श्रीमद्भागवत गीता | अध्याय ५ ( कर्मसंन्यास योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 5 ( Karmsannyas Yog ) maulimajhi-blogger
माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉 Download
माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join
श्रीमद्भागवत गीता | अध्याय ५ ( कर्मसंन्यास योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 5 ( Karmsannyas Yog ) maulimajhi-blogger
श्रीमद्भगवद्गीता : पाचवा अध्याय (कर्मसंन्यासयोग)
मूळ पाचव्या अध्यायाचा प्रारंभ
अथ पञ्चमोऽध्यायः
अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ ५-१ ॥
श्रीभगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ ५-२ ॥
ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति ।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥ ५-३ ॥
सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥ ५-४ ॥
यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ ५-५ ॥
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ॥ ५-६ ॥
योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ५-७ ॥
नैव किञ्चित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।
पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन् ॥ ५-८ ॥
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ५-९ ॥
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥ ५-१० ॥
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ ५-११ ॥
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥ ५-१२ ॥
सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ॥ ५-१३ ॥
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ ५-१४ ॥
नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ ५-१५ ॥
ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥ ५-१६ ॥
तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः ।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ ५-१७ ॥
विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ ५-१८ ॥
इहैव तैर्जितः सर्गो एषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिताः ॥ ५-१९ ॥
न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।
स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥ ५-२० ॥
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥ ५-२१ ॥
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ ५-२२ ॥
शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥ ५-२३ ॥
योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ ५-२४ ॥
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ ५-२५ ॥
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥ ५-२६ ॥
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥ ५-२७ ॥
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ ५-२८ ॥
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ ५-२९ ॥
मूळ पाचव्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥
गीता वाचताना प्ले करा
|| अध्याय पाचवा ||
अर्जुन म्हणाला,
हे कृष्णा ! तुम्ही कर्मसंन्यास आणि आता परत कर्मयोगाची प्रशंसा ही करत आहात ! तेव्हा या दोन्ही पैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते मला सांगा।।1।।
श्रीकृष्ण म्हणाले,
कर्मसंन्याय आणि कर्मयोग हे दोन्ही परम कल्याण करणारेच आहेत, पण त्या दोन्ही-मध्ये संन्यासाहूनि कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे ।।21।
हे अर्जुना ! जो पुरूष द्वेषरहित आणि अपेक्षारहित आहे, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा ,कारण तो राग-द्वेष इत्यादि सर्व द्वन्द्वांनी रहित असलेला पुरूष सुखाने या संसाररूपी बंधनातुन मुक्त होतो।।3।।
अज्ञ लोकच सांख्य आणि कर्मयोग वेग-वेगळे आहेत असे सांगतात ,पण्डित नव्हे. फक्त एकाचे उत्तम प्रकारे आश्रय घेतलेल्या पुरूषाला दोघांचे एकसारखे फलस्वरूप परमाम्म्येला प्राप्त करतो।।4।।
ज्ञानयोगाने जो परम धाम प्राप्त होतो, तोच कर्मयोगाने सुधा प्राप्त होतो. जो मनुष्य दोन्ही योगांची फल एकच आहे ,असे पाहतो तोच खरे अर्थाने पाहतो।151।
परन्तु हे अर्जुना ! निष्काम कर्मयोग सोडून संन्यास घेणे दुखकारक आहे, कारण निष्काम कर्म करणारे तत्काळ परब्रह्म परामात्म्याला प्राप्त होतात।।6।।
जो निष्काम कर्मयोगी आहे, व ज्यांचे मन, इंद्रिय संयमित आहे आणि सर्व जीवाच्या प्रति आत्मभूती आहे ,असा कर्मयोगी कर्म करून ही कर्मफलांपासून अलिप्त राहतो 11711
कर्मयोगी तत्ववृति ने पाहत असतात, ऐकत असतात, स्पर्श ,वास,भोजन, निद्रा, श्वास घेत असतात ।।8।।कथन, त्याग ,ग्रहण तसेच डोळयांची उघडझाप करीत असले तरी ते बुद्धिने निश्चय करून मानतात की सर्व इन्द्रिये आप-आपल्या विषयात वावरत आहे , पण मी काहीच करत नाही ।191।
जो पुरूष सर्व कर्मात आसक्ती सोडून सर्व कर्म मला (परमात्म्याला) अर्पण करतो, तोच पुरूष पाण्यातील कमलाप्रमाणे पापाने लिप्त होत नाही।।101।
कर्मयोगी ममत्वबुध्दी सोडून केवल इन्द्रिये, मन, बुध्दी आणि शरीरयांच्या द्वारा आसक्ती सोडून फक्त अंत: करणाच्या शुध्दीसाठी कर्म करतात।1111।
कर्मयोगी कर्मफलांचे आसक्तीचा त्याग करून निष्ठा व शांतिला(मोक्षाला) प्राप्त होतात आणि कामनांच्या प्रेरणेमुळे कर्मयोगी कर्मकलात आसक्त होऊन संसारूपी बंधनाला प्राप्त होतात।।121।।
जितेन्द्रिय (इंद्रिय संयमित) जीव मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करून स्वत: काही न करता व करविंता या नवं द्वार (नाक,कानादि) असलेल्या शरीरात सखपुर्वक (आनंदानी) अवस्थेत राहतो।1131।
परमेश्वर मनुष्याचे कर्तेपणा, कर्म आणि कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाही, तर त्याचा स्वभाव (प्रकृतिचे सत्व,रज ,तामस गुण) त्या जीवाला कर्मांमध्ये प्रवृत करतो (करायला लावतो) ।1141।
सर्वव्यापी परमेश्वर कोणाचेही पापकर्म किवा पुण्यकर्म स्वत:कडे घेत नाही .परन्तु अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे. त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होत आहे। 1151 ।
परन्तु ज्यांचे अज्ञान परमात्म ज्ञानाने नाहीसे झाले आहेत, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद परमात्म तत्वाला प्रकाशित करतो।॥161।
ज्यांचे मन, बुद्धि परमात्म्यात स्थित आहे व त्यांचे प्रति निष्ठावान, नित्य श्रवण कीर्तन करणारा आहे आणि ज्यांचे अविद्या(मोह) विद्या द्वारा नष्ट झाले आहेत, ते सर्व पुरूष पापरहित होऊन पुन: जन्मास येत नाहीत।।171।
जो ज्ञानी पुरूष विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण , गाय , हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वाना समदुष्टीनेच पाहतो।।18।।
त्याचेच मन समभाव तत्वात स्थिर झालेला आहे आणि त्यांनीच ह्याच जन्मी संपूर्ण संसार जिंकला आहे, कारण सच्विदानंद परमात्मा निर्दोष आणि समभावानी युक्त आहेत, म्हणून ते सदैव ब्रह्मामध्ये (परमात्म्यात अवस्थेत असतात ।1191।
जो पुरूष प्रिय वस्तु मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तु प्राप्त झाली असता उद्विग होत नाही , तो स्थिर बुद्धि असलेली संशयरहित ब्रह्मवेता पुरूष परब्रह्म परमाल्म्यात नित्य ऐक्यभावाने स्थित असतो।।1201।
व ज्यांचे अत:करणाला बाहेरील विषयाची आसक्ति नसते ,असा साधक आत्मामध्ये जो (सात्विक) सुख आहे, त्याला तो प्राप्त करतो. असे ब्रह्मयोग(परमात्मा ज्ञान) युक्त पुरूष नंतर अक्षय(अविनाशी) सुखाला (परमात्म) प्राप्त करतो।।21।।
जे इंद्रिया आणि विषययांच्या संयोगाने उत्तपन्न होणारे जे भोग आहेत, ते भोग सुखरूप असले तरी ते सर्व दुखांचे कारण, आदि-अंत होणारे व अनित्य आहेत. असे जाणून बुध्दिमान ज्ञानी पुरूष त्यात रमत नाहीत।।221।
जो साधक व मनुष्य शरीर नष्ट होणाच्या आगोदर काम आणि क्रोधामुळे उत्पन्न होणारे आवगतीला सहन करण्यास समर्थ होतो , तोच योगी व तोच सुखी होय ।।231।
जो पुरूष आल्म्यातच सुखी आहे, आत्मामध्येच राहणारा आहे आणि आत्मामध्येच दृष्टी टाकनारा आहे, असे योगीजन आपले मन ब्रम्हात (परमात्म्यात) स्थिर करून ब्रम्हानंद( परमात्म आनंद) प्राप्त करतो|।24।।
निष्पाप, निसंशय (संशय नसलेल्या), संयत चित्त असलेल्या आणि सर्वप्राणी मात्रांचे हित करणारे तत्पर क्रषिगण ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त करतात ।।251।
काम-क्रोध मावळेले ,मन जिंकलेले, परब्रह्म परमात्माचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरूष असतात, त्यांच्या सर्वबाजूला शान्त असा ब्रह्मानंद(परमानंद) उपस्थित होतो ।126।।
बाहेरच्या शब्द-स्पर्श विषयांना मनात बहिष्कार(विरोध) करून, दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातुन प्राण व अपान वायुला सम करून।1271।
इन्द्रिये, मन व बुद्धि ज्यांनी जिंकली आहेत ,असा मोक्ष परायण मुनी इच्छा ,भझय आणि क्रोध यांनी रहित झाला की , तो सर्वत्र मुक्त. असतो।।28।।
माझे सर्व भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोक्ता, सर्वलोकांचा महानियता (महेश्वर) सर्व प्राणीमांत्राचा सूहूद अर्थात स्वार्थरहित दयाळू आणि प्रेम ,असे तत्वत: जाणून ते परम शान्तीला (मोक्षाला) प्राप्त करतात।।291।
👇🏻
श्रीमद्भागवत गीता | अध्याय 6 ( आत्मसंयम योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 6 (Atmasanyam Yog ) maulimajhi-blogger
Maulimajhi-blogger
Post a Comment