श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अलौकिक चरित्र ( भाग - 2 ) | Shree Dyaneshwarmaharajanche Alaukik Charitra ( part -2 ) in marathi
॥ श्रीपांडुरंग प्रसन्न ॥
माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉 Download
माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join
Sant Dnyaneshwar full story in marathi
श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अलौकिक चरित्र | Shree Dyaneshwarmaharajanche Alaukik Charitra in marathi
Sant dnyaneshwar full imformation in marathi
Part - 2
|| श्रीज्ञानेधरमहाराजांचे अलौकिक चरित्र ||
अंतरावरचे. आणि लग्नाच्या तिथि तर संपत आल्या असून एकच व तीही शेवटचीच. अशा विशेष चिंतेंत ते असतांनाच त्याच रात्रीं त्यांना श्रीपंढरीरायाचा दृष्टांत झाला "हा वर तूं निश्चित करून यालाच आपली मुलगी द्यावी. हिच्या पोटीं हरि-हर-ब्रह्माचे अवतार जन्मास येणार आहेत." हा स्वप्नदृष्टांत सिद्धोपंतांनी दुसऱ्या दिवशीं उजाडतांच घरांतील सर्वांस तसाच तो विठ्ठलपंतांनाही सांगितला.
त्यावर विठ्ठलपंत बोलले कीं मला तसा कांही दृष्टांत झाला नही. तथापि आमची यात्रा संपून झाल्यावर मग याचा विचार करतां येईल. पण दैवी घटना कांही निराळी असल्यानें विठ्ठलपंतांनाही त्या रात्री तुळशीवृंदावनाशी ते निजले असतांना श्रीपांडुरंगाचा दृष्टांत झाला कीं, "तूं सिद्धोपंतांच्या मुलीचें पाणिग्रहण करून मग यात्रेस जावें. हिच्या पोटीं हरिहरब्रह्मा अवतार घेऊन धर्मरक्षणाकरितां येणार आहेत. " हा आपला दृष्टांत विठ्ठलपंतांनी दुसऱ्या दिवशी सकाळीं उठतांक्षणींच सर्वांना सांगून टाकला.
त्यामुळें पुढें लगेच सिद्धोपंतांनी वधूवरपक्षाची दोन्हीकडील तयारी आपणच करून लग्नसमारंभाचा सोहळा अतिशय उत्साहपूर्वक चार दिवसपर्यंत मोठ्या थाटाचा केला.
याप्रमाणे विधिपूर्वक वेदीवर सप्तपदी होऊन वरानें पाणिग्रहण करून होतांच सिद्धोपंतांना धन्यता वाटली व ही सर्व कांही पंढरीरायाचीच घटना होय असे त्यांचे उद्गार निघतांच त्यांचे डोळे त्यामुळें आनंदाश्रूंनी भरून गेलेले सर्वांस दिसत होते. नंतर वैदिक, शास्त्री, आप्तइष्ट, स्नेहीजन व आश्रित लोक या सर्वांना यथाधिकार देकार देऊन सिद्धोपंतांनी त्याचा आदरपूर्वक सन्मान केला.
पुढें लगेच आषाढी एकादशी निमित्त पंढरीस जाण्याची व नवीन लग्नकार्य घरांत झाल्यास जोडपे श्रीपांडुरंग दर्शनास नेण्याची परंपरागत चाल सिद्धोपंतांच्या घराण्यांत असल्याची, जामात विठ्ठलपंत यांचे कानावर त्यांनी घालतांच ते ही निघण्यास फार उत्सुक दिसले.
त्याप्रमाणे सर्व मंडळीसह ठिकठिकाणी मुक्काम करीत करीत सिद्धोपंत पंढरीस येतांच राउळांत पंढरीनाथ चरणीं कन्या जामाताची बडव्यांच्याकरवी भेट करविली. पुढें काल्यापर्यंत पंढरीस राहून सर्व सोहळा पाहून कन्या, भार्या व आश्रितजन या सर्वांसह ते आळंदीस येण्यास परतले. आणि विठ्ठलपंत आपल्या पूर्वीच्या संकेताप्रमाणे रामेश्वर यात्रेस सर्वांच्या संमतीने निघाले.
शिवकांची, विष्णुकांची, गिरीचा बालाजी, सेतुरामेश्वर करून गोकर्ण महाबळेश्वरावरून परतून कोल्हापुरी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन माहुलीच्या संगमतीर्थीं स्नान करून आळंदीस येऊन पोंचले. ते येतांच त्यांचा सिद्धोपंतांनी मोठा सत्कार करून त्यांना राहवून घेतलें.
तथापि मातापितरांच्या दर्शनास जाण्याची विठ्ठलपंतांनी आपली बरीच निकड दर्शवितांच सिद्धोपंतांनीही त्यांना प्रोत्साहन देऊन आपण सर्वच आपेगांवी जाऊं असें जावयास सांगितलें. आणि नंतर ती सर्व मंडळी आपेगांवास येऊन दाखल झाली. मग सिद्धोपंतांनी दृष्टांतापासूनची तें लग्नमुहुर्त अखेरचा अगदीं घाईचा तो साधण्यापर्यंतची सर्व हकीकत गोविंदपंतांना निवेदन आपली चूक झाल्याचें त्यांना मोठ्या आर्जवाने गहिंवरून सांगितलें व व्याही-विहिणींची क्षमा मागितली. सुनेला पाहून गोविंदपंतांना समाधान वाटले, आणि आक्ासून म्हणाले, " अहो तुमचे तसें आमचेंही पण तें लेंकरूंच कीं ! तरी आपल्या कन्येची आपण कांहीही काळजी करूं नका व झाल्या गोष्टी सर्व विसरून जा.
जें कांही होत असते ते परमेश्वरी योजनेनेंच होत असतें. आपण मात्र निमित्त होत असतो, असो. " यानंतर सिद्धोपंतांनी व्याहीविहिणींचा व त्यांच्या आप्त-इष्टांचा देकारपूर्वक सन्मान करून चार दिवस राहून ते आपेगांबी परतले आणि सर्व कांही यथास्थित झाल्याचें समाधान वाटून ते निश्चिंत झाले होते.
विठ्ठलपंतांना आपेगांवी लोटून कांही दिवस झाले आणि सृष्टीक्रमानुसार त्यांची वृद्ध माता व पिता दोन्ही दिवंगत झालीं. आतां प्रपंचाचा भार त्यांच्या शिरावर पडला होता खरा. तथापि त्यांच्या ध्यानींमनीं सदासर्वदा श्रीपंढरीनाथाचें चिंतन असल्याने व स्वभावतःच ते अगदीं विरक्त म्हणून त्यांचे लक्ष प्रपंचाकडे नसेंच. याचा परिणाम रुक्मिणींच्या मनावर फारच होऊन त्या अहोरात्र सचिंत असत. हें वर्तमान आळंदीस सिद्धोपंतांस कळतांच ते आपेगांबी येऊन जावयाची वृत्ति पाहून त्यांच्यासह कन्येला घेऊन आळंदीला आले. "आणि सर्व कांही श्रीपंढरीरायाच्या प्रेरणेनेंच होत असते, तरी त्याच्यावर विसंबून राहावें." असे सिद्धोपंतांनी सांगून रुक्मिणीचे समाधान केले. "प्रभु सर्व ठीक करील. तरी तूं कांही चिंता करूं नकोस." असे ते उद्गारले.
विठ्ठलपंतांचा आतांचा आळंदीस आल्यानंतरचा दररोजचा कार्यक्रम म्हणजे सकाळी प्रातःस्नानानंतर गायत्रीचा एक हजार जप, सूर्यनमस्कार, गीतापठण, भागवत, भारत, योगवसिष्ठ यांचे वाचन आणि "श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे " हे अहोरात्र मुखांत चाललेलेंच. ते दरसालच्या आषाढी कार्तिकेच्या पंढरीच्या यात्रेस जात. असा हा क्रम त्यांचा पुष्कळ वर्षे चालतच होता. पण आतां उतार वय होत चालल्याने संततीचा योग नाही असा निश्चय होऊन वाटूं लागलें कीं संन्यास घ्यावा, हे बरें. पण याला स्त्रीची संमति असावी लागते. म्हणून त्यांनी ही गोष्ट रुक्मिणींच्याजबळ एकदां काढून पाहिलेंही.
"पुत्रसंतानावांचून पितृक्रण फिटत नसते, यामुळें संन्यास घेतां येत नाही," असे रुक्मिणींनी निक्षून सांगितले. कांही दिवस थांबून नंतर विठ्ठलपंतांनी मधून मधून पण एकसारखा संन्यास घेण्याच्या परवानगीचा लकडा रुक्मिणींच्या पाठीमागें सुरूच ठेवला. तो इतका कीं एके दिवशी त्या अत्यंत घाईच्या कामांत असतांना विठ्ठलपंत म्हणाले कीं, "गंगास्नान करून येतो बरं कां !" " या, हं " असे त्या सहज नकळत बोलून गेल्या मात्र, की विठ्ठलपंतांनी दरकूच करीत करीत थेट काशीच्या श्रीपाद रामानंदस्वामींचा मठ गाठला.
तिर्थे लग्न न झाल्याचा बहाण करून विठ्ठलपंतांनी थोड्याच दिवसांत श्रीपादस्वामींची मर्जी संपादून संन्यास ग्रहण करून चैतन्य नांव धारण केलेले ते स्वामी होऊन बसले. आळंदीस रुक्मिणीबाई पतीची वाट पाहून पाहून दमल्या. आणि शेवटीं निरूपाय होऊन त्यांनी सिद्धेश्वर मंदिरांतील सुवर्ण अश्वत्थनारायणाची सेवा दररोज सकाळपासून तें दुपारच्या बारावाजेपर्यंत प्रदक्षिणा घालण्याची सुरुवात केली. एके दिवशी त्यांच्या कानावर विठ्ठलपंत काशीस असून संन्यास ग्रहण करून आहेत असें आलें व आपल्या नशिबीं पतिसुख नाहीं याचा त्यांना राहून राहून खेद वाटे.
ही बातमी लगेच त्यांनी वडीलांच्या कानांवर घातली. त्यामुळें त्यांनाही फार दु:ख होऊन पश्चात्ताप वाटूं लागला. तथापि रुक्मिणींनी दृढनिश्चयानें अधत्थसेवा चालविलीच होती. त्या अश्वत्थ नारायणास दररोज नाक घासून विनवीत कीं, "नारायणा, त्यांच्या ठिकाणचें तें तीव्र वैराग्य पार लोपून जाऊन त्यांनी पुन्हां संसाराकडे वळावे " हीच या अनाथ दासीची तुला हात होडून प्रार्थना आहे. साध्वी पतित्रतेच्या या प्रार्थनेचा परिणाम पण अखेरीस झालाच.
काशीस श्रीपादस्वामींच्या मनांत एकाएकीं आलें कीं आपण रामेश्वर यात्रेस निघावें व त्याप्रमाणे मठाची सर्व व्यवस्था, त्यांची मर्जी संपादून विश्वासास पात्र झालेल्या चैतन्यावर सोपवून ते लगेंच शिष्यमंडळीसह संचारार्थ बाहेर पडून दर मुक्काम करीत करीत वाटेवरील आळंदीस अवचित सहजच येऊन पोंचले. इथें ते एका प्रसिद्ध मारुतीच्या मंदिरांत उतरले होते व याच मारुतीला रुक्मिणींचा दररोज दर्शनास जाण्याचा नियम म्हणून त्या आजही आल्या.
त्या वेळीं त्यांना कुणी एक स्वामी दिसले म्हणून त्या स्वामींना वंदन करीत असतांच "पुत्रवती भव" म्हणून स्वामीमहाराज उद्गारले. तेव्हां रुक्मिणी ह्या आश्चर्यचकित होऊन संकोचल्यासारख्या दिसल्या. तेव्हां स्वामींनी कारण विचारतांच त्या उद्गारल्या, "आज बारा वर्षे झाली पतिदेवाचा पत्ता नाही. तथापि ते काशीस श्रीपादस्वामींच्या कडून संन्यास घेऊन असल्याचे नुकतेच ऐकले. " तात्काळ स्वामींच्याही लक्षात येऊन चुकलेंच कीं, "चैतन्य म्हणून जो तोच हा." असा निश्चय होऊन स्वामींनी रामेश्वर यात्रेचा बेत रहित करून सिद्धोपंतांची गांठ घेऊन ते रुक्मिणीसह काशीस तसेच परतले.
सिद्धोपंत व रुक्मिणी यांची उतरण्याची व्यवस्था लावून स्वामींनी चैतन्यास पुकारून खरी कहीकत काय आहे हें सांगण्यास मोठ्या रागाच्या आवेशाने विचारलें असतां चैतन्यांनी सर्व खरी हकीकत सांगून झाल्यावर सिद्धोपंतांना बोलावून रुक्मिणीला चैतन्यांच्या स्वाधीन करून स्वामी म्हणाले, "स्वस्त्रीची आज्ञा नसतांना घेतलेला संन्यास शास्त्रविरुद्ध ठरतो. म्हणून तूं खुशाल गृहस्थाश्रम स्वीकारून राहावें. व हिच्या पोटी 'हरिहरब्रह्मदेव' अवतरून येणार आहेत' , अशी पुढील भविष्याची त्यांस जाणीव करून दिल्यानंतर ती सर्व मंडळी आळंदीस येऊन दाखल झाली. त्या आधींच विठ्ठलपंतांनी संन्यास घेतलेला तो टाकून देऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्याची बातमी आळंदीस येऊन पोंचली होती.
त्यामुळे सिद्धोपंत गांवी येतांच त्यांच्यावर बहिष्कार घालण्यांत येणार असल्याचे त्यांस व विठ्ठलपंतांना कळतांच विठ्ठलपंतांनी आपण होऊनच सहकुटुंब गांबाबाहेर सिद्धबेटांत राहण्याचे ठरविले आणि ते तसे निघाले. तिथे त्यांनी झाडाच्या फांद्यांच्या लाकडांची, पानांनी आच्छादलेली एक झोंपडी तयार करून तींत उभयतां राहूं लागले. तरीसुद्धा ते कोरान्न भिक्षेस गांवांत जात त्यावेळी त्यांची उघड उघड तोंडावर निंदा होऊन त्यांना छळ सोसावा लागल्याने त्यांचे फार हाल होत. पुरेशी भिक्षा मिळत नसे.
म्हणून कधीं नुसत्या पाण्यावर तर कधीं रानांतल्या कंदमुळें फळांवर ते दिवस काढीत. असे काही दिवस जातांच रुक्मिणींच्या ठिकाणी गर्भधारणा झाली. नऊ महिने पुरे होतांच त्या पुत्ररत्न प्रसवल्या. ते प्रत्यक्ष शंकर भगवानच अवतरून येणार असल्याचे आधींच विठ्ठलपंतांना व रुक्मिणींना स्वप्नांतल्या दृष्टांताने सूचित झाले होतें. म्हणून त्यांनी या सुंदर तेजःपुंज मनोहर बाळाचे नांव 'निवृत्ति' ठेवले. हा दिवस माघ वद्य प्रतिपदा, सोमवार, प्रातः:काळ, श्रीमुख संवत्सर शके अठराशें नव्वद असावा. दुसरे अपत्य श्रावण, वद्य गोकुळ अष्टमी, गुरुवार, मध्यरात्र, युवानाम संवत्सर, शके अकराशे त्र्याण्णवांत जन्मले. ते..............
Maulimajhi-blogger
Post a Comment