श्रीमद्भागवत गीता | अध्याय 6 ( आत्मसंयम योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 6 (Atmasanyam Yog ) maulimajhi-blogger

shreyash feed ads 2

श्रीमद्भागवत गीता | अध्याय 6 ( आत्मसंयम योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 6 (Atmasanyam Yog ) maulimajhi-blogger

आत्मसंयम योग

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 










श्रीमद्‌भगवद्‌गीता : सहावा अध्याय (आत्मसंयमयोग)
मूळ सहाव्या अध्यायाचा प्रारंभ
अथ षष्ठोऽध्यायः
श्रीभगवानुवाच: अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।
स संन्यासी च योगी च निरग्निर्न चाक्रियः ॥ ६-१ ॥

न संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।
न ह्यसंन्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन ॥ ६-२ ॥

आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ६-३ ॥

यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।
सर्वसङ्कल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥ ६-४ ॥

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्‌ ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ६-५ ॥

बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्‌ ॥ ६-६ ॥

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ६-७ ॥

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः ॥ ६-८ ॥

सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥ ६-९ ॥

योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥ ६-१० ॥

शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्‌ ॥ ६-११ ॥

तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।
उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥ ६-१२ ॥

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।
सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्‌ ॥ ६-१३ ॥

प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥ ६-१४ ॥

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः ।
शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥ ६-१५ ॥

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।
न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ ६-१६ ॥

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ ६-१७ ॥

यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।
निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥ ६-१८ ॥

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ ६-१९ ॥

यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ ६-२० ॥

सुखमात्यन्तिकं यत्तद्‍बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम्‌ ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ ६-२१ ॥

यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिन्‌ स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ ६-२२ ॥

तं विद्याद्‌ दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम्‌ ।
स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ ६-२३ ॥

सङ्कल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।
मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ ६-२४ ॥

शनैः शनैरुपरमेद्‍बुद्ध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मनःकृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत्‌ ॥ ६-२५ ॥

यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम्‌ ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत्‌ ॥ ६-२६ ॥

प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम्‌ ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्‌ ॥ ६-२७ ॥

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ ६-२८ ॥

सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ ६-२९ ॥

यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥ ६-३० ॥

सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥ ६-३१ ॥

आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ ६-३२ ॥

अर्जुन उवाच: योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम्‌ ॥ ६-३३ ॥

चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्‍दृढम्‌ ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्‌ ॥ ६-३४ ॥

श्रीभगवानुवाच: असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्‌ ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ ६-३५ ॥

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ६-३६ ॥

अर्जुन उवाच: अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ६-३७ ॥

कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥ ६-३८ ॥

एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥ ६-३९ ॥

श्रीभगवानुवाच : पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।
न हि कल्याणकृत्कश्चिद्‍दुर्गतिं तात गच्छति ॥ ६-४० ॥

प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ६-४१ ॥

अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्‌ ।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्‌ ॥ ६-४२ ॥

तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्‌ ।
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ ६-४३ ॥

पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥ ६-४४ ॥

प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम्‌ ॥ ६-४५ ॥

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥ ६-४६ ॥

योगिनामपि सर्वेषां मद्‍गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥ ६-४७ ॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥



गीता वाचताना प्ले करा



|| अध्याय सहावा ||

श्रीभगवान म्हणाले,


        जो पुरूष कर्मफलांचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो, तोच संन्यासी व योगी होय केवल अग्निहोत्रिचा (यज्ञ,हवनाचा) त्याग करणारा संन्यासी नव्हे आणि केवल क्रियांच्या  (नामस्मरण, उपासनादिचा) त्याग करणारा योगी नव्हे।11।।


       हे अर्जुना! ज्याला संन्यास असे म्हणतात, त्यालाच तू योग समज, कारण कामसंकल्पांचा (विषय भोगांची कामना ) त्याग न करणारा कोणी पुरूष योगी होत नाही।।2।।


        योगा आरूढ मननशील असलेल्या पुरूषाला योगाची प्राप्ती मध्ये निष्काम कर्म करने हेच साधन आहे आणि योगारूढ झाल्यावर त्या पुरूषाचा विक्षेप कर्माचा (मन चंचल करणारे कर्मांच्ये) त्याग करने यालाच साधन म्हणतात ।131।


        कारण, ज्यावेळी इन्द्रियांच्या विषय भोगांत किंवा कर्माच्या ठायीं पुरूष आसक्त होत नाही , त्यावेळी सर्व संकल्पनांचा म्हणजे फळांची इच्छा त्याग करणारा त्या पुरूषाला योगारूढ असे म्हटले जाते।।41।


        माणसानी अनासक्त मनाच्या द्वारा आम्म्येच्या या संसारातून उद्धार करून घ्यावे, आत्म्याची(स्वत:ची) अधोगती होऊ देऊ नये, कारण आत्मा म्हणजे मनच आपले बांधव आणि शत्रु आहे ।151।


        ज्या जीवात्म्यानी आपले मन पूर्णपणे जिंकले (वंश केले) आहे, त्या जीवाल्म्येचा मन मित्र आहे, आणि ज्यांनी मंन जिंकले नाही त्यांचे मन शत्रु सारखे दिसणारे विषय भोगांमध्ये रमलेले असतात ।161।


        ठंड-उष्ण, सुख-दुख , इत्यादि तसेच मान अपमानात ज्यांचे अंत:करण पूर्णपणे शांत व स्वाधीन असलेल्या योगी सच्विदांनद परमात्म्यात समाधिस्थ असतो (म्हणजे त्यांचे ज्ञानात परमात्माशिवाय दुसरे काहीच नसते )।।7।।


        ज्यांचे अंत:करण ज्ञान-विज्ञानाने तृप्त झाले आहेत आणि ज्यांने(सर्व) इन्द्रिये पूर्णपणे जिंकले आहेत,तो कूटस्थ म्हणजे ज्याला माती ,दगड आणि सोने समान आहे ,तोच योगयुक्‍्त आहे म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हणतात।।81।


        सुहृद मित्र, शत्रु, उदासीन, मध्यस्थ, द्वेष बांधव , सज्जन आणि पापी या सर्वान् विषयी समान भाव ठेवणारा पुरूष अत्यंत श्रेष्ठ आहे।।9।।


        मन व इन्द्रियसह शरीर ताब्यात ठेवणारा निरीच्छ आणि संग्रह न करणारा योगीने एकट्यानेच एकान्तात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे।101।


        शुध्द जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजिन आणि वस्त्र अंधरून तयार केलेले, जे फार उंच सखोल नाही, असे आपले आसन स्थिर मांडून ।॥11।।


        त्या आसनावर बसून चित्त व इन्द्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंत:करणाच्या शुद्धीसाठी योगभ्यास करावा।1121।


            शरीर ,ठोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे. नंतर आपल्या नाकाच्या शेंडावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता।।131।


        ब्रह्मचर्य व्रत पाळून, निर्भय तसेच अत्यंत शांत अंत:करण चित्त माझा(ऊँ) ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे।।141।


        मन ताब्यात ठेवलेले योगी अशाप्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वर स्वस्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शान्ती मिळवितो 111511


        हे अर्जुना ! हा योग , ज्यास्त आहार करणारा, व अजिबात आहार न करणारा, फार झोपाळू तसेच नेहमी जागरण करणारे पुरूषाला साध्य होत नाही।।16।।


        यथायोग्य आहार - विहार करणारा, कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणारा आणि यथायोग्य झोपने व जागरण करणारेला हा योग सांसारिक दु:खांचा नाश व हरण करणारा असतो ।1171।


        पूर्णपणे ताब्यात आणलेले , चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होतो. तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेले अशा पुरूषाला योगयुक्‍त म्हंटला जातो।।18।।


        ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हालत नाही, तीच उपमा परमात्माच्या ध्यानात मग्न झालेल्या योगीच्या जिंकलेल्या चिंत्ताला दिली गेली आहे।।191।


        ज्या अवस्थेत योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त विषयान पासूण दुर जातात आणि ज्या स्थितीत विशुद्ध झालेल्या चित्त आत्म्याचे दर्शन करून करून आत्मामध्येच संतुष्ट राहतो।।201।


        त्यावेळी फक्त बुद्धिने प्राप्त होणारे इन्द्रिये नित्य सुखांचा ते(आत्म) अनुभव घेतात, ज्यामध्ये स्थित राहून ते आत्म स्वरूपा पासून भ्रष्ट (विचलित)होत नाही।।21।


        जे लाभ(आत्म सुख) प्राप्त झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरे कोणतेहि लाभ तो मानत नाही , आणि ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दु:खाने सुधा विचलित होत नाही ।1221।


        आणि जो दु:खरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे, त्याला तू “योग” हेच नावाने जाण  ,तो योग अभ्यास न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने अवश्य केला पाहिजे ।1231।


        संकल्पाने उत्पन्न होणारे सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूनी पूर्णतया आवरून|।।24।।


        क्रमकाने अभ्यास करीत उपरत व्हावे ,तसेच धैर्ययुक्‍्त, बुद्धियुक्‍्त मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसरे कोणतेहि विचार मनात देऊ नेय।1251।


        हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादि विषयांच्या संसारात भरकटत असते, त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमाल्म्यात स्थिर करावे।।26।।


        कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे ,जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुणे शांत झालेल्या आहे, अशा या सच्चिदानंद ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योगीला उत्तम आनंद प्राप्त होतो।।271।


        तो निष्पाप योगी निरंतर आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याशी अपार आनंदाचा अनुभव घेतो।।281।


        ते सर्वत्र समदर्शी योगयुक्‍्त पुरूष सर्व भूतां(जीवां) मध्ये आत्मा आणि आत्मामध्ये सर्व भूतांना अवस्थेत बघतो।।291।


        जो पुरूष सर्व प्राण्यात आत्मा असलेल्या पाहातो आणि सर्व प्राण्यांना तो मज वासुदेवात पाहतो, असे पुरूषाला मी अदृश्य असत नाही आणि तो सुधा मला अदृश्य असत नाही।1301।


        जो पुरूष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व प्राणिमात्रात आत्मरूपात असलेल्या मला सच्चिदानंद वासुदेवाला(निरंतर) “भजतो, तो योगी सर्व प्रकाराचे व्यवहार करत असला तरी , त्याचे सर्व व्यवहार माझ्यावर होत असतात ।1311।


        हे अर्जुना ! जे योगी आपल्या दृष्टी ने सर्व प्राणिमात्रांना स्वभावाने पाहतो, तसेच सर्व जीवांचे सुख आणि दु:ख समदृष्टीने पाहतो , ते माझ्या मता प्रमाणे श्रेष्ठ आहेत।1321।


अर्जुन म्हणाला -



        हे मधुसुधना! जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितला आहे, तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहिल , असे मला वाटत नाही।1331।


        हे श्राकृष्णा ! कारण हे मन चंचल, क्षोभ विणारे, मोठे दृढ आणि बलवान आहे. त्यामुळे त्याला वश करने मी वायुला अडवण्या प्रमाणें अत्यंत कठिण समजतो ।134।।


श्रीभगवान म्हणाले-



        हे महाबाहो ! यात संशय नाही की हे मन चंचल आणि कठिणांनी वंशमध्ये होणारा आहे, किन्तु हे कुन्ती पुत्रा! अभ्यास आणि वैराग्याने हे(मन) ताब्यात येतो।।351।


        असंयत मन असणारे पुरूषाला योग साधने कठिन आहे ,किंतु मन वंशमध्ये ठेवणारा अशा प्रयत्नशील माणसाला साधनेने ते (परमात्म ध्यान) प्राप्त होणे शक्‍य आहे, असे माझे मत आहे।136।।


अर्जुन म्हणाला-


        हे कृष्णा ! जो योगावर श्रध्दा ठेवणारा आहे ,परन्तु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले आहे, असा साधक योगसिध्दिला (भगवद साक्षात्काराला) प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो? ।1371।


        हे महाबाहो ! ब्रह्म प्राप्तीच्या मार्गात मोहित आणि आश्रय रहित असलेला पुरूष छिन्न भिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत? |1381।


        हे कृष्णा! हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा केला पाहिजे. कारण तुमच्या शिवाय दुसरा हा संशय दुर करणारा कोणी मिळण्याचा संभव नाही।।391।


श्राभगवान म्हणाले-


        हे पार्थ ! त्या पुरूषाचा ना इहलोकात नाश होतो व ना परलोकात. कारण हे तात ! कल्याणकारी कर्म करणारा कोणत्याहि मनुष्य अधोगतीला जात नाही ।।401।


        योगशभ्रष्ट पुरूष पुण्यवानांना मिळणारे लोक अर्थात स्वर्गादि उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्ष राहून नंतर शुध्द आचरण असणारे श्रीमंताच्या घरात जन्म घेतो ।141।।


        किंवा वैराग्यशील पुरूष त्या लोकात न जाता ज्ञानी योग्याचे घरात जन्म घेतात, त्या प्रकाराचे जन्म या जगात नि:संदेह अत्यंत दुर्मिळ आहे ।।421।


        हे कुन्तीनंदन ! ते योगभष्ट पूर्वजन्मात संग्रह केलेल्या बुध्दिसंयोग व संस्कार सहजच प्राप्त करतो आणि त्यांच्या प्रभावाने तो पुन: परमात्म प्राप्तिरूप सिद्धिसाठी पूर्वपिक्षा अधिक प्रयत्न करतो ।1431।


        तो श्रीमंत घरात जन्म घेणारा योगभष्ट पराधीन असला तरी आपल्या पूर्वी जन्माच्या अभ्यासामुळे नि:शंकपणे भगवंताकडे आकर्षित होतो आणि योगाच्या विषयात जिज्ञासा झाल्यावर तो वेदांतात सांगितलेल्या सत  कर्मांच्ये फलांना ओलांडून जातो. 11441


        परंतु अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्माच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धि मिळवून सर्व पापांनी मुक्त होऊन तत्काल परम गतीला प्राप्त करतो 114511


        तपस्वी , ज्ञानी( ब्रह्म उपासक) आणि कर्मी पेक्षा योगी (भगवद्‌ उपासक) अधिक श्रेष्ठ आहे . म्हणून हे अर्जुना ! तू योगी हो ।।461।


        सर्व योग्यांन पेक्षा जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापन करून मला अखंड भजतो , तोच योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो ।।471।

👇🏻

श्रीमद्भागवत गीता | अध्याय 7 (ज्ञानविज्ञान योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 7 (Dyanvidnyan Yog ) maulimajhi-blogger

Maulimajhi-blogger


धन्यवाद !




Copyright by :DeviAnaghaBraja Beats

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.