मदालसा & ताटीचे अभंग | bhajani malika ( mauli majhi )
]] हरिः ॐ [[
]] श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसज्ञ [[
मदालसा & ताटीचे अभंग
माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉 Download
माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join
संपूर्ण वारकरी भजनी मालिका | Varkari Bhajani Malika in marathi (Maulimajhi-blogger)
***।। भजनी मालिका ।। ***
~~~ मालिका तेरावी ~~~
( Malika Teravi )
**]] मदालसा [[**
( Madalasa )
३७४.उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा । आलासी कवण्या वाटां मातेचिया गर्भवासा । जो पंथ वोखटा रे पचलासि कर्मकोठा । अविचार बुद्धि तुझी पुत्रराया अदटा ॥ १॥ पर्ये दे मदालसा सोइं जो जो रे बाळा । निजध्यानीं निज पा रे लक्ष लागो दे डोळां । निज तें तूं विसरलासी होसी वरपडा काळा॥धृ .॥ नवमास कष्ठलासी दहाव्याने प्रसूत झाली । येतांचि कर्म जाळ तुझी मान अडकली । आकांतु ते जननीये दुःखें धाय मोकली । स्मरे त्या हरिहरा ध्यायीं श्रीकृष्ण माउली ॥ २॥ उपजोनि दुर्लभु रे मायबापा झालासी । वाढविती थोर आशा थोर कष्टी सायासी । माझे माझे म्हणोनियां झणी वायां भुलसी । होणारं जाणार रे जाण नको गुंफो भवपाशीं ।। ३ ॥ हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बाधा । वरी चर्म घातलें रे कर्म कीटकांचा सांदा । रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा । स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा।।४ ॥ या देहाचा भरंवसा पुत्रा न धरावा ऐसा । माझें माझे म्हणोनियां बहु दुःखाचा वळसा । बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा । तृष्णा सांडुनियां योगी गेले वनवासा ।। ५॥ या पोटाकारणे रे काय न करिजे एक । या लागी सोय धरीरे तिहीं भुलविले लोक । ठाईचें नेमियले त्यांचे आयुष्य भविष्या लल्लाटीं ब्रह्मरेखा नेणती ते ब्रह्मादिक ।। ६ ।। जळींची जलचरें रे जळींचिया रमती । भुलली ती बापुडी रे ते कांही नेणती । जंव नाही पुरली रे त्यांची आयुष्यप्राप्ती । वरि घालुनि भोंवर जाळ बापा तयातें गिवसिती ॥ ७ ॥ मदालसा पक्षिणी पक्षीयारे निरंजनी ये वनीं । पिलियाकारणें रे गेली चारया दोन्ही । अवचिती सांपडली पारधियालागुनी । गुंतुनिया मोहोपाशी प्राण त्यजिती दोन्ही ।। ८॥ मृग हा चारियारे अतिमानें सोकला । अविचार बुद्धि त्याची परतोनि मागुता आला । तंव त्या पारधियाने गुणी बाणु लाविला । आशा रे त्यजूनिया थिता प्राणा मुकला ।। ९ ॥ अठराभार वनस्पती फुली फळी वोळती । बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती । ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती । हे सुख सांडुनियां कासया योग सेविती ।। १०॥ हे सुख सांडूनियां कोण फळ तयासी । कपाट लंघुनिया योगी ध्याती कवणासी । योग तो सांग मज कवण ध्यान मानसीं । सर्वत्र गोविंदु रे हृदयीं ध्याई हृषीकेषी ।। ११ ।। इतुकिया उपरी रे पुत्रा घेई उपदेशु । नको भुलों येणें भ्रमें जिवित्वाचा होईल नाशु । क्षीरा निरा पारखी रे परमात्मा राजहंसु । निर्गुण निर्विकार पुत्रा सेवीं ब्रह्मरसु ।। १२॥ इतुकिया उपरी रे पुत्रा माते विनविता झाला । संसारसोहळा हा थोरा कष्टी जोडला । पंचभुतें निवती येथे म्हणोनी विश्रामु केला । ओखटा गर्भवासु कवणा कार्या रचिला ।॥ १३॥ गीची यातना रे पुत्रा ऐके आपुल्या कानीं । येतां जातां येणें पंथें सागाती नाहीं रे कोणी । अहंभावो प्रपंचु पुत्रा सांडी रे दोन्ही । चौऱ्यांशी जीवयोनी प्रवर्तले मुनीजन तत्क्षणी ॥ १४ ॥ वाहतां महापुरीं रे पुत्रा काढिलें तुज । रक्षिलासी प्रसिद्ध सांपडलें ब्रह्मबीज । मग तुज ओळखी नाहीं का रे नेणसी निज । आपोआप सद्गुरु कृपा करील सहज ॥१५ ॥ उपजत रंगणा रे पुत्रा तुवा जावें वना । बैसोनि आसनी रे पाहे निर्वाणीच्या खुणा । प्राणासी भय नाहीं तापत्रयाचरणा । मग तुज सौरसु पाहा रे परब्रह्मीच्या खुणा ॥ १६॥ बैसोनी आसनी रें पुत्रा दृढ होई मनीं । चेतवी तूं आपणापे चेतवी तें कुंडलिनी । चालतां पश्चिम पंथें जाई चक्र भेदूनी । सतरावी जीवनकळा पाहे आत्मा हा चिंतुनी ॥१७ ॥ मग तूं देखसी त्रिभुवन स्वर्ग मृत्यु पाताळ । नको भुलों भ्रमें सांडी विषय पाल्हाळा आपणापें देखपारे स्वरूप नाहीं वेगळं । परमात्मा व्यापकु रे पाहा परब्रह्म सांवळे ॥ १८॥ इतुकिया उपरी रे पुत्र तो विनवी जननी । परियेसी माउलिये संतोषलों तत्क्षणीं । इंद्रायणीं महातटीं विलासलों श्रीगुरूचरणीं । बोलियेले ज्ञानदेवो संतोषलों वो मनीं ॥१ ९ ॥
३७५.श्रीगुरू देवराया प्रणिपातु जो माझा । मूळ तूंचि विश्वव्यापका बीजा । समाधि घेई पुत्रा स्वानंदाचिया भोजा । पालखी पहुडलिया नाशिवंत रे माया ॥१ ॥ जाग रे पुत्रराया जाई श्रीगुरु शरण । देह तूं व्यापिलासी चुकवी जन्ममरण । गर्भवासु वोखटा रे तेथें दुःख दारूण । सावध होई कारे गुरपुत्र तुं सुजाण॥धृ ० ॥ मदालसा म्हणे पुत्रा ऐक बोलणे माझे । चौऱ्यांशी घरामाजीं मन व्याकुळ तुझें । बहुत सिणतोसी पाहतां विषयासी वांझे । जाण हे स्वप्नरूप येथें नाहीं वा दुजे।।२ ।। सांडी रे सांडी बाळा सांडी संसार छंदु । माझिया मोहळ रे रचियेला रे कंदु । झाडूनि आणखी नेला तया फुकटचि वेधु । तैसी परी होईल तुज उपदेशें आनु।।३।।सत्त्व रज तम हे तुज लाविती चाळा । काम क्रोध मद मत्सर तुज गोविती खेळा । यांसवें झणे जासी सुकुमारा रे बाळा । अपभ्रंशी घालतील मुकशील सर्वस्वाला॥४॥कोसलियाने घर सदृढ पैं केलें । निर्गमु न विचारितां तेणें सुख मानियेलें । झालें रे तुज तैसें यातायाती भोगविलें । मोक्षद्वार चुकलासी दृढ कर्म जोडिलें॥५॥सर्पे पै दुर्दर धरियेला रे मुखीं । तेणेंहि रे माशी धरियेली पक्षी । तैसा नव्हे ज्ञानयोगु आपआपणातें भक्षी । इंद्रिया घाली पाणी संसारीं होई रे सुखी ॥६ ॥ पक्षिया पक्षिणीरे निरंजनी ये वनीं । पिलियाकारणे रे गेली चारया दोन्ही । मोहजाळे गुंतली रे प्राण दिधले टाकुनी । संसार दुर्घट हा विचारू पाहे परतुनी ॥७ ॥ जाणत्या उपदेशु नेणतां भ्रांती पडिला । तैसा नव्हे ज्ञानप्रकाशु ज्ञानदेवो अनुवादला । अनुभवीं गुरुपुत्र तोचि स्वयें बुझाला । ऐक त्या उद्धरणा गायक सहज उद्धरला।।८ ॥
।। मालिका चौदावी ।।
( Malika Chaudavi )
।**** ताटीचे अभंग ****।
( Tatiche Abhang )
३७६. योगी पावन मनाचा । साहे अपराध जनाचा || || विश्व रागे झाले वन्ही । संती सुखें व्हावे पाणी ॥२ ॥ शब्दशस्त्रे झाले क्लेश । संतीं मानावा उपदेश।।३ ।। विश्वपट ब्रह्मदोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४ ||
३७७. सुखसागरी वास झाला । उंच नीच काय त्याला॥शा अहो आपण जैसें व्हावें । देवें तैसेंचि करावें || २ || ऐसा नटनाट्य खेळ । स्थिर नाहीं एक वेळ || ३ || एकापासूनि अनेक झालें । त्यासी पाहिजे सांभाळिलें।।४ ।। शून्य साक्षित्वे समजावें । वेद ओंकाराच्या नावें || ५ || एकें उंचपण केलें । एक अभिमानें गेलें।।६ ।। इतुके टाकूनि शांति धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।७ ||
३७८. वरी भगवा झाला नामें । अंतरीं वश्य केला कामें ॥१ ॥ त्याला म्हणूं नये साधू । जगीं विटंबना बाधु ॥२ ॥ आपआपणा शोधूनि घ्यावें । विवेक नांदे त्याच्यासवें।।३ ।। आशा दंभ अवघे आवरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४ ॥
३७९ . संत तोचि जाणा जगीं । दया क्षमा ज्याचें अंगी ॥१ ॥ लोभ अहंता नये मना । जगीं विरक्त तोचि जाणा।।२ ॥ इहपर लोकी सुखी । शुद्ध ज्ञान ज्याचें मुखीं।।३ ॥ मिथ्या कल्पना मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४ ॥
३८०. एक आपण साधु झाले । येर कोण वायां गेले।।१ ।। उठे विकार ब्रह्मीं मूळ । अवघे मायेचे गाबाळ।।२ ।। माया नुरे जेव्हां । विश्व ब्रह्म होईल तेव्हां ॥३ ॥ ऐसा उमज आदी अंती । मग सुखी व्हावें संतीं ॥४ ॥ चिंता क्रोध मागें सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।५ ।।
३८१. ब्रह्मा जैसे तैशापरी । आम्हां वडील भूतें सारी ।। १ ।। हात आपुला आपणा लागे । त्याचा करूं नये खेद।।२ ॥ जीभ दातांनी चाविली । कोणे बत्तिशी ताडिली ॥३ ॥ थोर दुखावलें मने । पुढे उदंड शहाणे ॥४ ॥ चणे खावे लोखंडाचे । मग ब्रह्मपदीं नाचे ॥५ ॥ मन मारूनी उन्मन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६ ॥
३८२. सुख सागर आपण व्हावें । जग बोधे निववावें ॥१ ॥ बोधा करूं नये अंतर । साधु नाहीं आपपर ॥२ ॥ जीव जीवासी पैं द्यावा । मग करूं नये हेवा।।३ । तरूणोपाय चित्तीं धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४ ॥
३८३. अहो क्रोधे यावें कोठें । अवघे आपण निघोटे ॥१ ॥ ऐसें कळलें उत्तम । जन तेचि जनार्दन।।२ ।। ब्रीद बांधिलें चरणीं । नये दावितां करणी ॥३ ॥ वेळ क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला ॥४ ॥ ऐसी थोर दृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५ ॥
३८४. सांडी कल्पना उपाधी । तीच साधुला समाधी ॥१ ॥ वाद घालावा कवणाला । अवघा द्वैताचा हो घाला ॥२ ॥ पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय।।३।।एक मन चेष्टा करी । भूतें बापुडी शेजारी॥४॥अवघी ईश्वाराची करणी । काय तेथे केले कोणी।।५ ।। पुन्हा शुद्ध मार्ग धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६ ॥
३८५. गिरी गव्हारें कशासाठीं । रागें पुरविली पाठी।।१ ।। ऐसा नसावा संन्यासी । परमार्थाचा जो कां द्वेषी।।२ ॥ घर बांधिलें डोंगरी । विषया हिंडे दारोदारी ॥३ ॥ काय केला योगधर्म । नाहीं अंतरी निष्काम।।४ ॥ गंगाजळ हृदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।५ ।।
३८६. शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरीं नाहीं देव त्याला ॥१ ॥ अवधी साधने हातवटीं । मोलें मिळत नाहीं हाटी।।२ ।। अहो आपण तैसें व्हावें । अवघे अनुमानूनि घ्यावें।।३ ॥ ऐसें के लें सद्गुरुनाथे । बापरखुमादेवीकांते ॥४ ॥ तेथे कोणी शिकवावे । सार साधूनियां घ्यावे ॥५ ॥ लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुद्दल ठायींचे ठायीं ॥६ ॥ तुम्ही तरून विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।७ ।।
MajhiMauli-blogger
Post a Comment