भारुडाचे अभंग ( दादला, एडका, भूत, विंचू, रोडगा, सर्प, फुगडी, शिमगा, बाहुले, थट्टा, गौळणी )

shreyash feed ads 2

]] हरिः  ॐ [[

]] श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसज्ञ [[

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download


 भारुडाचे अभंग ( दादला, एडका, भूत, विंचू, रोडगा, सर्प, फुगडी, शिमगा, बाहुले, थट्टा)  

संपूर्ण  वारकरी भजनी मालिका | Varkari Bhajani Malika in marathi 



**।। मालिका आठवी ।।**

( Malika Aathavi )


...... = भारुडाचे अभंग =......

 ( Bharudache Aabhang )


॥ ** दादला **॥ 

( Dadala )


            ९९ . मोडकेसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१ ॥ मला दादला नलगे बाई ॥धृ .॥ फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवायला दोराच नाही ॥२ ॥ जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी । वर तेलाची धाराच नाही ॥३ ॥ मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४ ॥ सुरतीचे मोती गुलधांव सोने । राज्यांत लेणे नाही ॥५ ॥ एका जनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६ ॥ 


॥ ** एडका **॥ 

( edaka )


            १००. एडका मदन , तो केवळ पंचानन ॥धृ .॥ धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मा याचा मातेरा । इंद्र  चंद्रासी दरारा । लाविला जेणे । तो केवळ पंचानन ॥१ ॥ धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा । दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण । तो केवळ पंचानन ॥२ ॥ भस्मासुर मुकला प्राणासी । तेचि गती झाली वालीसी । विश्वामित्रा सारिखा ऋषी । नाडिला जेणे । तो केवळ पंचानन ॥३ ॥ शुक देवाचे ध्यान धरोनी । एडका आणिला आकळोनी । एका जनार्दनाचे चरणी । बांधिला जेणे । तो केवळ पंचानन ॥४ ॥


॥ ** भूत **॥ 

( Bhut )


             १०१. भूत जबर मोठे गे बाई । झाली झडपडण करूं गत काई ॥१॥धृ .॥ सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिले केशी ॥२ ॥ लिंबु नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३ ॥ भूत लागले नारदाला । सांठ पोरे झाली त्याला ॥४ ॥ भूत लागले धृव बाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५ ॥ एका जनार्दनी भूत । सर्वठायी सदोदित ॥६ ॥


॥ ** विंचू **॥ 

( Vinchu )


             १०२. विंचु चावला , वृश्चिक चावला ( अबबबब ) । काम कोध विंचु चावला तम घाम अंगासी आला ॥धृ ॥ पंचप्राण व्याकुळ झाला तेणे माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१ ॥ मनुष्य इंगळी अति दारूण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२ ॥ या विंचावाला उतारा । तमोगण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा || ३ || सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित राहिली फुणफुण । शांत केली एकाजनार्दने ॥४ ॥


॥ ** रोडगा **॥ 

( Rokada )


            १०३. सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥१॥धृ .॥ सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला || २ || सासू माझी जाच करते । लवकर निर्दाळी तिला || ३ || जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर गे तिला || ४ || नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होउ दे त्याला || ५ || दादला मारून आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६ ॥ एका जनार्दनी सगळेचि जाउ दे । एकटीच राहू दे मला ॥७ ॥


 ॥ ** सर्प ** ॥ 

( Sarp )


             १०४. स्वरूपमंदिरी होते मी एकली । माया सांजवेळ अविद्येचे बिळी । माझे तुझें चालतां पाउली । मोहो भुजंगें धरिली करांगुळी ॥१ ॥ लोभसर्प डंखला करूं काय । स्वार्थसंपत्तीने जड झाला पाय । आशालहरी तापला माझा देह । तृप्ति वारा घाली वो गुरूमाय ॥२ ॥ विषय निंब बहु गोडिये आला । भजनमूळ तो मज कडू झाला । वित्तहानीचा गळां झेंडु आला । असत्यअशुध्दाच्या येताती गुरूळा वो ॥३ ॥ कामिनीकामाची डोळां आले पीत्त । रसस्तुतिनिंदा काळे झाले दात । विकल्पवासनेच्या मुंग्या धांवत । स्त्रीपुत्रलोभे जीवा पडली भ्रांत || ४ || मीतूंपणाची थोर आली भुली । मी येथे कोण वोळखी मोडली । अहं विवेके काया जड झाली । सद्गुरूगारूडी बोलवा माउली ॥५ ॥ गुरू गारूडी आला धाउनी । बोध वैराग्याचें पाजिले पाणी । विवेकअंजन घातले नयनीं । सोहंशब्द वाजवी नाम ध्वनी ॥६ ॥ मिथ्याभूतमय अवघी ब्रह्मस्थिती । अभयस्वरूपी लाविली विभूती । उतरला सर्प निवारली भ्रांती । एका जनार्दनी आलिसे प्रचिती ॥७ ॥


॥ **  फुगडी **॥ 

( Fugadi )


            १०५. फुगडी फू सवती माझे तूं । हागुनी भरले धूं तुझ्या ढुंगा तोंडावरी धुं ॥१ ॥ फुगडी घेता आली हरी । उठ जा वो जगनोवरी।।शाहात पाय बेंबळ जाती । ढुंगण घोळीतां लागे माती ॥३ ॥ सात पांच आणिल्या हरािवांचूनी काय तगसी पोरी ॥४ ॥ सरला दम पांगले पायाअझुनी तरी घोळिसी काय।।५।।तुका म्हणे अझुन तरी । सांगितले ते गधडी करी ॥६ ॥


॥ ** शिमगा **॥ 

( Shimga )


             १०६. सत्व गांठी उमगा । तेणे सकळ होईल शिमगा । तुम्ही हेच गाणे गा । तुम्ही हसू नका ॥१ ॥ भूत सभेची कारटी । विषय गोवऱ्या चोरटी । उतरा कुकर्माची राहटी । तुम्ही हसू नका हसू नका ॥२ ॥ जागोजागी थांबा । अवघ्या मिळोनी मारा बोंबा । न जळे एरंडाच्या कोंबा । तुम्ही हसू नका हसू नका ॥शा गांवचा पाटील कोळी । काळोबाची पिकली पोळी । तुमची पाजळू द्या होळी । तुम्ही हसू नका हसू नका ॥४ ॥ ओटीत घेउनि गुलाल । सख्या मेहुणीसंगे भुलाल । तिचा नवरा मोठा जलाल । तुम्ही हसू नका हसू नका ॥५ ॥ एकाजनार्दनी पोस्त । गाणे गांता हालमस्त । नाही तर भडवे समस्त । तुम्ही हसू नका हसू नका ॥६ ॥ 


॥ ** बाहुले **॥ 

( Bahule )


             १०७. शिळा ताव्याचे बाहुले केले । पाट मांडुनि ना वरी बैसविले । वस्त्र अळंकारी गुंडाळिले । मना आले भि ते नाम ठेविले ॥१ ॥ या जनासी लागले वेड ॥धृ .॥ शुध्द पाण्याने प्रक्षाळिले । गंध फुलाने झाकोळिले । धूप दाउनि दीपे उजळिले । पुढे अन्न ठेवूनि चाळविले ॥२ ॥ घेरे घेऊनि भोवंडिले । आडवे पडोनि दंडवत केले । आपपर नाही देखिले । एकाजनार्दनी ओळखिल ॥३ ॥


॥ ** थट्टा **॥ 

( Thatta )


             १०८. अशी ही थट्टा । भल्याभल्यासी लाविला बट्टा ॥धृ ।। ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी । थट्टेने हारविली के बुद्धिा केली नारदाची नारदी । अशी ही थट्टा ॥१ ॥ मा थट्टा दुर्योधनाने केली । पांचाळी सभेमाजी आणिली । गदाघाये मांडी फोडीली । अशी ही थट्टा || शा थट्टा गेली शंभोपाशी । कलंक लाविला चंद्रासी । भगेपाडिली इंद्रासी । बरी नव्हे थट्टा || ३ || थट्टेने मेला दुर्योधन । भस्मासुर गेला भस्म होऊन । वाळीही मुकला आपुल्या प्राण । अशी ही थट्टा || ४ || थट्टा रावणाने केली । नगरी सोन्याची बुडविली । थट्टा ज्याची त्यास भोवली । बरी नव्हे थट्टा।।५ ।। अरण्यात होता ऋषी । थट्टा गेली त्याचेपाशी । भुलवुनी आणिला अयोध्येसी । बरी नव्हे थट्टा ॥६ ॥ विराटराजाचा मेहुणा । नाम तयाचे कीचक जाणा । त्याणे घेतले बहतांचे प्राणा । बरी नव्हे थट्टा ॥७ ॥ थट्टेपासून सुटले चौघेजण । शुक भीष्म आणि हनुमान । चौथा कार्तिकस्वामी जाण । त्याला नाही बट्टा।।८ ॥ एकाजनार्दन म्हणे सर्वांला । थट्टेला भिऊन तुम्ही चाला । नाही तर नेईल नरककुंडाला । अशी ही थट्टा।।९ ।। 


--- गौळणी ---

( Gaulani )

            १०९ . त्रिभंगी देहुडा ठाण मांडूनियां माये । कल्पद्रुमातळी वेणु वाजवितु आहे ॥१ ॥ गोविंदु वो माये गोपाळु वो । सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु वो ॥२ ॥ सांवळे सगुण सकळां जीवांचे जीवन । घनानंद मूर्ति पाहतां हारपलें मन ॥३ ॥ शून्य स्थावर जंगम व्यापुनि राहिला अकळ । बापरखुमादेविवरू विठ्ठल सकळ ॥४ ॥ 

            ११०. वृंदावनी आनंदु रे । विठ्ठलु देवो आळविती रे ॥१ ॥ गोपाळ रतले रे । विठ्ठल देवो आळविती रे ॥२ ॥ निवृत्तिदासा प्रियो रे । विठ्ठलु देवो आळविती रे ॥३ ॥ 

            १११.योगियां मुनिजनां ध्यानीं । तें सुख आसनी शयनी ॥१ ॥ हरिसुख फावलें रे ॥ धृ ० ॥ गोकुळींच्या  गौळियां । गोपी गोधना सकळ i॥२ ॥ बापरखुमादेविवरू मी विठ्ठलें । तें सुख संवगडियां दिधलें।।३ ।। 

            ११२.तुजवीण येकली रे कृष्णा न गमे राती । तंव तुवां नवल केलें वेणू घेऊनि हातीं।आलिये तेचि सोय तुझी वोळखिली गति॥१॥नवल हे वालभ रे कैसें बार की जोडलें जीवा । दुसरें दुरी ठेलें प्रीति केला रिघावा॥धृ ०॥२ ॥ पारू रे पारूरे कान्हा झणे करिसी त्रि अव्हेरू।तूंतंव हृदयींचा होसी चैतन्य चोरू । बापरखुमादेविवरू विठो करीं कां अंगिकारू ॥३ ॥

             ११३. गायी चालिल्या वनाप्रती । सवे पेंधा चाले ता सांगाती ॥१ ॥ बळि गोवळिया कान्होबा । यमुने पाण्या नेई तूं बा ॥धृ ।। पांवया छंदे परतल्या गाई । विसरल्या चारा तल्लीन ठायीं।।२ ।। ज्ञानदेव सर्वे सवंगडा लाठा । गाई हांकितो गोठणा तटा ॥३ ॥

            ११४.  कृष्णें वेधिली विरहिणी बोले । चंद्रमा करितो उबारा गे माये । न लावा चंदनु अंगी न घाला विजणवारा । हरिविणे शून्य शेजारू गे माय ।।१ ।। माझे जिवींचे तुम्ही कां वो नेणां । माझा बळिया तो पंढरीराणा वो माय ।। २ ।। नंदनंदनु घडी घडी आणा । तयावीण न वांचती प्राणा वो माया बापरखुमादेविवरू विठ्ठल गोविंदु । अमृतपान गे माय ।। ३ ।। 

            ११५.यतिकुळ माझें गेलें हारपोनी । श्रीरंगावांचुनी आनु नेणें।।१ ॥ किती वो शिकवाल मज वेळोवेळां । मी तंव गोवळां रातलिय ।। २ ।। अष्टभोग भोगणे मातें नाहीं चाड । भक्तिप्रेम गोड लेईलें गे माये ।।३ ।। बापरखुमादेविवरू जीवींचा जिव्हाळा । कांहीं केलिया वेगळा नव्हे गे माये ।। ४ ।। 

            ११६.लक्ष लावुनि अंतरीं । कृष्णा पाहती नरनारी । लावण्यसागरू हरि । परमानंदु।।१ ।। छंदें छंदें वेणु वाजे । त्रिभुवनीं घनु गाजे । उतावेळ मन माझें । भेटावया।।२ ।। ब्रह्मविद्येचा पुतळा । गाई राखितो गोवळा । श्रुति नेणवे ते लीळां । वेदां सनकादिकां।।३ ॥ भूतग्रामींचा परेशु । तापत्रयाचा करी नाशु।आड धरूनी गोपवेषु । वत्सें राखे।।४ ।। रासक्रीडा वृंदावनी खेळे । इंदुवदन मेळे । उद्धरी यदुकुळें ।कुळदीप।।५।।निवृत्तिदासाचादातारू । बापरखुमादेविवरू । भक्तां देतो अभयक रू । क्षणक्षणांमार्जी ।। ६ || 

            ११७. भक्तांकारणे येणे घेतलीसे आळी । दहा गर्भवास सोशी वनमाळी।।१ ।। माझ्या कान्होचें तुम्ही नाव बरवे घ्या वो हृदयी धरूनी यासी खेळावया न्या वो ॥२ ॥ कल्पनेविरहीत भलतयांमागे । अभिमान सांडुनी दीनापाठी लागे ॥३ ॥ शोषिली पूतना येणे मोहिये लेकरूं । आळी न संडी बाप रखुमादेविवरु ॥४ ॥ 

         ११८. घनु वाजे घुणघुणा । वर वाहे रुणझुण ।भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ।।१।। चांद वो चांदणे । चांपे वो चंदनु । देवकीनंदनु । वीण नावडे | वो ॥ २॥ चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी कान्हो वनमाळी । वेगी भेटवा कां ॥ ३॥ सुमनाची सेज । शितळ वो निकी । पोळे आगिसारखी । वेगी | विझवा कां ॥ ४॥ तुम्ही गांतसां सुस्वरें । ऐकोनी द्या . उत्तरें । कोकिळे वर्जावे तुम्ही बाइयांनो ॥५ ॥ दर्पणी पाहता रूप न दिसें आपुलें । बापरखुमादेविवरे विठ्ठलें मज ऐसें केलें ॥ ६ ॥

             ११९ . गौळणी सांगती गान्हाणी । रात्री आला चक्रपाणी । खाऊनि दही दूध तूप लोणी । फोडिली अवघी विरजणी ॥१ ॥ हा गे बाई कोणासी आवरेना । यशोदे बाळ तुझा कान्हा । कोठवर सोसू धिंगाणा ॥धृ .॥ दुसरी आली धांवत । याने गे बाई काय केली माता मुखाशी मुख चुंबन देत । गळ्यांमधे हात घालीत । धरू जाता हा बाई सांपडेना ॥२ ॥ तिसरी आली धाऊनी । म्हणे गे बाई काय केली करणी । पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गांठ देऊनी । गांठ बाई कोणासी सूटेना ॥३ ॥ मिळोनि अवघ्या गौळणी । येती नंदाच्या अंगणी । जातो आम्ही गोकुळ सोडोनी । आमुच्या सुना घेऊनी । हे गे बाई आम्हासी पहावेना ग ॥४ ॥ ऐशी ऐकतां गा - हाणी । यशोदे नयनी आले । पाणी । कृष्णा खोडी दे टास्कुनी । एका जनार्दनी चरणी । प्रेम तया अवरेना ॥५ ॥ 

            १२०.जीवींचिया जीवा प्रेमभावाचिया भावा । तुज वांचुनी केशवा अनु नावडे || १ || जीवें अनुसरलीयें अझुनि कां नये । वेगीं आणावा तो सये प्राण माझा।।२ ।। सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू । बापरखुमादेविवरू श्रीविठ्ठलू ॥३ ॥

             १२१. ज्याचिये आवडी संसार त्याजिला । तेणे कां अबोला धरिला गे माये । पायां दिधली मिठी घातली जीवें गांठी । साऊमा नये जगजेठी उभा ठेला गे माये ॥१ ॥ भेटवा वो त्यांसी चरण झाडीन केशी । ना सगुणरूपासी मी वो भाळलिये ॥धृ .।। क्षेमालागी नी जीव उताविळ माझा । उचलोनि चारी भुजा देईन क्षेम ।। । कोण्या गुणें कां वो रुसला गोवळु । सुखाचा चावळू गा मजसी न करी गे माये ॥२ ॥ ऐसें अवस्थेचें पिसें य लाविलेसें कैसें । चित्त नेले आपणिया सरिसें गे माये त । बापरखुमादेवीवरें लावियेले पिसें । करूनि ठेविले जरी आपणिया ऐसें गे माये || ३ ||

              १२२.॥पंढपुरीचा निळा लावण्याचा पुतळा । विठो 1० देखियेला डोळां बाईये वो ।। १॥ वेधलें वो मन नवी तयाचिया गुणीं । क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी ।। २॥ पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय उणे । तैसे माझं जिणे एका विठ्ठलेंवीण ॥ ३॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलुचि पुरें । चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥ ४ ॥ 

             १२३. गौळणी ठकविल्या । गौळणी ठकविल्या । एक एकसंगतीने मराठी कानडीया । एक मुसलमानी कोकणी । गुजरणी अशा पांचीजणी गौळणी ठकविल्या ॥धृा।गौळणी सुंदरी । गौळणी सुंदरी । गेल्या यमुनेतीरी । वस्त्रे फेडूनियां मान करिती नारी । गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी।स्नान करोनि त्या आल्या बाहेरी ॥२॥लडोबा गोविंदा । लडोबा गोविंदा।निरवाणी आजाआडचाल्लो पडचालो । शीर फोड्या न कोडो । मारी कन्हय्या पानी खेळ्या न खेळो ॥३॥ देखे रे देव्ह शा देव ना द्य ग ना कन्हय्या । देखे रे कन्हय्या । मै इजतकी बडी । कदम पकडुंगी । मैया कुटोजुडी । मेरी चुनरी दे मेरी ले दुल्लडी ॥४ ॥ देवकी नंदना देवकी नंदना । तूं ऐक श्रीपती । उघडी हिंवाची तुज विनवू किती।पाया पडते बां । मी येते काकुलती । माझी साडी दे । घे नाकाचे मोती ॥५ ॥ पावगा दाताला । तूं नंदाचा झिलो । माका फडको दी । मी हिवान मेलों । घे माझो कोयतो । देवा पायां E पडलों ॥६ ॥ ज्योरे माधवजी । ज्योरे माधवजी । मैं शरण थईन तनकाकाकैपी । बाप दयाळ तूंही।मारी साडी आपो । हातणी ले कंकणी ॥७ ॥ इतुके ऐकुनी । म्हणे शारंगपाणी । सूर्या दंडवत करा कर जोडुनी । नामा विनवितो।गौळ्या ऐक तूं । धन्य तुझी करणी।।८ ।।

             १२४. परब्रह्म निष्काम तो हा गौळिया घरीं । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१ ॥ म्हणती गौळणी हरीची पाऊले धरा । रांगत रांगत येतो हरि हा राजमंदिरा ॥ २॥ लपत छपत येतो हरि हा राजभुवनी । नंदासी टाकुनि आपण बैसे सिंहासनीं । ३ ।। सांपडला देव्हारा यासी बांधा दाव्यांनीं । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥ ४॥ बहुता कष्टें बहुतां पुण्ये जोडले देवा । अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ।। ५ ।। नामा म्हणे केशवा अहो जी तुम्ही दातारा । जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण सेवा ॥६ ॥

             १२५.बाळ सगुण गुणाचें तान्हें गे । बाळ दिसतें गोजिरवाणे गे । काय सांगता गा - हाणे गे । गोकुळींच्या नारी ॥ १॥ श्रीरंग माझा वेडा गे । याला नाहीं दुसरा जोडागे । तुम्ही याची संगत सोडा गे । गोकुळीच्या नारी ॥२ ॥ पांच वर्षाचे माझे बाळ गे । अंगणी माझ्या खेळे गे । कां लटकाच घेतां आळ गे । गोकुळींच्या नारी ॥ ३॥ सावळा गे चिमणा माझा गे । गवळणींत खेळे राजा गे । तुम्ही मोठ्या ढालगजा गे । गोकुळीच्या नारी ॥ ४॥ तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे । आळ घेतां या गोपाळा गे । तुम्ही ठायींच्या वोढाळा गे । गोकुळींच्या नारी ॥ ५॥ तुम्ही लपवुनि याची गोटी गे । लागतां गे याचे पाठी गे । ही एवढीच रीत खोटी गे । गोकुळींच्या नारी ।। ६॥ तुम्ही लपवून याचा भवरा गे । आळ घेतां शारंगधरा गे । तुम्ही बारा घरच्या बारा गे । गोकुळींच्या नारी ।। ला हा ब्रह्म विधीचा जनीता गे । तुम्ही याला धरू पाहता गाहा कैसा येईल हातां गे । गोकुळींच्या नारी ॥ ८॥ नामा म्हणे यशोदेसी गे । हा तुझा हृषीकेशी गे । किती छळितो आम्हांसी गे । गोकुळींच्या नारी ।। ९ ॥

             १२६.हाती घेऊनियां कांठी । शिकविते श्रीपती । यमुनेची माती । खासी कां कां कां कां ॥१ ॥ हरी तूं खोडी नको करूं माझ्या बाबा बा बा।।धृ .॥ धावूनियां धरिला करीं । बैसविला मांडीवरी । मुख पसरोनि करी । आ आ आ आ ॥२ ॥ विष्णुदास नामा म्हणे । मरोनियां जन्मा येणे । कृष्ण सनातन पाहूं । या या या या।।३ ॥

             १२७. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल ॥धृ .॥ साध्या गव्हाची पोळी लाटीं । मला पुरण पोळी करून दे मोठी । नाहीं अवडीत गुळासाठीं । मला जेवू घाल ॥१ ॥ तूप लावून भाकर करीं । वांगे भाजून भरीत करीं । वर कांद्याची कोशिंबिरी । मला जेवू घाल ॥२ ॥ आई ग खडिसाखरेचे खडे । लवकर मला करून दे वडे । बाळ स्फुदस्फुदोनी रडे । मला जेवू घाल ॥३ ॥ लहानच घे गे उंडा । लवकर भाजून दे गे मांडा । लांब गेल्या गाईच्या झुंडा । मला जेवू घाल ॥४ ॥ आई मी खाईन शिळा घाटा । दह्याचा गे करून दे मठ्ठा । नाहीं माझ्या अंगी ताठा । मला जेवू घाल ॥५ ॥ भाकर बरीच गोड झाली । भक्षूनि भूक हारपली । यशोदेने कृपा केली । मला जेवू घाल ॥६ ।। आई मी तुझा एकुलता एक । गाई राखितों नऊ लाखा गाई राखून झिजली नखं । मला जेवू घाल ॥७ ॥ नामा विनवी केशवासी । गाई राखितो वनासी । जाऊन सांगा यशोदेशी । मला जेवू घाल ॥८ ॥ 

            १२८. वृंदावनीं वेणू कवणाचा माये वाजे । वेणूनादें गोवर्धनु गाजे । पुच्छ पसरूनी मयूर विराजे ! मज पाहतां भासती यादवराजे ॥ १॥ तृणचारा चळं विसरली । गाई व्याघ्र एकेठायीं जालीं । पक्षीकुळे निवांत राहिलीं । वैरभाव समूळ विसरलीं ॥ २॥ यमुनाजळ स्थिर स्थिर वाहे । रविमंडळ चालतां स्तब्ध होय । शेष कूर्म वराह चकित राहे । बाळा स्तन देऊं विसरली माय ॥ ३ ॥ ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती । वांकी रुणझुण रुणझुण वाजती । देव विमानीं बैसोनि स्तुति गाती । भानुदासा फावली प्रेमभक्ती ॥ ४ ॥ 

            १२९ . डोईचा पदर आला खांड्यावरी । भरल्या बाजारी जाईन मी ॥१ ॥ हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आतां मज मना कोण करी ॥२ ॥ पंढरीच्या पेठे मांडियेले पाल । मनगटावरी तेल घाला तुम्ही ॥३ ॥ जनी म्हणे देवा मी झालें येसवा । रिघाले केशवा घर तुझें ॥४ ॥

             १३०. राधा आणि तो मुरारी । क्रीडताती कुंजवनी ॥१ ॥ कृष्ण डोलत डोलत । आले राधेमंदिरात ॥२ ॥ सुमनाचे सेजेवरी । राधा आणि तो मुरारी ॥३ ॥ आवडीने विडे देत । दासी जनी उभी तेथ ॥४ ॥

             १३१. गवळण म्हणती यशोदेला । कोठे गे सांवळा । असे बाई गे साजणीशा या नंदाच्या अंगणी । सद्गदीत होऊनि । मथुरेसी चक्रपाणी । जातो गे साजणी । विव्हळ झाले मन वचन ऐकोनि ॥२ ॥ अक्रूरा चांडाळा । तुज कोणी धाडिला ।। कां घात करूं आलासी।वधिशी सकळां । अक्रूरा तुझे नाम तैशीच करणी।।शारथी चढले वनमाळी । आकांत गोकुळी । भूमि पडल्या व्रजबाळी । कोन त्या सांभाळी । नयनीच्या उदकानें भिजली धरणी॥४॥देव बोले अक्रूरासी । वेगे हाकी रथासी ।। या गोपीच्या शोकासी । न पहावे मजसी ।। एका जनार्दनी रथ गेला निघोनि ॥५ ॥ 

            १३२. गौळणी गा - हाणे सांगती यशोदेसी । दही दूध खाऊनियां पळूनि जातो हृषीकेशी ॥१ ॥ लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे । याच्या खोडी सांगू किती महीपत्र सिंधु आटे ॥२ ॥ मेळवोनि गोपाळ घरांमध्ये शिरे कान्हा । धरूं जाता पळूनि जातो यादवांचा राणा ॥३ ॥ ऐसे मज याने पिसे लावियेले सांगू काई । एका जनार्दनी काया वाचा मने पायी ॥४ ॥

             १३३. माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥धृ .॥ हाती घेऊनियां फूल । अंगणी रांगत आले मूल । होते सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली।।शा माथा शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण । त्याला म्हणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती।।शा संगे घेऊनि गोपाळ । बाळ खेळे गौळणी अळुमाळ । पायीं पोल्हारे झळाळ । गळां माळ वैजयंती ॥३ ॥ एका जनार्दनी माय । घरोघरांप्रती जाय । कृष्णा जाणावे ते काय । कोणी सांगा गे ॥४ ॥                 

            १३४. नानापरी समजाविते परी न राहे श्रीहरी । दहीभात कालवोनि दिला वेगी झडकरी । कडेवरी घेऊनिया फिरले मी दारोदारी ॥१ ॥ राधे राधे राधे राधे घेई शामसुंदरा । नेई आतां झडकरी आपुलिया मंदिरा।।धृ .॥ क्षणभरी घरी असतां करी खोडी शारंगपाणी । खेळावया बाहेरी जाता आळ घेती गौळणी । थापटोनि निजविता पळोनि जातो राजद्वारा।।३ ।। राधा घेऊनि हरिला त्वरे जात मंदिरी । हृदयमंचकी पहुडविला श्रीहरी । एका जनार्दनी हरिला भोगी राधा सुंदरी ॥४ ॥

             १३५. कशी जाऊ मी वृंदावना । मुरली वाजवितो कान्हा ।। धृ ० ॥ पैलतीरी हरी वाजवी मुरली । नदी भरली यमुना ॥ १॥ कांसे पीतांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥ २॥ काय करूं बाई कोणाला सांगू । नामाची सांगड आणा ॥ ३॥ नंदाच्या हरीने कौतुक केलें । जाणे अंतरींच्या खुणा ॥४ ॥ एकाजनार्दनीं मनी म्हणा । देव महात्म्य न कळे कोणा ॥५ ॥ 

            १३६.तुझें श्रीमुख सुंदर । कुसुम शुभकांती नागर । कांसे पितबिर मनोहरा पाहुनी भूल पडली । करूणाघना ॥१ ॥ मुरली नको वाजवू मनमोहना।।धृ ० ॥ सरपरता होय माघारा । देहभाव बुडाला सारा । नाहीं संसारासी थारा । भेदभ्रम गेला कमळनयना।।२।।ध्वनि मंजुळ ऐकिली कानीं । सर्व सुखां जाली धणी । एका जनार्दनीं ध्यानीं मनीं । एकपण जगजीवना।।३ ॥ 

            १३७.मनमोहन मुरलीवाला।नंदाचा अलबेला ॥१ ॥ भक्तासाठी तो जगजेठी । कुब्जेसी रत झाला ॥ २ ॥ विदुराघरच्या भक्षूनि कण्या । परमानंदें धाला ॥३ ॥ भक्ति सुखें सुखावला । एका जनार्दनीं निमाला ॥४ ॥ 

            1३८. भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदें ॥१ ॥ पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निच्छळ ॥२ ॥ तृणचरे लुब्ध झाली । पुच्छ वाहूनिया ठेली ॥३ ॥ नाद न समाये त्रिबुवणीं । एका भुलला जनार्दनीं।॥४ ॥ 

            १३९ . तुझ्या मुरलीची ध्वनी । अकल्पित पडली कांनी । विव्हळ झाले अंतःकरणी।मी घर धंदा विसरलें ॥१॥अहा रे सांवळिया।कैसी वाजविली मुरली॥धृ .॥ मुरली नोहे केवळ बाण । तिने हरीला माझा प्राण । संसार केला दाणादीन । येऊनि हृदयीं संचरली ॥२ ॥ तुझ्या मुरलीचा सूरतान । मी विसरलें देहभान । घर सोडोनि धरिले रान । मी वृंदावनी गेले ॥३ ॥ एका जनार्दनी गोविंदा । पतितपावन परमानंदा । तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदी निवर्तली ॥४ ॥

            १४०. गौळणीचा थाट निघाला मथुरे हाटालागीं । ते देखोनि जगदीश धांवला गोप घेऊनि वेगी ॥१ ॥ कान्हया सरसर परता नको आरुता येऊं । तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊं ॥धृ .॥ सासुरवासिनी आम्ही गौळणी । जाऊं दे रे हरी । बहु वेळ लागतां सासु सासरे कोपतील घरीं ॥२ ॥ आम्ही बहुजनी येकला तूं । शारंगपाणी दिससी येथें । हृदयमंदिरी ठेऊनि तूंते जाऊं मथुरा पंथे ॥३ ॥ एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपी या बरवंटा । कृष्णपदी त्या लील झाल्या । पूर्णपणे तन्निष्ठा ॥४ ॥

             १४१.अधरीं धरूनी वेणु । वेणु वाजविला कोणी नेणुं ॥ १॥ प्रातःकाळी तो वनमाळी । घेऊनी जातो धेनु ॥ २॥ उभी मी राहें वाट मी पाहें । केव्हां भेटेल मम कान्हु ।। ३ ।। एका जनार्दनीं वाजविला वेणु । ऐकतां मन झालें तल्लीनु ॥ ४ ॥ 

              १४२.गाई गोपाळ सवंगडे वना । घेऊनिया जाय ( गायी ) खेळे नंदाचा कान्हा॥धृ .॥ विष्णुमूर्ती चतुर्भुज शंख चक्र हाती । गदा पद्म वनमाळा शोभती शोभती ॥१ ॥ विटीदांडू चेंडू लगोरी नानापरी । खेळ मांडियेला यमुनेचे तीरी ॥२ ॥ एका जनार्दनी पाहतां तन्मय । वेधले वो मन वृत्तिसहीत माये ॥३ ॥

             १४३. चला बाई वृंदावनी रासक्रिडा पाहू । नंदाचा वाळ येणे केला नवलाऊ ॥१ ॥ कल्पनेची सासू इचा बहुतचि जाचूादेहभाव ठेउनी पायी ब्रह्मपदी नाचूं ॥२ ॥ सर्व गर्व सोडूनि बाई चला हरीपाशी । द्वैतभाव ठेवुनी पायी हरिरुप होशी ॥३ ॥ एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहता अवघे स्वप्नवत् वाव।।४ ॥ 

            १४४ . मुरली मनोहर रे माधव।।धृ .॥ श्रीवत्सलांछन हृदयी विलासन । दीन दयाघन रे ॥१ ॥ सुरनर किन्नर नारद तुंबर । गाती निरंतर रे ॥२ ॥ एका जनार्दनी त्रिभुवन मोहन । राखितो गोधन रे।।३ ।। 

            १४५.दुडीवरी दुडी गौळणी साते निघाली । गौळणी गोरसु म्हणों विसरली ॥१ ॥ गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे । तंव तंव हांसती मथुरेच्या गे॥२॥दुडिया माझारी कान्होबा झाला भारी । उचंबळे गोरस सांडे बाहेरी ॥३ ॥ एकाजनार्दनीं सबलस गौळणी । ब्रह्मानंदु न समाये मनीं ॥४ ॥ 

              १४६. खांद्यावरी कांबळी हातामधी काठी । चारीतसे धेनु सांवळा जगजेठी ॥१ ॥ राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२ ॥ एक एक गौळणी एक एक गोपाळा । हाती धरूनि नाचती रास मंडळा ॥३ ॥ एका जनार्दनी रासमंडळ रचिले । जिकडे पाहे तिकडे अवघे ब्रह्म कोंदले ॥४ ॥ 

            १४७.ऐक ऐक सखये बाई । नवल मी सांगू काई । त्रैलोक्याचा धनी तो हा । यशोदेसी म्हणतो आई ।। १॥ देवकीनें वाहिला । यशोदेनें पाळिला । पांडवांचा बंदिजन । होऊनियां राहिला ।। २॥ ब्रह्मांडाची सांठवण । योगियांचे निजधन । चोरी केली म्हणऊन । उखळासी बंधन ॥३ ॥ सकळ तीर्थे जया चरणीं । सुलभ हा शूळपाणी । राधिकेसी म्हणे तुझी । करीन वेणीफणी ।। ४॥ शरण एकाजनार्दनीं । कैवल्याचा मोक्ष दानीं । गाई गोप गोपी बाळा । मेळविले आपुलेपणीं ॥ ५ ॥ 

            १४८.कृष्णमूर्ति होय गे कळों आली सोय गे । प्राणाचाही प्राण पाहतां सुख सांगू काय गे ॥ १ ॥ तुळशीमाळ गळां गे कस्तुरीचा टिळा गे । अर्धांगी रुक्मिणी विंझणे वारिती गोपी बाळा गे ।। २ ।। पीतांबराची कास गे कसिली सावकाश गे । नारद तुंबर गायन करती पुढे निजदास गे ।। ३ ।। भक्तकृपेचि माय गे वोळखिली विठाई गे । एका जनार्दनीं विटे जोडियेले पाय गे ॥ ४ ॥ 

            १४९ . नंदनंदन मुरलीवाला । याच्या मुरलीचा वेध लागला ॥१ ॥ प्रपंच धंदा नाठवे कांही । मुरलीचा नाद भरला हृदयी ॥२ ॥ पती सुताचा विसर पडिला । याच्या मुरलीचा छंद लागला।।३ ॥ स्थावर जंगम विसरुनी गेले । भेदभाव हारपले ॥४ ॥ समाधी उन्मनी तुच्छ वाटती । मुरली नाद ऐकता मना विश्रांति ॥५ ॥ एका जनार्दनी मुरलीचा नाद । ऐकतां होती त्यां सद्गद् ॥६ ॥

             १५०.कसा मला टाकू नि गेला राम।।धृ .॥ रामाविण जीव व्याकुळ होतो । सुचत नाहीं काम ॥१ ॥ रामाविण मज चैन पडेना । नाहीं जीवासी आराम ॥२ ॥ एका जनार्दनी पाहूनि डोळा । स्वरूप तुझे घन : शाम ।।३।।

            १५१. तुझी संगती नाहीं कामाची । मी सुंदरा कोवळ्या मनाची । मज दृष्टि होईल साची । मग तुझी घेईन चर्चा || शा कसे वेड लाविलें कान्हो गोवळीयां ॥धृ .॥ माझा वंश आहे मोठ्याचा । तूं तंव यातीहीन भजनी मालिका घनःशाम ॥३ ॥ गौळ्याचा । ऐक्य जालीया नांवरूपाचा । ठावचि पुसलियां ॥२ ॥ तुझ्या अंगीची पुरट घाणी । तनु काय दिसती ओंगळवाणी । मुरली वाजविसी मंजुळवाणी । मनमोहन कान्हया ॥३ ॥ तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा । चोरी करूनि भरिसी पोटा । व्रजनारी सुंदरा चावटा । आडविसी अवगुणियां ॥४ ॥ सर्व सुखाची कृष्णसंगती । वेणुनादें गाई गोप वेधती । एका जनार्दनीं हरिरूपी रमती । त्या व्रज सुंदरीया।।५ ।। 

            १५२.गोधनें चारावया जातो शारंगपाणी । मार्गी भेटली राधिका गौळणी । कृष्ण दान मागे निरी आसडोनी । तंव ती देखिली यशोदा जननी ।। १ ॥ यशोदा म्हणे नाटका हृषीकेशी । परनारीसी कैसा रे झोंबसी । येरू रूदत सांगतों मातेपाशी । माझा चेंडू लपविला निरीपाशीं।।२ ।। राधिका म्हणे यशोदे परीयेशी । चेंडू नाहीं नाहीं वो मजपाशीं । परि हा लटिका लबाड हृषीकेशी । निरी आसडितां चेंडू पडे धरणीसी ॥ ३॥ यशोदा म्हणे चाळकां तुम्ही नारी । मार्गी बैसतां क्षण एक मुरारी । एका जनार्दनीं विनवी श्रीहरी । नाम घेतां पातकें जाती दूरी ॥ ४ ॥

             १५३.हरी तुझी ऐसी कैसी हे खोड॥धृ .॥ घेऊनि चिमुटे मुलासी पळसी । गोपी तुज हाणती हा दोड ॥२ ॥ सोडूनि वासरे गाईसी पाजसी । यांत तुज काय मिलती जोड ॥३ ॥ आडवा होऊनि गोपीसी धरीसी । चुंबिता वदन मज म्हणसी सोड ॥४ ॥ अशा ह्या चेष्टा नाम्यासी करिसी । हरी तुझी ऐसी कैशी हे खोड ! ॥५ ॥

             १५४.कान्हया रे जगजेठी । देई भेटी एकवेळे ।। शा काय मोकलिलें वनीं । सावजांनी वेढिलें ॥ २ ॥ येथवरी होता संग । अंगे अंग लपविलें ।॥ ३॥ तुका म्हणे पाहिले मागें । एवढ्या वेगें अंतरला ॥४ ॥

             १५५.कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस घ्या म्हणे हरी ॥१ ॥ देखिला डोळा बैसला मनीं । तोचि वदनीं उच्चारी ॥२ ॥ आपुलियाचा विसरभोळा । गोविंद कळा कौतुकें ॥ ३॥ तुका म्हणे हांसे जन । नाहीं कान ते ठायीं ।॥ ४ ॥

             १५६.आंत हरि बाहेर हरि । हरिने घरी कोंडिलें । १॥ हरिने कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविले ॥ २॥ हरिने जीवें केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥ ३॥ तुका म्हणे वेगळा नव्हे । हरि हा भोंवें भोंवताला || ४ ||  

                   १५७.हरिने माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरलें ॥१॥ आतां कैसी जाऊ घसा नव्हे बरा लौकिका २ ।। पारखियासी सांगतां गोष्टी । घरची कुटी खातील।।३ ।। तुका म्हणे नियांत राहीं । पाहिले पाही परतुनी।।४ ।। 

                        १५८.हरि तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चापेकळी । तुझ्या दर्शन होईन काळीं । मग हे वाळी जन मज ।। १ ।। उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ।। २ ।। तुझिये अंगी घुरट घाणी । बहु खासी दूध तूप लोणी । घरींचे बाहेरील आणोनि । मी रे चांदणी सुकुमार ।। ३ ।। मज ते हांसतील जन । धिकारिती मज देखोन । अंगींचें तुझें देखोनि लक्षण । मग विटंबना होईल रे ।। ४ ।। तुज तंव लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही । आणिक मात बोलू काहीं । कशी भीड नाहीं तुज माझी ॥ ५ ॥ वचन मोडी नेदी हात । कळलें न साहेची मात । तुकया स्वामी गोपीनाथा जीवन्मुक्त करूनी भोगी ।॥ ६ ॥ 

            १५९.गाई गोपाळ यमुनेचे तटीं । येती पाणिया मिळोनि जगजेठी । चेंडु चौगुणा खेळती वाळवंटी । चला चला म्हणती पाहूं दृष्टी वो ॥१ ॥ ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळतें देखावया हरी । मिस पाणिया , करितील घरीं । बारा सोळा मिळोनि परस्परी वो ॥ २॥ चिरें चोळिया त्या धुतां विसरती । उर्ध्व लक्ष लागलें कृष्णमूर्ती । कोणा नाठवे हा कोण कुळ याती । झाल्या तटस्थ सकळां नेत्रपाती वो ।। ३॥ दंतधावनाचा मुखामाजीं हात । वायें वाजती नाइके जनमाता करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत । स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ वो ॥४ ॥ 

            १६०. बाळपणी हरी । खेळे मथुरे माझारी । पायीं घागरीया सरी । कडदोरा वांकी । मुख पाहे माता । सुख न समाये चित्ता । धन्य मानवे संचिता । वोढवले आजी॥शाबाळ चांगलें वो । बाळ चांगले वो । म्हणतां चांगले । वेळ लागे तया बोलें । जीवापरीस तें वाल्हें । मज आवडते ॥२ ॥ मिळोनियां याती । येती नारी कुमारी बहुती । नाहीं आठव त्या चित्तीं । देहभाव कांहीं । विसरल्या घतान्हीं पारठी लेकुरें । धाक सांडोनियां येरें । तहान भूक नाहीं।।शाएकी असतील घरीं । चित्त तयापाशी परी । वेगीं करूनी ओसारी।तेथे जाऊं पाहे । लाज सांडियेली वोज । नाहीं फजितीचे काज । सुख सांडोनियां शेज तेथे धांव घाली॥४॥वधियेल्या बाळा।नर नारी या सकळांबाळा बाळा खेळवी अबला।त्याही विसरल्या कुमरकुमारी । नाहीं भाव हा शरीरीं । दृष्टी न फिरे माघारी।तया देखतांही।।५ ।। वैरभाव नाहीं।आपपर कोणी काहीं । शोक मोह दुःख ठायीं।त्या निरसलीं । तुका म्हणे सुखी।के ली आपणासारिखीं स्वामी माझा कवतिकीं । बाळवेषें खेळें ।।६।।

             १६१.गौळणी बांधिती धारणासी गळा । खेळे त्या गोपाळामाजी ब्रह्म॥१॥धांवोनिया मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईपाठी || २ || तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी।भोळेपणा लागी भीक मागे।।३ ।।

             १६२. स्वये सुखाचे झाले अनुभवाएक एकीपाशी सांगतील भावाअवघ्याअवघा हा कैसा नवलावा सर्व साक्षी तेथेचि त्यांचा जीव वो | शाआपआपणाशी करिती नवलापरि वादावाद न संडिती बोलाएका मेघश्यामे जलधर वोल । रसी उताविळ हृदय सखोल वो॥२॥एक विषय तो सकळांचा हरि।त्याच्या आवडीने आवडी इतरी । अंध बहिर हे प्रेत लोकाचारी । त्यांची कीर्ति गाइली पुराणांतरी वो॥शास्तुति पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राचा गौरवीं आदर । परस्परें हैं सादरासादर । योग सज्जनाच्या सुखा नाहीं पार वो।।४ ।। भक्तिवालभ न तुटे चराचरी । आप्त अनाप्त हे ऐशी नाहीं उरी । दुरी जवळी संचिता ऐसे धरी । रंगा रंगा ऐसे होणे लागे हरि वो ॥५ ॥ तुका लाधला हे उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमे ओसंडून । कानी पडिले त्या जीवाचे जतन । धरी एकाभावें हृदयीचरण वो।।६ ।। 

            १६३.आजी का वो तूं दिससी दुश्चित्ती । म्हणिये काम नलगे तुझ्या चित्तीं । दिलें ठेवू ते विसरसी हातीं । नेणों काय  ौसला हरि चिती वो ॥ १॥ सर सर परती झालीस आतां भांड । कैसे दाखविसी जगासी या तोंड । व्याली माय ते लाजविली रांड । नाहीं थारा दो ठायीं झाला खंड वो ॥ २॥ होतें तैसें तें उमटले वरी । बाहा संपादणी अंतरींची चोरी । नाही मर्यादा निःसंग वावरी । मन हे गोविंदी देह काम करीं वो ॥।।३।।नाहीं करीत उत्तर कोणासवें । पराधीन भोजन दिलें खावें । नाही उचल सावरावा ठावें । देखें उदासीन तुझे गे देहभाव वो ।।४।। कोठे नेणों हा फावला एकांता सदा किलकिल भोंवती बहुत । दोघे एकवत बोलावया मात । नाहीं लाज धरिली दिला हात वो ॥ कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासु सुना । पराभक्ति हे शुद्ध तुम्ही जाणा । तुका म्हणे ऐसे कळों यावें या जना वो ॥ ६ ॥

             १६४. होतें बहुत दिवस आर्त वागविलें । आजि अकस्मात फळ देऊ आलें । दृष्टी श्रीहरींची देखिली पाऊलें । घेतलें जन्म मागें सार्थक त्याचें झालें वो ॥ 1 ॥ धन्य हे आनंदाची सांपडली वेळ । तेणें संत सज्जन भेटलें कृपाळ । त्यांनी फेडियला बुद्धिचा वो मळ । दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ वो ॥ २॥ नाना साधनांच्या केल्या खटपटा । परि त्या न पवती वो याच्या दारवंटा । जाणों जातां जाणीव घाली आडफाटा । योगाभ्यासें सिद्धि रोधिती वाटा वो । ३॥ यज्ञयागें स्वर्गभोग आड येती । करितां तपें काम क्रोध खवळती । नित्यानित्यज्ञानें अभिमान वाढती । करितां तीर्थाटनें अहंकाराची प्राप्ती वो ॥ ४॥ जपतां मंत्राबीजें चळचि घाली घाला । करितां दानधर्म पुढे भोगवितो फळा । सोवळे मिरवितां विधिनिषेध आगळा । आतां हेंचि धणीवरी घ्याऊं याला वो ॥ ५॥ ऐसें शोधियले मार्ग नानापरी । न येती प्रतीति मग सांडियलें दुरी । आतां गाऊनी गीती नाचों हा मुरारी । निळा म्हणे करूं संसारा बोहरी वो ॥६ ॥

             १६५. भरिला उलंडूनी रिता करी घट । मीस पाणियाचें गोविंदाची चट । चाले झडझडां उसतूनी वाट । पाहे पाळतुनी उभा तोचि नीट वो ॥ १॥ चाळा लावियेला गोप गोपीनाथे । जाणे आवडीचे रूप जेथें तेथें । दावी बहुतांच्या बहु वेष पंथे । गुणातीतें खेळ मांडियला येथे वो ॥ ॥ मनीं आवडे ते करावें उत्तर । काही निमित्ताचा पाहोनी आधार । उगा राहे कां मारिसी कंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥ ३॥ धरिली खोडी दे टाकोनियां मागें । नये विनोद हा कामा मशी संगें । मिठी घालीन या जीवाचिया त्यागें । नाहीं ठाऊकीं पडली तुझी सोंगें वो ।। ४॥ सुख अंतरींचे बाह्य ठसठसी । म्हणे विनोद हा काय सोंग यासी । तुज मज काय सोयरीक ऐसी । नंद नंदन या थोरपणे जासी वो ॥ ५॥ करी कारण ते कळों नेदी कोणा । सुख अंतरींचे बाह्यरंग जना । मन मिनले रे तुका म्हणे मना भोग अंतरिचा पावें नारायणा वो ॥ ६ ॥

             १६६.पडली भुली धांवती सैराट । छंद गोविंदाचा चोजविती वाट । मागें सारूनी सकळ बोभाट । वंदी पदांबुजें ठेवुनी ललाट वो ॥१ ॥ कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी । होता वहिला लपाला आतां खांदीं । कोठे आड आली हे देहबुद्धि । धांवा आळवा करुणा कृपानिधी वो ।। २॥ मागे  बहुतांचा अंतरला संग ।मुळें  जयाचिया तेणें केला त्याग । पैल पाहतां तें हरपलें अंग । खुंटली वाट नाहीसे झालें जग वो ।। शाशोक वियोग घडला सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा । केला उच्चार घडल्या दोषांचा झाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥ ४ ॥ 

            १६७.काय उणें कां किरतोसी चोरी । किती सांगों तू नाइकसी हरी । परेपरतां तूं पळोनी जासी दूरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥ १॥ माया करूणा हे करिते बहुत । किती सोसूं या जनाचे आघात । न पुरे अवसरू हेचि नित्यानित्य । तूंची सोडवी करूनी स्थिर चित्त वो ॥ २॥ बहुत कामें मी गुंतलिये घरीं । जासी डोळां तूं चुकवूनी हरी । करितां लागा न येसीं चपळ भारी । नाहीं सायासाची उरो दिली उरी वो ॥ ३॥ तुज म्हणीये मी न संगें अनंता । नको जाऊं या डोळियां परता । नलगे जोडी हे तुजविण आतां । तुकया स्वामी कान्होबा गुणभरितां वो ॥ ४ ॥     

            १६८.कोणी सुना कोणी लेकी । कोण एकी सत्ता ।। १॥ अवघियांची जगनिंद । झाली धिंद सारखी ।। २॥ अवघ्या अवघ्या चोरा । विना बरा मायबापा ।। ३॥ तुका म्हणे करा सेवा । आले जीवावरी तरी ॥४ ॥ 

            १६९ . हरिबिन रहियां न जाये जिहिरा । कबकी ठाडी देखें राहा ।।।। क्या मेरे लाल कवन चुकी भई । क्या मोहिपासिती बेर लगाई ॥२ ॥ कोई सखी हरी जावे बुलावन । बारही डारूं उसपर तन ॥३ ॥  तुका प्रभु कब देखें पाऊ|  पासीं आऊ फेर न जाऊ ॥४ ॥

             १७०. चुराचुराकर माखन खाया । गौलनिका नंद कुंवर कन्हैया ॥१ ॥ काहे बराई दिखावत मोही जानतहुं प्रभुपना तेरा सबही ॥ २॥ और बात सुन उखलसुगला । बांधलिया आपना तूं गोपाला ॥ ३ ॥ फेरत बन बन गाऊं चरावत । कहे तुकयाबंधु लपारी लेले हात ।॥ ४ ॥ 

            १७१.मैं भुली घरजानी बाट । गोरस बेचन आयें हाट ।॥ १॥ कान्हा रे मन मोहनलाल । सबही बिसरूं देखें गोपाल ॥ २॥ काहां पग डारूं देखें आनेरा । देखें तो सब वोहिने घेरा ।। ३॥ हुं तो थकित भई रे तुका । भागा रे सब मनका धोका ॥ ४ ॥

             १७२. एकी एकटेचि असोनि एकला । विश्वी विश्वाकार होऊनियां ठेला । जयापरी वो तैसाची गमला । नंदनंदन हा आचोज अंबुला वो ॥१ ॥ ऐशा गौळणी त्या बोलती परस्परी । करूनि विस्मय आपुल्या अंतरी । विश्वलाघविया हाचि चराचरी । नेणो महिमा यासी म्हणो व्यभिचारी वो ॥२ ॥ गिरी गोवर्धन येणे उचलिला । काळिया महासर्प नाथूनि आणिला । जळत वणवा वो मुखेचि प्राशिला । गिळितां अघासुर चिरूनि सांडिला वो ॥३ ॥ कपट्या माभळभटा दिले पिढे दान । शोषिली पूतना विर्षे पाजितांची स्तन । उखळी बांधितां उपटिले विमळार्जुन । भक्षोनि मृत्तिका वदनी दाविली भुवने वो ॥४ ॥ आणिखी एक येणे नवलावो केला । काला वाटिता वो विधाता ठकविला । भाग नेदिता तो वत्से गोवळ घेऊनि गेला । तैसीच आपण येथे होऊनियां ठेला वो ॥५ ॥ इंद्र चंद्र महेंद्र यातेचि पूजिती । श्रुति शास्त्रे तेही यातेचि स्तविती । महासिद्ध मुनि ध्यानी आराधिती । निळा म्हणे तो हा जोडला सांगती वो ॥६ ॥ 

            १७३.एकले न कंठेचि म्हणोनियां येणें । केली निर्माण वो चौदाही भुवनें । गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणें । पांचही महाभूते भौतिके भिन्न भिन्ने वो ॥१ ॥ ऐसा लाघविया माया सूत्रधारी । येकला एकटाचि झाला नानाकारी । स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी । तो हा नंदनंदन सये बाळब्रह्मचारी वो ॥२ ॥ याचियें नाभिकमळी जन्म चतुरानना । याचिया निजप्रभा प्रकाश रविकिरणा । याचिया महातेजे तेज हुताशना । येणेचि पढवूनि वेद केला शहाणा वो ॥३ ॥ याचिया द्रावपणे समुद्रासि जळ । याचिया चपळपणे पवन हा चंचळ । याचिया अवकाशे आकाश पघळ । याचिया धृतिबळे अवनी ही अढळ वो ॥४ ॥ येणेचि मेरुस्तंभ अचळ धरियेला । दिशा दिग्पाळासी येणेचि ठाव दिधला । विधिविधानाचा शास्त्रा बोध केला । येणेचि सुरपति स्वर्गी बसविला वो ॥५ ॥ भोगूनि अंगना हा बाळब्रह्मचारी । येकला जेथें तेथें सोळा सहस्त्रा घरीं । विवादती नारी वो ॥६ ॥

            १७४. दिसे सगुण हा स्वरूप सुंदर । परि व्यापूनियाँ ठेला चराचर । देवदानवादि मानव असुर । याविण उरला ऐसा नाहीं तृणांकुर वो ॥१ ॥ ऐशा गौळणी त्या अनुवाद करिती । ज्या ज्या रंगलिया याच्या अनुवृत्ति  रजनी दिवो जया याचीचि संगती । त्या त्या स्वानुभवें आपुल्या बोलती वो ॥२ ॥ महि अंबु तेज मारुत  गगन । जगा बीज रुप हाचि वो लपोन । महन्मायेचे हा अनादि कारण । देवत्रयासी हा मूळ अधिष्ठान वो ॥३ ॥ एकानेक झाला आपुल्याचि गुणी । उरला भरोनियां चारी वाणी खाणी । जयापरी हा तैसाचि  साजणी । रूपें गुणें क्रिया मंडित भूषणी वो ॥४ ॥ भुवने चतुर्दश तीहि याच्या पोटी । स्वर्गा एकविसाहि आदि हा शेवटी । होण्या न होण्याच्या नेणोनियां गोठी । आपी आपणचि एकट एकटी ॥५ ॥ निळा म्हणे आम्ही नेणोनि अबळा । हासो रुसो यासी करूं गदारोळा । खेळता खेळ यासी भांडो वेळोवेळा । केले अपराध ते मागो या गोपाळा वो ॥६ ॥ 

            १७५. होतें बहुत दिवस मानसीं । आजी नवस फळले नवसीं । व्हावी भेटी ते जाली गोविंदासी । आतां सेवा करीन निश्चयेसीं वो ॥१ ॥ स्थिर स्थिर मजसि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा । येथें आड मज न साहावे वारा । देऊनि कपाट आले तें दुसरें वारा वो ॥२ ॥ मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळे होऊ एकी घडी । नाहीं लौकिक स्मरला आवडी । आतां येणें काळं या लोभ वेडी वो || 3 ||  उदयीं उदयो साधिला अवकाश । निश्चितीने निश्चिंती सावकाश । धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता नये दिवस वो ।।४।।

             १७६.एकी एकपणाचा घेऊनियां त्रास । झाला नानाकार स्वरूपें बहुवस । म्हणोनि दुसरेंची नाढळे वो त्यास । जया तयामाजी याचाचि रहिवास वो ॥ १ ॥ ऐसे निजात्मया जाणोनि गोविंदा । जीवे भावे अनुसरल्या सकळही प्रमदा । करिती सेवावृत्ति निशिदिनी सदा । हसती रूसती करिती विनोदा वो ॥ शा सर्वसाक्षी सर्वही जाणता । सर्व करूनियां म्हणवी अकर्ता । जीवीं जिवाचा हा आप्तचि सर्वथा । जेणे तेथें याचि नित्य ऐक्यात्मता वो ।। ३॥ नित्य अंगसंगें भोग त्यासी देती । दृष्टी अवलोकूनि गुण त्याचे गाती । नेऊनि एकांति वो निजगुज बोलती । करिती काम धाम परि त्याचि पासी वृत्ति वो ।। ४॥ सासु सासरिया भ्रतारासी चोरी । नणंद जावा त्याही त्यजुनियां घरीं । देती आलिंगन निजात्मया हरी । येथूनि म्हणती संसारा बोहरी वो ॥ ५॥ ऐशा निळा म्हणे झाल्या हरीरता । त्या विराजती मुक्तिचिया माथा । नाना साधनाच्या लाजवुनि चळथा । झाल्या असोनि संसारी नित्यमुक्ता वो ॥६ ॥

            १७७. नव्हतें एक ना दुसरें कांही होता यासी । लपोनियां आपुलिये कुसी । कांहींचि नोळखुनि आपआपणासी । तोचि घेउनि येथे आला अविनाशी वो ॥ १॥ रूप धरिलें सगुण चांगलें । ठाण माण जेथिल तेथेंचि रेखिलें । चतुर्भुज शंखचक्रातें मिरविलें । मुकुटमाळा श्रवणीं सुतेज कुंडलें वो ॥ २॥ नव्हता गांवसीव पहिला यासी कांहीं । नामरूपासि तो आधींची ठाव नाहीं । म्हणति वैकुंठ ते कालचि झालें बाई । क्षीरसारगर ना कैंचि शेषशाई वो ।। ३॥ नव्हता काळा गोरा खुजा ना ठेंगणा । स्वरूप सुंदर ना आंधळा देखणा । कैंचि जीवशिव तयासि भावना । पंचभौतिक ना नेणें पंचप्राणा वो ॥ ४॥ नव्हता मन बुद्धि इंद्रियांचा मेळा । कार्य कर्तृत्व हा कारणा वेगळा । येणे जाणे यासी नव्हती कवण्या काळा । तोचि आला या नंदाच्या राऊळा वो ॥ ५॥ यासि जीवेंभावें धरा घाला मिठ्या । ऐशा बोलती गौळणी गोरट्या । निळा म्हणे अवघ्या मिळोनि लहान मोठ्या । यासि चुकती त्या अभाग्या करंट्या वो ॥ ६ ॥

             १७८.नित्यानंदापुढे आनंद तो कोण । विषयसुख व बाई बापुडे ते क्षीण । जेथें न सरेचि वैकुंठ सदन । न शेषशायी त्रिकुट भुवन वो ॥१ ॥ नेधों म्हणोनियां त्यागिती परौतें । घेऊ संगसुख हरीच्या सांगातें । गाऊ वायूँ रूप पाहुनि निरुतें । हासों खेळो ठायीं जेववू सांगातें वो ॥२ ॥ नेधों समाधीचे सुख तुच्छ वाटें । नित्यानित्याचिये न पडो खटपटे । काय करूं ते तपाचे भोबाटे । एका हरिविण अवघी ते फलकटे वो ॥३ ॥ काय जाऊनिया करूं निजधामा । तेथें मी नातुडें नाढळे विश्रामा । येथें सांडुनियां तमाल मेघःश्यामा । नेधों नाईको आणिका दुर्गमा वो ॥४ ॥ स्वर्ग भोग तेही नलगती असार । क्षणे होती जाती क्षणेचि नैश्वर येथे वी हरिसंगें क्रीडों निरंतर । सर्वही सुखाचे हा जोडला आगर वो ॥५ ॥ निळा म्हणे नित्य निःसीम स्वानुभवें । ऐसा गोपिका त्या रंगल्या हरीसवें । अधिकाधिक हे प्रेम त्यांचे नवें । जाणोनि आवडी तें पुरविली देवें ॥ 

            १७९.माझ्या मीपणाचा करोनि फराळ । उरलें खावयासी बैसला सकळ । ऐसा भुकाळु हा नंदाचा गोवळ । यासी न पुरेचि ग्रासितां माझा खेळ वो ॥1 ॥ आतां काय देऊ नसतां जवळीं । संचित प्रारब्ध ।। ते भक्षिलें समूळीं । कर्माकर्माच्या घेतल्या कवळी । ॥ विषयवासना त्या ग्रासिल्या निमिषमेळी वो ॥ २ ॥ भक्षिलें संपत्ति विपत्तीचे भोग । कांहीं नुरवितां च कोणाचाही भाग । अवघे भक्षुनियां नुरवि हा भाग । नाम रूप तेंही नेदिचि उरों सोंग वो ॥ ३॥ ऐसा भक्षुनियां  संसार  उपाधि । जीवभावाचि या नूरवूनियां आधीं । केलें एकाएकी निजरूप अनादि वो ॥ ४॥ आधींची दुर्बळ मी नव्हती काही जोडी । पूर्वीच भक्षोनियां गेला वो भुकालुचि सदाचा बराडी वो ॥ ५॥ आतां तृप्तीलागीं दिसे एक शेवटी । भावभक्ति याचे वोगरीन ताटी । तेणेंचि होईल या क्षुधेची संतुष्टी । निळा म्हणे ऐसे विचारलें पोटीं वो ।। ६ ।। 

            १८०.येणें येकलें वो जाणेहि शेवटीं । येथे राहणेचि नाहीं कल्पकोटी । जोडिलें धन ते न चले लक्ष कोटी । म्हणोनि आलिये या सांवळियाचे भेटी वो ।। ।। आतां घाला वो याच्या पायांवरी । हाचि चुकवील जन्माची भोंवरी । शिणले बहुत वो चौऱ्यांशीचे फेरी । तोडील चिंता हा हेचि आशा थोरी वो ।। २ ।। बहुत गांजियले माया मोह भ्रमें । रततां विषयीं या विषयाच्या कामें । करितां भरोवरी रित्या मनोधर्मे । यासी कृपा येतां हरील हा कमें वॉ ॥ ३॥ कामक्रोधी वो जाचिले बहुत । नेदी राहों वो क्षण एक निवांत । वरी पडती वो  गर्वाचे आघात । म्हणोनि विनवणी सांगा त्वरित वो ।। ४ || आशा कल्पना या मातल्या पापिणी । मनसा चिंता डंखिणी सर्पिणी । येती लहरी वो जाणिवेची जाचणी । म्हणोनि विनवितें हेंचि क्षणक्षणीं वो ॥ ५ ॥ आहे शेवटींचें माझें येथे पेणें । वाटे निश्चय हा याचिया दर्शनें । राहिलें चित्तीं वो याचेंचि चिंतनें । निळा म्हणे आजि ऐकिलें गा - हाणे वो ॥ ६ ॥

             १८१. काहींच न होऊनियां कांही एक होता । नाम रूपातीत आपण नेणता । होण्या न होण्याच्या नेणोनियां वार्ता । त्याचा संकल्पचि झाला त्या प्रसवता वो ॥ १॥ ऐशा परि हा मूर्तिमंत झाला । विश्नी विश्वाकार होऊनियां ठेला । भाग्ये आमुचिया मूर्ती मुसावला । गाउं वानूं ऐसा आम्हांसी फावला वो ।। २॥ नव्हे पुरूण ना नारीपण जेथे । शून्या निरशून्याहि पैलाडी परते । नाकळे नादबिंदु कळा ना ज्योति तें । च परा पश्यंतीचा प्रवेश नाही जेथें वो ॥ ३॥ गुण लावण्याची उघडली खाणी । मंडित चतुर्भुज मुगुट माळा मणी । मुख मनोहर कुंडलें श्रवणीं । श्रीवत्सलांछन हृदयीं साजणी वो ॥ ४॥ घ्या गे उचलोनि जाऊं निज धरा । आजी फावला तो पाहों यदुवीरा । खेळों आदरें या खेळवू सुंदरा । याच्या संगें नाहीं सुखा पारावारा वो ॥ ५॥ निळा म्हणे ऐशा संवादति सुंदरी । करिती वा क्रीडा सवें घेऊनि मुरारी । सुखी सुखरूप झाल्या कल्पवरी । पुन्हा न येती त्या फिरोन संसारी वो ॥६ ॥ 


Majhimauli-blogger






FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER


Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.