मंगलाचरण पहिले / दुसरे / तिसरे | Mangalcharn Pahile/ Dusare/ Tisare संपूर्ण वारकरी भजनी मालिका Varkari Bhajani Malika in marathi

shreyash feed ads 2

 ]] हरिः  ॐ [[

]] श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसज्ञ [[

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 

संपूर्ण  वारकरी भजनी मालिका Varkari Bhajani Malika in marathi 

मंगलाचरण पहिले / दुसरे / तिसरे  ) 

भजनी मालिका

[[ मालिका पहिली ]]

(malika pahili) 

***मंगलाचरण पहिले ***

( Mangal Charan Pahile )

भजन : [[  जय जय रामकृष्ण हरि ]]


१. रुप पाहतां लोचनी । सुख झाले बो साजणी

॥१॥| तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा

॥॥२)। बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठलीं

आवडी ॥३॥ सर्व सुखाचे आगर । बापरखुमादेवीवर

11४1]


2. आरंभी आवडे आदरे आले नाम । तेणे सकळ

सिध्दि जगी झाले पूर्णकाम ।॥१॥। रामकृष्ण गोविंद

गोपाळा । तूं माय माऊली जीवीचा जिव्हाळा ॥धृ।॥

तुझियेनि नामे. सकळ संदेहो फिटला ।

बापरखुमादेवीवरा श्रीविठ्ठला।।३॥।


3.  राहो आतां हेंचि ध्यान । डोळां मन लंपट ॥१॥

कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें पूजीन ॥२॥

होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥३॥

तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडो द्या ॥४॥


4.  वचन ऎका कमळापती । माझी रंकाची विनंती ॥१॥

कर जोडितों कथेकाळीं । आपण असावें जवळीं ॥२॥

घ्यावी घ्यावी माझी भाक । जरीं कां मागेन आणिक ॥३॥

तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाची राखावा ॥४॥


5.  तुज पाहतां सामोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥

माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडली पंढरीराया ॥२॥

नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥३॥

तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळीं ॥४॥


6. तुम्ही सनकादिक संत । म्हणवितां कृतावंत ॥१॥

एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥२॥

माझी भाकावी करुणा । विनवा पंढरीचा राणा ॥३॥

तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥४॥


7.  आतां तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ॥१॥

गोमटें तें करा माझें । भार ओझें तुम्हांसी ॥२॥

वंचिलें तें पायांपाशीं । नाहीं यासी वेगळें ॥३॥

तुका म्हणे सोडिल्या गांठी। दिली मिठी पायांसी ॥४॥


8.  लेकुराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥

ऎसी कवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ॥२॥

पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्वही साहे ॥३॥

तुका म्हणे माझें । तुम्हां संतांवरी ओझे ॥४॥


9.  करुनि उचित । प्रेम घाली ह्र्दयांत ॥१॥

आलों दान मागायास । थोर करुनियां आस ॥२॥

चिंतन समयीं । सेवा आपुलीच घेई ॥३॥

तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावे देवा ॥४॥


10.  न धरी उदास । माझी पुरवावी आस ॥१॥

ऎका ऎका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥२॥

मायबाप बंधुजन । तुंचि सोयरा सज्जन ॥३॥

तुका म्हणे तुजविरहित । कोण करील माझें हित ॥४॥


11.  गरुडाचे पायीं । ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥

वेगीं आणावा तो हरी । मज दीनातें उद्धरी ॥२॥

पाय लक्ष्मीच्या हातीं । तिसीं यावे काकुळती ॥३॥

तुका म्हणे शेषा । जागे करा ह्रषीकेशा ॥४॥


12.  येग येग विठाबाई । माझे पंढरींचे आई ॥१॥

भिमा आणि चंद्रभागा । तुझ्या चरणींची गंगा ॥२॥

इतुक्यासहित त्वां बा यावें । माझें रंगणीं नाचावें॥३॥

माझा रंग तुझे गुणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥


भजन जय जय विठोबा रखुमाई



*** मंगलाचरण दुसरे ***


 १३.सुंदर ते ज्ञान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१ ॥ 

तुळसीहार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२ ॥ 

मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठी कौस्तुभ मणि विराजित ॥३ ॥ 

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥४ ॥ 


१४.राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१ ॥ 

कस्तुरी मळवट चंदनाची उटी । रूळे माळ कंठी वैजयंती ॥२ ॥

 मुकुट कुंडले श्रीमुख शोभलें। सुखाचें ओतले सकळही || ३ || 

कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळां बाइयांनो || ४ || 

सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥५ ॥ 


१५. सदा माझे डोळे जडों तुझें मूर्ति । रखुमाईच्या पती सोयरीया ॥१ ॥

 गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देई मज प्रेम सर्वकाळ॥२॥

विठू माउलिये हाचि वर देई।संचरोनि राही हृदयामाजी ॥३ ॥ 

तुका म्हणे काही न मागी आणिक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥४ ॥ 


१६. आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहतां लोचन सुखावले॥१॥

आतां दृष्टिपुढे ऐसाचि तूं राहे । जो मी तुज पाहें पांडुरंगा ॥२ ॥ 

लांचावले मन लागलीसे गोडी । तें जीवें न सोडी ऐसे झाले ॥३ ॥ 

तुका म्हणे आम्ही मागावी लडिवाळी।पुरवावी आळी मायबापा ॥४ ॥ 


१७ . झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा । तेणें माझ्या मना बोध केला ॥१॥

अनंत जन्मींचे विसरलो दुःख । पाहतां तुझे मुख पांडुरंगा ॥२ ॥

 योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी । तो तूं आम्हांपाशी मागे पुढे ॥३ ॥ 

नामा म्हणे जीवें करीन निंबलोण । विटेसहित चरण आंवाळीण ॥४ ॥ 


१८. पाहतां श्रीमुख सुखावले सुख । डोळियांची भूक न वजे माझ्या ॥१ ॥ 

जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिके पुढें ॥२ ॥ 

श्रवणाची वाट चोखाळली शुध्द । गेले भेदाभेद निवारोनी ॥३ ॥

 महामळे मन होते जे गादलें । शुध्द चोखाळले स्फटिक जसें ।

 तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥५ ॥


 १ ९ . येणें मुखें तुझें वर्णी गुण नाम । तेचि मज प्रेम देई देवा ॥१ ॥ 

डोळे भरूनियां पाहीन तुझें मुख । तेंचि मज सुख देई देवा ॥२ ॥

 कान भरोनियां ऐकेन तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देई देवा ॥३ ॥ 

वाहे रंगी टाळी नाचेन उदास । हे देई हातांस पायां सुख ॥४ ॥

 तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणिक नको ठाव चिंतू यासी ॥५ ॥ 


२०. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव । मी भक्त तूं देव ऐसे करी ॥१ ॥ 

दावी रूप मज गोपिकारमणा । ठेवू दे चरणांवरी माथा ॥२ ॥ 

पाहीन श्रीमुख देईन आलिंगन । जीवें निंगलोण उतरीन ॥३ ॥

 पुसता सांगेन हितगुज मात । बैसोनी एकांत सुख गोष्टी ॥४ ॥ 

तुका म्हणे यासी न लावी उशीर । माझे अभ्यंतर जाणोनियां ॥५ ॥


 भजन जय जय विठोबा रखुमाई 


*** मंगलाचरण तिसरे *** 


सप्तादि कार्यक्रमाच्या वेळी म्हणावयाची प्रार्थना व श्लोक


 २१. श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥१ ॥ 

सकळ देवाधिदेवा॥२॥

कृपाळुवा जी केशवा । महानंदा  महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥धृ .॥

 चक्रधरा विश्वंभरा । गरूडध्वजा करूणाकरा । सहस्त्रपादा सहस्त्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥३ || 

कमलनयना कमलापति । कामिनी मोहना मदनमूर्ति । भवतारका धरित्या क्षिती । वामनमूर्ति त्रिविक्रमा ॥४ ॥ 

अगा ये सगुणा निर्गुणा । जगजनित्या जगज्जीवना । वसुदेव देवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥५ ॥

 तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं । हेचि करितसे विणवणी । भवबंधनी सोडवावे ॥६ ॥ 


२२. ॐनमो ज्ञानेश्वरा । करूणाकरा दयाळा ॥१ ।। 

तुमचा अनुग्रह लाधलो । पावन झालों चराचरी ॥२ ॥

 मी कळाकु सरी कांहींच नेणे । बोलतो वचनें भाविका ॥३ ॥ 

एका जनार्दनी तुमचा दास । त्याची आस पुरवावी।।४ ॥ 


२३. पाहे पां ध्वजेचे चिरगुट । रायां जतन करितां कष्ट ॥१॥

तैसा मी एक पतीत । परी तुझा मुद्रांकित ॥२ ॥ 

मी कळाकुसरी कांहींच नेणे । बोलतो वचनें भाविका ॥३ ॥ 

एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४ ॥ 


२४. पतीत पतीत पतीत । तरी मी त्रिवाचा पतीत ॥१ ॥ 

परि तू आपुलिया सत्ते मज करावे सरते ॥२ ॥ 

नाही चित्तशुध्दी । स्थिर पायांपाशी बुध्दि ॥३ ॥

 अपराधाचा केलो । तुका म्हणे काय बोलो ॥४ ॥


** श्लोक ** 

१ ) वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् । 

देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगदुरूम् ॥ 

२ ) मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरीम् ।

 यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥ 


॥ पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकराम ॥

 ॥ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय ॥

 ॥ श्री तुकाराम महाराज की जय ॥