देवांच्या जयंत्या (श्रीराम, हनुमान, श्रीकृष्ण, नृसिंह, श्रीदत्त ) bhajani malika ( mauli majhi )
]] हरिः ॐ [[
]] श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसज्ञ [[
माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉 Download
माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join
देवांच्या जयंत्या (श्रीराम, हनुमान, श्रीकृष्ण, नृसिंह, श्रीदत्त ) bhajani malika ( mauli majhi )
संपूर्ण वारकरी भजनी मालिका ( देवांच्या जयंत्या ) | Varkari Bhajani Malika ( Devanchya Jayantya )
***।। भजनी मालिका ।। ***
***।। मालिका सोळावी ।। ***
<<< देवांच्या जयंत्या >>>
( Devanchya Jayantya )
--{-{ श्रीराम जयंती }-}--
( Shree ram jayanti )
४४६.कुळगुरू वसिष्ठ सांगे नृपवरा । असती गरोदरा तुझ्या कांता ॥१ ॥ धर्मशास्त्र ऐसे डोहळे पुसावे । त्यांचे पुरवावे मनोरथा ॥२ ॥ ऐकोनिया ऐसें आनंद मानसीं । कैकयी सदनासीं जाता झाला ॥३ ॥ मंचकी बैसली होती ते पापिणी । देखतां नयनी पहुडली ॥४ ॥ सुंदरपणाचा अभिमान मनीं । त्यावरी गर्भिणी नामा म्हणे ॥५ ॥
४४७. राजा म्हणे इच्छा तुझिये मानसीं । डोहळे मजसी सांग आतां ॥ १॥ येरी म्हणे ऐसे वाटतसे जीवा । कनिष्ठासी द्यावें राज्यपट ॥२ ॥ ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा । नये समाचार त्याचा आम्हां ॥३ ॥ जनांत हे निंद्य वेदबााकर्म । करितां अधर्म पाप बहु ॥४ ॥ माझिये मस्तकी ठेवावा हा दोष । तुम्हाकडे लेश नाहीं नाहीं ॥५ ॥ निंदितील जन मन वाटे सुख । ऐकतांची दुःख राया झालें ॥६ ॥ वृश्चिकाचे पेवीं तक्षक पडत । घालितां हें घृत अग्निमुखीं ॥७ ॥ ऐशी व्यथा होय नामा म्हणे त्यासी । उठिला त्वरेसी तेथुनिया ॥८ ॥
४४८. येतसे दशरथ सुमित्रा मंदिरीं । देखतां सामोरी येती झाली ॥१॥ न माये आनंद तियेचे मानसीं । ठेवीं मस्तकासी चरणावरी ॥२ ॥ घालोनी आसन प्रक्षाळी चरण । सर्वांगीं लेपन तीर्थोदकें ॥३ ॥ गंध धूप दीप पुण्यांचिया माळा । अर्पूनी तांबुला उभी राहे ॥४ ॥ कैकयीचे दुःख विसरला राव । पाहुनियां भाव सुमित्रेचा ॥५ ॥ होती जे डोहळे तुझिये मानसी । सांग मजपासीं पतिव्रते ॥६ ॥ प्राणनाथा ऐसें वाटतसे जीवा । वडिलांची सेवा अहर्निशी ॥७ ॥ आवड हे एक नावडे आणिक । द्यावें मज एक हेंचि आतां ॥८ ॥ ऐकतांचीं ऐसें कांतेचे वचन । आनंदें निमग्न मन होय॥९॥ घेऊनियां हाती रत्नांचे भूषण । टाकी ओवाळून नामा म्हणे ॥१० ॥
४४९ . दशरथ राजा उठिला तेथूनी । कौसल्ये सदनीं जातां झाला ॥१ ॥ पाहातसे दृष्टी तेव्हां श्रावणारी । न माये अंतरीं तेज तिचें ॥ २॥ तुझिये मानसीं होती जे डोहळे । सांग वो वेल्हाळे मजपाशीं ॥३ ॥ उदरांत असें भक्तांचा कैवारी । तेथें कैंची उरी देहभावा ॥४ ॥ सदा समाधिस्थ रामरूप झाली । कौसल्या माउली नामा म्हणे ॥ ५ ॥
४५०. न बोलेचि कांहीं हिंसीं काय झालें । भूतें झडपिलें निश्चयेसी ॥१ ॥ माझीये अदृष्टी नाहीं हा नंदन । म्हणोनियां विघ्न ओढवलें ।॥ २॥ निवारी हे विघ्न वैकुंठ नायका । रक्षी या बाळका सुदर्शनें ।॥ ३ ॥ तुझा मी किंकर आजी अंबुजाक्षा । द्यावी मज भिक्षा हेचि आतां ॥ ४॥ नामाचा उच्चार ऐकतांचि कानीं । नेत्र उघडोनी पाहती झाली ॥ ५॥ राजा म्हणे कांहो ऐसी अवस्था । कांहो भ्रम चित्ता झाला असे ।। ६ ॥ विश्वाचा मी आत्मा स्वये असे राम । मजमाजी भ्रम कैंचा असे ।। ७॥ अवतार महिमा वाणी वेद माझा । सुरवरांच्या काजा नामा म्हणे ॥ ८ ॥
४५१. रावणे हे केलें लग्नामाजी विघ्नाअसे की स्मरण तुजलागीं ॥१ ॥ आणीरे धनुष्य लंका बिभीषणा देईन मी।।२ ॥ अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा । हनुमंता पाचारा लवकरी।।३ ॥ टाकोनि पर्वत बुझवारे सागरा । पायवाट करा जावयासी ॥४ ॥ लंकेपुढे मोठे माजवीन रण । तोडीन बंधन सुरवरांचें।॥५ ॥ विश्वामित्रयाग नेईन मी सिद्धी । मारीन कुबुद्धि दोघां जणा॥६॥खरदूरषणांचा घेईन मी प्राण । धनुष्य मोडीन भुजाबळे ॥७ ॥ ध्याती मज त्यांची बहुत आवडी । न विसंबे घडी त्यासी एक।।८ । बोलिला वाल्मिक तैसेचि करीन । वर्तोनी दावीन नामा म्हणे॥९ ॥
४५२. परब्रह्म पूर्ण आले माझे घरीं । न कळे अंतरीं नृपाचिया ॥१ ॥ करिती बडबड होती भूतचेष्ठा । पाचारा वसिष्ठा लवकरी ॥२ ॥ येउनि वसिष्ठ पाहे कौसल्येसी । नावरती तियेसी अष्टभाव।।३ ।। राजा म्हणे कैसें विपरीत झालें । वसिष्ठां झडपिलें महाभूते ॥४ ॥ श्रावणवधाचें अघ नाहीं जळालें । दुजें हे निर्मिले प्रारब्धासी ॥५ ॥ ऐकतांचि हांसे सावध होऊनी । बोलतसे झणी नामा म्हणे ॥६ ॥
४५३. विरंचीचा बाप क्षीरासागरवासी । ध्याती योगी त्यासी निरंतर ॥१ ॥ परेहूनि पर वैखरीहूनि दूरी कौशल्येचे उदरीं तोचि असे ॥२ ॥ बोलियेले जें जें नव्हे असत्य वाणी । न येऊ दे मनीं शंका कांहीं ॥३ ॥ माझें हें संचित धन्य धन्य आतां । पाहीन मी कांता लक्ष्मीच्या ॥ ४॥ धन्य धन्य धन्य अयोध्येचे लोक । वैकुंठनायक पाहतील ॥ ५॥ धन्य पशु पक्षी श्वापदें तरूवर । राजा रघुवीर पाहतील ॥६ ॥ त्रैलोक्यांत धन्य तूंचि एक नृपा । नामयाच्या बापा पाहाशील ॥७ ॥
४५४. उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसंताचा दिवस ॥१ ॥ शुक्लपक्षी ही नवमी । उभे सुरवर ते व्योमीं ॥२ ॥ माध्यान्हासी दिनकर । पळभरी होय स्थिर।।३ ॥ धन्य मीच त्रिभुवनीं । माझें वंशी चक्रपाणी ॥४ ॥ सुशोभित दाही दिशा । आनंद नरनारी मशेषा ॥५ ।। नाहीं कौशल्येसी भान । गर्मी आले नारायण ॥ ६॥ अयोनी संभव । प्रगटला हा राघव।।७ ।। नामा म्हणे डोळां । पाहीन भुवनत्रय पाळा ॥८ ॥
( शेवटचे चरण म्हणून गुलाल व फळे टाकणे आणि भजनासाठी खालील अभंग घेणे )
४५५. झालें रामराज्य काय उणे आम्हांसी । धरणी धरी पीक गाई वोळल्या म्हैसी ।। १॥ राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये । दळितां कांढितां जेवितां गे बाईये ॥ २॥ स्वप्नींही दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरे भय सुटलें कळिकाळा ॥ ३ ॥ तुका म्हणे रामें सुख दिले आपुलें । तया गर्भवासी येणे जाणे खुंटले ॥४ ॥
--{-{ श्री हनुमान जयंती }-}--
( Hanuman Jayanti )
४५६.देवांगना हाती आणविला शृंगी।यज्ञ तो प्रसंगी आरंभिला ॥१ ॥ विभांडका क्रोध आला असे भारी । अयोध्या भितरी वेगीं आला।।२ ।। राजा दशरथ सामोरा जाऊनी।अतिप्रिती करूनि सभे नेला।।३ ।। पुत्र सुषा दोन्ही देखतां नयनीं।आनंदला मनीं म्हमे नामा । | ४ ||
४५७. आनंदोनी म्हणे राया धन्य केलें । इच्छिले सोहळे पुरवीन ॥१ ॥ यज्ञाचा आरंभ करी लवलाह्यां । पुसोनि आचार्या वसिष्ठांसी ॥ २॥ सर्व ऋषीजन मिळाले सकळ । मंत्राचा कल्लोळ करिताती ॥ ३ ॥ नामा म्हणे शृंगी मुख्यत्वे शोभला । यज्ञ आरंभीला तेणे जेव्हां ॥४ ॥
४५८. आरंभीला यज्ञ संतोष सर्वत्र । आनंदें नगर दुमदुमीत।।१ ॥ यज्ञनारायण संतोष पावला । प्रत्यक्ष तो आला कुंडांतूनी ॥ २॥ पायस तें पात्र घेऊनियां करी । शृंगीस झडकरी बोलतसे ॥३ ॥ विलंब करितां विघ्न ओढवेल । सत्वर वहिले भाग करा ।। ४॥ नामा म्हणे देव येईल पोटासी । ऐसें गूज त्यांसी अग्नी सांगे ॥५ ॥
४५९ . विभाग सत्वर वसिष्ठाने केले राया बोलाविलें सन्निधची ॥१ ॥ प्रथम तो भाग कौसल्येची दिला । तेणें क्रोध आला कनिष्ठेसी ॥ २॥ येतांचि तो क्रोध विघ्न ओढवलें । मुखीं झडपिला पिंड घारी ॥ ३॥ आसडोनी पिंड घारीने 4 नेला । नामा म्हणे घातिला अंजनी करीं ॥४ ॥
४६०. ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी । आठविला अंतरीं सदाशिव ॥१ ॥ तपाचिया अंती शिव झाला प्रसन्न । मागे वरदान काय इच्छा ।।२ ।। येरी म्हणे तुजऐसा व्हावा मज पुत्र । ज्ञानी पवित्र भक्त उत्तम गुणी ॥३ ॥ म्हणतसे शिव अंजुळी पसरूनी । बैस माझें ध्यानीं सावधान ॥४ ॥ वायुदेव येऊनी प्रसाद देईल तुजला । भक्षीं कां वहिला अविलंबे ॥५ ॥ एका जनार्दनीं घारी नेतां पिंड । वायुनें प्रचंड आसडिला ॥६ ॥
४६१. घारी मुखींचा पिंड अंजनीच्या करीं । पडतां निर्धारी भक्षियेला ॥१ ॥ नवमास होतां झाली ती वायुसुत प्रगटला ॥२ ॥ वानराचा वेष सुवर्ण कौपीन । दिसती शोभायमान कुंटलें ती ॥ ३॥ जन्मतांची जेणे सूर्यातें धरियेले । इंद्रादिकां दिले थोर मार ॥४ ॥ अमरपति मारी वज्र हनुवटीं । पडिला कपाटीं मेरूचिया।॥५ ॥ वायुदेव येवोनी बाळ तो . उचलिला । अवघाचि रोधिला प्राण तेथें ।। ६॥ सकळ प्रसूत । दिव्य देव मिळोनि प्रसन्न पै होती । वरदान देती मारूतीसी ।। ७॥ सर्व देव मिळोनि अंजनीशी बाळा देतां प्रातःकाळ होतां तेव्हा ॥८ ॥ तिथी पौर्णिमा चैत्रमास जाण । एका जनार्दनीं रूपासी आला॥९॥
४६२. पिंड घारीने झडपिला । अंजनीनें तो सेविला ॥ १॥ अंजनीच्या तपासाठीं । महारुद्र आले पोटीं ॥ २॥ चैत्र शुद्ध पौर्णिमेसी । सूर्योदय समस्यासी ॥ ३॥ महारूद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला ॥४ ॥
( गुलालयुक्त पुष्पवृष्टी करणे )
--{-{ श्रीकृष्ण जयंती }-}--
( Shreekrushna jayanti )
४६३. पापी जे अभक्त दैत्य ते मातले । धरणी झाले ओझें त्यांचें ॥१ ॥ दिधलासे त्रास ऋषी मुनि सर्वा । न पूजिती देवा कोणी एक ॥२ ॥ राहियेले यज्ञ मोडलें कीर्तन । पळाले ब्राह्मण दैत्यां भेणें ॥३ ॥ वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय । नेत्री वाहे तोय सांगतसे।।४ ॥ बुडविला धर्म अधर्म झाला फार । सोसवेना भार मज आतां ॥५ ॥ ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव । चालियेले सर्व क्षीराब्धीशीं ॥६ ॥ नामा म्हणे आतां करितील स्तुती । सावधान चित्ती परिसावे।।७ ।।
४६४. वासुदेवा हृषिकेशा माधवा मधुसूदना । करिताती स्तवना पुरुषसुक्त ॥१ ॥ पद्मनाभा त्रिलोकेशा वामना शेषशायी । आम्हां कोणी नाहीं तुजवीण ।। २॥ जनार्दना हरि श्रीवत्सला गरूडध्वजा । पाव अधोक्षजा आतां आम्हां ।। ३ ।। वराहा पुंडरीका नृसिंहा नरांतका । वैकुंठनायका देवराया ।। ४ ।। अच्युता शाश्वता अनंता अज अव्यया । कृपेच्या अभया देई आम्हां ।। ५॥ नारायणा देवाध्यक्षा कैटभ भंजना । करीरे मर्दना दुष्टांचिया ॥ ६॥ चक्रगदाशंखपाणि नरोत्तमा । पाव पुरूषोत्तमा दासा तुझ्या ।। ७॥ रामा हयग्रीवा भीमा रौद्रोभ्दवा । आश्रय भूतां सर्वा तुझा असे ॥ ८॥ श्रीधरा श्रीपते चतुर्बाहो मेघःश्यामा । लेकुरे आम्ही आम्हां पाव त्वरें ।। ९ ॥ नामा म्हणे ऐसें करितां स्तवन । तोषला भगवान क्षीराब्धींत ॥१० ॥
४६५. आकाशींची वाणी सांगे सकळांसी । तळमळ मानसी करूं नका ॥ १॥ देवकीच्या गर्भा येईल भगवान । रक्षील ब्राह्मण गाई भक्त ॥ २ ॥ उतरील भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वांशी करील तो ॥ ३॥ रोहिणी उदरीं शेष बळीभद्र । यादव समग्र व्हारे तुम्हीं।।४ ॥ ऐकोनियां ऐसे आनंद मानसीं । येती स्वस्थळासी नामा म्हणे ।। ५ ॥
४६६. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊ आतां ॥ १॥ पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार । गा - हाणे सुरवर सांगू आले ॥२ ॥ शेष म्हणे मज श्रम झाले फार । यालागी अवतार मी न घेचि ॥ ३॥ रामअवतारी झालों लक्ष्मण । सेवीले अरण्य तुम्हां सवें ॥४ ॥ चौदा वर्षावरी केलें उपोषण । जाणतां आपण प्रत्यक्ष हें ।। ५॥ नामा म्हणे ऐसे वदे धरणीधर । हांसोनि श्रीधर काय बोले ।॥ ६ ॥
४६७. पूर्वी तूं अनुज झालासी कनिष्ठ । सोशियेले कष्ट मज सर्वे ॥१ ॥ आतां तूं वडील होई गा सर्वज्ञा । पाळीन मी आज्ञा तुझी बा रे ॥ २ ॥ देवकी उदरीं रहावें जावोनि । मायेसी मागूनि पाठवितों ॥३ ॥ योगमाया तुज काढील तेथून । घालील नेऊन गोकुळासी ।।४।। लक्ष्मीशी सांगे तेव्हा हृषीकेशी । कोडण्यपुरासी जावें तुम्ही ।। ५॥ नामा म्हणे ऐसा करूनि विचार । घ्यावया अवतार सिद्ध असे ॥ ६ ॥
४६८. देवकी कवण वासुदेव कवण । सांगावी खूण नागबाळा ॥१ ॥ ऐकोनी उत्तर देव म्हणे पाही । बोलतो लवलाही चित्त देई ॥२ ॥ सुतपा पृश्री ते अनुष्ठाणी दोघे । करुनियां तपे वर मागे ॥३ ॥ तया दिला वर पुत्र मी होईल । यालागी कारण आहे तेथे ॥४ ॥ तीचि दोघे झाली वासुदेव देवकी । म्हणोनि यादवी जन्म घेणे ॥५ ॥ तयाचा वृत्तांत आता कोठे आहे । सांगेन लवलाहे नामा म्हणे ॥६ ॥
४६९. वसुदेवा देत देवकी बहीण । लग्नामधे विघ्न झालें ऐका ॥१ ॥ आकाशीची वाणी सांगतसे कंसा । मानी हा भरंवसा बोलण्याचा ॥२ ॥ आठवा ईचा पुत्र वधील तुजशी । ऐकोनी मानसीं क्रोधावला ॥ ३ ॥ घेऊनियां खड्ग माराया धांवला । हात तो धरिला वसुदेवें ॥ ४॥ देईन मी पुत्र सत्य माझें मानी । ठेवा बंदीखानी दूता सांगे ।। ५॥ पुण्य सारावया भेटे देवऋषी । वधी बाळकाशी ठेवू नको ॥ ६॥ होतांचि प्रसूत नेऊनिया देत । सहाही मारीत दुराचारी ।। ७ ॥ धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक । वधितां बाळक नामा म्हणे ॥ ८ ॥
४७०. सातवा जो गर्भ योगमाया नेत । आश्चर्य करीत मनामाजीं ॥१ ॥ रोहिणी उदरीं नेवोनि घातला । न कळे कोणाला देवावीण ॥२ ॥ कंसाचिया भेणें यादव पळाले । ब्राह्मण राहिले अरण्यांत ॥३ ॥ नाहीं कोणा सुख तळमळ मानसीं । वधील दुष्टांसी कोण आतां ॥४ ॥ विश्वाचा जो आत्मा कळलें तयाला । दावितसे लीला संभूतीची ॥५ ॥ अहर्निशी ध्यान भक्तांचे मानसीं । स्थापील धर्मासी नामा म्हणे ॥६ ॥
४७१. देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचे हृदय जळतसे ॥१ ॥ हरणे पळती देखोनियां व्याघ्र । कापे थरथर तयापरी ।। २ ।। अजासर्पन्यायें कीटक भ्रमर । दिसती नारीनर कृष्णरूप ॥ ३॥ जेवितां बोलतां सेजेसी तो निजे । आला आला मज मारावया ॥ ४ ॥ नाशील हा आतां दैत्याचे तें बंड । फाटलीसे गांड तेव्हां त्याची ।। ५ ।। नामा म्हणे भये लागलेंसे ध्यान । चराचरी कृष्ण दिसतसे ॥ ६ ॥
४७२. विमानांची दाटी अंतरिक्षीं देव । करिताती सर्व गर्भस्तुती ॥१ ॥ सत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ति । यज्ञेशा तुजप्रति नमो नमो ॥ २॥ सहा जणे भांडती नव जणी स्थापिती । न कळे कोणाप्रती अंत तुझा ॥३ ॥ अठरा जणे तुझी वर्णिताती कीर्ति । गुणातीत श्रीपति नमो तुज ॥ ४॥ चौघा जणा तुझा नकळेची पार । श्रमसी वारंवार आम्हांसाठी ॥ ५॥ अठ्यांशी सहस्त्र जन्ममरणाचें नाही तया भय । आठविती पाय तुझे जे परब्रह्ममूर्ति तुज नमो ॥ ८॥ नामा म्हणे ऐशी करिताती स्तुती । पुष्पं वाहूनि जाती स्वस्थळांसी ।।९ ||
४७३. मयूरादि पक्षी नृत्य करिताती । नद्या वाहताती दोहीं थड्या।।शा भूमीवरी सडे केशर कस्तुरी । आनंद अंतरी सकळांच्या।।शा विमानांची दाटी मुरवर येती । गंधर्व गाताती सप्तस्वरें।।३ ।। मंद मंद मेघ गर्जना करीती । वाद्ये वाजताती नानापरीं || ४ || नामा म्हणे स्वर्गी नागारे वाजती । अप्सरा नाचती आनंदानें।।4 ।।
४७४. दशरथें मारिला तोचि होता मास । वर्षाऋतु असे कृष्णपक्ष ॥ १॥ वसुनाम तिथी बुधवार असे । शुक सांगतसे परीक्षिती ॥ २॥ रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र । माया घाली अस्त्र रक्षपाळां ।। ३ ।। नवग्रह अनुकूल सर्वांचें जें मूळ । वसुदेव कपाळ धन्य धन्य ॥ ४॥ जयाचा तो वंश तयासी आनंद । माझ्या कुळीं गोविंद अवतरला।।५ ।। अयोनीसंभव नोहे कांहीं श्रमी । नामयाचा स्वामी प्रगटला ।। ६ ॥
( शेवटचे चरण म्हणून गुलाल व पुष्प टाकणे . )
४७५. गौळण म्हणे गौळणीला । पुत्र झाला यशोदेला ॥१ ॥ एक धांवे एकीपुढें । ताटी वाटी F + सुंठवडे।।२ ।। सुइणीची गलबल झाली । दासी जनी हेल घाली ॥३ ॥
४७६.गोकुळींच्या सुखा।अंतपार नाही लेखा ॥१॥बाळकृष्ण नंदाघरीं । आनंदल्या नरनारी ॥२ ॥ गुढिया तोरणे करिती कथा गाती गाणे॥३॥तुका म्हणे छंदे । येणें वेधिलें गोविंदे ॥४ ॥ ।
--{-{ नृसिंह जयंती }-}--
( Nrusinh jayanti )
४७७. क्रोधयुत्क पिता पुसे प्रल्हादासी । सांग हृषिकेशी कोठे आहे ॥१ ॥ येरूं म्हणे जळी स्थळी काष्ठी भरला । व्यापुनी राहिला दिशाद्रुम।।२ ।। एका जनार्दनी ऐकातांची मात । मारितसे लाथ खांबावरी ॥३ ॥
४७८. दुर्जन तो लाथ मारी खांबावरी । स्तंभी नरहरी प्रगटला ॥१॥धावुनिया हरि आडवा तो घेतिला । हृदयी विदारिला हस्तनखी।।२ ।। एका जनार्दनी भक्ताचे रक्षण । स्वये नारायण करितसे।।३ ।।
--{-{ श्रीदत्त जयंती }-}--
( Shree Datta Jayanti )
४७९. पैल मेरूच्या शिखरीं । एक योगी निराकारी । मुद्रा लावूनी खेचरी । प्राणायामी बैसला ।। १॥ तेणें सांडियेली माया । त्यजियली कंथा काया । मन गेलें विलया । ब्रह्मानंदा माझारी ।।2 || अनुहत ध्वनि नाद । तो पावला परमपद । उन्मनीं तूर्या विनोदें । छंदें छंदें डुल्लतसे ।। ३॥ ज्ञान गोदावरीच्या तीरीं । मान केलें पांचाळेश्वरी । ज्ञानदेवाच्या अंतरीं । दत्तात्रय योगिया ॥ ४ ॥
४८०. तीन शिरे सहा हात ।तया माझे दंडवत ।।१।।काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान।।२।।माथा शोभे जटाभार । अंगी विभूती सुंदर।।३।।शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ।।४ ।। तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ।।५ ।।
४८१. धरी अवतार विश्व तारावया । अत्रीची अनुसूया गरोदर।।१ ।। ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनी पूर्ण तिथी ।।२ ।। तिथी पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सव काळ ।।३ ।। एका जनार्दनीं पूर्ण अवतार । निर्गुण निराकार आकारले।।४ ।।
MajhiMauli-blogger
Post a Comment