मराठी आरती संग्रह | marathi aarti sangrah | Aarti collection in marathi | majhi mauli

shreyash feed ads 2

1. श्री गणप‍‍तीची आर‍‍ती  | Ganpathichi Aarti | majhi mauli 

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download




सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।

कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।।1।।


जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ।।


रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा

हिरे जडित मुकुट शोभतो बरा

रूणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।।२ ।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ।।



लंबोदर पीतांबर फ‍ण‍ीवरवंदना ।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।

दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।।3 



जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।


2.  शंकराची आरती  | Shankarachi Aarti




लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां ।।

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।

तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां  ।।1।।


जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।

आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा  ।।ध्रु.।।

कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा ।

आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ।

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।।2।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।

आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा  ।।ध्रु.।।


देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें ।

त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें ।

तें त्वां असुरपषं प्राशन केलें ।

नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ।।3।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।

आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा  ।।ध्रु.।।


व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।

रघुकुलतिलक रामदासा अंतरी ।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।4।।





3.   दुर्गा आरती | Duraga Aarti




दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।

अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी।

वारी वारी जन्म मरणांते वारी।

हारी पडलो आता संकट निवारी॥१॥

जय देवी जय देवी महिषा सुरमथिनी।

सुरवर ईश्र्वर वरदे तारक संजीवनी॥धृ॥

तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही।

चारी श्रमले परंतु न बोलवे काही।

साही श्रमले परंतु न बोलवे काही।

साही विवाद करिता पडले प्रवाही।

ते तू भक्तालागी पावसी लवलाही॥२॥

जय देवी जय देवी महिषा सुरमथिनी।

सुरवर ईश्र्वर वरदे तारक संजीवनी॥धृ॥


प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा।

क्लेशांपासूनी सोडवी तोडी भवपाशा।

अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा।

नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा॥३॥



 4.   ज्ञानराजा आरती | Dyanaraja Aarti





आरती ज्ञानराजा |
महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत ||
मनु वेधला माझा ||

आरती ज्ञानराजा |
महाकैवल्यतेजा || धृ ||

लोपलें ज्ञान जगी |
हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग |
नाम ठेविले ज्ञानी || १ ||

आरती ज्ञानराजा |
महाकैवल्यतेजा || धृ ||

कनकाचे ताट करी |
उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबर हो ||
साम गायन करी || २ || 

आरती ज्ञानराजा |
महाकैवल्यतेजा || धृ ||

प्रकट गुह्य बोले |
विश्र्व ब्रम्हाची केलें |
रामजनार्दनी |
पायी मस्तक ठेविले |

आरती ज्ञानराजा |
महाकैवल्यतेजा ||
सेविती साधुसंत ||
मनु वेधला माझा  || ३ ||

 5. विठोबा आरती | Vithobachi Aarti






युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।

चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।


जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।

कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।

देव सुरवर नित्य येती भेटी ।

गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।। 2।।


जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।


धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।

राई रखुमाबाई राणीया सकळा ।

ओवळिती राजा विठोबा सावळा।।
किंवा 
ओवाळू आरत्या विठोबा सावळा ।। 3।।


जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।


ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।

चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।

दिंड्या पताका वैष्णव नाचती ।

पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। 4।।


जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।


आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।

चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।।

दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती।

केशवासी नामदेव भावे ओंवळिती।। 5।।


जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।


6.    श्री गुरुदत्ता आरती | Gurudattachi Aarti




त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।

 त्रिगुणी अवतार त्रेलोक्य राणा ।।

नेती नेती शब्द न ये अनुमाना । 

सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।।१।।

जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता।

 आरती ओवाळिता हरली भवचिंता। जय देव जय देव।।धृ. ।।


सबाह्य अभ्यंतरीं तू एक दत्त।

 अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।।

परा ही परतली तेथे कैंचा हा हेत ।

 जन्मरमरण्याचा पुरलासे अंत ।।२।। 


जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता।

 आरती ओवाळिता हरली भवचिंता। जय देव जय देव।।धृ. ।।


दत्त येऊनिया उभा ठाकला ।

 सद्भावे साष्टांग प्रणिपात केला ।।

प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला ।

 जन्ममरण्याचा फेरा चुकविला ।।३।। 


जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता। 

आरती ओवाळिता हरली भवचिंता। जय देव जय देव।।धृ. ।।


दत्त दत्त ऐसे लागले ध्यान।

 हारपले मन झाले उन्मन ।।

मीतूंपणाची झाली बोळवण ।

 एका जनार्दनीं श्री दत्त ध्यान ।।४।।


जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता। 

आरती ओवाळिता हरली भवचिंता। जय देव जय देव।।धृ. ।।


7.   घालिन लोटांगण | Ghalin lotangan


Ganpatichi Aarti: 

घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।।

।। मंगलमुर्ती मोरया ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।


धन्यवाद !

majhi mauli 




Whatsapp  ग्रुप मध्ये सहभागी व्हा 👉🏻Join