श्रीमद्भागवत गीता | अध्याय १०( विभूती योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 10 (Vibhuti Yog ) maulimajhi-blogger
श्रीमद्भागवत गीता | अध्याय १०( विभूती योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 10 (Vibhuti Yog ) maulimajhi-blogger
|| विभूती योग ||
माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉 Download
माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join
श्रीमद्भगवद्गीता : दहावा अध्याय (विभूतियोग)
मूळ दहाव्या अध्यायाचा प्रारंभ
अथ दशमोऽध्यायः
श्रीभगवानुवाच : भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १०-१ ॥
न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ १०-२ ॥
यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।
असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ १०-३ ॥
बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ १०-४ ॥
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ १०-५ ॥
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ १०-६ ॥
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ १०-७ ॥
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ १०-८ ॥
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ १०-९ ॥
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०-१० ॥
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ १०-११ ॥
अर्जुन उवाच: परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १०-१२ ॥
आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १०-१३ ॥
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १०-१४ ॥
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेष देवदेव जगत्पते ॥ १०-१५ ॥
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।
याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १०-१६ ॥
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १०-१७ ॥
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १०-१८ ॥
श्रीभगवानुवाच: हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १०-१९ ॥
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ १०-२० ॥
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ १०-२१ ॥
वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ १०-२२ ॥
रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ १०-२३ ॥
पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ १०-२४ ॥
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ १०-२५ ॥
अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥ १०-२६ ॥
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥ १०-२७ ॥
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ १०-२८ ॥
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥ १०-२९ ॥
प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ १०-३० ॥
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी ॥ १०-३१ ॥
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ १०-३२ ॥
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ १०-३३ ॥
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ १०-३४ ॥
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ १०-३५ ॥
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ १०-३६ ॥
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः ।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ १०-३७ ॥
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ १०-३८ ॥
यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ १०-३९ ॥
नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ १०-४० ॥
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम् ॥ १०-४१ ॥
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कॄत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥ १०-४२ ॥
मूळ दहाव्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥
गीता वाचताना प्ले करा
|| अध्याय दहावा ||
श्रीभगवान म्हणाले,
हे महाबाहो ! आणखी माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणने ऐक, जे मी अतिशय प्रेमी अशा तुझ्या हितासाठी सांगणार आहे।।1।।
माझी उत्पत्ति (लीला द्वारा प्रकट होणे ) ना देव जाणत ना महर्षि .कारण सर्व प्रकारे देवांचे व महर्षिचे मीच आदिकारण आहे| ।21।
जोमला वास्तविक जन्मरहित,अनादि आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्वत: जाणतो, तो मनुष्यात मोहशुन्य होऊन सर्व पापान पासून मुक्त होतो।।31।
निर्णय शक्ति, यथार्थ ज्ञान ,असंमूढता, क्षमा ,सत्य इन्द्रियनिग्रह, मनोनिग्रह, सुख , दुख उत्पत्ति, प्रलय, भय, अभय।141।
अहिंसा , समता, संतोष , तप, दान , कीर्ति-अपकीर्ति इत्यादि प्राण्यांचे अनेक प्रकाराचे सर्व भाव माझ्यापासुनच उत्पन्न होतात।15।।
सात महर्षिगण, त्यांच्याही पूर्वी असणारे सनकादिक चार कुमार तसेच स्वांयभुव इत्यादि चौदा मनु हे माझ्या संकल्पाने (हिरण्यगर्भातून) उत्पन्न झाले आहेत .या जगात सर्व ब्राह्मणादि प्रजा त्यांचीच पुत्र-पौत्रादि आहेत।।6।।
जो पुरूष माझे परमेश्वरर्यरूपी विभूतीला आणि योगशक्तिला तत्त्वत जाणतो तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो, यात मुळीच शंका नाही।।7।।
मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्त्पत्तिचे कारण आहे आणि माझ्यामुळेच हे सर्व जग क्रियाशील होत आहे. असे जाणुन श्रध्दा व भक्तीने युक्त असलेले बुध्दिमान भक्त मज परमेश्वरालाच नेहमी भजतात ।।8।।
माझ्या ठिकानी मन आणि प्राणांना अर्पण करून, माझे भक्तजन, एक-दुसर्याला (परस्पर) माझे गुणतत्व सांगत आणि नाम, स्वरूपांचे आदिचे कीर्तन करत निरंतर संतृष्ट व आनंदाचा अनुभव घेतात।।91।
त्या नेहमी माझे ध्यान ,कीर्तनात वगैरेमध्ये (भक्तियोगात) मग्न झालेल्या भक्तांना मी बुद्धियोग प्रदान करतो ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात।1101।
हे अर्जुना ! त्यांच्यावर कृपा करण्यांसाठी त्यांच्या आत्म्यात (व बुध्दित) स्थित असलेला मी स्वत:च त्यांच्यात अज्ञानाने उत्पन्न झालेल्या संसाररूपी अंधकाराला प्रकाशमय तत्वज्ञानरूपी दिपका द्वारे नाहीसा करतो|।111।।
अर्जुन म्हणाला-
(हे केशवा!) आपनच परम ब्रह्म, परम धाम आणि परम पवित्र आहात. कारण आपल्याला सर्व क्रषिगण सनातन, दिव्य पुरूष।1121।
तसेच आपल्याला देवांचेही आदिदेव आणि सर्वव्यापी म्हणतात. देवर्षी नारद, असित, देवल व महर्षि व्यासही तसेच सांगतात आणि आपणही मला तेच सांगता।।131।
हे केशवा ! जे काही मला आपण सांगत आहात, ते सर्व मी सत्य मानतो, हे भगवान ! आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाणत ना देव।॥141।
हे भूतांना उत्पन्न करणारे ! हे भुतांचे ईश्वरा ! हे देवांचे देव ! हे जगाचे स्वामी ! हे पुरूषोत्तमा ! तुम्ही स्वत:च आपणच आपल्याला पूर्णपणे जाणत आहात।1151।
म्हणुन ज्या विभूतिंच्या योगाने आपण या सर्व जीवांना व्यापून राहिला आहात, आणि त्या आपले सर्व दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहे।1161।
हे योगेश्वरा ! मी कशा प्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे? आणि हे भगवान ! आपण कोण-कोणत्या भावात माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात? 111711
हे जनार्दना ! आपली योगशक््ती आणि विभूती मला पुन्हा विस्ताराने सांगा. कारण आपली अमृतमय वचने ऐकता माझी तृप्ती होत नाही ।।1181।
श्रीभगवान म्हणाले,
हे कुरूश्रेष्ठा ! आता मी ज्या माझ्या प्रमुख दिव्य विभूती आहेत , त्या मुख्य अशा तुला सांगेन. कारण माझ्या विस्तारांचा अन्त नाही।1191।
हे अर्जुना ! मी सर्व भुतांच्या हृदयात असलेल्या सर्वांचा आत्मा आहे .तसेच सर्व भुतांचे आदि, मध्य आणि अंतही मीच आहे।।201।
आदितीच्या बारा पुत्रापैकी विष्णु मी आणि ज्योतीमध्ये किरणांणी युक्त सूर्य मी आहे ,एकोण पन्नास वायुदेवतांचे तेज आणि नक्षत्रांचे अधिपती चंद्र मी आहे।1211।।
वेदांमध्ये सामवेद मी आहे ,देवांमध्ये इन्द्र, इन्द्रियांमध्ये मन आणि सर्व जीवांमध्ये चेतन(जीवन) शक्ति मी आहे।।1221।
अकरा रूद्रांमध्ये शंकर मी आहे ,यक्ष व राक्षसांमध्ये धनाचा स्वामी कुबेर,आठ वसूतील अग्नी आणि शिखरे असणारे पर्वतातील सुमेरू पर्वत मी आहे ।।231।
पुरोहितां मध्ये बृहस्पति मला समज, हे पार्थ ! सेनापति मधला स्कंद(कार्तिकेय) आणि सर्व जलाश्यांतील समुद्र मी आहे।।241।
मी महर्षिमध्ये भूगु आणि शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात ओंकार आहे .सर्व प्रकाराच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थिर वस्तूंतील हिमालय पर्वत मी आहे।।251।
सर्व वृक्षांत पिपळ, देवर्षीमध्ये नारद मुनी , गन्धर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धि मुनीमध्ये कपिल मुनी मी आहे।।26।।
घोड्यांनमध्ये अमृत-मंथना बरोबर उत्पन्न झालेला उच्वे:श्रवा नावाचा घोडा श्रेष्ठ हत्ती मध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांन मध्ये नरपति मला समज।1271।
मी शस्त्रांमध्ये वज्र ,गाई मध्ये कामधेनू. सर्पांमध्ये वासुकी आणि संतान-उत्पत्तिचे कारण असणारे काम मी आहे।1281।
मी नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपति वरूणदेव ,पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर आणि शासन करणारे मध्ये यमराज मी आहे।1291।
मी दैत्यांमध्ये प्हलाद ,वशीकारांमध्ये काल, पशुमध्ये मृगराज सिंह आणि पक्ष्यांमध्ये गरूड मी आहे।1301।
मी पवित्र करणारा वायू ,शस्त्र धारण करन्यात श्रीराम ,माशांत मगर आणि नद्यात श्रीभागीरथी गंगा आहे।।311।
हे अर्जुना ! सृष्टिचा आदि आणि अंत तसेच मध्य मी आहे ।विद्यांतीय आत्मविद्या (ज्ञान) आणि परस्पर तत्व निर्णयांमध्ये होणारा वाद मी आहे।।321।
मी अक्षरांतील अकार .संमासापैकी द्वन्द्ट समास आहे, मीच संहार करण्यातील महाकाल रूद्र आहे ,आणि सृष्ट प्राण्यांमध्ये चतुर्मख ब्रह्मा मी आहे।1331।
मी सर्वांचा आहारी जाणारा “मृत्यु" आहे ,सहा भाव विकारातून पहिला विकार “जन्म मी आहे तसेच स्त्रियांमध्ये कीर्ति, लक्ष्मी, वाणी ,स्मृति , मेधा , धृती आणि क्षमा मी आहे 113411
मी सामवेदात बृहत-साम(इन्द्रस्तुतिरूप), छंदांमध्ये गायत्री छंद, महिन्यांतील मार्गशीर्ष आणि (चार) क्रतुंतील वसंत(क्रतु) मी आहे।1351।
मी कपटी खेळांमध्ये जुगार आहे तेजस्वी पुरूषांचे तेच, विजयांतील जय आहे उघमी(व्यवसायी) पुरूषांचे उघम आणि बलवानी पुरूषांचे बल आहे।।36।।
मी वृष्णि(्यदु' कुळात वासुदेव ,पाण्डवांतील अर्जुन, मुनींमध्ये वेदव्यास आणि कविंमध्ये शुक्रचार्य कवि मी आहे।।1371।
दमन करण्याची शक्तिमध्ये दण्डशक््ति , विजय इच्छा ठेवणारे यांची नीती , गुप्त ठेवणारें मध्ये मौन (भाव) आणि ज्ञानवानांचे तत्वज्ञान मी आहे।।381।
हे परंतपा ! माझ्या दिव्य विभुतींचा अंत नाही , हा विस्तार तर तुझ्यासाठी संक्षेपमध्ये सांगितला ।।401।
जी जी (विभूतियुक्त) ऐश्वर्ययुकक्त, कान्तियुक््त आणि शक्तियुक्त वस्तु आहेत, ती ती समस्त वस्तु तू माझ्या तेजाच्या अंशाशी उत्पन्न समज।1411।
किवा हे अर्जुना ! हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे? मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तिच्या केवल एका अंशाने सर्व धारण करून राहिलो आहे 1421
मूळ दहाव्या अध्यायाची समाप्ती
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विभूतियोग नावाचा हा दहावा अध्याय समाप्त झाला. ॥ १० ॥
👇🏻
Maulimajhi-blogger
Post a Comment