श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अलौकिक चरित्र ( भाग - 1 ) | Shree Dyaneshwarmaharajanche Alaukik Charitra ( part -1 ) in marathi
॥ श्रीपांडुरंग प्रसन्न ॥
माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉 Download
माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join
Sant Dnyaneshwar full story in marathi
श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अलौकिक चरित्र | Shree Dyaneshwarmaharajanche Alaukik Charitra in marathi
Sant dnyaneshwar full imformation in marathi
Part - 1
श्रीज्ञानेधरमहाराजांचे अलौकिक चरित्र
भगवंत म्हणतात -
तेणेंसी आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र ।
परि तयाचें चरित्र । ऐकती जे॥ ज्ञा. १२.२२६ ॥
तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें ।
जे भक्तचरित्रातें । प्रशंसती ॥ ज्ञा. १२.२२७॥
पूर्ववृत्तांत -
श्री महाविष्णु भगवंताच्या चरणांपासून निघून भगवान् श्रीशंकरांच्या जटेंत प्रकटलेली ती गौतमक्रषींच्या प्रार्थनेवरून नाशिकजवळच्या त्र्यंबकेधरक्षेत्राच्या लगतच्या ब्रह्मगिरीवरून वाहात आलेली गंगा तीच महानदी गोदावरी होय. तिच्या काठी दक्षिणेकडील काशीक्षेत्र समजलेले असें फार पुरातनचे वसलेले एक महान् क्षेत्र, त्याचें नांव पैठण. इथून जवळच अदमासें चार कोसांवर, ज्याला पूर्वी आपपस्तंब क्षेत्र म्हणत तेंच आपेगांव.
हेंही गोदावरी या महानदी तीर्थावर्चे, म्हणून क्षेत्रांत गणले जाते. याच आपेगांवांत वत्सगोत्री माध्यंदिन शाखेचे यजुर्वेदी ब्राह्मणाचे बऱ्याच प्राचीन कालचें कुलकर्णवृत्तीचें एक घराणें. या घराण्यांत हरिपंतांचे पणतु त्र्यंबकपंत नांवाचे मोठे कुलदीपक गृहस्थ जन्माला आले. . हेच आमच्या चरित्रनायकाचे म्हणजे श्रीज्ञानेथर महाराजांचे पणजोबा. ते पुढें लवकरच वेद शास्त्रसंपन्न झाले.
आपल्या कुलकर्ण-पणाच्या कामांतही त्र्यंबकपंत हे अतिशय दक्ष असत. तसेच त्यांचा ते फार शूर व पराक्रमी असल्याचा लौकिक तेथल्या सर्व पंचक्रोशींत सर्वत्र विश्रुत होता. याच वेळी भगवान् श्रीकृष्णाच्या वंश जातल्या यादव घराण्यांतला जयत्रपाळ नांवाचा अकराव्या शतकांतल्या मध्यात मोठा धार्मिक, प्रजा पालनदक्ष राजा राज्य करीत होता.
त्याच्या कानापर्यंत त्र्यंबकपंतांच्या शूर व पराक्रमी स्वभावाची व लौकिकाची हकीकत गेलेली होती. म्हणून राजाने त्र्यंबकपंतांना दरबारी बोलावून घेऊन त्यांचेवर बीडप्रांताचा सर्व अधिकार पांच वर्षांच्या मदतीचा सोंपवला, व त्याबद्दल त्र्यंबपंतांनी एकदम एकाच वेळी दहा हजार मुद्रा 'कर' म्हणून दरबारच्या खजिन्यात भरावयाच्या होत्या. त्या त्यांनी भरल्यावर त्यांना राजाकडून अधिकार वस्त्रे पण लगेच देण्यात आली. पुढे पांच वर्षेपर्यंत त्यांनी विशेष दक्षतेने बीड राज्याचा कारभार चालवून सर्व प्रजाजनांचा मोठ्या जिव्हाळ्याचा व आदराचा लौकिक संपादून त्यांतून ते निवृत्त होऊन आपेगांवी येऊन राहिलें.
त्र्यंबकपंतांना गोविंदपंत व हरिपंत असे दोन मुलगे. त्यांपैकी धाकटे हरिपंत. हे सिंधणराजाचे सेनापति असून ते एका लढाईच्या हात-घाईच्या प्रसंगांत कामी आले. त्र्यंबकपंतांच्या उतारवयांतल्या मानसिक स्थितीवर त्याचा फार परिणाम झाला.
त्यांनी सर्व कारभार आतां त्यांचे थोरले चिरंजीव गोविंदपंतांच्यावर सोंपबला आणि आपण स्वतः श्रीगोरखनाथांच्या योगवैभवांतल्या सहवासात तसेच गुरुपरंपरेतल्या श्रीकृष्णाच्या उपासनेंतल्या आध्यात्मिक श्रवण मनन निदिध्यासनपूर्वक आत्मचिंतनांत सदैव घालवू लागल्याने पुढें पुढें ते अगदी स्थित प्रज्ञाच्या त्या उन्मनींतल्या अंतरंगात निमग्न असत. तें इतके कीं याच परिणती अवस्थेत ते नंतर एका मोठ्या तुळशीवृंदावनांतल्या सारख्या जागेंत जिवंत समाधीत कायमचेच बसले. यांत त्यांच्या कंबरेपासूनचा वरचा भाग पिंडीसारखा व खालचा शाळुंका होऊन शिवलिंग बनत असलेला या तुळशीवृंदावनाच्या जीर्णोद्धारकालीं प्रत्यक्ष पाहिल्याचा अलिकडचा दाखला आहे.
त्र्यंबकपंतांच्या मागे त्यांचे चिरंजीव गोविंदपंत हे महान् भगवदुभक्त असून घरचे कुलकर्णपणही पहात असत. त्यांची भार्या नीरूबाई (नीरादेवी) ह्याही मोठ्या साध्वी होत्या. असें हें एक सात्त्विक जोडपें होते. श्रीगोरखनाथांचे परमशिष्य श्रीगहिनीनाथ हें एकदा फिरत फिरत आपेगांवी आले. त्या वेळी त्यांनी गोविंदपंतांचा अधिकार पाहून त्यांना सोहंस्वरूपाची ओळख करून देऊन नाथपंथांतली श्रीकृष्णाची उपासना सांगून त्यांना कृतार्थ केले होते.
तथापि त्यांना संतान नसल्यामुळे तीं उभयतां अगदी उदासीन असत. त्यासाठी त्यांना गहिनीनाथांनी सांगितल्यावरून त्यांनी गायत्री पुरध्षरण केलें आणि गायत्रीपुरश्वरणाच्या योगानें, गायत्रीदेवीच्या प्रसन्नतेमुळें गोविंदपंतांना नंतर पुत्रसंतान लाभले. त्याचे नांव विठ्ठलठेवण्यांत आले. ज्योतिष्यांनी त्या वेळी भविष्यही वर्तविले होते कीं हा मुलगा मोठा तपस्वी व विरक्त राहील व याच्या वंशांत हरिहर, विधि अवतरतील. गायत्रीदेवीच्या प्रसादाचा प्रभाव असा कीं, लहानपणापासूनच या मुलाचें खाण्यापिण्याकडे किंवा खेळण्याकडे लक्ष नसून अखंड हरिभजनाकडेच लागलेले दिसून येई.
सातव्या वर्षी विठ्ठलाची मुंज झाली. नंतर पैठणास मातुलगृही त्याची अध्ययनास सुरुवात झाली. एक वेळ दिलेला पाठ लगेच त्याने मुखोद्गत म्हणून दाखवावा. विठ्ठलाची अशी उपजत ग्रहणशक्ति व तीव्रबुद्धि पाहून पैठणचे शास्त्रीपंडितही चकित होत. लवकरच ते वेदसंहिता षडंगपरायण होऊन न्याय, वेदांत, योग, सांख्य, मिमांसादि शास्त्रांत तसेच भारत, भागवत, योगविसिष्ठ व शारीरभाष्यांत पारंगत झालेले आणि अनेक गायत्री पुरश्वरणांच्यामुळें तेजःपुंज तपोनिष्ठ बनलेले परमविरक्त आत्मनिष्ठ असले विठ्ठलपंत आतां आपल्या घरी पैठणाहून आपेगांवी आले. गायत्री पुरश्वरणानंतर ब्रह्मचाऱ्यास तीर्थाटन अवश्य असल्याचें त्यांचे ध्यानी येतांच लगेच त्यांचा तीर्थयात्रेस निघण्याचा बेत झाला.
वृद्ध आईवडिलांची परवानगी, तीही मोठ्या कष्टाने मिळवून ते लवकरच बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या मातुश्री उद्गारल्या, "बाळ, आम्ही दोघेही आतां वृद्ध झालो आहोत, हें लक्षांत घेऊन लवकरच तूं आपली तीर्थयात्रा संपवून परतावें. वाटेंत तुला क्षुधा, तृषा, ऊन, वारा, पाऊस इत्यादि सर्व सोसावें लागेल, तरी नीट जपून असावे. संध्याकाळ होतांच पुढें प्रवास न करतां तिथेच थांबून दुसऱ्या दिवशी सकाळीं पुढें जाण्याचे करावे, असो. आमची आठवण तुला असूं दे" असे म्हणून आईने पंतांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांस कुरवाळले व गहिंवरून त्यांना यात्रेस जाण्याचा निरोप मोठ्या कष्टाने, पण दिला.
मग मातापित्यांना वंदन करून पंत यात्रेस निघाले. पावलोंपावलीं श्रीहरीचे ध्यानपूर्वक मुखीं नामस्मरण करीत करीत मार्ग क्रमून ते लवकरच द्वारकेस पोंचले. येथें भगवंत द्रार्काधीशाची आनंदमय मूर्ति दृष्टीस पडतांच प्रेमाश्रूंनी त्यांचा कंठ दाटून आला. सर्वांगावर हर्षभरित रोमांच उभे असलेल्या स्थितींतच ते कांही काळ तसेच आनंदभरित अगदीं स्तब्ध अवस्थेंत होते.
द्वारकेस तीन रात्र राहून नंतर पिंडारक, सुदामपुरी, प्रभासतीर्थ, सोरटीसोमनाथ करून सप्तशृंगीच्या भगवती देवीचे दर्शन घेऊन नाशिक पंचवटींतल्या रामरायाची भेट होऊन पुढें त्र्यंबकेश्वरी कुशावर्तांत स्नान करून ब्रह्मगिरीस उजवी घालून तो ओलांडून ते भीमाशंकरावरून पंढरीस जाण्याच्या वाटेवरील आळंदीस येऊन थांबले. तिर्थे आल्यावर भगवान् श्रीशंकराच्या प्रसन्नतेने इंद्रास वर मिळून झालेले तीर्थ इंद्रायणी ही प्रतिगंगाच असल्यानें इर्थे स्नान करणाराचें शरीर निर्मळ होऊन मनाला प्रसन्नता प्राप्त होते असे पुराणांतरी वाचल्याचे त्यांना स्मरले.
आळंदीतले ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिद्धेध्वरमंदिरांतील सुवर्ण पिंपळालगतच्या एका ओंवरींत पंतांचा आतां मुक्काम झाला होता. दुसऱ्या दिवशी ते तेथून तीर्थस्नानादि उरकून पुढें पंढरीकडे निघणार होते. आळंदीस सिद्धे.धवर ऊर्फ सिद्धोपंत नांवाचे चोवीस गांवचे वतनदार, मोठे संपन्न, सदाचारी, सत्पुरुषवृत्तीचे व परंपरागतचे कुळकर्णपण असलेले सट्ग्रहस्थ. त्यांची साध्वी भार्या उमाबाई. यांची एकुलती एक जिवलग सद्गुणी मुलगी रुक्मिणी.
आपले नित्याचे ब्रह्मकर्म उरकल्यावर भोजनापूर्वी सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन झाल्यावर तिथे कुणी एखादा पांथस्थ आला असल्यास त्याची विचारपूस करण्याचा सिद्धोपंतांचा नित्याचा क्रम असे. आज ते नित्याप्रमाणे मंदिरांत गेले असतां त्यांना कुणीतरी तेज:पुंज तपोनिष्ठ ब्रह्मचारी यात्रेकरी ध्यानस्थ असल्याचे आढळून आल्यावर ते तिथें कांही वेळ थांबले.
नंतर विचारपूस होऊन त्यांची खात्री झाल्यानें त्या यात्रेकरूस त्यांनी जेवायचा बराच आग्रह करून आपल्या घरीं घेऊन गेले. जेवणाच्या वेळी विठ्ठलपंतांची ती अंतरंगी ध्यानस्थ वृत्ति पाहून व जेवणाखाण्याकडे त्यांचे विशेष लक्ष नसल्याचे दिसून येतांच हा मोठा शांत, गंभीर, सात्त्विक स्वभावाचा पण अत्यंत विरक्त पुरुष असावा असे सिद्धोपंतांचे ध्यानांत आले. आपली रुक्मिणी पण आतां अगदीं उपवर झाली असून तिला आज कित्यके दिवस योग्य वर शोधण्याचे आपलें चाललें आहेच.
तरी हा वर तिला योग्य होईल आणि अनायार्सेच योगही पण जुळून आल्यासारखे दिसत आहे. तरी ईश्वरी इच्छा काय असेल तसें घडून येईल, असो. जेवणानंतर विठ्ठलपंतांना त्यांच्या तीर्थयात्रेच्या प्रवासाची हकीकत सिद्धोपंतांनी विचारतांच ते उद्गारले, "पैठणजवळच्या आपेगांवचे आम्ही कुलकर्णी. आमचे गोत्र वत्स. आम्ही यजुर्वेदी माध्यंदिन शाखीय ब्राह्मण. मार्झे नांव विठ्ठल. घरीं वृद्ध आईवडील. वडिलांचे नांव गोविंतपंत व आईचें नांव नीराबाई. पैठणास माझें षडंगशाखाध्ययन व षट्शास्त्रांचेही अध्ययन झाले आहे.
गायत्री पुरश्वरणानंतर ब्रह्मचाऱ्यास तीर्थयात्रा अवश्य असल्यानें त्याप्रमाणे यात्रेस निघालो असून येथून पुढें पंढरीस जाऊन रामेश्वरची यात्रा पुरी करून घरीं परतणार आहे". ही हकीकत ऐकून सिद्धोपंतांच्या मनाचा हा वर आपल्या रुक्मिणीला योग्य असल्याचा निश्चय झाला व याला त्यांच्या भार्येची व घरांतील व गांबांतील इतर मंडळीचीही संमति मिळाली. तथापि वराच्या बाजूनें इथें दुसरें कुणी त्याचे आप्त नाहींत व त्याचे आईवडील तर फारच दूरच्या .........................................
Maulimajhi-blogger
Post a Comment