श्रीमद्‌भगवद्‌गीता : नववा अध्याय 9 (राजविद्याराजगुह्ययोग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 9 (Rajvidyarajgrahya Yog ) maulimajhi-blogger

shreyash feed ads 2

श्रीमद्‌भगवद्‌गीता : नववा अध्याय (राजविद्याराजगुह्ययोग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 9 (Rajvidyarajgrahya Yog ) 

maulimajhi-blogger

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 












श्रीमद्‌भगवद्‌गीता : नववा अध्याय (राजविद्याराजगुह्ययोग)
मूळ नवव्या अध्यायाचा प्रारंभ
अथ नवमोऽध्यायः
श्रीभगवानुवाच : इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ ९-१ ॥

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम्‌ ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्‌ ॥ ९-२ ॥

अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ९-३ ॥

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥ ९-४ ॥

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्‌ ।
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥ ९-५ ॥

यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान्‌ ।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ९-६ ॥

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्‌ ।
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्‌ ॥ ९-७ ॥

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्‌ ॥ ९-८ ॥

न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९-९ ॥

मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम्‌ ।
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ ९-१० ॥

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्‌ ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्‌ ॥ ९-११ ॥

मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः ।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥ ९-१२ ॥

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः ।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्‌ ॥ ९-१३ ॥

सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः ।
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ ९-१४ ॥

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम्‌ ॥ ९-१५ ॥

अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम्‌ ।
मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्‌ ॥ ९-१६ ॥

पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः ।
वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च ॥ ९-१७ ॥

गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्‌ ।
प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्‌ ॥ ९-१८ ॥

तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ ९-१९ ॥

त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान्‌ ॥ ९-२० ॥

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥ ९-२२ ॥

येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्‌ ॥ ९-२३ ॥

अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।
न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥ ९-२४ ॥

यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रताः ।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्‌ ॥ ९-२५ ॥

पत्रं पुष्पं फलं तोयं ये मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ ९-२६ ॥

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्‌ ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्‌ ॥ ९-२७ ॥

शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः ।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ ९-२८ ॥

समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्‌ ॥ ९-२९ ॥

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्‌ ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ९-३० ॥

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।
कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ९-३१ ॥

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्‌ ॥ ९-३२ ॥

किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्‌ ॥ ९-३३ ॥

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ॥ ९-३४ ॥

मूळ नवव्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥



गीता वाचताना प्ले करा



|| अध्याय नववा ||

      || श्रीभगवान म्हणाले, ||


          हे अर्जुना ! दोषदृष्टी रहित ,अतिशय गोपनीय विज्ञानसहित व केवल शुद्ध भक्तियुक्‍त असे ज्ञान तुला पुन्हा मी नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू या दुख:रूपी संसारातून मुक्‍त होशील ।111।


       ते विज्ञानसहिता ज्ञान सर्व वाद्यांचा राजा, सर्व गुप्त गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र ,अतिशय उत्तम प्रत्यक्ष शीघ्र फल देणारे, धर्मयुक्‍त ,साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे।।21।


       हे परंतपा ! या वर सांगितलेल्या भक्तिस्वरूप धर्मावर श्रध्दा नसलेले पुरूष मला प्राप्त न होता मृत्युरूप संसारमार्गात(चक्रात) फिरत राहतात।131।


       जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते, तसे मी निरंकार परमात्म्याने हे संपूर्ण जग व्यापले आहेत .तसेच सर्व भूते (जीव) माझ्यामध्ये फक्त संकल्पाच्या आधारावर राहिलेले आहेत. पण वास्तविक पणे मी त्यांच्यात राहत नाही।।41।


       परंतु माझी ईश्वरीय योगशक्‍ती पहा, भूतांना (जीव) उत्पन्न करणारा व त्यांचे धारण- पोषण करणारा असून सुधा मी वास्तविक पणे मी त्या भूतांच्या आणि ते (जीव) माझ्या ठिकाणी राहत नाही।151।


       जसे सुक्ष्म वायु आकाशा पासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा नेहमी आकाशातच राहतो ,त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले सर्व भुते(जीव) माझ्यात राहतात असे तू समज।।61।


       हे अर्जुना ! प्रलथकाळी (शेवटी) सर्व भूते माझ्या प्रकृतिमध्ये विलीन होतात आणि पुन: सृष्टिकाळी (आरंभी) मी त्यांचे विशेष भावानी( पुन:) स्थापना करतो।।7।1।


       आपल्या मायेच्या अंगीकार करून प्रकृतिच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूत(जीव) समुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो ।।181।


       हे अर्जुना ! त्या कर्मात आसक्ति नसलेल्या व उदासीन प्रमाणे मला (परमात्म्याला) ते कर्मेबंधनकारक होत नाहीत।।91।


        हे अर्जुना ! माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृति चराचरास हे संपुर्ण जग निर्माण होते. ह्याच कारणाने हे संसारचक्र पुन: पुन: फिरत आहे।1101।


       माझ्या परम भावाला न जाणणारे मुर्ख लोक व मायिक मनुष्य शरीर धारण करणारे सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात. अर्थात योगमायेने जगाचे उद्धारासाठी मनुष्यरूप धारणारा मला सामान्य मनुष्य समजतात ।111।।


       ज्यांची आशा व्यर्थ , कर्म निरर्थक आणि ज्ञान फुटके असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचे आश्रय करून राहतात।।121।


       परंतु हे कुन्तीपुत्रा ! दैवी प्रकृतिच्या आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षरस्वरूप जाणुन अनन्य चित्ताने युक्‍त होऊन निरंतर मला भजतात |1131।


       ते हढ निश्चयी भक्‍त निरंतर माझ्या नामांचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात 111411


       अन्य काहीजण ज्ञानयज्ञाने (वेदगीता पाठ) यज्ञ करताता, कोणी अभेद्य भावाने ,पृथकत्वानें म्हणजे भेदभावाने, नाना प्रकारांनी आणि सर्वतोमुख (माझी) उपासना करतात ।1151।


       हे अर्जुना ! श्रौत(अग्निष्टोमादि) यज्ञ मी आहे, स्मार्तत(स्मृति विहित) यज्ञ मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती, अन्न व औषधी मी, मंत्र मी , तूप मी ,अग्नी मी ,होम मी आहे ।1161।


       मीच या जगाचे आई- वडिल धाता आणि आजोबा आहे, मीच पवित्र ओंकार आहे, तसेच क्रग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदहि मीच आहे।।117।।


       प्राप्त होण्यासारखे परम धाम, भरण पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान , शरण देणारा, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ति - प्रलयाचे कारण , स्थिति, आधार, निधान आणि अव्यय बीज मी आहे।।181।


       मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, पाणी आकर्षण करून घेतो व वर्षाव करतो. हे अर्जुना ! मीच अमृत आणि मृत्यु आहे, सत्‌ (स्थुल) आणि असत्‌(सुक्ष्म) वस्तु मीच आहे ।1191।


        तिन्ही वेदांतील सांगितलेली सकाम कर्मे करणारे , सोमरस पिणारे , पापमुक्त लोक माझे (ब्रह्मरूप) यज्ञांजे पूजन करून स्वर्ग प्राप्तीची इच्छा करतात. ते इन्द्रलोक(स्वर्ग) पुण्यफल प्राप्त करून दिव्य देवतांचे भोग व पदार्थांचा ते उपभोग घेतात ।।1201।


        ते त्या विशाल स्वर्ग लोकांच उपभोग घेत पुण्य संपल्यावर ते मृत्यु लोकात(संसारात) पुन: येतात. अशा रीतीने (स्वर्ग प्राप्तीचे साधन असणारे )तिन्ही वेदांमध्ये सांगितलेल्या सकाम कर्मांचे अनुष्ठान करून ते पुन: पुन: या संसारात येतात आणि जातात ।।1211।


        जे अनन्य कामनारहित भक्‍त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत सर्वोत भावनाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणारे व्यक्तिंचे योग(धन-धाण्य) आणि क्षेम मी स्वत: त्यांना प्रापत करून (वहाम्यहम्‌ -वाहून) देतो।।221।। (पालन-पोषण करतो)


        हे अर्जुना ! जे सकाम भक्त श्रेध्देने दुसरे देवतांची पूजा करतात , तेही माझीच पूजा करतात . परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते।।2311।


        कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी मीच आहे. पण ते मला परमेश्वराला तत्वत: जाणत नाहीत: म्हणुन ते पुन:जन्म घेतात। 1241 |


        देवांची पूजा करणारे देवांना जावून मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात , भुतांची पूजा करणारे भुत-प्रेतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मलाच प्राप्त करतात (त्यामुळे माझ्या भक्तांना पुन:जन्म नाही)11251।


        जो कोणी भक्त मला प्रेमाने पान , फुल , फल, पाणी इत्यादि अर्पण करतो, त्या शुध्द बुध्दीच्या निष्काम भक्‍्तांने अर्पन कलेले सर्व पदार्थांना मी ग्रहण करतो ।।261।


        हे अर्जुना ! तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व कर्म मला समर्पित (माझा प्राप्तीसाठी) कर।।27।।


        अशा प्रकारे तू शुभ व अशुभफल स्वरूप कर्मबंधनातून मुकत होशील आणि अशा संन्यास योगानेयुक्‍त चित्त असलेला तू मुक्‍त झालेले योगीसारखे मलाच येऊन मिळशील 112811


        मी सर्व प्राणीमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे . मला ना कोणी अप्रिय न प्रिय आहे. परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात, ते माझ्यात आसक्त असतात आणि मीही त्याच प्रकारे त्यांच्यात आसक्त (निर्भर) असतो ।।291।


        जर एखादा अत्यंत दुराचारी (वाईट) माणसाने जर सुधा अनन्य भावाने माझा भक्‍त होऊन मला भजला, तर त्याला साधुच (सज्जनच) समजावा. कारण माझ्यात भक्तियुक्‍त (परमात्मा शिवाय दुसरे काहीच नाही) निश्चयी बुध्दि त्याची झालेली असते।।301।


        तो तत्काळ धर्मात्मा होऊन परम शांतीला प्राप्त करतो, हे कौन्तेया ! तू असे प्रतिज्ञा करून घे कि माझे भक्‍त कधीहि नाश पावत नाही।1311।


        हे अर्जुना ! नीच कुळातली स्त्रिया, वैश्य, शुद्र तसेच पापयोगी अर्थात चाण्डालादी कोणीहि असो, ते सुधा माझे आश्रय घेवून परम गतीला प्राप्त करतात ।।32।।


        मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजर्षि भक्तगण माझ्या शरणात येऊन परम गतिला प्राप्त करतील, यात कसली शंका आहे ? म्हणुन तू दुख:रूपी व नाशवंत या मनुष्य शरीराला प्रापत करून, नेहमी माझेच भजन (नामस्मरण) कर 13311


        माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर ,अशा रीतीने आम्म्याला माझ्याशी जोडून मत्परायण होऊन तू (मृत्युच्यावेळी) मलाच प्राप्त होशील 11341 |

मूळ नवव्या अध्यायाची समाप्ती

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील राजविद्याराजगुह्ययोग नावाचा हा नववा अध्याय समाप्त झाला. ॥ ९ ॥

👇🏻

श्रीमद्भागवत गीता | अध्याय १०( विभूती योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 10 (Vibhuti Yog ) maulimajhi-blogger

Maulimajhi-blogger


धन्यवाद !




Copyright by :DeviAnaghaBraja Beats

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.