काही प्रासंगिक अभंग ( अभंग / महिमा / महात्म ) bhanani malika ( mauli majhi )

shreyash feed ads 2

]] हरिः  ॐ [[

]] श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसज्ञ [[

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 

 काही प्रासंगिक अभंग ( अभंग / महिमा / महात्म ) bhanani malika ( mauli majhi )

संपूर्ण  वारकरी भजनी मालिका | Varkari Bhajani Malika 




***।। भजनी मालिका ।। ***

[[ मालिका सतरावी ]]

( Malika Sataravi )

.............काही प्रासंगिक अभंग...........

( Kahi Prasangik abhang )

--{-{ एकादशीचे अभंग }-}--

( Akadashiche Abhang )

            ४८२. दशमी व्रताचा आरंभु । दिंडी कीर्तन करा समारंभु । तेणें तो स्वयंभु । संतोष पावें।।१ ।। एकादशी जाग्रण । हरिपूजन नामकीर्तन । द्वादशी क्षीरापती जाण । वैष्णव जन सेवती।।२ ।। ऐसें व्रत तीन दिन । करी जो आदरें परिपूर्ण । एकाजनार्दनी बंधन । तयां नाहीं सर्वथा।।३ ।। 


            ४८३. पंधरा दिवसां एक एकादशी । कारे न करिसी व्रतसार ।।१ ।। काय तुझा जीव जातो एका दिसे । फराळाच्या मिसें धणी घेसी ।। २ ।। स्वहित  कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचे ।। ३ || थोडे तुज घरी होती उजगरे । देउळांसी का रे मरसी जाता ।। ४ ।। तुका म्हणे कां रे सकुमार झालासी । काय जाब देसी यमदुतां ।। ५ ।।


             ४८४. एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठेसमान् । अधम जन ते एक ।। १ ।। ऐका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन । गाती ऐकती हरिकीर्तन । तें समान विष्णूशीं।।२ ।। अशुद्ध विटाळशीचे खळ । विडा भक्षितां तांबुल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ।। ३ ।। सेज बाज विलास भोग । करिती कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ।। ४ ।। आपण नवजे हरिकीर्तना । आणिकां वारी जातां कोणां । त्याच्या पापे जाणा । ठेंगणा तो महामेरू ।। ५ ।। तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकीत । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलिया ।। ६ ।।


 --{-{ द्वादशीचे अभंग }-}--

( Dvadashiche Abhang )

            ४८५.उठोनि प्रातःकाळी ओढितां कांचोळी । जातो वेळोवेळी महाद्वारा ॥१ ॥ अहो जी दातारा विनंती अवधारा । तुम्ही या घरा भोजनासी ॥२ ॥ रखुमाईमातें तुम्ही यावे तेथें । सामुग्री सांगातें चालवावी।।३ ॥ सडा संमार्जन हे माझें करणें । उदक भरीन सुंगधेसीं ॥४ ॥ शेष पत्रावळी काढीन उष्टावळीं । नित्य वेळोवेळी हेंचि काम।।५ ।। नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा । प्रसाद तो ठेवा सेवकासी ॥६ ॥ 


            ४८६. जाले ज्ञानदेव वाणी । आले सामुग्री घेऊनि ॥१ ॥ पर्वकाळ द्वादशी । दिली सामुग्री आम्हांसी।।२ ।। ज्ञानदेवाच्या चरणीं । शरण एका जनार्दनी ॥३ ॥ 


--{-{ क्षीरापतीचे अभंग }-}--

( Kshiraptiche Abhang )

             ४८७.क्षीरसागरींचे नावडे सुख । क्षीरापती देखे देव आला।।१ ।। कवळ कवळ पाहा हो । मुख पसरूनि धांवतो देवो।।२ ।। एकादशी देव जागरा आला । क्षीरापतीलागी टोकत ठेला ॥३ ॥ द्वादशी क्षीरापती ऐकोनि गोष्टी । आवडी देव देतसे मिठीं ॥४ ॥ क्षीरापती घालितां वैष्णवां मुखीं । तेणें मुखे देव होतसे सुखी।।५ ।। क्षीरापती सेवितां आनंदु । स्वानंदें भुलला नाचे गोविंदु ॥६ ॥ क्षीरापती सेवितां वैष्णवा लाहो । मुखामार्जी मुख घालितो देवो ॥७ ॥ क्षीरापती चारा जनार्दनामुखीं । एका एकीं तेणें होतसे सुखी ॥८ ॥


             ४८८. पाहे प्रसादाची वाट । द्यावें धुवोनियां ताट ।। १ ।। शेष घेऊनी जाईन । तुमचें झालिया भोजन ॥२ ॥ झालो एकसवा । तुम्हा आळवोनी देवा।।३ ।। तुका म्हणे चित्त । करूनि राहिलों निवांत ॥४ ॥ 


            ४८९ . पावला प्रसाद आतां विठो निजावें । अपुलाले श्रम कळों येताती भावें ॥१ ॥ आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरलें मनोरथ जातो आपुलिया स्थळा ॥२ ॥ तुम्हांसी जागवू आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा || ३ || तुका म्हणे क्षारापतीचे व श्री तुलशी महिमा । दिलें उच्छिष्टाचें भोजन । नाहीं निवडिलें आम्हां आपणा भिन्न।।४ ।। 


--{-{ श्री तुलशी महिमा }-}--

( Shree Tulashi Mahima )

             ४९० . धन्य तुळसीचा महिमा । नाही आणिक उपमा ॥१ ॥ प्रात : काळी दरुशन । घडतां पुण्य कोटीयज्ञ।।२ ।। नाम वदता हे तुळसी । इच्छिले पुरवी मानसी।।३ ।। तुळसी नामाचा निजछंद । एका जनार्दनी आनंद ॥४ || 


            ४९१ . जयांचिये द्वारी तुळसी वृंदावन । धन्य ते सदन वैष्णवांचे ॥१ ॥ उत्तम चांडाळ अथवा सुशील । पावन सकळ वैकुंठी होती ॥२ ॥ जयांचिया गळां तुळसीच्या माळा । यम पदकमळा वंदी त्याच्या ॥३ || गोपीचंदन उटी जयांचिया अंगी । प्रत्यक्ष देव जगी , तोचि धन्य ॥४ ॥ एका जनार्दनी तयाची संगती । जन्मोजन्मी प्राप्त हो कां मज ॥५ ।। 


            ४९२ . तुळसी कष्ठाची माळ । गळां घालावी मिर्मळ ॥१ ॥ होतां एकचि स्नान । सर्व तीर्थाचे मार्जन।।२ ।। नित्य वंदिता तुळसी । काळ पळे देशोदशी ॥३ ॥ तुळसीचे पाणी । वसवी त्र्यैलोक्यनाथा चरणीं।।४ ।।


             ४९३ . देवासी प्रिय तुळसीपान । नोहे कारण यज्ञाचे ॥१ ॥ संतुष्ट होय नारायण । तुळसीपत्रे पूर्ण अर्पिता ॥२ ॥ पूजा धूप दीप सर्व उपचार । अर्पिता तुळसीचे पत्र ॥३ ॥ एका जनार्दनी शरण । तुळसीपासी नारायण || ४ || 


--{-{ श्री गीता महिमा }-}--

( Shree Gita Mahima )

             ४९४ . गीता गीता गीता त्रिवार बोलतां । पाप जाय तत्वतां मोक्षजोडे ॥१ ॥ गीता महिमा बोलवेना वाचे । बंधन जीवाचे दूर होती।।2 || एके अक्षरी कोटी अश्वमेध । फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त।।शाएकचि तो श्लोक वाचिलिया नेमे । अंती परमधाम प्राप्त होय ॥४ ॥ नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिती । लाभ त्याचे आर्ता बोलवेना।।५ ।।


             ४९५ . गीता गीता गीता वाचे जे म्हणती । नाही पुनरावृत्ति तया नरा ॥१ ॥ नित्य नेम वाचे वदता अक्षरे । भवसिंधु तरे अर्धक्षणी ॥२ ॥ एका जनार्दनी जयाचा हा नेम । तया पुरुषोत्तम न विसंवे ॥३ ॥ 


            ४९६.गीता गीता म्हणता पापा होय नाश । कैवल्यही त्यास प्राप्त होय॥शागीतेची अक्षरे पडतां श्रवणी । जाय तत्क्षणी भवभय॥२॥एक एक श्लोकी कोटी अश्वमेधापुण्यही अगाध म्हणतां गीता॥३॥नामा म्हणे गीता नित्य जोवाचिता । तयाच्या सुकृता पार नाही ॥४ ॥ 


--{-{ ज्ञानेश्वरी पारायणाचे फळ }-}--

( Dnyneshwar Parayanache Fal )

            ४९७ . वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पहावी पंढरी ॥१॥ ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टीकेशी ॥ ज्ञान होय मूढा । अति मूख त्या दगडा।।३ ॥ वाचील जो कोणी । जणी त्यासी लोटांगणी ॥४ ॥


             ४९८ . भाव धरुनियां वाचे ज्ञानेश्वरी । कृपा करी हरि तयावरी।।१ ।। स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्रु अर्जुनेशी।।२ ।। तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाहीं तयां ॥३ ॥ एकाजनार्दनी संशय सांडोनि । दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी।।४ ।। 


            ४९९ . ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणे निगमवल्ली प्रगट केली ॥१ ॥ गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रगट केली।।२ ।। अध्यात्म विद्येचें दाविलेसें रूप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३ ॥ छपन्न भषेचा केलासे गौरव । भवार्णवी नाव उभारिली ॥४ ॥ श्रवणाचे मिषे बैसावे येऊनि । साम्राज्य भुवनीं सुखी नांद।।५ ।। नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओंवी अनुभवावी।।६ ।।


--{-{ अजानवृक्ष महिमा }-}--

( Ajanvruksha Mahima )

            ५००.अजानवृक्षांची पाने जाण।जो भर्न करील अनुष्ठान । त्यासी साध्य होईल ज्ञान । येथे संशय नाही ॥१ ॥ ज्ञानेश्वरी तीन सप्तकोजो श्रवण करील विवेके । तो होय ज्ञानी अधिक । येथे संशय नाही ॥२ ॥ मनकर्णिका भागीरथी । इंद्रायणीचे स्नान करितीति मोक्षपदासी जाती । येथे संशय नाही।।३।।अश्वस्थ सिद्धेश्वर समाधीसी करी नमस्कार । तो पावे मोक्ष प  सार । येथे संशय नाही ॥४ ॥ येथीचे वृक्षपाषाण । ते अवघे देव जाण । म्हणे एकाजनार्दन । येथे संशय नाही।।५ ।। 


--{-{ श्री गंगा महात्म्य }-}--

( Shree Ganga Mahatmay )

            ५०१. वाचें म्हणतां गंगा गंगा।सकळ पा जाती भंगा ॥१ ॥ दृष्टी पडतां ब्रह्मगिरी । त्यासी नाही यमपुरी ॥२ ॥ कुशावर्ती करितां मान । त्याचे वैकुंठी राहणे ॥३ ॥ नामा म्हणे प्रदक्षिणा । त्याच्या पुण्या - नाहीं गणना।।४ ॥ 


--{-{ बारा जोतिर्लिंग महात्म्य }-}--

( Bara Jotirling Mahatmay )

            ५०२. सत्य ज्योतिर्लिंग बारा । प्रात : काळी स्मरण करा । कोतीकुळे उद्धारा । भव तरा बापहो ॥१ ॥ वाराणशी विश्वनाथ । मोक्ष दाता तो समर्थ । पुरवील अंतरीचे आर्त । सोमनाथ सोरटी ॥२ ॥ ॐकार ममलेश्वर । श्वेत्तबंध रामेश्वर । भीमा उगमी भीमाशंकर । घृष्णेश्वर वेरुळीं ॥३ ॥ नगनाथ अमृतोदकी । विश्वजन केले सुखी । परळी वैजनाथ सुखी । सुकृत साचे जन्माचें ॥४ ॥ त्र्यंबक हा तीर्थराज । पुरवील अंतरीचें  काजा त्याही तेजामाजी तेज । महाकाळ उज्जनी ॥५ ॥ दुजे कैलास भुवन । श्रीशैल्य मल्लिकार्जुन । वाचे स्मरतां धन्य धन्य । अनुपम्य क्षेत्र तें ॥६ ॥ बद्रिकेदार उत्तरें । ज्याचे स्मरणें भव हा तरें । ध्यान धरितां वृत्ति नुरे । निज निश्शल दसाची ॥७ ॥ नरहरी म्हणे जन्मा यावे । शुद्ध सत्त्व प्रेमभावें । वाचे हरी गुण गावें । माला जपे महाशिवरात्र महीमा सर्वदा।।८ ॥ 


            ५०३.एका सावधान कथा शिवरात्रापावन पवित्र तिही लोकी ॥१॥ भाव धरोनियां आचरती जरी । वास शिवपुरी घडे त्यासी॥२॥उपवास आणि शिवाचे पूजनारात्री जागरण विधी त्याचा॥३॥एक पसा पाणी एक बिल्वदळापूजन केवळ सोपे बहु ॥४॥ नामा म्हणे करा नामाचा गजर | मुखी हरिहर शब्दमात्रे ॥५ ॥


             ५०४. शिवरात्र व्रत करी यथाविधी । भावे पूजा आधी शिवलिंग ॥१ ॥ चुकले चुकले जन्माचे बधन । पुनरागमन नये तेणे ॥२ ॥ एक बिल्वदळ चंदन अक्षतां । पूजन तत्वतां सोपे बहु ॥३ ॥ एका जनार्दनी पूजिता साचार । इच्छिले हरिहर पूर्ण करिती ॥४ ॥ 


--{-{ किर्तन महीमा }-}--

( Kirtan Mahima )

             ५०५. एकच टाळी झाली चंद्रभागें वालवंटी । माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी ॥१ ॥ नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंगा जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥२॥ अभंग बोलतां रंग कीर्तनीं भरला । प्रेमाचेनि छंदें विठ्ठल नाचूं लागला ॥३ ॥ नाचतां नाचतां देवाचा गळला पीतांबर ॥ सावध होई देवा ऐसा बोले कबी ॥४ ॥ साधु या संतांनी देवाला धरिले मनगटीं । काय झाले म्हणूनि दचकले जगजेठी ॥५ ॥ ऐसा कीर्तन महिमा सर्वांमाजी वरिष्ठ । जड मूढ भाविका सोपी केली पायवाट ॥६ ॥ नामयाची जनी लोळे संताच्या पायीं । कीर्तन प्रेमरस अखंड देईं गे विठाई ॥७ ॥


             ५०६.श्रवणें कीर्तनें जाले ते पावन । सनकादिक जाण परमभक्त ॥ १॥ जाली ते विश्रांति याचकां सकळां । जीवीं जीवनकळा श्रीमूर्ति रया ।॥ २ ॥ पादसेवनें अक्रूर जाला ब्रह्मरूप । प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचें ।। शासख्य अर्जुन नरनारायण । सृष्टी जनार्दन एकरूप ॥ ४॥ दास्यत्व निकट हनुमंतें केले । म्हणोनि देखिले रामचरण ॥ ५॥ बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद । बभीषणा वरद चंद्रअर्क ।। ६ ।। व्यास आणि वसिष्ठ वाल्मीकादिक आणि पुंडलिक शिरोमणी ।। ७॥ शुकादिक योगी रंगले श्रीरंगीं । परीक्षितीच्या अंगी ठसावलें ॥८ ॥ उद्धव यादव आणि ते गोपाळ ।। गोपीकांचा मेळ ब्रह्मरूप ॥ ९ ॥ अनंत भक्तराशी तरले वानर । ज्ञानदेवा घर चिदानंदीं ॥१० ॥ 


            ५०७. यमधर्म सांगे दूतां । तुम्हां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय हरिकथा । सदा घोष नामाचा ॥१ ॥ नका जाऊं तया गांवा । नामधारकाच्या शिर्वा । सुदर्शन यावा । घरटी फिरे भोवती ।।२ ।। चक्र गदा घेऊनि हरि । उभा असे त्यांचे द्वारी । लक्ष्मी कामारी । रिद्धिसिद्धिसहित।।३ ।। ते बळिया शिरोमणी । हरिभक्त ये मेदिनी । तुका म्हणे कानीं । यम सांगे दूतांचे।।४ ।। 


--{-{ नक्र व गजेंद्र मोक्ष ( उद्धार ) }-}--

( Nakra va Gajendra moksha ( Udhhar )

            ५०८. नक्र बोले ऐक हषीकेशी । नाममात्रे तारिले गजेंद्रासी । काय कृपे झाले मजविशीं । आतां कैसा बा मोकलूनि जासी।।शा कळलें तुझें देवपण आतां । सोडी ब्रीद आपुले दीनानाथा।।धृ .।। दीनानाथ म्हणविसी कशासाठीं । द्वैतभाव त्वां धरियेला पोटीं । कैसें पाप लाविलें माझें पाठीं । तुझे रुप देखिलें आजि दृष्टि।।२ ।। दीनानाथ बोलती वेदचारी । साधुसंत गाताती नाना परी । सत्य ब्रीद मिरवत चराचरी । सोडी ब्रीद आपुलें झडकरीं ॥३ ॥ रजमाने तारिली अहिल्या शिळा । नामें करूनि उद्धरिले अजामेळा । पापी कैसा मी घननीळा । तुझें रूप देखिलें म्यां आजि डोळां ॥४ ॥ न्याय ब्रीद घेऊन तुझें आता । पापी कैसा मी सांग दीनानाथा । कैसे पाप मारिलें माझ्या माथां । अझूनि लाज कां नये तुझ्या चित्ता।।५ ।। नक्र बोले देवासी हांसू आले । निंदा नोहे स्तवन माझें केले । ' दीनानाथें तात्काळ उद्धरिलें । विष्णुदास नामा कौतुक बोले ॥६ ॥


            ५०९ . गजेंद्र तो हत्ती सहस्त्र वरुष । जळामाजी नक्रे पीडिलासे || १ || सुहृदयी सांडिले कोणी नाही साहे । अंती वाट पाहे विठो तुझी ॥२ ।। कृपेच्या सागरा माझ्या नारायणा । तयां दोघाजणा तारियेले ॥३ ॥ तुका म्हणे नेले वाहूनि विमानी । मीही ऐकोनी विश्वासलो ॥४ ॥ 


--{-{ अंतयात्रे प्रसंगीचे अभंग }-}--

( Antayatre Prasangiche Abhang )

            ५१०. क्षणोक्षणी हाचि करावा विचारा तरावया पार भवसिंधू ॥१|| शानाशिवंत देह जाणार सकळा आयुष्य खातो काळ सावधान॥२॥संत समागमी धरावी आवडी । करावी तांतडी परमार्थाची॥३॥तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारानका डोळे धुरे भरुनि राहो ॥४ ॥


             ५११.देह जाईल जाईल।यांसी काळ बा खाईल॥१॥कां रे नुमजसी दगडा।कैचे हत्ती घोडे वाडा।।शालोडे बलिस्ते सुपती।जरा आलिया फजिती।॥३ ॥ शरीर संबंधाचे नाते।भोरड्या बुडविती शेताते॥४॥अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढे दगा।।५ ।। 


            ५१२. धन मेळवूनि कोटी । सवे नये रे लंगोटी ॥१ ॥ पाने खासील उदंड । अंती जासी सुकल्या : तोंड ॥२ ॥ पलंग नाहाल्या सुपती । शेवटी गोवऱ्या सांगाती ॥३ ॥ तुका म्हणे राम । एक विसरता श्रम ॥४ ॥


             ५१३. नको नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळी ग्रासावया।॥१ ॥ काळाची हे उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबापाशा सोडविना राजा देशींचा चौधरी । आणिक सोयरी भली भलीं ॥३ ।। तुका म्हणे तुला सोडविना कोणी । एका चक्रपाणी वांचोनियां ॥४ ॥ 


            ५१४.आलिया संसारा उठा वेग करा।शरण जा उदारा पांडुरंगा॥१॥देह हे काळाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचे काय आहे।।२ ।। देता देवविता नेता नेवविता । येथे याची सत्ता काय आहे ॥३ ॥ निमित्ताचा धनी केला असे प्राणी।तुका म्हणे म्हणोनि व्यर्थ गेला ॥४ ॥ 


            ५१५. अंतकाळी मी परदेशी । ऐसें जाणोनि मानसी । म्हणोनियां हृषीकेशी । शरण तुजसि मी आलो ॥१ ॥ नवमास गर्भवासी । कष्ट झाले ज्या मातेशी।तिही निष्ठुर झाली कै सी । अंती दूर राहिली ॥२ ॥ जीवीं बापासि आवड मुखीं घालोनि करी कोड । जेव्हां लागली यम ओढ । तेव्हा दूरी टाकिलें ॥३ ॥ बहिणी बंधूंचा कळवळा । तें तूं जाणसी रे दयाळा । जेव्हां लागली यमशृंखला । तेव्हां दूरी टाकील ॥४ ॥ कन्या पुत्रादिक बळें । ही तंव स्नेहाची स्नेहाळें । तुझ्या दर्शनाहून व्याकुळें । अंती दूर   राहिली ॥५ ॥ देह गृहाची कामिनी । तें तंव राहिली भवनी।मी तंव जवळतसे स्मशानीं । अग्निसवें ॥ येकला ॥६ ॥ मित्र आले गोत्रज आले । तेही स्मशानीं परतलें । शेवटी टाकोनिया गेले । मजलागीं न स्मशानीं ॥७ ॥ ऐसा जाणोनि निर्धार । मग मज आला गहिवर । तंव दाही दिशा अंधकार । मग मज काही न सुचे।।८ ॥ ऐसें जाणोनि निर्वाण पाहीं । मनुष्य जन्म मागुता नाहीं । नामा म्हणे तुझें पायीं । मज ठाव देई विठोबा।।९ ।। 


            ५१६. झाला प्रेतरूप शरीराचा भावा लक्षियेला ठाव स्मशनींचा।।शा रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया । म्हणती हाय हाय यमधर्म ॥२ ॥ वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानानी लागला ब्रह्मत्वेंसी ॥३ ॥ फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य ध्वनी : बोंब झाली ॥४ || दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी । शरीर ज्याचे त्यासी समर्पिलें ॥५ ।। तुका म्हणे रक्षा में झाली अपोआप । उजळला दीप गुरुकृपा ॥६ ॥ 


--{-{ काल्याचे अभंग }-}--

( kalyache Abhang )

             ५१७.याल तरी यारे लागे।अवघे माझ्या मागें  मागें || 1 || आजि देतों पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥२ ॥ हळू हळू चाला | कोणी कोणाशी न बोला ॥३ ॥ तुका म्हणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥४ ॥ 


            ५१८. शिंकें लावियेलें दुरी । हे तो तिघांचे मी  वरी || 1 ||  तुम्ही व्हारे दोहीकडे । मुख पसरूनी गडे ॥२ ॥ वाहाती त्या धारा । घ्यारे दोहींच्या कोपरा ॥३ ॥ तुका  म्हणे हाती टोका । अधिक उणे नेदी एका ॥४ ॥ 


            ५१९.पाहाती गौळणी । तंव ती पालथी दुधाणी || १ म्हणती नंदाचिया पो।आजी चोरी केली खरें।।शात्याविण हे नासी।नव्हें दुसरिया ऐसी॥३॥सवें तुकया मेला । त्याने अगुणा आणिला ॥४ ॥


             ५२०. चला वळू गाई । बैसो जेऊं एके ठायीं ॥१ ॥ बहु के ली वणवण । पायपिटी जाला सिण ॥२ ॥ खांदी भार पोटीं भूक । काय खेळायाचे सुख ॥३ ॥ तुका म्हणे धांवें ॥ मग अवघे बरवें।।४ ।। 


            ५२१.घ्यारे भोंकरें भाकरी । दहीभाताची शिदोरी । ताक सांडा दुरी । असेल तें तयापे ॥१ ॥ येथे द्यावें तैसें घ्यावें । थोडे परि निरें व्हावें । सांगतो हे ठावें । असो द्या रे सकळां ॥२ ॥ माझें आहे तैसे पाहे । नाहीं तरी घरा जाये । चोरोनिया माये । नवनीत आणावें ॥ ३ ॥ तुका म्हणे घरीं । माझें कोणी नाहीं हरी । नका करूं दुरी । मज पाया वेगळे ॥४ ॥ 


            ५२२.अवघ्या सोडियेल्या मोटा।आजिचा दहीकाला गोमटा॥शाघ्यारे घ्यारे दहीभात।आम्हां देतो पंढरीनाथ ॥२ ॥ मुदा घेऊनियां करीं । पेंधा वाटितो शिदोरी ॥३॥ भानुदास गीतीं गाता प्रसाद देतो पंढरीनाथा ॥४ ॥ 


            ५२३.उपजोनियां पुढती येऊ । काला खाऊ दहीं भात ॥ १॥ वैकुंठीं तो ऐसे नाहीं । कवळ काही काल्याचे ॥ २॥ एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥ ३॥ तुका म्हणे वाळवंट । बरवें नीट उत्तम ॥४ ॥


              ५२४. आजी दिवस झाला । धन्य सोनियाचा भला ॥१ ॥ झालें संतांचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥२ ॥ रामकृष्ण नामें । बरवीं मोहियेली प्रेमें ॥३ ॥ तुका म्हणे आला । चवी रसाळ हा काला || ४ || 


            ५२५.काल्याचिये आसे । देव जळी झालें मासे । पुसोनियां हांसे । टिरी सांगातें हात ।। १ ।। लाजे त्यासी वाटा नाहीं । जाणे अंतरींचें तेंहीं । दीन होतां कांहीं । होऊं नेदी वेगलें ।। २ ।। उपाय अपाय यापुढें । खोटें निवडितो कुडें । जोडोनियां पुढें । हात उभे नुपेक्षी।।३ ।। तें घ्यारे सावकाशें । जया फावेल तें तैसे । तुका म्हणे रसे । प्रेमाचिया आनंदें ।। ४ ॥


             ५२६.आजि ओस अमरावती । काला पहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला।।१ ।। आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी । तटस्थ त्या ध्यानीं । गाई झाल्या श्वापदें।।२ ।। जें या देवाचे दैवत उभे आहे या रंगांत । गोपाळां सहित । क्रीडा करी कान्होबा ॥३ ॥ जया सुखाची शिराणी । तीच पाउलें मेदिनी । तुका म्हणे मुनी । धुंडितांहि न लभती ।॥ ४ ॥ 


            ५२७.कंठी धरिला कृष्णमणी।अवघा जनीं प्रकाश।॥१॥काला वाटू एकमेकां वैष्णव निका संभ्रम।।२॥वांकुलिया ब्रह्मादिकां।उत्तम लोकां दाखवू॥३॥तुका म्हणे भूमंडळीं । आम्ही बळी वीर गाढे ॥४ ॥ 


--{-{ आळंदी महिमा }-}--

( Alandi Mahima )

            ५२८. धन्य पुण्यभूमी आळंदी हे गांव । दैवताचे नांव शिद्धेश्वर।॥१ ॥ चौयांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा । तो सुखसोहळा काय वानु ॥२ ॥ विमानांची दाटी पुष्पांचा वरूषाव । स्वर्गीहूनि देव करिताती || ३ || नामा म्हणे देवा चला तया ठाया । विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४ ॥


             ५२९ . विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर । ते या भूमीवर अलंकापू॥शातये स्थळी माझा जीवाचा वो ठेवा । नमीन ज्ञानदेवा जाऊनियां।शासिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ति । ब्रह्मज्ञान प्राप्ति वटेश्वर।।शाचौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा।प्रत्यक्ष स्थपिला कल्पवृक्षा ॥४ ॥ तयासी नित्यतां घडता प्रदक्षणा । नाही पार पुण्या वास स्वर्गी।।५।।अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी । भागीरथी आदिकरुनी तीर्थराज ॥६ ॥ ऐशिया स्थळी समाधी ज्ञानदेवाएकाजनार्दनी ठाव अलंकापुर ॥७ ॥


             ५३०. सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई । अलंकापुरी || १ || शिवपीठ हे जुनाट । ज्ञानाबाई तेथे मुगुट ॥२ ॥ वेदशास्त्र देती ग्वाही । म्हणती ज्ञानाबाई आई || शाज्ञानाबाईचे चरणी । शरण एकाजनार्दनी ॥४ ॥ 


--{-{ पंढरी महात्म्य }-}--

( Pandhari Mahatmya )

            ५३१. सुखालागी करिसी तळमळ । तरी तूं पंढरीसी जाय एक वेळ ॥१ ॥ मग तूं अवघाची सुखरूप होसी । जन्मोजन्मींचें दुःख विसरसी।।२ ।। चंद्रभागेसी करितां एक सान । तुझे दोष पळती रानोरान ॥३ ॥  लोटांगण घालोनि महाद्वारीं । कान धरोनि नाचावे गरूडपारी ॥४ ॥ नामा म्हणे उपमा काय द्यावी । माझ्या विठोबाची अला बला घ्यावी ॥५ ॥ 


            ५३२.पंढरीसी जारे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१ ॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तांतडी उतावीळ ।। २॥ मागिल परिहार पुढे नाहीं शीण । झालिया दर्शन एकवेळा ।। ३ ।। तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चित्तीं निनडेना ॥ ४ ॥


             ५३३. अवधींच तीर्थे घडली एक वेळां । चंद्रभागा डोळां देखलिया ॥१ ॥ अवघींच पा गेली दिगांतरीं । वैकुंठ पंढरी देखलिया ॥२ ॥ अवघिया संतां एकवेळां भेटी।पुंडलिक दृष्टी देखलिया।॥३ ॥ तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक । विठ्ठलचि एक देखलिया ॥४ ॥ 


            ५३४. आषाढी कार्तिकी विसरूं नका मज । संगतसें गुज पांडुरंग ॥१ ॥ पतितपावन मी तो आहे खरा । तुमचेनि बरा दिसतसे ॥२ ॥ तुम्ही जातां गांवा हुरहुर माझे जीवा । भेटाल केधवां मजलागीं ॥३ ॥ धांवोनियां देव गळां घाली मिठी । स्फुदस्फुदून गोष्टी बोलतसे ॥४ ॥ तिहीं त्रिभुवनीं मज नाहीं कोणी । म्हणे चक्रपाणे नामयासी ॥५ ॥ 


            ५३५.संपदा सोहळा नावडे मनाला । लागला टकळा पंढरीचा ॥ १॥ जावें पंढरीसी आवडी मनासी । कधी एकदशी आषाढी ये ॥ २॥ तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचें मनीं । त्याची चक्रपाणी वाट पाहें।।३ ।। 


            ५३६. उदंड पाहिलें उदंड ऐकिलें । उदंड वर्णिलें क्षेत्रमहिमे ॥१ ॥ ऐसी चंद्रभागा ऐसें भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ॥ २॥ ऐसे संतजन ऐसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ॥ ३॥ तुका म्हणे आम्हां अनाथा कारणे । पंढरी निर्माण केली देवें ॥ ४ ॥ 


            ५३७. होय होय वारकरी । पाहें पाहें रे पंढरीं ॥ १॥ काय करावीं साधनें । फळ अवघेचि तेणें ॥ २ ॥ अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ।। ३॥ तुका म्हणे डोळां । विठो बैसला सावळा।।४ ।।


             ५३८.पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करी तीर्थव्रत ॥ १॥ व्रत एकादशी करीन उपवासी । गाईन अहर्निशीं मुखीं नाम ॥२ ॥ नाम विठोबाचे घेईन मी वाचे । बीज कल्पांतीचे तुका म्हणे।।३ ॥ 


            ५३९ . पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥ १॥ पुंडलिका दिला वर । करूणाकरें विठ्ठलें ।॥ २ ॥ मूढ पापी जैसे तैसे । उतरी कांसे लावूनी ॥ ३॥ तुका म्हणे खरें झालें । एका बोले संतांच्या ॥४ ॥ 


            ५४०. झळझळीत सोनकळा । कळस दिसतो सोज्वळा ॥१ ॥ बरवें बरवें पंढरपूर । विठोबारायाचें नगरा ॥२ ॥ माहेर संतांचे । नामया स्वामी केशवाचें ॥३ ॥


             ५४१. भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां । कोण्या काळें सुखा । ऐशा कोण पावत ।। १॥ नातुडे जो कवणेपरी । उभा केला विटेवरी ।।2 | । अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥३ ॥ तुका म्हणे धन्य झालें । भूमी वैकुंठ आणिलें ॥ ४ ॥


             ५४२. देह जावो अथवा राहो । पांडुरंगी भावो ॥१ ॥ चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ॥२ ॥ वदनीं तुझें मंगळनाम । हृदयीं अखंडित प्रेम ॥३ ॥ नामा म्हणे केशवराजा । केला नेम चालवी माझा ॥४ ॥ 


--{-{ धावा }-}--

( Dhava )

            ५४३.सिंचन करितां मूळ । वृक्ष ओलावे सकळ ।। १ ॥ नको पृथकाचे भरी । पडो एक मूळ धरीं ॥ २ ॥ पाणचोऱ्याचे दार । वरिल दाटावें तें थोर ॥3 ॥ वश झाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥४ ॥ एकआतुड़े चिंतामणी । फिटे सर्व सुख धणी ।। ५॥ तुका म्हणे धांवा । आहे पंढरी विसांवा ॥ ६ ॥


 --{-{ प्रारब्धपर अभंग }-}--

( Prarabdhapar Abhang) 

             ५४४. जे जे असेल प्रारब्धी । ते न चुके कर्मकधी । होणारा सारिखी बुद्धी । कर्मरेषा प्रगटे ॥१ ॥ नकळे पुढील होणार । भूत भविष्य हा विचार । कर्मधर्म तदनुसार । भोगणे लागे सर्वथा ॥२ ॥ ऐसा लिहूनि गेला विधाता । मग कासया करावि ते चिंता । आपुलिया संचिता । कर्मरेषा प्रमाण ॥३ ॥ जैसे असेल अचरण । घडले असेल पाप । पुण्य । तैसे सानुकुल होतील कर्म । मान अपमान जन करिता ॥४ ॥ काळ अनुकूल अथवा प्रतिकुल । परि सोडू नये आपले धैर्यबळ । अनचारी मन केवळ । नये बाटवू । सर्वथा । अखंड वाणी हरिस्मरणी । सुख विश्रांती कीर्तनी । खेचर विसोबा म्हणे प्राणी । मनुष्य देह दुर्लभ ॥६ ।। 


            ५४५. हरिश्चंद्र राजा होता सत्वगुणी । वाहातसे पाणी डोंबाघारी॥1|| सत्य पतिव्रता तारामती राणी । राहिली भोगोनी कायाक्लेश ॥२ ॥ भरते ऐकता मातेचे वचन । श्रीराम दर्शन कैसे घडे ॥३ ॥ माता पिता सर्व अव्हेरी जनक । नामा म्हणे भाक प्रारब्ध हे ॥४ ॥ 


MajhiMauli-blogger







FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER


Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.