रूपके ( जोगी, जोगवा, जोहार, बाळछद, गोंधळ, मल्हारीची वारी, बहिरा, मुका, दळण, जाते ) | Rupake ( jogi, jogava, johar, balachhand, gondhal, malharachi vari, bahira, muka, dalan, jate)
]] हरिः ॐ [[
]] श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसज्ञ [[
**॥ रूपके ॥**
( Rupake )
माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉 Download
माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join
रूपके ( जोगी, जोगवा, जोहार, बाळछद, गोंधळ, मल्हारीची वारी, बहिरा, मुका, दळण, जाते ) | Rupake ( jogi, jogava, johar, balachhand, gondhal, malharachi vari, bahira, muka, dalan, jate)
संपूर्ण वारकरी भजनी मालिका | Varkari Bhajani Malika in marathi
।। भजनी मालिका ।।
॥ मालिका सातवी ॥
( Malika Satavi )
जोगी ( Jogi )
८९ . जग जोगी जग जोगी । जाग जाग बोलती ॥१ ॥ जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥२ ॥ अवघा क्षेत्रपाळ । पूजावा सकळ ॥३ ॥ पूजा पत्र कांहीं । फळ पुष्प तोय ॥४ ॥ बहुतां दिसा फेरा । आला या नगरा ॥५ ॥ नका घेऊ भार । धर्म तोचि सार ॥६ ॥ तुका मागे दान । द्यावे जी अनन्य ॥७ ॥
**॥ जोगवा ॥ **
( Jogava )
९० . अनादि निर्गुण प्रकटली भवानी । मोह महिषासूर मर्दनालागुनी । त्रिविध तापांची करावया झाडणी । भक्तालागी तूं पावसी निर्वाणी ॥१ ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन । व्दैत सारूनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहीत वारिसी जाईन ॥२ ॥ नवविध भक्तिच्या नवरात्रा । करूनि पोटी मागेन ज्ञानपुत्रा । धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा । दंभ सासऱ्या सांडिन कूपात्रा ॥३ ।। पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी । मनोविकार करीन कुर्वडी । अद्भुतरसाची भरीन दुरडी ॥४ ॥ आतां साजणी जाले मी निःसंग । विकल्प नवऱ्याचा सोडियला संग । काम क्रोध हे झोडियले मांग । केला मोकळा मारग सुरंग ॥५ ॥ ऐसा जोगवा मागूनी ठेविला । जाऊनि महाव्दारी नवस फेडिला । एकपणे जनार्दन देखिला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६ ॥
॥ ** जोहार **॥
( Johar )
९१ . जोहार मायबाप जोहार । मी सकळ संतांचा महार । सांगतो दृढ विचार । तो ऐका की जी मायबाप ॥१ ॥ माझा विाचर नारदें ऐकीला । तो पुन्हा रूपा नाही आला । भीष्म ध्रुव प्रल्हाद आगळा । या विचारें बोधिलें की ॥२ ॥ उपमन्यू बिभीषण । सर्वा माजी अर्जुन । आणिकही ऋषी सांगेन । सावध ऐका की ॥३ ॥ पराशर विश्वामित्रदि जाण । या विचारें पावले समाधान । हरिशंद्र शिबी सुखसंपन्न । जाले की ॥४ ॥ ऐशा विचारें चालले । ते पुनरपि नाही आले । एकाजनार्दनीं भले । ऐक्यपण की जी मायबाप ॥५ ॥
॥ ** बाळछद **॥
( Bhalchhand )
`९२ . अलक्षलक्षी मी लक्षी । तेथें दिसती दोन्ही पक्षी । वेदशास्त्रा हेचि साक्षी । चंद्रसूर्यासहित मागेन स्वानुभव अंगुलें । पांचां तत्वांचे सानुलें । व्यर्थ इंद्रिये भोगिले । नाहीं रंगले संतचरणी || १ || बाळ छंदो बाबा बाळ छंदो ॥धृ .॥ रामकृष्ण नित्य उदो । हृदयकळिके भाव भेदो । निवृत्तिसहित शरीर निंदो । नित्य उदो तुझाची ॥२ ॥ क्षीरसिंधुही दुहिला । चतुर्दशरत्नी भरला । नेघो तेथील साऊला । मज अबोला प्रपंचेसी । दान दे गा उदारश्रेष्ठा । परब्रह्म तूं ॥ वैकुंठा । मुक्ति मार्गीचा चोहटा । फुकटा नेघे तयार ॥३ ॥ पृथ्वीतळ राज्यमद । मी ने नेणे हेही पद ।। रामकृष्ण वाचे गोविंद । हाचि छंद तुझ्या पंथें । मंत्र तीर्थ यज्ञ याग । या न करी भागाभाग । तूंचि होऊनि सर्वांग । सर्व संग मज देई ॥४ ॥ वृत्तिसहित मज लपवीं । माझे मन चरणी ठेवी । निवृत्ति पदोपदी गोवी । तूं गोसावी दीनोध्दरण । सात पांच तीन मेळा । पा नेघे तत्वांचा सोहळा । रज तमाच कंटाळा । हृदयीं जिव्हाळा हरि वसो ॥५ ॥ श्वेत पीत नेघे वस्त्र । ज्ञान विज्ञान नेघे शास्त्र । स्वर्ग मृत्यू पाताळ पात्र । नित्य वक्त्र हरि देई । चंद्र सूर्य महेंद्रपदें । ध्रुवादिकांची आनंदे । ते मी नेघे गा आल्हादें । तुझ्या ब्रीदें करीन घोष ॥६ ॥ करचरणेसि इंद्रियवृत्ति । तुझ्या ठायीं तूंचि होती । मी माझी उरो नेदी कीर्ति । हे दान श्रीपती मज द्यावे ॥७ ॥ शांति दया क्षमा ऋध्दी । हेही पाहतां मज उपाधी । तुझिया नामाची समाधि । कृपानिधी मज द्यावी ॥८ ॥ बापरखुमादेवीवरू तुष्टला । दान घे घे म्हणोनि वोळला । अजानवृक्ष पाल्हारूला । मग बोलिला विठ्ठल हरि ॥९ ॥ पुंडलिके केले रे कोडें । ते तुवां मागितले रे निवाडे । मी तुज हृदयीं सांपडे । हे त्वां केले ज्ञानदेवा।।१० ॥ ज्ञानदेव घेतले दान । हृदयीं धरोनियां ध्यान । समाधि बैसला निर्वाण । कथा कीर्तन करीतु ॥११ ॥ बाळछंदो बावीस जन्में । तोडिली भवाब्धीची कर्मे । चंद्रार्क तारांगणे । रश्मी दान घेतला हरी ।।१२ ।।
॥ ** गोंधळ **॥
( Gondhal )
९३ . अनादि अंबिका भगवती । बोध परडी घेउनी हाती । पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदो भक्त नाचती ॥१ ॥ गोंधळा येई वो जगदंबे मूळपीठ अंबे ॥धृ .।। व्यास वसिष्ठ शुक गोंधळी । नाचताति सोहंमेळी । व्दैतभाव विसरूनी बळी । खेळती अंबे तुझे गोंधळी ॥२ ॥ मुकुटमणी पुंडलिक । तेहतीस कोटी देव नायक । गोंधळ घालिती सकौतुक । एका जनार्दनी नाचे देख ॥३ ॥
॥ ** मल्हारीची वारी **॥
( Malharachi Vari )
९४ . अहं वाघा सोहंवाघा प्रेमनगरा वारी । सावध होऊनि भजनी लागा देव करा कैवारी ॥१ ॥ मल्हारीची वारी । माझ्या मल्हारीची वारी || शा इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नर्कव्दारी । बोधबुधली ज्ञानदिवटी उजळा महाव्दारी ॥३ ॥ आत्मनिवेदन भरित रोडगा निवतिल हारोहारी । एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी ॥४ ॥
॥ ** बहिरा **॥
( Bahira )
९५ . बहिरा झालों या जगीं ॥धृ .॥ नाहीं ऐकिले हरिकीर्तन । नाहीं केले पुराणश्रवण । नाहीं वेदशास्त्रपठण । गर्मी बहिरा झालो त्यागून ॥१ ॥ नाहीं संतकीर्ति श्रवणी आली । नाहीं साधुसेवा घडियेली । । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रतें असोनि त्यागिली ॥२ ॥ माता माउली पाचारिता । शब्द नाहीं दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एका जनार्दनी स्मरेन आतां ॥३ ॥
॥ ** मुका **॥ ( Muka )
९६ . मुका झालो वाचा गेली ॥धृ .॥ होतो पंडित त महाज्ञानी । दशग्रंथ षड्शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी॥शाजिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पातलो ग मुखबंधना ॥२ ॥ साधुसंतांची निंदा केली । हरिभक्तांची स्तुति नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एका जनार्दनी कृपा लाधली।॥३ ॥
॥ ** दळण **॥ ( Dalan )
९७ . येई हो कान्हाई मी दळीन एकली । एकली दळितां शिणले हात लावी वहिली ॥धृ .॥ वैराग्य जाते मांडूनि विवेक खुंटा थापटोनी । अनुहात दळण मांडूनि त्रिगुण वैरणी घातलें ॥१॥ स्थूळ सुक्ष्म दळियेले देहकारणासहित । महाकारण दळियेलें औट मात्रेसहित।।शदिशा दोनी दळिल्या द्वैत अद्वैतासहित । दाही व्यापक दळियेलें अहं सोहं सहित ॥३ ॥ एकवीस स्वर्ग दळियेलें चवदा भुवनासहित । सप्त पाताळे दळियली सप्त सागरांसहित।॥४ ॥ बारा सोळा दळियल्या सत्रावीसहित । चंद्र सूर्य दळियलें तारांगणासहित ॥५ ॥ नक्षत्र वैरण घालुनि नवग्रहांसहित । तेहतीस कोटी देव दळियेलें ब्रह्माविष्णु - सहित ॥६ ॥ ज्ञानअज्ञान दळियेलें विज्ञानासहित । मीतूंपण दळियेलें जन्ममरणासहित ॥७ ॥ ऐसे दळण दळियेलें दोनी तळ्यासहित । एका जनार्दनी कांहीं नाहीं उरले व्दैत।॥८ ॥
॥ ** जाते **॥ ( Jate )
९८ . सुंदर माझे जाते गे फिरे बहुतेके । ओव्या गाऊं कौतुकें तूं ये रे बा विठ्ठला ॥१ ॥ जीव शिव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे । लावूनि पांची बोटेंगे तूं येरे बा विठ्ठला ॥२ ॥ सासु आणि सासरा दीर तो तिसरा । ओव्या गाऊं भतारा तूं येरे बा विठ्ठला ॥३ ॥ बारा सोळा गडणी अवघ्या कामिनी । ओव्या गाऊं बसूनि तूं येरे बा विठ्ठला ॥४ ॥ प्रपंच दळण दळिलें पीठ भरिलें । सासुपुढे ठेविले तूं येरे बा विठ्ठला।।५ ।। सत्वाचे आधण ठेविले पुण्य वैरिलें । पाप ते उतूं गेले तूं येरे बा विठ्ठला ॥६ ॥ जनी जाते गाईल कीर्त राहिला थोडासा लाभ होईल तूं येरे बा विठ्ठला ॥७ ॥
Majhimajhi-blogger
Post a Comment