काकड आरतीचे अभंग / भूपाळ्याचे अभंग / विनंतीचे अभंग ( kakad Aartiche Abhang / Bhupalyache Abhang / Vinantiche Abhang )
]] हरिः ॐ [[
]] श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसज्ञ [[
माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉 Download
माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join
संपूर्ण वारकरी भजनी मालिका | Varkari Bhajani Malika in marathi
॥ मालिका दुसरी ॥
( Malika Dusari )
|| काकड आरतीचे अभंग ||
(kakada Aarti che abhang )
भजन : ॥ जय जय रामकृष्ण हरि ॥
२५. उठा उठा साधुसंत । साधा आपुले हित । गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥१ ॥ उठुनि वेगेशीं । चला जाऊ राउळाशी । जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखिलिया ॥२ ॥ उठोनियां पहाटे । विठ्ठल पहा उभा विटे । चरण तयाचे गोमटे । अमृत दृष्टी अवलोका ॥३ ॥ जागे करा रूक्मिणीवरा । देव आहे निदसुरा । वेगें लिंबलोण करा । दृष्ट होईल तयासी ॥४ ॥ पुढे वाजंत्री वाजती । ढोल दमामे गर्जती । होते काकड आरती । पांडुरंगरायाची ॥५ ॥ सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारी । भजनी मालिका केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥६ ॥
२६. उठां पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां । झाला अरूणोदय सरली निद्रेची वेळा ॥१ ॥ संत साधु मुनि अवघे झालेती गोळा । सोडा शेज सुख आता पाहुं द्या मुखकमळा ॥२ ॥ रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी । मन उतावेळ रूप पहावया दृष्टी । ॥३ ॥ राही रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया । शेजे हालऊनि जागे करा देवराया ॥४ ॥ गरूड हनुमंत पुढे पहातो वाट । स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥५ ॥ झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥६ ॥
२७. उठा अरुणोदय प्रकाश जाहला । घंटा गजर गर्जिनला । हरि चौघडा सुरु झाला । काकड आरती समयाचा ॥१ ॥ महाव्दारी वैष्णव जन । पूजा सामुग्री घेऊन । आले द्यावे तयांसी दर्शन । बंदीजन गर्जती ॥२ ॥ सभामंडपी कीर्तन घोष । मृदंग टाळ वीणे सुरस । आनंदे गाती हरीचे दास । परम उल्हास करूनियां ॥३ ॥ चंद्रभागे वाळवंटी । प्रात : स्नानाचि जनदाटी | आतां येतील आपुले भेटी । उठी उठी गोविंदा ॥४ ॥ ऐसे विनवी रुक्मिणी । जागृत जाहले चक्रपाणी ।नामा बध्दांजुळी जोडूनि । चरणीं माथा ठेवितसे ॥५ ॥
२८. उठा उठा प्रभात जाहली । चिंता श्रीविठ्ठल माउली । दीन जनांची साउली । येई धांवूनि स्मरतांचि ॥१ ॥ पंढरपुरी जे भीमातटी । सुंदर मनोहर गोमटी । दोन्ही कर ठेऊनियां कटी । भेटीसाठी तिष्ठतसे ॥२ ॥ कीरीट कुंडलें मंडित । श्रीमुख अति सुंदर शोभत । गळां वैजयंती डुल्लत । हार मिरवत तुळसीचा ॥३ ॥ सुरेख मूर्ति सगुण सांवळी । कंठी कौस्तुभ एकावळी । केशर उटी परिमळ आगळी । बुका भाळी विलसतसे ॥४ ॥ पीत पीतांबर कसला कटी । अक्षयीं वीट चरण तळवटी । सकळ सौदर्य सुखाची पेटी । हृदय संपुष्टी आठवातें ॥५ ।। अति प्रिय आवडे तुळसी बुका । तैसीच प्रीति करी भोळ्या भाविका । नामा पदपंकज पादुका । शिरी मस्तकी वंदितसे ॥६ ॥
२९ . उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला । वैष्णवांचा मेळा गरूड पारी दाटला ॥१ ॥ वाळवंटापासूनि महाव्दारापर्यंत । सुरवरांची दाटी उभे जोडूनि हात ॥२ ॥ सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ । रखुमाबाई माते वेगीं उठावा घननिळ ॥४ ॥ रंभादिक नाचति उभ्या जोडूनि हात । त्रिशूळ डमरू घेउनि आला गिरिजेचा कांत ॥५ ॥ पंचप्राण आरत्या घेउनियां देवस्त्रियां येती । भावें ओवाळिती राही रखुमाईचा पती ॥६ ॥ अनंत अवतार घेसी भक्ताकारणे । कनवाळु कृपाळु दीनालागी उध्दरणें ॥७ ॥ चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनीं । पाठीमागे डोळे झांकुनी उभी ते जनी ॥८ ॥
३०. उठा जागे व्हा रे आतां । स्मरण करा पंढरीनाथा । भावें चरणी ठेवा माथा । चुकवी व्यथा जन्माच्या ॥१ ॥ धन दारा पुत्रजन । बंधु सोयरे पिशून । सर्व मिथ्या हे जाणून । शरण रिघा देवासी ॥२ ॥ मायाविघ्ने भ्रमला खरे । म्हणता मी माझेनि घरे । हे तो संपत्तीचे वारें । साचोकारें जाईल ॥३ ॥ आयुष्य जात आहे पहा । काळ जपतसे महा । स्वहिताचा घोर वहा । ध्यानीं रहा श्रीहरीच्या ॥४ ॥ संतचरणी भाव धरा । क्षणाक्षणा नामस्मरा । मुक्ति सायुज्यता वरा । हेंचि करा बापांनो ॥५ ॥ विष्णुदास विनवी नामा । भुलू नका भवकामा । धरा अंतरी निजप्रेमा । न चुका नेमा हरिभक्ति ॥६ ॥
३१. अवघे हरिजन मिळोनी आले राउळा । दोन्ही कर जोडोनी विनविती गोपाळा ॥१ ॥ उठा पांडुरंगा हरिजना सांभाळी । पाहूं द्या वदन वंदू पायाची धुळी ॥2 || उगवला दिनकर अवघ्या उजळल्या दिशा । कोठवर निद्रा आता उठा परेशा । तुका म्हणे आम्ही उभे तिष्ठत व्दारासी।कर जोडोनी गायी गोप सेवेसी ॥४ ॥
*** देवास काकडा ओवाळते वेळी म्हणावयाचे अभंग ***
( Devas kakada Oovalate veli mhanavayache abhang)
३२. सहस्त्र दिपे दीप कैसी प्रकाशली प्रभा । उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ॥१ ॥ काकड आरती माझ्या कृष्ण सभागीया । चराचर मोहरलें तुझी मूर्ति पाहाया ॥२ ॥ कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक । नित्य नवा आनंद ओवाळितां श्रीमुख ॥३ ॥ आरती करितां तेज प्रकाशले नयनी । तेणे तेजे मिनला एकाएकी जनार्दनी ॥४ ॥
३३. भक्तीचीया पोटी बोध काकडा ज्योती । पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती ॥१ ॥ ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविन माथा ॥२ ॥ काय महिमा वर्ण आता सांगो किती । कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ॥३ ॥ राही रखुमाई दोही दो बाही । मयूर पुच्छ चामरे ढाळिती ठायी ठायी ॥४ ॥ तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनी ते शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा ॥६ ॥
३४. उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१ ॥ करा जयजयकार वाद्यांचे गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥२ ॥ जोडोनियां कर मुख पाहा सादर । पायांवर शीर ठेवूनियां ॥३ ॥ तुका म्हणे काय पढिये ते मागा । आपुलाले सांगा सुख दुःख ॥४ ॥
३५. तुझिये निढळी कोटी चंद्र प्रकाशे।कमल नयन हास्य वदन हांसे ॥१ ॥ हालकां रे कृष्णा डोलका रे । घडिये घडिये गुज बोलका रे॥२॥ उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो । बापरखुमादेवीवरू विठ्ठलु नाहो ॥३ ॥
( Malika Tisari )
...॥ भूपाळ्याचे अभंग ॥...
३६.योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजनी । पाहता पाहतां मना न पुरे धनी ॥१ ॥ देखिला देखिला माये देवांचा देवो । फिटला संदेहो निमाले दुजेपण ॥२ ॥ अनंतरूपें अनंतवेषे देखिले म्यां त्यासी । बापरखुमादेवीवरू खूण बाणली कैसी ॥३ ॥
३७. अवताराची राशी तो हा उभा विटेवरी । शंख चक्रगदापासहित करी हरी ॥१ ॥ देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहतां वाटे गे माये ॥२ ॥ सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळती । वंदुनी चरणरज नामा विनवीतसे पुढती ॥३ ॥
३८. करूनि विनवणी पायी ठेवितो माथा । परिसावी विनंती माझी पंढरीनाथा ॥१ ॥ अखंडित असावे ऐसे वाटते पायी । साहोनी संकोच ठाव थोडासा देई ॥२ ॥ असो नसो भाव आलो तुझिया ठाया । कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया ॥३ ॥ तुका म्हणे तुझी आम्ही वेडी वाकुडी । नामें भवपाश हातें आपुल्या तोडी ॥४ ॥
३ ९ . चित्ती तुझें पाय डोळां रूपाचे ध्यान अखंड सुखी नाम तुमचें वर्णावें गुण ॥१ ॥ हेचि एक तुम्हां मागतो मी दातारा । उचित तें करा भाव जाणूनि खरा ॥२ ॥ खुंटली जाणीव काही बोलणेचि आतां । कळो येईल तैसी करा बाळाची चिंता ॥३ ॥ तुका म्हणे आतां नका देऊ अंतर । न कळे पुढे कायाकैसा होईल विचार ॥४ ॥
४०. बोलोनियां दाऊं कां तुम्ही नेणा जी देवा । ठेवाल ते ठेवा ठायी तैसा राहेन ॥१ ॥ पांगुळले मन कांहीं नाठवे उपाय । म्हणऊनि पाय जीवीं धरूनि राहीलों ॥२ ॥ त्याग भोग दुःख काय सांडावे मांडावे । ऐसी धरियेली जीवे माझ्या थोर आशंका ॥३ ॥ तुका म्हणे बाळ माता चुकलिया वनीं । न पवतां जननी दुःख पावे विठ्ठले ॥४ ॥
४१. कां गा केविलवाणा केलो दीनाचा दीन । काय तुझी हीन शक्ति जालीसे दिसे ॥१ ॥ लाज वाटे मना तुझा म्हणविता दास । गोडी नाहीं रस बोलिलीयासारिखी ॥२ ॥ लाजविली मागे संतांची ही उत्तरें । कळो येते खरे दुजे एकावरूनि ॥३ ॥ तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी।प्रसादावांचूनि तुमचिया विठ्ठला ॥४ ॥
४२. जळो माझे कर्म वाया केली कटकट । झाले तैसे तंट नाही आले अनुभवा ॥१ ॥ आतां पुढे धीर काय देऊ या मना । ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहीजे ॥२ ॥ गुणवंत केलो दोष जाणायासाठी । माझे मज पोटी बळकट दूषण || शा तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटीं ॥४ ॥
४३. जळोत ती येथें उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय || शाआतां मज साहा येथे करावे देवा।तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवूनी।।२ ॥ भोगें रोगा जोडोनिया दिले आणिका । अरूचि तेहोकां आतां सकळांपासूनि॥शातुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकीं।नाहीं ये लौकिकी आतां मज वर्तणे ॥४ ॥
४४. न सांगता तुम्हां कळो येते अंतर । विश्वी विश्वंभर परिहारचि नलगे ॥१ ॥ परि हे अनावर आवरिता आवडी । अवसान ते घडी पुरो एकी देत नाहीं ॥२ ॥ काय उणे मज येथें ठेविलिये ठायीं । पोटा आलों तईपासूनियां समर्थे ॥३ ॥ तुका म्हणे अवघी आवरिली वासना । आतां नारायणा दुसरियापासूनि ॥४ ॥
४५. तुजसवें आम्ही अनुसरलों अबळा । नको अंगी कळा राहो हरी हीन देऊं ॥१ ॥ सासुरवासा भीतो जीव ओढे तुजपाशीं । आतां दोहींविशीं लज्जा राखे आमुची ॥२ ॥ न कळतां संग झाला सहज खेळतां । प्रवर्तली चिंता मागिलाचि यावरी ॥३ ॥ तुका म्हणे असतां जैसे तैसें बरवें । वचन या भावं वेचूनिया विनटलों ॥४ ॥
४६. कामें नेले चित्त नेदी अवलोकू मुख । बहु वाटे दुःख फुटों पाहे हृदय॥१॥कां गा सासुरवासी मज केले भगवंता।आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं।।२ ॥ प्रभातेसी वाटे तुमच्या या दर्शना । येथे न चले चोरी उरली राहे वासना ॥३ ॥ येथे अवघे वायां गेले दिसती सायासातुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा ॥४ ॥
४७. आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१ ॥ भाग गेला सीण गेला । अवघा झाला आनंद ॥२ ॥ प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥३ ॥ तुका म्हणे आम्हां जोगें । विठ्ठल घोगें खरें माप।॥४ ॥
भजन : ॥ जय जय विठोबा रखुमाई
***।। मालिका चौथी ।। ***
( विनंतीचे अभंग )
(Vinantiche Aabhang )
४८. वाट पाहे बाहे निढळी ठेवूनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टि लागलेसे चित्त ॥१ ॥ कई येता देखेन माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखी धरूनियां माप ॥शा डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहे । मन उताविळ भाव सांडूनियां देहे ॥३ ॥ सुखसेज गोड चित्तीं न लगे आणिक । नाठवे घरदार तहान पळाली भूफ ॥४ ॥ तुका म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोण । पंढरीचे वाटे येता मूळ देखेन ॥५ ||
४ ९ . माझे चित्त तुझे पायीं । राहे ऐसे करी कांहीं । धरोनिया बाही । भव हा तारी दातारा ॥१ ॥ चतुरा तूं शिरोमणि । गुण लावण्याची खाणी । मुगुट सकळां मणि । धन्य तूंचि विठोबा।।शाकरी या तिमिरांचा नाशाउदय होऊनि प्रकाश । तोडी आशापाश । करी वास हृदयीं ॥३ ॥ पाहे गुंतलो नेणता । माझी असो तुम्हा चिंता । तुका ठेवी माथा।पायीं आतां राखावें ॥४ ॥
५०. तुझे दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् झाले जिणे माझे पंढरीराया।॥१ ॥ काय गा विठोबा तुज आतां म्हणावे । शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नांवे ॥२ ॥ संसाराचा धाक निरंतर आम्हांसी । मरण भलें परि काय अवकळा ऐसी ॥३ ॥ तुझा शरणागत शरण जाऊ आणिकांसी । तुका म्हणे लाज कवणा हे कां नेणसी ॥४ ॥
५१. ऐसी वाट पाहें कांही निरोप कां मूळ । कांहो कळवळा तुम्हां उमटेचिना ॥१ ॥ आहो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनियां आसे चाळवूनि ठेविलें ॥२ ॥ काय जन्मा येनियां केली म्यां जोडी । ऐसें घडोघडी चित्ता येते आठव ॥३ ॥ तुका म्हणे खरा न पवेचि विभागाधिक्कारितें जग हाचि लाहें हिशोब ॥४ ॥
५२. पडिलें दूरदेशी मज आठवे मानसीं । नको विनंतीचे अभंग नको हा वियोग कष्ट होताती जीवासी ॥१ ॥ दिन तैसी रजनी झाली वो माये । अवस्था लाऊनि गेला अझुनी कां नये ॥२ ॥ गरूडवाहना गंभीरा येई गा दातारा । बापरखुमादेवीवरा श्रीविठ्ठला ॥३ ॥
५३. पैल विळाचिये विळ अंगणी उभी ठेलिये । येतिया जतिया पुसे विठ्ठल केउता गे माये ॥१ ॥ पायरऊ झाला संचारू नवलावेधे विंदान लाविले म्हणे विठ्ठल विठ्ठल ॥२ ॥ नेणे तहानभूक नाहीं लाज अभिमान । वेधिले जनार्दनी देवकी नंदगु गे माये ॥३ ॥ बारखुमादेवीरू जीवीचा जीवनु । माझे मनीचे मनोरथ पुरवी कमळनयनु ॥४ ॥
५४. येतिया पुसे जातिया धाडी निरोप । पंढरपूरी आहे माझा मायबाप ॥१ ॥ येई वो येई वो विठाबाई माउलिये । निढळावरी कर ठेऊनि वाट मी पाहे ॥२ ॥ पीतांबर शेळा कैसा गगणी झळकला । गरूडावरी बैसोनि माझा कैवारी आला ॥३ ॥ विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिवाळी । विष्णुदास नामा जीवें भावें ओवाळी ॥४ ॥
५५. येई वो येई वो येई धांवोनियां । विलंब कां वायां लावियला कृपाळे ॥१ ॥ विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके । कोठे गुंतलीस माये विश्वव्यापके ॥२ ॥ न करीं न करी आतां आळस अव्हेरू । व्हावया प्रगट कैचें दूरी अंतरू ॥३ ॥ नेघे ने नेघे माझी वाचा विसांवा । तुका म्हणे हांवा हावा हांवा साधावा ॥४ ॥
५६. गाऊ नाचूं विठो तुझा करूं अनुवाद । जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद ॥१ ॥ आनंद रे विठोबा झाला माझे मनी । देखिली लोचनी विटेसहित पाऊलें ॥२ ॥ नकरी तप साधन मुक्तीचे सायास।हाचि जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस ॥३ ॥ तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काईपिंढरीचा राणा साठविला हृदयी ॥४ ॥
५७. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन । कासया त्यजीन प्राण आपुला गे माये ॥१ ॥ असेन धणीवरी आपुले माहेरी । मग तो श्रीहरि गीती गाईन गे माये ॥२ ॥ सकळही गोत माझे पंढरीसी जाण । बापरखुमादेवीवरा विठ्ठलाची आण ॥३ ॥
भजन : ॥ जय जय विठोबा रखुमाई ।।
MajhiMauli-blogger
Post a Comment