श्रीशनिदेवाची आरती | Shree Shanidevachi Aarti | mauli majhi

shreyash feed ads 2

  श्रीशनिदेवाची आरती | Shree Shanidevachi Aarti  | mauli majhi

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ।।

आरती ओवाळितों । मनोभावें करूनी सेवा ।| धृ ।।

सूर्यसूता शनिमूर्ती । तुझी अगाध कीर्ती ।।

एक मुखें काय वर्णू | शेषा न चले स्फूर्ती || १|।

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ।।

नवग्रहामाजीं श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा ||

ज्यावरी कृपा करिसी । होय रंकाचा राजा ।। २।|

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ।।

विक्रमासारिखा हो | शककर्ता पुण्यराशी ।|

गर्व धरितां शिक्षा केली । बहु छळियलें त्यासी || ३।।

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ।।

शंकराच्या वरदानें । गर्व रावणें केला ।।

साडेसाती येतां त्यासी । समूळ नाशासी नेला || ४ ||

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ।।

प्रत्यक्ष गुरुनाथा | चमत्कार दावियेला ||

नेऊनी शूलापाशी । पुन्हा सन्मान केला || ५|।

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ।।

ऐसे गुण किती गाऊं | धणी न पुरे गातां ।।

कृपा करी दीनावरी । महाराजा समर्था ।।६॥।

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ।।

दोन्ही कर जोडूनियां । रखमां लीन सदा पायीं ।।

प्रसाद हाचि मागे । उदयकाळ सौख्य दावी ।।७॥|।

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ।।