श्रीमद्भागवत गीता | अध्याय ८ (अक्षरब्रह्म योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 8 (Aksharbramh Yog ) maulimajhi-blogger

shreyash feed ads 2

श्रीमद्भागवत गीता | अध्याय ८ (अक्षरब्रह्म योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 8 (Aksharbramh Yog ) maulimajhi-blogger

|| अक्षरब्रह्म योग ||

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 











श्रीमद्‌भगवद्‌गीता : आठवा अध्याय (अक्षरब्रह्मयोग)
मूळ आठव्या अध्यायाचा प्रारंभ
अथ अष्टमोऽध्यायः
अर्जुन उवाच : किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥ ८-१ ॥

अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥ ८-२ ॥

श्रीभगवानुवाच: अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः ॥ ८-३ ॥

अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम्‌ ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥ ८-४ ॥

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्‌ ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ ८-५ ॥

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्‌ ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ ८-६ ॥

तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्‌ ॥ ८-७ ॥

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्‌ ॥ ८-८ ॥

कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्यः ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात्‌ ॥ ८-९ ॥

प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक्‌ स तं परं पुरुषमुपैति दिव्यम्‌ ॥ ८-१० ॥

यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं सङ्ग्रहेण प्रवक्ष्ये ॥ ८-११ ॥

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम्‌ ॥ ८-१२ ॥

ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन्‌ ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्‌ ॥ ८-१३ ॥

अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ ८-१४ ॥

मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम्‌ ।
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥ ८-१५ ॥

आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ ८-१६ ॥

सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदुः ।
रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ ८-१७ ॥

अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसञ्ज्ञके ॥ ८-१८ ॥

भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ ८-१९ ॥

परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः ।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ ८-२० ॥

अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम्‌ ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ ८-२१ ॥

पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।
यस्यान्तः स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्‌ ॥ ८-२२ ॥

यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ ८-२३ ॥

अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्‌ ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥ ८-२४ ॥

धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्‌ ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ॥ ८-२५ ॥

शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ॥ ८-२६ ॥

नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥ ८-२७ ॥

वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्‌ ।
अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्‌ ॥ ८-२८ ॥

मूळ आठव्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥



गीता वाचताना प्ले करा



|| अध्याय आठवा ||


अर्जुन म्हणाला,

        हे पुरूषोत्तमा ! ब्रह्म काय आहे? अध्यात्म म्हणजे काय? अधिदैव काय आणि अधिभूत कसे आहे? कर्म काय आहे?।11।।


        हे मधुसूदना ! या शरीरामध्ये राहणारा अधियज्ञ कोण आहे? अंत व मृत्यु समयी संयमी पुरूष आपल्याला कुठल्या योगा द्वारा जाणतो?।।21।


श्रीभगवान म्हणाले-


        परम नित्य अक्षरच “ब्रह्म” (ऊँ) आहे ,आणि शुध्दतत्व जीवात्मा याला “अध्यात्म” म्हटला जातो, तसेच भूतांचे उत्पत्ति , वृध्दि करणारा जो विसर्ग(सृष्टिव्यापार आहे , तो “कर्म” या नावाने संबोधला जातो| ।31।


        सर्व नाशीवंत पदार्थ “अधिभूत” आहेत, विराट पुरूष “अधिदैव” म्हणजे देवतांचे अधिपति आहे आणि हे अर्जुना ! मी या शरीरात अंतर्यामी (परमात्मा) म्हणजे “अधियज्ञ” ( सर्व यज्ञ क्रियांना करणारा या) रूपाने अधिष्ठित आहे।।4।।


        जो पुरूष अंतकाळी माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो ,यात मुळीच शंका नाही।151।


        हे कौन्तेय ! जो मृत्युच्या वेळी कोणत्या(आवडत्या) भावाचे तो स्मरण करतो. सर्वादा त्याच भावेचे स्मरण करीत असल्याने तो भाव (व देह) त्याला न चुकता प्राप्त होते।|6।।


        म्हणुन हे अर्जुना ! तू सर्वकाळी निरंतर माझेच स्मरण कर आणि युद्ध ही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुध्दि अर्पण केल्यामुळे तू नि:संशय मलाच येवून मिळशील 1171]


        हे पार्थ ! असा नियम आहे की ,परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त, दुसरीकडे न जाणारा चित्त निरंतर दिव्य परम पुरूषांचे चिंतन करीत करीत त्यांनाच (परमेश्वराला) प्राप्त होतात ।।8।।


        जो सर्वज्ञ ,सनातन ,अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्माहून अति सूक्ष्म, सर्वाचे धारण - पोषण करणारा, सूर्याप्रमाणे प्रकाशित आणि प्रकृति पासून वेगळे त्या पुरूषाचे निश्चल अशा सच्विदानंद परमेश्वराचे स्मरण करीत|।91।


        एकाग्रचित आणि भक्तियुक्‍त पुरूष आपल्या योगबलाने दोन्ही भुवयांच्या मध्य भागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने मृत्युकाळी त्या पुरूषाला स्मरण करील तो दिव्य परम पुरूषाला (परमात्म्याला) प्राप्त करतो।।1101।


        वेदांचे ज्ञानी ज्याला अविनाशी म्हण्तात, वासनारहित संन्यासी ज्यात प्रवेश करतात आणि ज्याला प्राप्त करण्यासाठी ब्रह्मचारी लोक ब्रह्मचर्य रूपी कठोर व्रताचा पालन करतात ,त्या प्राप्य वस्तुबदल थोडक्यात तुला मी सांगतो।।11|।


        सर्व इन्द्रियांची प्रवेश द्वारे बंद करून, हृदयांत मन एकाग्र करून, प्राणवायुला भ्रुमध्ये (दोन्ही भुवांचे मध्ये) स्थापन करून|।121।


        आम्म्यात मन स्थिर झाल्यानंतर ,परम पवित्र अशा ओम (ऊँ) या शब्दचा उच्चार करत आणि भगवतांचे ध्यान करत करत आपले शरीर सोडले की तो निश्चितपणे परम गतीला (अक्षर धामाला) प्राप्त करतो।॥131।


        हे पथापुत्रा ! जे योगी अन्य भावना(कामना) शुन्य होऊण दररोज, निरंतर माझे स्मरण करतो ,असे नित्ययुक्‍्त योगीला मी सहजच प्राप्त होतो।।141।


        असे महात्मे एकदा मला प्राप्त केरल्यावर पुन: दु:खांचे आगर असलेल्या क्षणभंगुर आणि अनित्य जन्म घेत नाही, कारण ते परम सिध्दिला प्राप्त झालेत।||151।


        ब्रहालोक (उच्चतम लोक) पासून तो सर्वात खालच्या लोकापर्यंत(पाताळ लोक) जेवढे लोक आहेत त्यात जन्म व मृत्यु (दुख) होतो. परन्तु (जीव) एकदा मला प्राप्त झाले की तो पुन: जन्म घेत नाही।1161।


        मनुष्य लोकांतील हिशोबा प्रमाणें, एक हजार युगे, म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, आणि ब्रह्मदेवाचे एका रात्रीचा सुधा हेच काल आहे।1171।


        जेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस प्रकट होतो तेव्हा हे सर्व जीवसमुदाय व्यक्‍्त(उत्पन्न) होतात आणि ब्रह्मदेवाची रात्र आली की त्या सर्व अवयक्त(नष्ट) होतात ।।18।।


        हे प्रथापुत्रा ! वारंवार दिवस होतो आणि हा जीव समुदाय कार्याला लागतो आणि पुन्हा रात्र होते आणि मग हे सर्व जीव नि:सहाय होऊन नाश पावतात।।19|।


        परंतु दुसरी एक सनातन अशी प्रकृति आहे जी या व्यक्‍त आणि अव्यक्त पदार्थांच्या पलीकडची आहे, ती श्रेष्ठ आहे आणि कधीहि नष्ट होत नाही।।201।


        त्या परम धामाला अव्यक्त ,अविनाशी आणि परम गती श्रेष्ट प्रवास) म्हटले आहे. (जीवात्मा) जेव्हा तेथे जाऊन पोहोचतो तेव्हा तो कधीहि परत येत नाही . असे माझे परम (कृष्ण) धाम आहे| ।1211।


        हे पार्थ ! ज्या परमात्माच्या ठिकाणी सर्व भूते (जीव) राहतात आणि ज्या सच्चिदानंद परमाम्माने हे सर्व जग व्यापले आहेत ,तो सनातन अव्यक्त परम अनन्य भक्तिनेच प्राप्त होणारा आहे ।।22।।


        हे अर्जुना ! ज्या काळी(मार्गात) देह त्यागले की योगी संसारात पुन जन्म व परम गतीला (मोक्षाला) प्राप्त करतो, ते काळ अर्थात असे ते दोन मार्ग मी(तुला) सांगेतो।।23।1।


        ज्या मार्गात अग्नि, ज्योति, शुभदिवस, शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाच्या सहा महिनायांची अभिमानी देवाता आहेत त्या मार्गात मेल्यावर(व देह त्यागल्यावरोतो ब्रह्मज्ञानी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात | ।24।।


        ज्या मार्गात धूम , रात्री कृष्ण पक्ष आणि दक्षिणायणच्या सहा महिनायांची देवतांचे मार्गात मेल्यावर कर्मयोगीगण चंद्रज्योतिस्वरूप स्वर्ग प्राप्त करून आपल्या शुभ कर्मांचे फल भोगुन परत येतो( मृत्यु लोकात पतित होतो)।।25।1।


        कृष्ण आणि शुक्ल असे जगाचे असे दोन सनातन मार्ग स्वीकारलेत , एकेणी मोक्ष प्राप्त होतो तर दुसरे मार्गात मेल्यावर संसारात पुन: जन्म व दु:ख होतो।।261।


        हे पार्थ ! या दोन्ही मार्गांचे तत्व जाणून कोणीहि योगी मोह पावत नाही .म्हणुन हे अर्जुना , तू सर्वदा समतत्वयुक्‍त (कर्म) योग परायण हो।1271।


        (भक्ति) योगी पुरूष या रहस्याला तत्वत: जाणुन , वेदांचे , पठण , यज्ञ, तप, दान , इत्यादि कर्मांचे शास्त्रात चे पूण्यफल सांगितले आहेत , त्या सर्वानला तो नि:संशय ओलांडून (सोडून) जातो आणि सनातन परम अप्राकृत नित्य अशा स्थानाला(कृष्ण धामाला तो) प्राप्त करतो ।॥28।।

👇🏻

श्रीमद्‌भगवद्‌गीता : नववा अध्याय 9 (राजविद्याराजगुह्ययोग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 9 (Rajvidyarajgrahya Yog ) maulimajhi-blogger

Maulimajhi-blogger


धन्यवाद !





Copyright by :DeviAnaghaBraja Beats

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.