नाटाचे अभंग ( bhajani malika ) mauli majhi

shreyash feed ads 2

]] हरिः  ॐ [[

]] श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसज्ञ [[

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download


संपूर्ण  वारकरी भजनी मालिका ( नाटाचे अभंग ) | Varkari Bhajani Malika ( Natache Abhang  ) in marathi  (Maulimajhi-blogger) 

***।। भजनी मालिका ।। ***

--- ।। मालिका बारावी ।। --- ( malika Baravi )

 *** नाटाचे अभंग ***

( natache Abhang )

            ३१३.विठ्ठल आमुचें जीवन । आगम निगमाचे स्थान । विठ्ठल सिद्धीचे साधन । विठ्ठल ध्यान विसावा ।। १ ।। विठ्ठल कुळींचे दैवत । विठ्ठल वित्त गोत चित्त । विठ्ठल पुण्य पुरूषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ।। २ ।। विठ्ठल विस्तारला जनीं । सप्तही पाताळ भरूनी । विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनि मानसीं ।। ३ || विठ्ठल जीवाचा जिव्हाळा । विठ्ठलकृपेचा कॉवळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेला चाळा विश्व विठ्ठलें ।। ४ ।। विठ्ठल मायबाप चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका म्हणे आतां नाहीं दुसरें ।। ५ ।।

             ३१४. बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिलाचि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ।। १ ।। बरवा फळला शकुन । अवधा निवारिला सीण । तुमचें झालिया दरूषण । जन्म मरण नाहीं आतां ।। २ ।। बरवें झालें आलों या ठाया । होतें संचित ठायींचे पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मींची ।। ३ ।। जोडिले हे न सरे धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूर्ती मधुसूदन । समचरणी देखियेला ।। ४ ।। जुनाट जुगादिचे नाणें । बहुता काळाचें ठेवणे । लोपलें होतें पारिखेपणें । ठाव चळणे चुकविला ।। ५ ।। आतां या जिवाचियासाठीं । न सोडी पडलिया मिठी । तुका म्हणे सीणलों जगजेठी । न लवी दिठी दुसऱ्याची ।। ६ ॥ 

            ३१५. मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी । तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानिधी मायबापा ।। १ ।। नाहीं ऐकिले गाईले गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ।। २ ।। नाहीं केला करविला परोपकार । नाहीं दया आली पीडितां पर । करूं नये तो केला व्यापार । पाहिला भार कुटुंबाचा ।। ३ ।। नाहीं केलें तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड कर चरण । नाहीं संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मूर्तीचे ।। ४ ।। असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय । न कळे हित करावें तें काय । नये बोलूं आठवू तें ।। ५ ।। आपआपण्या घातकर । शत्रु झालों मी दावेदार । तूं तंव कृपेचा सागर । उतरी पार तुका म्हणे ।। ६ ॥ 

            ३१६. आतां पावेन सकळ सुखें । खादलें कदा तें न देखें । अवघे सरलें पारिखें । सकळ देखें माहियेर ।। १ ।। जवळी विठ्ठल रखुमाई । बहिण बंधु बाप आई । सकळ गोताचीच साई । पारिखें काई ऐसें नेणिजे ।। २ ।। जगदाकारी झाली सत्ता । वारोनि गेली पराधीनता । अवघे आपुलेचि आतां । लाज आणि चिंता दुरावली ।। ३ ।। वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरी । करवी तैसे आपण करी । भीड न धरीं चुकल्याची ।। ४ ।। सोसिला होता सासुरवास । बहुतांचा बहुत दिवस । बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ।। ५ ।। करिती कवतुक लाडें । मज बोलाविती कोडें । मायबाप उत्तरें गोडें । बोले बोबडे पुढे तुका ।। ६ ।। 

            ३१७. सर्व सुखाचिया आशा जन्म गेला । क्षण एक मुक्ति यत्न नाही केला । हिंडतां दिशा सीण पावला । माया वेष्ठिला जीव माझा ।। १ ।। माझे स्वहित नेणती कोणी । कांहीच न करिती मजवांचूनि । सज्जन तंव सुखाची मांडणी । नेणती कोणी आदि अंत ।। २ ।। काय सांगों गर्भाची यातना । मज भोगितां नारायणा । मांस मूळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असे ।। ३ ।। मज चालतां प्रयाणकाळीं । असतां न दिसती जवळीं । मृतिके मृतिका कवळी । एकलें मेळी संचिताचे।।४ ।। आतां मज ऐसें करी गा देवा । कांही घडे तुझी चरण सेवा । तुका विनवितसे केशवा । चालवी दावा संसारें ।। ५ ।।

             ३१८. अगा ए सावळ्या सगुणा । गुणनिधिनाम नारायणा । आमची परिसावी विज्ञापना । सांभाळी दीना आपुलिया ।। १ ।। बहु या उदराचे कष्ट । आम्हांसी केलें कर्मभ्रष्ट । तुमची चुकविली वाट । करी वटवट या निमित्ये ।। २ ।। झालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न कळे कधी सोडविसी । दृढ पाशी बहु बांधलों ।। ३ ।। येथें तो नये आठवं कांही । विसावा तो क्षण एक नाहीं । पडिलों आणिके प्रवाहीं । हित तो कांही दिसेचना ।। ४ ।। जीवित्व वेचिलें वियोगें । हिंडतां प्रवास वाउगे । कांही व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी।।५ ।। माझा मीच झालो शत्रु । कैचें पुत्र दारा कैंचा मित्रु । कासया घातला पसारू । अहो जगद्गुरू तुका म्हणे ।।६ ।।

             ३१९ . आतां मज धरवावी शुद्धि । येथुनी माझे परतवावी बुद्धी । घ्यावें सोडवूनी कृपानिधी । सांपडलों चूनि संधी काळचक्रीं ।।१ ।। करसील तरी नव्हें काई । आदि राईचा डोंगर पर्वत राई । आपुले करुणेची साई । करी गिता वो आई मजवरी ।।२ ।। मागील काळ अज्ञानपणे । सरल्ला स्वभावें त्या गुणें । नेणे आयुष्य होतें उणें । ta न पुढील पेणें अंतरलों ।।३ ।। आतां मज वाटतसे भय । नेळी दिवसेंदिवस चालत जाय । तेथें म्यां येऊनी केलें काय । जांही नाहीं तुझें पाय आठविले ।। ४ ।। करूनी अपराध क्षमा । नवी होतील केले पुरुषोत्तमा । आपुलें नामीं द्यावा प्रेमा । सोडवी भ्रमापासुनियां ।। ५ ।। हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव पायापें चरणीं । करूं हा रस सेवन वाणीं । फिटे तों धणी तुका म्हणे ।। ६ ।। 

            ३२०. जेणे हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाईन गुम तयाचे।।१ ।। जो या भीवरेच्या तीरीं । कट धरूनियां करीं । पाऊलें समचि साजिरी । अंतरीं धरोनी राहेन ।।२ ।। जो या असुरांचा काळ । भक्तजनप्रतिपाळ । खेळे हा लाघवें  सकळ । तयाच्या भाळ पायांवरी।।३।।जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळी स्वामी माझा।।४।।जो हा लावण्यपुतळा ।जयाचे अंगीं सकळ कळाजया चे गळा वैजयती माळा । तया वेळोवेळी दंडवत ।।५ ।। जयाचें नाम पाप नासी । लक्ष्मी ऐसी जयाची दासी । जो हा तेजोपुंज रासी । सर्व भावं त्यासी तुका शरण।।६ ।। 

            ३२१. काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसें तुम्ही सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ।।१ ।। काय हे खंडईल कर्म । पारूषतील धर्माधर्म । कासयाने ते कळेल वर्म । म्हणऊनी श्रम वाटतसे ।।२ ।। काय हे स्थिर राहेल बुद्धि । कांहीं अरिष्ट न येल की मधीं । धरिलें जाईल त सिद्धी । शेवट तो कधीं मज न कळे।।३ ।। काय ऐसें पुण्य होईल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी । मज तो कुरवाळील जगजेठी । दाटईन कंठीं सद्गदीत ।।४ ।। काय हे निवतील डोळे । सुख तें देखोनी सोहळे । संचित कैसें तें न कळे । होतील डोहळे वासनेसी।।५ ।। ऐसी चिंता करीं सदा सर्वकाळ । रात्रंदिवस हेचि तळमळ । तुका म्हणे नाहीं आपुलें बळ । जेणे फळ पावेन निश्चयेसीं ।।६ ।। 

            ३२२. जेणे हा तुझा विसर न पडावा । हाचि भाव माझिया जीवा । पुरवी देवा मनोरथ ।।२ ।। मज भाव प्रेम देई प्रीति । गुण नाम . वर्णावया स्तुती । विघ्ना सोडवूनी हातीं । विनंती माझी परिसावी हे।।३ ।। आणिक काहीं नाहीं मागणें । सुख संपत्ति राज्यचाड धनें । सांकडे न पडे तुज जेणें । भक्तावीण मायबापा ।। ४ ।। जोडोनी कर पायीं ठेवितो माथा । तुका विनवी पंढरीनाथा । रंगीं वोडवावी रंगकथा । पुरवीं मनोरथा मायबापा।।५ ।।

             ३२३. सेंदरीहेंदरी दैवतें । कोण ती पूजी भूतें खेतें । आपुल्या पोटा जी रडतें । मागती शितें अवदान ।। १ ।। आपुलें इच्छे आणिकां पीडी । काय तें देईल बराडी । कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी द्धी । बुद्धि अधिरा ।। २ ।। दासीचा पाहुणेर उखीतें । धणी देईल आपुल्या हातें । करूणाभाषण उचितें । हे तों रितें सतत शक्तिहीन।।३ ।। काय तें थिल्लरीचे पाणी । ओठ न भिजे न फिटे धणी । सीण तरी आदी अवसानीं । क्षोभे पुरश्चरणी दिलें फळ ।। ४ ।। विलेपनें बुजविती तोंड । भार खोळ वाहतीं उदंड । करविती आपआपणया दंड । ऐशियास भांड म्हणे देव तो ।। ५ ।। तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनार्दन । तुका म्हणे त्याचे करा चिंतन । वंदूं चरण येती सकळ ।। ६ ।। 

            ३२४. विषय ओढी भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव । नुपजे नारायणी भाव । पावोनि ठाव नरदेह ।। १ ।। कोण सुख धरिलें संसारीं । पडोनि काळाचे आहारी माप या लागले शरीरीं । जालियावरी सळे ओढिती ।। २ ।। बापुडी होतील शेवटीं । आयुष्यासवें झालिया तुटी । भोगिले मागे पुढेही कोटी । होईल भेटी जन्मासी ।। ३ ।। जुतिले घाणा बांधोनि डोळे । मागें जोडी आर तेणेंहि पोळे । चालिलों किती ते न कळे । दुःखें आरंबळे भूक तहान ।। ४ ।। एवढे जयाचे निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित । तें हें देह मानूनी अनित्य । न करिती कां नित्य नामस्मरण ।। ५ ।। तुका म्हणे न वेचतां मोल । तो हा यासीं महाग विठ्ठल । वेचितां फुकाचेचि बोल । केवढें खोल अभागियां ।। ६ ।। 

            ३२५. आले हो संसारा तुम्ही एक करा । मुक्तिमारग हळुचि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा दचकसी ना ।। १ ।। नाहीं त्या यमासी करूणा । बाहेर काढितां कुडी प्राणा । ओढोळ सांपडे जैसे धान्या । चोर यातना धरिजेतो ।। २ ।। नाहीं दिलें पावईल कैसा । चालतां पंथें तेणें वळसा । नसेल ठाऊकें ऐकतो कैसा । नेती बंद जैसा धरोनियां ।। ३ ।। क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करितां कांहीं । ओढि ती कांट वणा सोई । अग्निस्तंभ बाहीं कवटाळविती।।४ ।। देखोनी अंगें कांपती । तये नदीमाजी चालविती । लागे ठाव ना न चलवे बुडविती । वरी मारिती यमदंड ।। ५ ।। तहानभूक न साहावे वेळ । तो राखिती किती एक काळ । पिंड पाळूनी कैसा सीतळ । तो तप्तभूमी ज्वाळ लोळविती ।। ६ ।। म्हणऊनी करा कांहीं सायास । व्हावेल तर व्हारे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तिरस तुका म्हणे ।। ७ ।। 

            ३२६. न बोलसी तेंही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा । तुज मी घालीत नाहीं गोवा । भीड केशवा कासयाची।।१ ।। उतरी आपुला हा भार । मजशी बोलोनी उत्तर । माझा तुज नव्हे अंगिकार । मग विचार करीन मी।।२ ।। दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी । यथानुशक्ति ठाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ।।३ ।। म्हणोनि करितों मी आस । तुझिया वचनाची वास । धीर हा करूनि सायास । न टळे नेमास आपुलिया ।। ४ ।। तुझें म्यां घेतल्यावांचून । येथूनी न वजे वचन । हाचि माझा नेम सत्य जाण । आहे नाही म्हण तुका म्हणे ।। ५ ।।

             ३२७.आता मी न पडे सायासीं । संसार दुःखाचियेपाशीं । शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशी मागेन त्यां ।। १ ।। न कळे संचित होते काय । कोण्या पुण्ये तुझे लाधती पाय । आतां मज न विसंबें वो थोरा । समासी सांपडे दिले राऊकें क्षण नाहीं । माय । मोकलूनी धाय विनवीतसें ।। २ ।। बहुत जाचलों ही संसारें । मोहमाया जाळाच्या विखारें । त्रिगुण येताती लहरें । तेणें दुःखें थोर आक्रंदलों ।। ३ ।। आणिक ती दुःखें सांगों मी किती । सकळ संसाराची स्थिती । न साहे पाषाण फुटती । भय कांप चित्तीं भरलासे ।। ४ ।। आतां मज न साहावे सर्वथा । संसारगंधीची हे  वार्ता । झालों वेडा असोनी जाणता । पावे अनंता तुका म्हणे ।। ५ ।। 

            ३२८. आतां तुज कळेल तें करी । तारिसी तरी तारी मारी । जवळी अथवा दुरी धरीं । घालीं संसारी अथवा नको ।। १॥ शरण आलों नेणतेपणे । भाव आणि भक्ति कांहींच नेणें । मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक उणे रंकाहुनी ।। २ ।। मन स्थिर नाही माझिये हातीं । इंद्रिये धावतां नांवरती । सकळ खुंटलिया युक्ति । शांति निवृत्ति जवळीं नाहीं ।। ३ ।। सकळ निवेदिला भाव । तुझिये पायी ठेविला जीव । आतां करीं कळे तो उपाव । तूंचि सर्व ठाव माझा देवा ।। ४ ।। राहिलों धरूनि विश्वास । आधार नेटी तुझी कास । आणिक नेणे मी सायास । तुका म्हणे यास तुझें उचित ।। ५ ।। 

            ३२९ . देवा तूं कृपा करूणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु । जीवनसिध्दि साधन सिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ।। १ ।। शरणागता वज्रपंजर । अभयदाना तूं उदार । सकळां देवा तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ।। २ ।। भागली स्तुति करितां फार । तेथें मी काय तें गव्हार । जाणावया तुझा विचार । नको अंतर देऊं आतां ।। ३ ।। नेणें भाव परि म्हणवितों तुझा । नेणें भक्ति परि करितो पूजा । आपुलिया नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धावणे ।। ४ ।। तुझिया बळें पंढरीनाथा । झालों निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथां । न भी सर्वथा तुका म्हणे ।। ५ ।। 

             ३३०. कोण सुख धरोनी संसारीं । राहो सांग मज वा हरी । अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी तूंही अंतरसी ।। १ ।। प्रथम केला गर्मी वास । काय तें जन्मास येथवरी ।। २ ।। बाळपण गेलें नेणतां । तारूण्यदर्श विषयव्यथा । वृद्धपणी प्रवर्तली चिंता । मरे मागुता जन्म धरीं ।। ३ ।। क्षण एक तोही नाहीं विसावा । लक्ष चौऱ्यांशी घेतल्या धांवां । भोवंडिती पाठी लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ।। ४ ।। आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनी राहेन द्वारीं । तुझा दास मी दीन कामारी । तुका म्हणे । करीं कृपा आतां ।। ५ ।। 

            ३३१ सुख या संतसमागमें । नित्य दुणावे सी तुझियां नामें।दहन होतीं सकळ कमें । सर्वकाळ प्रेमें । डुल्लतसों ।। १ ।। म्हणोनी नाहीं कांहीं चिंता । तूंचि न वी आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । । आणिकां गोतां सर्वाठायीं ।। २ ।। ऐसा हा कळला निर्धार । माझा तुज न पडे विसर । अससी देऊनियां धीर । बाह्य अभ्यंतर मजजवळीं।।३ ।। दुःख तें कैसे नये स्वप्नासी । भुक्ति मुक्ति झाल्या कामारी दासी । त्यांचे वर्म तूं आम्हापासीं । सुखें राहिलासी पापें पळती दोष । काय तें उणे आम्हां आनंदास । सेवू ब्रह्मरस तुका म्हणे ।। ५ ।।

             ३३२. न पवे सन्निध वाटते चिंता । वरि या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बळिवंता सांपडलों ।। १ ।। बहु भार पडियेला शिरीं । मी हे माझें मजवरी । उघड्या नागाविलों चोरीं । घरिच्याघरी जाणत जाणतां ।। २ ।। तुज मागणे इतुलें आता । मज या निरवावें संता । झाला कंठस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ।। ३ ।। अति हा निकट समय । मग म्यां करावें तें काय । दिवस गेलिया ठाकईल छाय । उरईल हाय रातिकाळीं ।। ४ ।। होईल संचिताची सत्ता।अगां येईल पराधीनता।ठाव तो न दिसे लपता । बहु चिंता प्रवर्तली ।। ५ ।। ऐसी या संकटाचे संधी । धांव घालावी कृपानिधी । तुका म्हणे माझी बळबुद्धि । सकळ सिद्धी पाय तुझे ।। ६ ।।

             ३३३. देवां तूं आमुचा कृपाळ । भक्तप्रतिपाळ दीनवत्सल । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ।। १ ।। तुज लागली सकळ चिंता । राखणे लागे वाकडे जातां । पुढती निरविसी संता । नव्हे विसंबता धीर तुज ।। २ ।। आम्हां भय चिंता नाहीं धाक । जन्ममरण कांहीं एक । झाला इहलोकीं परलोक । आलें सकळिक वैकुंठ ।। ३ ।। न कळे दिवस की राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंद लहरीची गती । वणू मी किती तया सुखा ।। ४ ।। तुझिया नामाची भूषणें । तोयें मज लेवविली लेणें । तुका म्हणे तुझिया गुणें । काय तें उणें एक आम्हा ।।५।।

           ३३४.आतां धर्माधर्मी कांहीं उचित | माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि झालों।।१ ।। येथें राया रंक एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावें।।२ ।। ऐसें हे चालत आले मागें । नाहीं मी बोलत वाउगें । आपुलिया पाडिल्या प्रसंगें । किर्ति हे जगे वाखाणिजेती।।३ ।। घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली थार । अविनाशपर पद ऐसें।।४।।येथे एक कर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार । देह नाशिवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ।।५ ।। केली आराणूक सकळां हातीं । धरावें तें धरिलें चित्तीं।तुका म्हणे सांगितलें संतीं । देई अंतीं ठाव मज देवा ।। ६ ।। 

            ३३५. बरवें झालें आलों या जन्मासी । जोड जोडिली मनुष्यदेहा ऐसी । महालाभाची उत्तम रासी । जेणे सर्व सुखासी पात्र होईजे।।१ ।। दिली इंद्रियें तिळे हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग।।२ ।। तिळे पुण्य सांचा पडे । तरि हे बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा।।३ ।। ऐसिये पावविलों ठायीं । आतां मी काय होऊ उतराई । एवढा जीव ठेवीन पायीं । तूं वो माझे आई पांडुरंगें।।४ ।। फेडिला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनी स्तनी केलों सीतळ । निजविलों बाळ निजस्थानी ।। ५ ।। नाहीं या आनंदासी जोडा । सांगता गोष्टी लागती गोडा । आलासी आकारा आमुच्या चाडा । तुका म्हणे भिडा भक्तीचिया।।६ ।।

             ३३६. अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची बोळिलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ।। १ ।। किती दोषा देऊं परिहार । गुणदोषे मळिलें अंतर । आदि वर्तमान भविष्याकार । लागे अंतपार ऐसें नाहीं ।। २ ।। विविध कर्म चौऱ्यांशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्म कोठार पांजरा । जन्म जरा मरण सांठवण ।। ३ ।। जीवा नाहीं कुडीचे लाहातें । ये भिन्न भिन्न पंचभूतें । रचतें खचतें संचितें । असार रितें फलकट ।। ४ ।। पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर । मिळतीं काष्ठं लोटतां पूर । आदळे दूर होती खल्लाळीं ।।५ ।। म्हणोनि नासावें अज्ञान । इतुकें करीं कृपादान । कृपाळू तूं जनार्दन । धरूनी चरण तुका विनवी ।। ६ ।। 

            ३३७. ऐसी हे गर्जवू वैखरी । केशवा मुकुंदा मुरारी । रामकृष्ण नामें बरीं । हरी हरी दोष सकळ ।। १ ।। जनार्दना जगजीवना । विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ।। २ ।। चक्रपाणी गदाधरा । असुरमर्दना वीर्यवीरा । सकळ मुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ।। ३ ।। मदनमूर्ति मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाट्य कौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणे ।। ४ ।। गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी सर्वजाणा । करोनी अकतों आपणा । नेदी अभिमाना आतळों ।। ५ ।। कासयाने घडे याची सेवा । काय एक समर्पावें या देवा  । वश्य तो नव्हे वांचूनि भावा । पाया वेगळे जीवा न करी तुका ।। ६ ॥ 

            ३३८. होतों तें चिंतीत मानसीं । नवस फळलें नवसीं । जोडी ते नारायणा ऐसी । अवीट ज्यासी नाश नाहीं ।। १॥ धरिलें जीवें न सोडी पाय । आले या जीवित्वाचे काय । कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ।। २ ।। मज तो पडिली होती भुली । चित्ताची अपसव्य चाली । होती मृगजळें गोवी केली । दृष्टी उघडली बरवे झालें ।। ३ ।। आतां हा सिद्धी जाद पावो भाव । मध्ये चांचल्य न व्हावा जीव । ऐसी तुम्हां भाकीतसें कींव । कृपाळूवा जगदानिया ।। ४ ।। ण कळों येते आपुले बुद्धी । ऐसें तो न घडे कधीं । एवढे आघात ते मधीं । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ।। ५ ।। कृपा या केली संतजनीं । माझी अलंकारिली वाणी । का प्रीति हे लाविली कीर्तनीं । तुका चरणी लोळतसे।।६ ।।

             ३३९ . मज ते हांसतील संत । जिद्दी देखिलती मूर्तिमंत । म्हणोनि उद्वेगलें चित्त । आहाच भक्त ऐसा सर दिसे ।॥ १॥ ध्यानीं म्यां वर्णावेती कैसें । पुढे एकी स्तुति केली असे । येथूनी जीव निघत नसे । ऐसिये आसे लागलोंसें ।। २ ।। कासया पडिलाजी धडा । उगाचि वेडा आणि वांकडा । आम्हां लेकरांसी पीडा । एका मागें जोडा दुसऱ्याचा ।। ३ ।। सांगा कोणाचा अन्याय । ऐसे मी धरितों पाय । तूं तंव समचि सकळां माय । काय अन्याय एक माझा ।। ४ ।। नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेती नारायणा । वचन द्यावें जी वचना । मज अज्ञानी समजावी।।५ ।। बहुत दिवस केला बोभाट । पाहतां श्रमलों वाट । तुका म्हणे विस्तारले ताट । काय वीट आला नेणों स्वामीया।।६ ।। 

            ३४०. बरवें झालें आजीवरी । नाहीं पडलों मृत्यूचे आहारी । वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरि तुम्हां समर्पण ।। १ ।। दिला या काळे अवकाश । नाहीं पावलें आयुष्य नाश । कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावो परतें ।। २ ।। बुडणे खोटें पावतां थडी । स्वप्नी झाली ओढाओढी । नासली जागृती घडी । साच जोडी शेवटी गोड घास।।३ ।। तुम्हां पावविली हाक । तेणें निरसला धाक । तुमचें भातें हे कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ।। ४ ।। रवीच्या नांवें निशीचा नाश । उदय होतांचि प्रकाश । आतां कैंचा आम्हां दोष । तूं जगदीश कैवारी।।५ ।। आतां जळो देह सुख दंभ मान । न करी तयाचें साधन । तूं जगदीश नारायण । आलों शरण तुका म्हणे ।। ६ ।। 

            ३४१. आतां माझा नेणे परतां भाव । विसावोनि ठायीं ठेविला जीव । सकळ लाभांचा हा ठाव । ऐसा वाव झाला चित्ता ठायीं।।१ ।। भांडवल गांठीं तरि विश्वास । झालों तें झालों निश्चयें दास । न पाहे मागील ते वास । पुढती सोस सेवेचाचि ।। २ ।। आहे ते निवदिलें सर्व । माझा मोडियेला गर्व । अकाळी काळ अवघे पर्व । झाला भरवसा कृपे लाभाचा ।। ३ ।। वेव्हारी वेव्हारां अनंत । नाहीं या वांचूनी जाणत । तरी हे समाधान चित्त । लाभहानी नाही येत अंतरा ।। आनंदरूप । आतळों नये पुण्य पाप । सारूनी ठेविले संकल्प । तुका म्हणे आपेआप एकाएकीं ।। ६ ।। नाटाचे अभंग त ।। करूनी नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जीवनी खरा । बीजांचा थारा दुरी आघात ।। ५ ।। बहु मतापासूनी निराळा । होउनि म्हणे डोळां लेईलों तें।।६ ।। राहिलों सोंवळा । बैसला रूपाचा कळवळा । तुका म्हणे डोळां लेईलो तें ।।६।।

            ३४२. बरवें झालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जईल गुणी खरी ।। १ ।। न वंचे शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेंसी । झालों संताची आंदणी दासी । केला येविशीं निर्धार ।। २ ।। जीवनी राखिला जिव्हाळा । झालों मी मजसी निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ।। ३ ।। जयाचें जया होईल ठावें । लाहो या साधियेला भावें । ऐसें होतें राखियेलें जीवें । येथूनी देवें भोवंडूनी ।। ४ ।। आस निरसली ये खेपे । अवघे पंथ झाले सांपे । तुमचे दीनबंधु कृपे । दुसरें कांपें सत्ताधाकें ।। ५ ।। अंकिलपणे आनंदरूप । आतळों नये पुण्य पाप । सारूनी ठेविले संकल्प । तुका म्हणे आपेआप एकाएकीं।।६ ।।

            ३४३. अवघ्या दशा येणेंचि साधती । मुख्य उपासना सगुण भक्ति । प्रगटे हृदयींची मूर्ती । भावशुद्धी जाणोनियां ।। १॥ बीज आणि फळ हरीचें नाम । सकळ पुण्य सकळ धर्म । सकळां कळांचे हे वर्म । निवारी श्रम सकळही ।। २ ।। जेथें कीर्तन हे नामघोष । करिती निर्लज हरीचे दास । सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ।। ३ ।। येती अंगा वसती लक्षणे । अंतरी देवें धरिलें ठाणे । आपणचि येती तयाचे गुणें । जाणे येणे खुंटें ये वस्तीचें ।। ४ ।। न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळीचें धर्म । आणिक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचें ।। ५ ।। वेदपुरूष नारायण । योगियांचें ब्रह्म शून्य । मुक्त आत्मा परिपूर्ण । तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हां ।। ६ ।।

             ३४४. श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ।। १ ।। सकळ देवाधिदेवा । कृपाळूवा जी केशवा । महानंदा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ।। २ ।। चक्रधरा निश्वंभरा । गरूडध्वजा करूणाकरा । सहस्त्रपादा सहस्त्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ।। ३ ।। कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती । भवतारका धरि त्या क्षिती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ।। ४ ।। अगा ये सगुणा निर्गुणा । जगजिनत्या जगजीवना । वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ।। ५ ।। तुका आला लोटांगणीं । मज ठाव द्यावा जी चरणीं । हेचि करीतसे विनवणी । भवबंधनी सोडवावें ।। ६ ।। 

            ३४५. माझा तव खुटला उपाव । जेणे तुझे आतुडती पाव । करू भक्ति तरी नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेवीशीं ।। १ ।। धर्म करूं तरि नाहीं नाटाचे अभंग चित्त । दान देऊं तरि नाहीं वित्त । नेणें पुजों ब्राह्मण अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ।। २ ।। नेणें गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान । नव्हे वैराग्य नवसेवन । नव्हे दमन इंद्रियांसी ।। ३ ।। तीर्थ करूं तरी मन नये सवें । व्रत करूं तरि विधि नेणे स्वभावें । देव जवळी आहे म्हणों मजसवें । तरि आपपरावे न वचे ।। ४ ।। म्हणोनी झालों शरणागत । तुझा दास मी अंकित । यास न लगे संचित । झालों निश्चित तुका म्हणे।।५ ।।

             ३४६. तरी म्यां आळवावें कोणा । कोण हे यणा , पुरवील वासना । तुजवांचून नारायणा । लावीं स्तना पण निदा धरा बादा १॥ कृपावंते ।। १॥ आपुला न विचारी सीण । न धरी अंगसंगें भिन्न । अंगिकारिलें राखें दीन । देई जीवन आवडीचें।।२ ।। माझिया मानसीं हे आस । नित्य सेवावा ब्रह्मरस । अखंड चरणीचा वास । पुरवी आस याचकाची ।। ३ ।। माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे धरि वाट दाविली देवा । एवढ्या आदराचा हेवा । मागे सेवादान आवडीचें ॥४ ॥ आळवीन करुणावचनीं । आणिक गोड नलगे मनीं । निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रूप ।। ५ ।। आतां भेट न भेटतां आहे । किंवा नाहीं ऐसें विचारूनी पाहें । लागला झरा अखंड आहे । तुका म्हणे साहे केलें अंतरीं ।। ६ ।। 

            ३४७. हेंचि भवरोगाचे औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणिक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ।। १ ।। सांवळें रूप ल्या डोळां । सहा चौ अठरांचा मेळा । पदर लागों नेदी खळा । नाम मंत्र माळा विष्णुसहस्त्र ।। २ ।। भोजना न द्यावें आन । जेणें चुके अनुपान । तरीच घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ।। ३ ।। नये निघो आपुलिया घरा । बाहेर लागों नये वारा । बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ।।४ ।। पासीं तें एक द्यावें वरी । नवनीताची होईल परी । होईल घुसळिलें तें निवारी । सार भीतरी नाहीं तया ।। ५ ।। न्हायें अनुतापी पांघरें दिशा । स्वेद निघों दे अवधी आशा । होसील आधीं होतासी तैसा । तुका म्हणे दशा भोगी वैराग्य ।। ६ ।। 

            ३४८. मागुता हाचि जन्म पावसी । भोगिलें सुख दुःख जाणसी । हें तो न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ।। १ ।। लक्ष चौऱ्यांशी न चुके फेरा । गर्भवासी यातना थोरा । येऊनी पडसी संदेहपुरा । वोळसा थोर मायाजाळीं ।। २ ।। पशु काय पाप पुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । कांहीं एक उपजतां मरती । बहिरी अंध होती पांगुळ मुकी ।। ३ ।। नरदेह निधान लागले हातीं । उत्तम सार उत्तम गती । देवचि होईन म्हणती ते होती । तरि कां चिची न धरावें ।। ४ ।। क्षण एक मन स्थिर करूनी । सावध होई डोळे उघडूनी । पाहे वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ।। ५ ।। 

            ३४९ . दास्य करी दासाचें । उणे न साहे तयाचें । वाढिलें ठायींचें । भाणे टाकोनियां धावें ।। १ ।। ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटी कर । सर्वस्वं उदर । भक्ताचे भूषण । नाहीं तयाचा सीण । सुख धरिलें भक्तांलागी प्रगटे ।। २ ।। हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी लाथेचें।।३ ।। सत्यभामा दान करी । उजूर नाहीं अंगीकारी । सेवकाच्या शिरीं । धरूनी चाले पादुका ।। ४ || राखे दारवंटा बळीचा । सारथी झाला अर्जुनाचा । दास सेवकांचा । होय साचा अंकित ।। ५ ।। भिडा न बोले पुंडलीकासीं । उभा मर्यादा पाठीसीं । तुका म्हणे ऐसी । कां रे न भजा माउली ।। ६ ।।

            ३५०. हरि तैसे हरीचे दास । नाहीं तया भय मोह चिंता आस । होऊनी राहाती उदास । बळकट कारे कांस भक्तीची ।। १ ।। धरूनी पाय त्यजिलें जन । न चुके लगे मान मृत्तिका धन । कंठी नामामृत पान । न लगे आन ऐसें झालें ।। २ ।। वाव तरी उदंडचि पोटी । धीर सिंधु ऐसे जगजेठी । काम क्रोधा न सुटे मिठी । गिन्हे तरी वेठी राबविती ।। ३ ।। बळ तरी नागविती काळा ।  लीन तरी सकळांच्या तळा । उदार तरी देहासी सकळां । ती जाणोनी कळा सर्व नेणत ।।। संसार तो तयांचा दास । मोक्ष तो पहातसे वास । रिद्धिसिद्धि देशवटा त्रास । न शिवती यास वैष्णवजन ।। ५ ।। जन्ममृत्यू स्वप्नांसारिखें । आप त्या न दिसे पारखे । तुका म्हणे अखंडित सुखे । वाणी वदे मुखें प्रेमामृताची।।६ ।।

             ३५१. बहुत जाचलों संसारीं । वसे गर्मी मातेच्या उदरीं । लक्ष चौऱ्यांशी योनिद्वारीं । झालों भिकारी याचक ।। १ ।। जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशी बहु बांधलों संचितीं । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ।। २ ।। न भरे पोट नाहीं विसावा । नाहीं नेम एक ठाव गांवा । नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाही जिवा खापरी तडफडी ।। ३ ।। काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणिक पुढेही नेणों किती । खंडना नाही पुनरावृत्ती । मज कल्पांतीं तरी वेगळे ।। ४ ।। ऐसें दुःख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपुले ओझें । भवसिंधुतारक नाम तुझें । धांवसी कांजें आडलिया ।। ५ ।। आतां धांव घाली नारायणा । मजकारणे रंका दीना । गुण न विचारी अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ।। ६ ।। 

            ३५२. जंव हे सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाय । तंव तूं आपुलें स्वहित पाहे । तीर्थयात्रे जाय चुको नको ।। १ ।। जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरिगुण गाय आइक वहिला । मनीं भाव धरूनी भला । न वंचे त्याला चुकों नको ।। २ ।। जोडोनी धन न घाली माती । ब्रह्मवृंदें पुजन यती । सत्य आचरण दया भूर्ती । करीं सांगाती चुको नको ।। ३॥ दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हे विषयसंगी । काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहे संतसंगीं चूको नको ।। ४ || मग तेथे न चले काहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं । पुढें संचित जाईल ग्वाही । तुका म्हणे तई यमआज्ञा ।। ५ ।। 

            ३५३. चांगले नाम गोमटें रूप । निवती डोळे हरती ताप । विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प अति अवसान । कोठे योजेल दश दान । खंडी नारायण दुःख चिंतनें ।। २ ।। सकळ श्रेष्ठाचे हे मत । पावे सिद्धी पाववी अनंत । म्हणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढेंचि ।। ३ ।। म्हणोनि रूसलो संसारा । सर्प हा विखार पांढरा । तुजशी अंतर रे दातारा । याचि दावेदारानिमित्त ।। ४ ।। येणे मज भोगविल्या खाणी । नसतां छंद लाविला मनीं । माजलों मी माझें भ्रमणीं । झाली बोडणी विट बना ।। ५।।पावलो केलियाचा दंड । खाणी भोगिल्या याती उदंड । आतां केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ।। ६ ।। 

            ३५४. तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा । भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ।। १ ।। काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भक्तीची लक्षणें । धड ते तोंड धुऊं नेणें । परि चिंतनें काळ सारी ।। २ ।। न लवी आणीक कांहीं पिसें । माझिया मना वायां जाय ऐसें । चालवी आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसें धरोनियां ।। ३ ।। तुज हे समर्पिली काया । जीवें भावें पंढरीराया । सांभाळी समविषम डाया । करी छाया कृपेची ।। ४ ।। चतुर तरी चतुरांराव । जाणता तरी जीवांचा जीव । न्यून तो कोण एक ठाव । अरूष भाव परि माझा ।। ५॥ होतें तें माझें भा भांडवल । पायांप निवदिले बोल । आदर ऐसें पाविजे मोल । तुका म्हणे साच फोल तूं जाणसी।।६ ।।  

            ३५५. कांहो माझा मानियेला भार । ऐसा तंव दिसतसे फार । अनंत पावविली उद्धार । नव्हेचि मज शेवटीं ।। १ ।। पाप बळिवंत गाढ़ें । तुजही राहों सकतें पुढें । मागील काही राहिले ओढें । नवल कोडें , देखियेलें ।। २ ।। काय मानिती संतजन । तुमचें हीनत्व वचन । की वृद्ध झाला नारायण । न चले पण आधील तो ।। ३ ।। आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी । पडदा काय घरच्या घरीं । धरिले दुरी तेव्हां धरिलें ।। ४ ।। नको चाळवू अनंता । कासया होतोसी नेणता । काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका म्हणे आतां होईल प्रगट।।५ ।। 

            ३५६. तुळसी माळा घालूनी कंठीं । उभा विटेवरी जगजेठी । अवलोकोनी पुंडलिका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीये।।१।।भुक्तिमुक्ति जयाच्या कामारी । रिद्धिसिद्धि तोळगती दारी । सदर्शन घरटी करी । काळ कांपे दूरी धाकें तया।।२ ।। जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगीं । जैसी विद्युलता झळके मेघीं । दर्शने भंगी महा दोष।।३ ।। सुखसागर परमानंदु । गोपी गोपाळा साधना गोधना छंदु । पक्षीश्वापदां जयाचा वेधु।वाहे गोविंदु पांवा छंदें।।४ ।। मुखमंडित चतुर्भुजा । मन माहन गरूडध्वजा । तुका म्हणे स्वामी माझा पावे भक्तकाजा लवलाही ।।५ ।। 

            ३५७. हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें म्हणावें । करितों जीवें निंबलोण ।। १ ।। बैसतां संतांचे संगतीं । कळों आलें चि कमळापती । आपुली कोणीच नव्हती । निश्चय चित्तीं दृढ झाला।।२ ॥ येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठी रूचि ठेवूनी गोड । देखत नाड हीन कळतसे ।। ३ ।। मरती मेली नेणों किती । हाचि लाभ आधी तयाचे संगतीं । म्हणोनि येतों काकुळती । धीर तो चंड चित्तीं दृढ द्यावा ।। ४ ।। सुखें निंदोत हे जन । न करी बारित तयांसी वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण नेणता तुमचे ते ।। ५ ।। आपले आपण न करूं हित । करूं हे प्रमाण संचित । तरी मी नष्टचि पतीत । तुका म्हणे मज संत हांसती ।। ६ ।।

             ३५८. आतां येणे बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहतां न कळे जयाचा अंत । तोचि हृदयांत घालूं आतां ।। १ ।। विसरोनि आपला देवपणभाव । नामेंचि भुलविला पंढरीराव । न विचारी याती कुळ ठाव । लागावया पाव संतांचे ।। ।। बरें वर्म आले आमुचिया हातां । हिंडावें धुंडावें न लगता । होय अविनाश साहाकारी दाता । चतुर्भुज सत्ता परि धाके ।। ३ ।। होय आवडी साना थोर । रूप सुंदर मनोहर । भक्तिप्रिय लोभापर । करी आदर याचकपणे ।। ४ ।। तें वर्म आले आमुच्या हाता । म्हणोनि शरण रिघालों संतां । तुका म्हणे पंढरीनाथा । न सोडी आता जीवें भावें ।। ५ ।।

             ३५९ . आइक पांडुरंगा एक मात । कांहीं बोलणे आहे एकांत । आम्हां जरी तारील संचित । तरी उचित काय तुझें ।। १ ।। उसणे फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनी भूषण । वायां थोरपण जनामध्ये ।। २ ।। अन्न जरी न मिळे तयासी देणें । अगांतुक पात्र उचित दान । उपकार तरी धन्वंतरीपणें । जरी देणे घेणे नाहीं आशा ।। ३ ।। शूर तो तयासी बोलिजे जाणा । पाठीसी घालुनी राखे दीना । पार पुण्या नाहीं त्या भूषणा । ऐक नारायणा वचन हें ।। ४ ।। आतां पुढे बोलणें तें कांहीं । मज तारिसील तरीच सही । वचन आपुलें सिद्धी नेई । तुका म्हणे तई मज कळसी ।। ५ ।।

             ३६०. चांगला तरी पूर्ण काम । गोड तरी याचेंचि नाम । दयाळु तरी अवघा धर्म । भला तरी दासां श्रम होऊ नेदी ।। १ ।। उदार तरी लक्ष्मीयेसी । झुंजार तरी कळिकाळासी । चतुर तरी गुणांचीच रासी । जाणता तयासी तोचि एक ।। २ ।। जुनाट तरी बहुकाळा । न कळे जयाची लीळा । नेणता गोवळी गोवळा । लाववी अबळा भुलवणा।।३ ।। गांढ्या तरी भावाचा अंकित । बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत । ओंगळ तरी कुब्जेशी रत । भ्याड अनंत बहु पापा ।। ४ ।। खेळ तो येणेंचि खेळावा । नट तो येणेंचि आवगावा । लपोनि जीवीं न कळे जीवा । धरितां देवा नातुडसी ।। ५ ।। उंच तरी बहुतचि उंच । नीच तरी बहुतचि नीच । तुका म्हणे बोलिलों साच । नाहीं आहाच पूजा केली।।६ ।। 

            ३६१. काय आम्ही भक्ती करणें कैसी । काय एक वाहावें तुम्हांसी । अवघा भरोनी उरलासी । वाणी खाणी रसीं रूपी गंधीं।।१ ।। कैसे करूं इंद्रियां बंधन । पुण्यपापाचे खंडण । काय व्रत करूं आचरण । काय तुजविण उरणें तें।।२ ।। काय डोळे झाकुंनिया पाहो । मंत्र जप काय घ्यावो । कवणे ठायीं धरूनि भाव । काय ते वाव तुजविण तें।।३ ।। काय हिंडों कवण दिशा । कवणे ठायीं पाय ठेवू कैसा । काय तूं नव्हेसी | मा नकळे ऐसा । काय मी कैसा पाहों आतां ।।४ ।। तुझिया तुक नामाची सकळ । पूजा अर्चन मंत्र माळ । धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । वाहूं पुष्पांजुळ तुका म्हणे ।। ५ ।।

             ३६२. शरीर दुःखाचे कोठार । शरीर रोगांचें भांडार । शरीर दुर्गंधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा में ऐसें ।। १ ।। शरीर उत्तम चांगलें । शरीर सुखाचें घोसुलें । शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रह्म ।। २ ।। शरीर विटाळांचे आळे । माया मोह पाश जाळें । पतन शरीराच्या मुळे । शरीर काळें व्यापिलें ।। ३ ।। शरीर सकळही शुद्ध । शरीर निधींचाही निध । शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यभागी देव शरीरा।।४ ।। शरीर श्रीविद्येचा बांधा।शरीर अवगुणांचा रांधा । शरीरी वसे बहुत बाधा । नाहीं गुणसुधा एक शरीरी।।५ ।। शरीरा दुःख नेदावा भोग । न द्यावें सुख न करी त्याग । शरीर बोखटें ना चांग।तुका म्हणे वेग करी हरीभजनीं।।६ ।। 

            ३६३. इतुलें करी भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्ते तेव्हारी सुखरूप।।१ ।। न करी दंभाचा सायास । शांति राहे बहुवस । जिव्हे सेवीं सुगंध रस । न करी आळस रामनामी ।। २ ।। जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा । संग न धरावा दुर्जनाचा । करी संतांचा सायास ।। ३ ।। करिसी देवावीण आस । अवघी होईल निरासष । तृष्णा वाढविती बहुवस । कधीं सुखास न पवसी ।। ४ ।। धरूनि विश्वास करीं धीर । करितां देव हाचि निर्धार । तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर तुका म्हणे।।५ ।। 

            ३६४. संसारसिंधु हा दुस्तर । नुल्लंघवे उल्लंघिता पार । बहुत वाहाविलें दूर । न लगेचि तीर पैलथडी।।१ ।। किती जन्म झाला फेरा।गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवर्ती भोंवरा ।बहु थोरा वोळसिया।।२ ।। वाढलों परि नेणती बुद्धि । नाहीं परतली धरिली शुद्धी । मग म्यां विचारावें कधीं।ऐसी संधी सांडोनियां।।३ ।। अनेक खाणी आहार निद्रा । भयमैथुनाचाचि थारा । बालत्व तारुण्य जरा ।प्रधान पुरा भोग तेथें।।४ ।। ऐसी उल्लंघूनी आलों स्थळें । बहु या भोवंडिलों काळे । आतां हैं उगवावें जाळें । उजेडा बळे दिवसाच्या।।५ ।। सांडो या संसाराची वाट ।बहु येणे भोगविलें कष्ट । दावी सत्य ऐसें नष्ट ।तुका म्हणे भ्रष्ट झालों देवद्रोही।।६ ।।

             ३६५. विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी । विठ्ठल पुंडलीकापासीं।कृपादानासी उदार।।१ ।। विठ्ठल स्मरण कोवळा । विठ्ठल गौरवी आगळा । आधार ब्रह्मांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ।।२ ।। उभाचि परि न मनी सीण।नाहीं उद्धरितां भिन्न । समर्थांचे घरीं एकचि अन्न ।आर्त भूता क्षणोक्षणा सांभाळी।।३।।रूचीचे प्रकार।आणिताती आदरें । कोठेही न पडे अंतर।थोरासी थोर धाकुट्या धाकुटा।।४ ।। करितां बळ धरितां नये।झोंबतां डोळा मनच होय । आपुल्या उद्देशाची सोय।जाणे हृदयनिवासी।।५ ।। पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तो नाहीं भरिलें रितें । करितों सेवन आइतें।तुका म्हणे चित्तें चित्त मेळवूनी।।६ ।। 

            ३६६. ताप हे हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें TA दु : ख।अवलो कि तां उपजे सुख।उभे सन्मुख दृष्टीपुढें।।१ ।। न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेचीच खाणी । स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी * कृपानिधि।।२ ।। रामकृष्ण ध्यान वामन नरसिंही । उग्र आणि सौम्य कांहींच नाहीं । सांपडे भरलीये वाही । 111 ला भाव शुद्ध पाही याचे भातुकें।।३ ।। गुणगंभीर चतुर सजाण । शूर धीर उदार नारायण । व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहन लावण्य हैं।।४।।ठाण हे साजिरें सुंदर ।अविनाश अविकार । अनंत आणि अपरंपार । तो हा कटीं कर धरिताहे।।५ ।। जयाची वाणी सुमनमाळा । परमामृत जिव्हाळा । अनंता अंगी अनंत कळा । तुका जवळा चरणसेवक।।६ ।। 

            ३६७.अगा ये वैकुं ठनायका । अगा ये त्रैलोक्यतारका । अगा जनार्दना जगव्यापका । अगा पाळका भक्ताचिया।।१ ।। अगा ये वासुदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा । अगा बळिबंध वामना । अगा निधाना गुणनिधी ।।२।।अगा ये द्रौपदीबांधवा । अगा ये सखया पांडवा।अगा जिवाचिये जीवा । अगा माधवा मधुसूदना।।३।।अगा महेश्वरा महाराजा।अगा श्रीहरी गरूडध्वजा।अगा सुंदरा सहस्त्रभुजा ।पार मी तुझा काय वर्जू।।४ ।। अगा अंबऋषीपरंपरा । निरालंबा निर्विकारा । अगा गोवर्धन धरणीधरा । अगा माहेरा दीनाचिया ।।५।।अगा धर्मराया धर्मशीळा । अगा कृपासिंधु कृपाळा । अगा प्रेमाचिया कल्लोळा । सकळकळाप्रवीणा ।।६।।अगा चतुरा सुजाणा । मधुरा गिरा सुलक्षणा । अगा उदारा असुरमर्दना । राखे शरण तुकयाबंधु।।७ ।। 

            ३६८. देवा मी चांडाळ चांडाळ । म्हणतां लागताहे वेळ । नसे पाहतां भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा।।१ ।। जन्मा उपजलियापासूनी।असत्य कर्म ते अझूनी । सत्य आचरण नेणे स्वप्नीं । निखळ खाणी अवगुणांची।।२ ।। भक्ति दया अथवा कथा । कानीं न साहावे वार्ता । अखंड विषयांची व्यथा । अधम पुरता अधमाहुनी।।३ ।। वाचा मद मत्सर । यांचे तरी माहेरघर । परउपकार वैरी जैसा।।४।।निंदा द्वेष घात विश्वास । करितां नाहीं केला आळस । करूं नये ते केले संतउपहास । अभय भक्ष तेंहीं भक्षिले।।५ ।। पाळिलें नाहीं पितृवचन । सदा परद्वारी परधनीं ध्यान । बोलों नये घडलें ऐसे अन्योन्यविण । दासीगमन आदिकरूनी।।६।।काया मनें इंद्रियांसी । सकळ पापांचीच राशी । तुकया बंधु म्हणे ऐसियासी । आलों हृषीकेशी । तुज शरण।।७ ।। 

            ३६९ . काय काय करितों या मना । परी नाइके नारायणा । करूं नये त्याची करी विवंचना । नेऊं पतना आदरिलें ।। १ ।। भलतिया सवें धांवें सैराट । वाट आडवाट दरे दरकुट । न विचारी कुडें कांहीं कपट । घात बळकट मांडियेला ।। २ ।। न पुरती भ्रमणा दाही पासिंधु दिशा । सप्तही पाताळे आकाशा । घाली उडी वळेचि प्रवीणा देखोनि फांसा । केलों या दोषा पाहुणा ।। ३ ।। चेतवूनी इंद्रियें सकळ । आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुराविलीं शुद्ध बुद्धी केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार म्हणतां हैं।।४ ।। आतां काय ऐसें करावें यासी । बहु जाचिलों केलों कासावीसी । तुकयाबंधु म्हणे हृषीकेषी । धांव कर्म मजसी ऐसी परी जाली।।५ ।। 

             ३७०.एक मागणे हृषीकेशीषी । चित्त द्यावें सांगतों वचनासी । मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसा कृपा करीं ।। १ ।। नको दुजी बुद्धी आणिक । रिद्धिसिद्धि परलोक । तूं स्वामी मी सेवक । खंडणा नको करूं ऐसी ।। २ ।। मना येईल तो जन्म देई । भलते कुळी भलते ठायीं । तें मी सांकडे घालीत नाहीं । हृदयींहुनी तुवां नव जावें ।। ३ ।। इतुकें करी भलत्यापरी । भलत्याभावें तुझे द्वारीं । राहेन दास होऊनी कामारी । वदो वैखरी नित्य नाम ।। ४ ।। नको विचारूं दुसरें आतां । शरण आलों जी पंढरीनाथा । तुकयाबंधु म्हणे रे अच्युता । आहेसि तूं दाता दानशूर।।५ ।। 

            ३७१. तूं बळिया शिरोमणी । आहेसी माजी ये त्रिभुवनीं । रिघालों पाठी तुझी म्हणऊनि । आतां करी मनी असेल तें।।१ ।। तूं देवा प्रतापदिनकर । सुरअसुरांचा सुर । महावीरावीर धनुर्धर । मी तो पामर काय तेथें।।२ ।। कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवांची बंदीशाळ । संहारूनी राक्षसदळ । शरणागत राज्यीं स्थापिला।।३ ।। उपक्रम करावा बहुत । तरी तूं जाणसी धर्मनीत । उचित काय तें अनुचित । राखें शरणागत आलों आतां ।।४ ।। किती म्यां काय विनवावें । शरण आलों जीवेंभावें । तुकयाबंधु म्हणे करावें । क्षेम अवघे येणे काळे ।।५ ।। 

            ३७२.उभा देखिला भीमातीरीं । कर मिरविले कटावरी । पाउले तरी समचि साजिरी । नाम तरि अनंत अतिगोड।।१।।शंखचक्रांकित भूषणें ।जडितमेखळा चिद्रत्नें । पीतांबर उटी शोभे गोरेपणें।लोपले तेणें रवितेज।।२ ।। श्रवणीं कुंडलें देती ढाळ।दशांगुळीं मुद्रिका माळ।दंत ओळ हिरे झळाळ । मुख निर्मळ सुखरासी।।३।।कटीं कडदोरा वांकी वेळा । वाहीं बाहुवटे पदक गळां।मृगनामी रेखिला टिळा लवती डोळां विद्युल्लता।।४ ।। सुंदरपणाची साम्यता । काय वर्जू ते  पाने आतां ।तुकयाबंधु म्हुणे रे अच्युता।धन्य ते माता प्रसवली।।५ ।।

            ३७३.कई देखतां होईन डोळीं । सकळां भूती मूर्ति सांवळी । जीवा नांव भूमंडळीं । जळी स्थळी काष्ठी पाषाणीं ।। १ ।। ऐसी कृपा करील नारायण । जीव जगाचा होईन । प्रेमसागरी बुडईन । होईल स्नान अनुतापी ।। २ ।। ऐसा कई येईन दैवास । दृश्य नासोनी जाईल आस । सदा संतचरणीं देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी।।३ ।। कई नवसा येतील अंकुर । सुखा नाहींसा होईल पार । अमृत तें पृथ्वीतळ सागर । वाहाती पूर आनंदाचे ।। ४ ।। प्रसन्न दया क्षमा शांती । कई नवविधा होईल भक्ति । भोगईन वैराग्यसंपत्ती । मनोरथ कळती तई पुरले ।। ५ ।। तुकयाबंधु म्हणे सांग । नव्हे तुजविण निरसेना पांग । म्हणोनी घातलें साष्टांग । पांडुरंगा चरणावरी।।६ ।।




MajhiMauli-blogger






FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER


Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.