श्रीमद्भागवत गीता | अध्याय 12( भक्तियोग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 12 (Bhaktiyog ) maulimajhi-blogger

shreyash feed ads 2

श्रीमद्भागवत गीता | अध्याय 12( भक्तियोग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 12 (Bhaktiyog ) maulimajhi-blogger

|| भक्तियोग ||

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 











श्रीमद्‌भगवद्‌गीता : बारावा अध्याय (भक्तियोग)
मूळ बाराव्या अध्यायाचा प्रारंभ
अथ द्वादशोऽध्यायः
अर्जुन उवाच: एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १२-१ ॥

श्रीभगवानुवाच: मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ १२-२ ॥

ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्‌ ॥ १२-३ ॥

सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ १२-४ ॥

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्‌ ॥
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ १२-५ ॥

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ १२-६ ॥

तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्‌ ।
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम्‌ ॥ १२-७ ॥

मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥ १२-८ ॥

अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्‌ ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ॥ १२-९ ॥

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ॥ १२-१० ॥

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः ।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्‌ ॥ १२-११ ॥

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाञ्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम्‌ ॥ १२-१२ ॥

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १२-१३ ॥

सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १२-१४ ॥

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १२-१५ ॥

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १२-१६ ॥

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १२-१७ ॥

समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १२-१८ ॥

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्‌ ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १२-१९ ॥

ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥ १२-२० ॥

मूळ बाराव्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥



गीता वाचताना प्ले करा



|| अध्याय बारावा ||


अर्जुन म्हणाला,

        जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्या प्रमाणे निरंतर आपल्या भजन - ध्यानात मग्न राहून आपले सगुणरूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवल निराकार अक्षर (ऊँ) ब्रह्माची उपासना करतात ,त्या दोन्ही मध्ये उत्तम योगी कोण आहे? ।11।।


श्रीभगवान म्हणाले,


        जे निर्गुण श्रध्देने आणि मन एकाग्र करून निरंतर मला भजतात, ते मला सर्व योग्यांमध्ये अति उत्तम योगी वाटतात ।।21।


        परंतु जे पुरूष सर्व इन्द्रियांना चागल्या प्रकारे ताब्यात ठेवुन सर्वत्र समबुध्दियुक्‍्त होऊन सर्वव्यापी ,अवर्णिय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणारा नित्य।|31।


        अचल, निराकार,अविनाशी ,सच्विदानंद ब्रह्माची निरंतर ऐक्यभावाने (ऊँ अक्षरचे) ध्यान करीत उपासना करतात, ते मलाच प्राप्त होतात।।4।।


        पण निर्विशेष निराकार ब्रह्मांत चित्त गुतलेल्या त्या पुरूषांचे ध्यान (योग) साधनेत कष्ट जास्त आहे. कारण देहाच्या अभिमानी व्यक्ति द्वारा अव्यक्त(सूक्ष्म) ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते|।5।।


        परंतु जे मत्परायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पन करून मज सगुणरूप परमेश्वराचीच अनन्य भक्तियोगा द्वारा निरंतर चिंतन करीत उपासना करतात ।।61।


        हे अर्जुना ! त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या भक्तांचा मी तत्काल मृत्युरूप संसार सागरा- तुन उद्धार करणारा होतो।।7।।


        माझ्यातच मन ठेव ,माझ्या ठिकाणीच बुध्दि स्थापन कर. म्हणजे तु मग माझ्याच जवल राहशील ,यात मुळीच संशय नाही।।8।।


        जर तु माझ्यात मन निश्चल करण्यास समर्थ नसशील ,तर हे अर्जुना ! योग-अभ्यासा द्वारा मला प्राप्त होण्याची इच्छा कर।।91।


        जर तु वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील .तर केवल माझ्यासाठी कर्म  कर ,मत्परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही (परम) सिद्धि तु मिळवशील।।101।


        जर तू वर सांगितलेले साधन करण्यास असमर्थ अशील, तर सर्व कर्मे मला समर्पित करून कर्मसंन्यास योगाचा आश्रय घेत आणि मन नियंत्रित करून सर्व कर्मफलांचा त्याग कर।1111।


        कारण अभ्यासापेक्षा श्रेष्ठ आहे- ज्ञान, आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ मज परमात्मस्वरूप ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यान केल्याणे कर्म फलांचा त्याग होतो ,कारण त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते (परमात्म्यात मन स्थिर होते ) ।1121।


        जो सर्व प्राण्यांच्या प्रति द्वेषरहित, मित्रभावपण, कृपाळू, पुत्र-कुळादि मध्ये ममता शुन्य, देह, संपत्ति आदिमध्ये अहंकार शुन्य ,सुख-दुखात समभाव असलेला, क्षमा करणारा 11131|


        सर्वदा प्रसन्न चित्त , माझ्यात भक्तियोग युक्त, सर्व इन्द्रिये ताब्यात ठेवनारा, हढनिश्चयी, मन आणि बुध्दिला माझ्या (नाम-गुण-कोर्तना ) मध्ये समर्पित करनारा भक्‍त मला प्रिय आहे।1141|


        जो भक्त कोणत्याहि प्राणीला त्रास देत नाही आणि कोणालाहि त्याचापासून त्रास होत नाही . जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादि पासुन अलिप्त असतो, तो भक्‍त मला प्रिय आहे।1151।


        ज्या भक्ताला व्यवहारीक कार्यांपासून कुठलिच अपेक्षा नसते , ज्यांचा आंतर्बाह्य शुध्द, आहे, अनासक्त, उद्देगरहित आणि भक्ति प्रतिकुल असणारे सर्व कार्यांमध्ये तटस्थ राहणारे माझे भक्‍त मला प्रिय आहेत।।161।


        जो कधीही प्रिय वस्तु प्राप्त झाली की हर्षित होत नाही व नाही मिळाली असता द्वेष करत नाही ,नष्ट झाली असता शोक करत नाही व अप्राप्त वस्तुची इच्छा सुधा करीत नाहीत, शुभ आणि अशुभ कर्मांचा त्याग करणारा भक्‍्तियुक्‍त पुरूष मला प्रिय आहे। 11711


        जो शत्रु-मित्र ,मान-अपमान या विषयी समभाव बाळगतो ,तसेच थंडी - ऊन द्वंद्वात ज्याची वृत्ति सारखीच राहते आणि ज्याची वाणी संयत आहे।।181।


        ज्याला निंदा-स्तुती सारखीच वाटते , जे मिळेल त्यामध्येच तो संष्ट राहतो (शरीर निर्वाह करतो), ज्याला निवास स्थानात (घर-कुटुंबात) आसक्ति (ममता) नसते, तो स्थिर बुध्दि असणारा भक्तिमान पुरूष मला प्रिय आहे।1191।


        परंतु जे श्रध्दाळू पुरूष मत्परायण होऊन वर सांगितलेल्या धर्ममय अमृताची (भगवद्‌ गीतेची) नित्य उपासना (पाठ) करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत।।1201।

 

मूळ बाराव्या अध्यायाची समाप्ती

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील भक्तियोग नावाचा हा बारावा अध्याय समाप्त झाला. ॥ १२ ॥

👇🏻

श्रीमद्भागवत गीता | अध्याय १३ (क्षेत्रक्षेत्रविभाग योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 13 (kshetrakshetravibhag yog) maulimajhi-blogger

Maulimajhi-blogger


धन्यवाद !



Copyright by :DeviAnaghaBraja Beats

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.