श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अलौकिक चरित्र ( भाग - 5 ) | Shree Dyaneshwarmaharajanche Alaukik Charitra ( part - 5 ) in marathi
॥ श्रीपांडुरंग प्रसन्न ॥
माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉 Download
माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join
Sant Dnyaneshwar full story in marathi
श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अलौकिक चरित्र | Shree Dyaneshwarmaharajanche Alaukik Charitra in marathi
sant dnyneshawar full imformation in marathi
Part - 5
|| श्रीज्ञानेधरमहाराजांचे अलौकिक चरित्र ||
परत येत असतां वाटेंतल्या अतिशयच खोल विहिरीचे पाणी तें आंत उतरून पिण्यास कठीण म्हणून नामदेवांनी धांबा करतांच तें वर उचंबळून येऊन त्यानें सर्व तृप्त झाले.
महाशिवरात्रीच्या रात्रीं औंढ्यानागनाथीं नामदेवांचे कीर्तन चालूं असतांना तें नागनाथास महारुद्राचा अभिषेक करीत असलेल्या वैदिकांनी त्यांना अडथळा होतो म्हणून मंदिराच्या पिछाडीला करण्यास सांगितलें. म्हणून नामदेव कीर्तनास मागील बाजूस वळून गेले आहेत तोंच सर्व मंदिरच गरकन फिरून नामदेवांसमोर झालें, तें अद्यापही तसेंच आहे.
नंतर ही संतमंडळी यात्रा परिपूर्ण होऊन पंढरीस आल्यावर एक मोठें थोरलें मांवदें झालें. (मी यात्रा केल्यार्चे "मा वद" - बोलूं नकोस असा याला लाक्षणिक अर्थही लावतात). नंतर लगेचच दर वर्षींचा कार्तिक यात्रेचा सोहळा असल्यानें कार्तिक शुद्ध नवमीपासून सर्व संतमंडळी पंढरीस यात्रेस जमूं लागली. दशमीच्या दिवशीं श्रीज्ञानेश्वर महाराजांसह चंद्रभागेचे स्नान उरकून पुंडलीक महामुनीचें दर्शन घेऊन श्रीरक्मिणीपांडुरंगाचे भेटीस ही मंडळी राउळांत जमली. सर्वांचे हितगुज पंढरीरायाशीं आलिंगनपूर्वक सांगून झालें. दुसरे दिवशीं एकादशीनिमित्त वाळवंटांत आपआपले फड उभारून दिंड्या पताकांच्या थाटांत तो भाग किर्तन भजनांनी दुमदुमून जाऊन तिथें रात्रभर हरिजागर झाला.
द्वादशीस पारणें होऊन चातुर्मास्य संपल्याचा प्रबोध उत्सव झाला -
त्रयोदशीचे दिनीं । सप्रेम देवीरुकमिणी ।
षडूस पक्वान्न भोजनीं । तोषवी ज्ञानदेवांसहित ॥ १॥
मग ज्ञानेश ज्ञानमणि । मस्तक ठेवी विठ्ठलचरणीं ।
वंदिली भावें सती रुक्मिणी | 'येतो' ऐसें बोलतां ॥ २॥
सर्वांसी आला गहिंवर | कंठ दाटला अपार ।
नयनीं लोटले बाष्पनीर । कळवळले हृदय चवघांचें ॥ ३॥
तेव्हां वदे रुक्मिणीपती । 'तुम्ही कष्टी न व्हावें चित्तीं ।
तुम्हांमागें शीप्रगती । आळंदीस आम्ही येतसो' ॥ ४ ॥
ऐसें बोलुनी दिधला वर । 'शुक्ल एकादशी पंढरपूर ।
कृष्णपक्षीची आळंदीक्षेत्र । कार्तिकी यात्रेसी नेमिली' ॥ ५ ॥
तेव्हां सकल संतवृंद । देवाचे ऐकुनी शब्द ।
टाळ्या पिटुनी अत्यानंद । जयजयकारें पावले ॥ ६॥
आळंदीस निघण्याच्या वेळीं श्रीज्ञानराजांनी देवास विनवून प्रार्थिलें कीं देवा, तुमचें सुंदर सगुणरूपाचें सुख मी आतापर्यंत खूप उपभोगलें. आतां निरंतरच्या निर्विकल्प चिन्मयसुखांत मला ठेवावें. ही ज्ञादेवांची प्रार्थना ऐकल्यावर देवाला संतोष वाटून देव उद्गारले कीं -
देव म्हणती तुझी कामना । आधींच आहे पुरविली ॥ १ ॥
गोडी आणि गूळ । कापूर आणि परिमळ ।
परस्पर एकचि केवळ । तुम्ही आम्ही त्यापरी ॥ २॥
ऐकूनी देवाचें वचन । ज्ञानेश्वरे केले वंदन ।
पुनः पुन्हा धरिले चरण । रोमांच अंगी ताठले॥ ३॥
आला प्रेमाचा उमाळा । मिठी दिधली चरणकमळा ।
तेव्हां परमात्मा सांवळा । उठवी ज्ञानदेवासी ॥ ४॥
हा प्रसंग पाहुनी डोळां । नामदेवाचा दाटला गळा |
नेत्री वाहे जळ खळखळां । आवरेना मन त्याचें ॥ ५॥
तेव्हां वदे रुकमिणीकांत । कां नामया होसी सचिंत ।
मी आणि ज्ञानेश्वर निश्चित । एकरूप जाण तूं ॥ ६॥
आतां मदंश जो ज्ञानराय । आत्मस्वरूपीं पावेल लय ।
यासाठीं तूं निजह्ृदय । कष्टमय करूं नको ॥ ७॥
मग श्री ज्ञानराज आपल्या भावंडांसह आळंदीस येतांच सिद्धेधवर मंदिरांतली सिद्धेश्वर सन्मुख असलेली जागा पाहून झाल्यावर तिथे गुहा तयार करून होतांच पुढें त्रयोदशीला आंतमध्यें नामदेवांच्या दोन्ही मुलांनी दर्भ पसरून त्यांवर दुर्वा, तुळशी, बेल अंथरून याप्रमाणे समाधीची तयारी केली. नामदेव रुक्मिणींसह देवही पंढरीहून लगेच आले होतेच.
" समाधीसी ज्ञानेश्वर । बैसेल शीघ्र साचार । जाणुनी आळंदीसी सत्वर ।
रुक्मिणीवर पातला ॥ देखावया समाधिसोहळा । सकल संतांचा मेळा । आणि इतर भक्त
झाले गोळा । आळंदीसी तेकाळीं ॥ "
श्रीज्ञाने्वर माउलीचे समाधिसोहळ्याचे अखेरचे दर्शन घडावें म्हणून लंबलांबची मंडळी येऊन दाखल झाली. त्यांतले मुख्य गोरोबा, सांवतोबा, विसोबा खेचर, जनाबाई, चांगदेव, कान्होबा पाठक, तसेच अनेक साधुसंत, ज्ञानी, योगी, सिद्ध, महंत, हरिदास, आत्मनिष्ठ, वैदिक, शास्त्री, पंडितजन अशा लांबलांबच्या झुंडीच्या झुंडी आळंदीस येऊन दाखल झाल्या.
संतभक्त येऊनी थोर थोर । हरिनामाचा केला गजर ।
अहोरात्र दिवस चार । आळंदीक्षेत्र जजबजलें ॥ १॥
एकादशीसी गजर । नामदेवें केली कथा सुंदर ।
द्वादशीसी दोन प्रहर- । पर्यंत घडलें पारणें ॥ २॥
तेचि रात्री प्रासादिक । हरिदास कान्हु पाठक ।
कीर्तन करिती परम भाविक । श्रोते कथेसी रंगले ॥ ३॥
समाधींत बसण्याची वेळ साधली जावी म्हणून माध्यान्हीं सूर्य आला असल्याचें देवांनीं सुचवितांच श्रीज्ञानराज ती वेळ साधण्यासाठीं लगेच उठले आणि त्यांनी सोपान, मुक्ताबाईस पोटाशीं धरून कुरवाळलें तोंच त्यांनी हंबरडा फोडला. तेव्हां जबळच श्रीनिवृत्तिनाथ बसले होते. ते सुद्धां आपल्या नेहमीच्या उन्मनींत असलेल्या अवस्थेतून यावेळी विचलित होऊन ज्ञानेश्वरांना डोळे भरून पाहून अगदीं गहिंवरून पाझरून गेले.
मग श्रीपंढरीरायांनीं ज्ञानरायांच्या कपाळीं केशराचा मळवट व सर्वांगास तीच उटी स्वत: हातानें लावून त्यांना पीतांबर नेसवून अंगावर शाल पांघरून गळ्यात तुळशीचे हार घालून झाल्यावर रुक्मिणीमातेनें नीरांजनानें त्यांस ओवाळलें. नंतर ज्ञानराजांनी समाधिस्थानास तीन प्रदक्षिणा घातल्या. तेव्हां देव बोलले -
"ज्ञानदेवे समाधिस्थाना । केल्या तीन प्रदक्षिणा । तंव देव बोलिले कष्ट नाना । जगासाठीं त्वां केले ॥"
मग देवांनी ज्ञानराजांचा एक हात व दुसरा हात निवृत्तिनाथांनी धरून सर्वजण हळू हळू समाधिस्थानी उतरून झाल्यावर तेथल्या एका व्यासपीठासारख्या लांबरुंद चौरंगावर ज्ञानराजांनी उत्तराभिमुख होऊन पद्मासन घालून अर्धोन्मीलित दृष्टीनेच निवृत्तिनाथांना व देवाला पाहून हात जोडून त्रिवार नमस्कार करून होतांच ते एकदम अंतरंगी चित्तासह प्राणास आत आकर्षून सर्वरूपपरायण होऊन गेले.
"मग देव आणि निवृत्तिनाथ । समाधीसी शिळा त्वरित । घालिती ते देखूनि भक्त । खेद अत्यंत पावले ॥"
मग सर्व मंडळींनी भजन करून समाधीवर सर्वांची पुष्पवृष्टी करून झाल्यावर त्यांनी "जय हरि विठ्ठल" या नामाचा एकसारखा जयघोष केला.
"तेव्हां देव म्हणे पंढरपुरी । सख्या नामा जाऊं सत्वरी ॥"
असे देवांचे म्हणून होतांच सर्व मंडळी आपआपल्या स्थानी जावयास निघाली. खालीलप्रमाने या सर्वांचे समाधिशक व त्यांच्या यात्रातिथि व स्थानें आहेत :--
श्रीज्ञानेधर महाराज - शक १२१५, कार्तिक वद्य १३, आळंदी.
श्रीसोपानकाका - शक १२१५, मार्गशीर्ष वद्य १३, सासवड.
श्रीमुक्ताबाई - शक १२१६, वैशाख वद्य १२, मेहुण (तापीतीरीं)
श्री निवृत्तिनाथ महाराज - शक १२१६.ज्येष्ठ वद्य ११,
त्र्यंबके धर,
श्रीचांगदेव - शक १२१५, माघ वद्य १३, पुणतांबे (नाशिक)
या विभूति विषयींचे नामदेवरायांचे शेवटचे उद्गार -
गेले दिगंबर ईश्वरविभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥ १॥
वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानीं । आतां ऐसे कोणी होणें नाहीं॥ २॥
'सांगतील ज्ञान म्हणतील खूण' । नयेची साधन निवृत्तीर्चे ॥ ३ ॥
'परब्रह्म डोळां दाऊं ऐसे म्हणती' । कोणा न ये युक्ति ज्ञानोबाची ॥ ४॥
'करतील अर्थ, सांगतील परमार्थ' | न ये पा एकांत सोपानाचा ॥ ५
नामा म्हणे देवा सांगूनियां कांही । न ये मुक्ताबाई गुह्य तुर्झे ॥ ६ ॥
पूर्वी अनंत भक्त जाहले । पुढेंही भविष्य बोलिलें ।
परी निवृत्ति-ज्ञानदेवें सोडविले । अपार जीवजंतु ॥ ७॥
ऐसे ज्ञानेश्वर माहात्म्य अगाध | कथा ऐकतां होईल बाध ।
तैसाचि उपजेल परमानंद । पातकें हरतील सर्वथा ॥ ८ ॥
व्यासमहर्षींनी कर्म-उपासना-ज्ञान अशा प्रवृत्ति निवृत्तिधर्मांतील रहस्य वैदिक धर्मीयांना समजावून देऊन त्याचें योग्य रीतीनें परिपालन व्हावें म्हणून भारत, भागवत असे राष्ट्रीय ग्रंथ निर्माण केले. उपनिषदांतील श्रुतिवाक्यांच्या अर्थाचा विपर्यास करणारे जैन, बौद्ध, पाशुपत, चार्वाक, कपिल, कणाद अशांच्या विरोधाचा परिहार करून त्यांच्या मतांचे अप्रत्यक्ष रीत्या खंडन व्हावें म्हणून 'ब्रह्मसूत्र' नांवाचा ग्रंथ निर्माण करून वैदिक धर्माचा पाया स्थिर केला. त्यानंतर आद्य श्रीशंकराचार्यांनी भगवद् गीता, दशोपनिषदें, ब्रह्मसूत्र या ग्रंथांवर विस्तारपूर्वक भाष्ये लिहून अनात्मवादी परमतांचा खरपूस समाचार घेऊन अध्यात्मज्ञान प्राप्तीचे निशाण सर्व भारतभर फडकविलें.
हेंच धर्म प्रचाराचे कार्य स्वयंसिद्ध अशा नवनाथांनी प्रकट अप्रकट असें करून ठेवले होते. त्याचा श्रीज्ञानराजांनी मोठ्या विस्ताराने परधर्मीयांच्या हल्ल्याचे पाऊल कितीही जोराने पडत राहिलें तरी त्याचा परिणाम टिकून राहूं नये, यासाठीं सर्व महाराष्ट्रभर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, पासष्टी, अभंगगाथा, हरिपाठ यांची निर्मिती केली. अशा ग्रंथद्वारां मराठी भाषेतल्या प्रांतांत ब्रह्मसाग्राज्य निर्मून सततच्या प्रचाराचे कार्य म्हणून
'माझे जिवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥'
पंढरीच्या आषाढी- कार्तिकीच्या वारीसाठी दरवर्षी मोठ्या सोहळ्याने आळंदीपासून तें थेट पंढरीपर्यंत स्वतः दर मुक््कामांत भजन, कीर्तन, प्रवचनांच्या गजरांच्या द्वारां हजारों वारकऱ्यांकडून पंढरीच्या वारीचें हें ्रत धारण करविले. श्रीहरिभक्तीच्या या भगवतधर्माचा संप्रदाय वाढवून पाया पक्का घालून ठेवला व भागवत वारकरी संप्रदायधर्माची परंपण एकसारखी, अव्याहत खेडोंपाडींसुद्धां चालत राहावी एवढें मोठें कार्य सुरू करून ठेवल्याने ते आज जवळ जवळ सातशें वर्षे चालत आलें आहे.
आतांपर्यंत राजकारणांतल्या कितीतरी उलाढाली होऊन गेल्या व यापुढें त्या होत राहिल्या तरी या भक्तिप्रधान मार्गातल्या संप्रदायाला खेडुतातल्या अडाणी वर्गापासून ते वरच्या थरांतल्या सर्व दर्जाच्या व्यक्तींना केव्हांही सुलभ वाव असल्याने त्यांतल्या निर्मळ, निर्विकार प्रेमळपणामुळें तो असाच वाढत्या प्रमाणावर एकसारखा चालतच राहावा अशी घटना श्रीज्ञानेधर माऊलीच्या अवतारकार्याने निर्माण झालेली आहे.
श्रीज्ञानराजांच्या सहज अंगभूत वैभवाचे तुकोबाराय वर्णन करतात -
जयाचिया द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥ १ ॥
करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥ २॥
जयाने घातली मुक्तीची गवादी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥ ३ ॥
तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधारने चित्ताचिया ॥ ४ ॥
संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥ १ ॥
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिलें देवालया ॥ २॥
नामा तयाचा किंकर । तेणें केलासे विस्तार ॥ ३॥
जनार्दन एकनाथे । ध्वज उभारिला भागवत ॥ ४॥
तुका झाला तेथें कळस । भजन करावें सावकाश॥ ५॥
[ श्री. दत्तात्रय केशव पाठक यांचे 'अमृतानुभव' - (प्रथमावृत्ति शके १८७८) या पुस्तकावरून ]..........
Maulimajhi-blogger
Post a Comment