संत ज्ञानेश्वर महाराज / एकनाथ महाराज कृत हरिपाठ ( भजनी मालिका ) mauli majhi

shreyash feed ads 2

]] हरिः  ॐ [[

]] श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसज्ञ [[

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download


 ( संत ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज कृत हरिपाठ )

संपूर्ण  वारकरी भजनी मालिका ( संत ज्ञानेश्वर /एकनाथ महाराज कृत हरिपाठ ) | Varkari Bhajani Malika ( Sant Dnyaneshwar / eknath maharajkrut haripath ) in marathi  (Maulimajhi-blogger) 

***।। भजनी मालिका ।। ***

।।मालिका अकरावी ।।

(Malika Aakravi )

(( श्री संत ज्ञानेश्वर महाराजकृत हरिपाठ ))

( shree Sant Dyaneshwar maharajkrut Hripath )

            १५० .  देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी ।वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥

            १५१.  चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥

            १५२.  त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजें ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥

            १५३.  भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलु नये ॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥ सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न  भजसी कवण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥

            १५४.   योगयागविधि येणें नोहे सिद्धी ।  वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥ 

            १५५.   साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥ मोक्षरेखे आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं वनी आत्मतत्वीं ॥४॥

            १५६.  पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥ नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥

            १५७.   संतांचे संगतीं मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥ रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥ एकतत्व नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥ नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥४॥ सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥ ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥

            १५८.   विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसेनी होय ॥२॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे गुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥

भजन : रामकृष्णाहरी । जय जय रामकृष्णाहरी ।।

            १५९.   त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥ नामासी विन्मुख तो नर पापिया । हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक । नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥

            १६०.   हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥ तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥ हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भेणे तेथें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥

            १६१.  तीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धि । वायांचि उपाधि करिसी जनां ॥१॥ भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे ।करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥ पारियाचा रवा घेतां भूमिवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥

            १६२.  समाधि हरिची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥ बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥ ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥

            १६३.  नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥ रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥

         १६४.  एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥ समबुद्धि घेतां समान श्रीहरि । शमदमांवरी हरि झाला ॥२॥ सर्वांघटीं राम देहांदेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥ ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४||

            १६५.   हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥ राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धी ॥२॥ सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥ ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥४॥

          १६६.  हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥ तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्पकोटि वैकुंठीं नांदे ॥२॥ मातृपितृभ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर हो‌ऊनि ठेले ॥३॥ ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिधले माझे हातीं ॥४॥

            १६७.  हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥ त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥ मनोमार्गें गेला तो तेथे मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥ ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडि सर्वकाळ ॥४॥


भजन : विठोबा रखुमाई । जय जय विठोबा रखुमाई ।।


            २६८.नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी । पा अनंत कोडी गेली त्यांची॥१॥अनंत जन्मांचे तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥२ ॥ योगयाग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठे ॥३ ।। ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म । हरिवीण नेम नाहीं दुजा || ४ || 

            २६९.वेदशास्त्रप्रमाण श्रुतीचें वचन । एक नारायण सार जप ॥१ ॥ जप तप कर्म हरिवीण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२ ॥ हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिकें ॥३ ॥ ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळ गोत्र वर्जियेले ॥४ ॥ 

            २७०.काळवेळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती॥१॥रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण । जड जीवां तारण हरि एक।।२ ॥ हरिनाम सार जिव्हां या नामाची।उपमा त्या दैवाची कोण वानी ॥३ ॥ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ॥४ ॥ 

            २७१.नित्य नेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयांजवळीं ॥१ ॥ नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या॥२॥हरिवीण जन्म तो नर्कचि पै जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३ ॥ ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाडा गगनाहूनि वाड नाम आहे ॥४ ॥ 

            २७२.सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वी कळा दावी हरी ॥१ ॥ तैसें नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ ।येथें कांहीं कष्ट न लगती ॥२ ॥ अजपा जपणे उलट प्राणाचा । तेथेही मनाचा निर्धारु असे ॥२ ॥ ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ । रामकृष्णी पंथ पर क्रमियेला ॥४ ॥ 

             २७३.जप तप कर्म क्रिया नेम धर्मासर्वां घटीं राम भाव शुद्ध।।शान सोर्डी रे भावो टाकी रे संदेहो । वि रामकृष्णीं टाहो नित्य फोडी॥२॥जात वित्त गोत कुळशीळ मात । भजें कां त्वरित भावनायुक्त ॥३ ॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।वैकुंठभुवनीं घर केलें ॥४ ॥ 

            २७४.जाणीव नेणीव भगवंती नाहीं । हरि उच्चारणी पाहीं मोक्ष सदा ॥१ ॥ नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२ ॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतुंसी केंविं कळे ॥३ ॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४ ॥ 

            २७५.एकतत्त्व नाम दृढ धरीं मना । हरिसी करुणा येईल तुझी ॥१ ॥ तें नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपें आधीं ॥२ ॥ नामापरतें तत्त्व नाही रे अन्यथा । वायां आणिक पंथा जाशी झणीं ॥३ ॥ ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरीं । धरोनि श्रीहरि जपें सदा ॥४ ॥ 

                २७६.सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडीं । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१ ॥ लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरीविण ॥२ ॥ नाममंत्र जप कोटी जाईल पाप । कृष्णनामी संकल्प धरुनि राहें ॥३ ॥ निजवृत्ति कार्की सर्व माया तोडीं । इंद्रिया भ सवीं लपों नको ॥४ ॥ तीर्थव्रती भाव धरी रे करुणा  । शांति दया पाहुणा हरि करीं ॥५ ॥ ज्ञानदेवा प्रमाण  निवृत्तिदेवी ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६ ॥ 

             २७७.नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पा ब जन्मांतरे ॥१ ॥ न लगती सायास जावें वनांतरा । रा सुखें येतो घरा नारायण ॥२ ॥ ठायींच बैसोनि करा । एक चित्त । आवडी अनंत आळवावा ॥३ ॥ रामकृष्णहरि विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥४ ॥ याविण असतां आणिक साधन । वाहातसें । आण विठोबाची ॥५ ॥ तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनी उत । शहाणा तो धणी घेतो येथें ॥६ ॥ 

            २७८.देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणें मुक्ति ॥ चारी साधियेल्या ॥१ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें सा हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२ ॥ असोनि संसारी जिव्हें वेगु करीं । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा संद ॥३ ॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा मा राणा पांडवा घरीं ॥४ ॥ 

भजन : ।। ज्ञानोबा माऊली तुकाराम ।।

             ।। गुरुपरंपरेचे अभंग ।। 

            २७९.सत्यगुरुरायें कृपा मज केली । परि नाहीं गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥२ ॥ या भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर णा स्वप्नामार्जी ॥३ ॥ काय कळे उपजला अंतराय । ण म्हणोनियां काय त्वरा झाली ॥४ ॥ राघव चैतन्य ॥ केशव चैतन्य । सांगितली खूण मालिकेची ॥५ ॥ पें बाबाजी आपुलें सांगितलें नाम । मंत्र दिला । रामकृष्णहरि ॥६ ॥ माहो शुद्ध दशमी पाहुनि गुरुवार रा । केला अंगीकार तुका म्हणे ॥७ ॥ ॥ 

            २८०.माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुराव ॥१ ॥ आवडीचा मंत्र सांगितला सोपा में । जेणें नोहे गुंफा कोठे काहीं ॥२ ॥ जाती पुढे एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥३ ॥ जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटे ॥४ ॥ तुका म्हणे संती दाखविला तारु । कृपेचा सागरु पांडुरंग ॥५ ॥ 

            २८१.घालुनिया भार राहिलों निशिंती । निरविले संती विठोबासी ॥१ ॥ लावूनियां हात कुरवाळिला । माथा । सांगितली चिंता न करावी ॥२ ॥ कटिकर समचरण साजिरे । राहिला भीवरे तिरी उभा ॥३ ॥ खुंटले सायास आणीक या जीवा । धरिले केशवा पाय तुझे ॥४ ॥ तुज वाटे आतां तें करीं अनंता । तुका म्हणे संता लाज माझी ॥५ ॥ 

            २८२.माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरु॥१॥पढिये देहभाव पुरवी वासना । अंती  तें आपणापाशी न्यावें ॥२ ॥ मागे पुढे उभा राहे सांभाळित ।आलिया आघात निवाराया।॥३ ॥ योग क्षेम त्याचा जाणे जडभारी । वाट दावी करी धरुनियां ॥४ ॥ तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पहावें पुराणी विचारुनी ॥५ ॥ 

            २८३.आदिनाथ उमा बीज प्रगटलें । मच्छिंद्रा लाधलें सहज स्थिती ॥१ ॥ तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पूर्ण कृपा केली गहिनीनाथा ॥२ ॥ वैराग्ये नि तापला सप्रेमें निवाला । ठेवा जो लाधला शांति घ सुख ॥३ ॥ निद्व निःशंक विचरतां महीं । सुखानंद । । हृदयीं स्थिरावला ॥४ ॥ विरक्तीचे पात्र अन्वयाचें सुख । येऊनि सम्यक अनन्यता ॥५ ॥ निवृत्ति गहिनी कृपा केली पूर्ण । कुळ हे पावन कृष्ण नामें ॥६ ॥

             २८४.आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा । मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ॥१ ॥ मच्छिंद्राने बोध गोरक्षासी ' केला । गोरक्ष वोळला गहिनीप्रती ॥२॥गहिनी प्रसाद निवृत्ति दातार । ज्ञानदेवा सार चोजविले ॥३ ॥ २८५.अवघाचि संसार सुखाचा करीन।आनंद भरीन तिन्ही लोक ॥१ ॥ जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२ ॥ सर्व सुकृताचें फळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगा।।३।।बाप रुखमादेवीवरु विठ्ठलाची भेटी । आपुले संवसाटी करुनी ठेला ॥४ ॥ ' 

भजन : ।। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ।। 


((( संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ )))

((( Sant Eknath maharajkrut haripath ))

            २८६.हरीचिया दासा हरि दाही दिशा । पायें जैसा तैसा हरि एक ।।१ ।। हरि पुखी गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुतां जन्म घेणे ।।२ ।। जन्म घेणे लागे वासनेच्या संगें । तेंचि झाली अंगे हरिरूप ॥३ ॥ हरिरूप झाले जाणणे हरपलें । नेणणे ते गेले हरिचे ठायीं ।।४ ।। हरिरूप ध्यानी हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरी बोला ।।५ ।। 

            २८७.हरि बोला हरि बोला नाही तरी अबोला | व्यर्थ गलबला करूं नका ॥१ ।। नको नको मान नको अभिमान । सोडी मीतूंपण तोचि सुखी ।।२ ।। सुखी जेणे व्हावें जग निववावें । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥३ ॥ मार्ग जया कळे भावभक्तिबलें । जगाचिये मेळे न दिसती ।।४ ।। दिसती जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनी ओळखिले ॥५ ॥ २८८.ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरीं सिद्धिसहित ॥१ ॥ सिद्धि लावी पिसे कोण तया पुसे । नेलें राजहंसे पाणी कायी ॥२ ॥ काय ते करावे संदेंहीं निर्गुण । ज्ञानाने सगुण ओस केलें ॥३ ॥ केले कर्म झालें तेंचि भोगा आलें । उपजले मेले ऐसे किती ॥४ ॥ एका जनार्दनी नाही यातायाती । सुखाची विश्रांती हरीसगें ॥५ ॥

            २८९. जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाही ॥१ ॥ वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव । तयाविण ठाव रिता कोठे ॥२ ॥ वैष्णवांचें गुह्य मोक्षाचा एकांत । अनंतासी अंत पाहतां नाहीं ॥३ ॥ आदि मध्य अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरी ॥४ ॥ एकाकार झाले जीव शिव दोन्ही । एका जनार्दनी ऐसें केलें ॥५ ॥

             २९०.नामावीण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा नव्हे काळ सर्प आहे ॥१ ॥ वाचा नव्हे लांव जळो त्याचे जिणे । यातना भोगणे यमपुरी ॥२ ॥ हरिवीण कोणी नाही सोडविता । पुत्र बंधु कांता संपत्तीचे ॥३ ॥ अंतकाळी कोणी नाहीं बा सांगाती । साधूंचे संगतीं हरि जोडे ॥४ ॥ कोटीकुळे तारि हरि अक्षरे दोन्ही । एका जनार्दनी पाठ केली ॥५ ॥ 

            २९१.धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ ते निर्फळ हरिवीण ॥१ ॥ वेदाचेंहे बीज हरि हरि अक्षरे पवित्र सोपारें हेंचि एक ॥२ ॥ योगयाग व्रत नेम धर्म दान । नलगे साधन जपतां हरि ॥३ ॥ साधनाचें सार नाम मुखीं गातां । हरि हरि म्हणतां कार्यसिद्धि ॥४ ॥ नित्य मुक्त तोचि एक ब्रह्मज्ञानी । एका जनार्दनी हरी बोला ॥५ ॥

             २९२.बहुतां सुकृती नर देह लाधला । भक्तिविण गेला अधोगती ॥१ ॥ बाप भाग्य कैसें न सरेचि कर्म । नकळेचि वर्म अरे मूढा ॥२ ॥ अनेका जन्मांचें सुकृत पदरीं । त्याचे मुखीं हरि पैठा होय ॥३ ॥ राव रंक हो का . उंच नीच याति । भक्तिवीण माती मुखीं त्याच्या ॥४ ॥ एका जनार्दनीं हरिहरि म्हणतां । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥५ ॥ 

            २९३.हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचें भूस दृष्टीपुढें ॥१ ॥ नित्य नामघोष जयाचे मंदिरीं । तेचि काशी पुरी तीर्थक्षेत्र ॥२ ॥ वाराणसी तीर्थ क्षेत्रा नाश आहे । अविनाशासी पाहे नाश कैचा ॥३ ॥ एका तासामाजीं कोटि वेळां सृष्टी । होती जाती दृष्टि पाहे तोचि ॥४ ॥ एका जनार्दनी ऐसे किती झाले । हरिनाम सेविलें तोचि धन्य ॥५ ॥

             २९४.भक्तिविण पशू कशासी वाढला । सटवीनें नेला कैसा नाहीं ॥१ ॥ काय माय गेली होती भूतापाशी । हरि नये मुखासी अरे मूढा ॥२ ॥ पातके करितां पुढे आहे पुसता । काय उत्तर देता होशील तूं ॥३ ॥ अनेक यातना यम करवील । कोण सोडविल तेथें तुजला ॥४ ॥ एका जनार्दनी सांगता हे तोंडें । आहा वाचा रडे बोलतांची ॥५ ॥

             २९५.स्वहिता कारणे संगती साधूची । भावे भक्ति हरिची भेटी तेणें ॥१ ॥ हरि तेथें संत संत तेथें हरि । ऐसे वेद चारी बोलताती ॥२ ॥ ब्रह्मा डोळसाते वेदार्थ ना कळे । तेथें हे आंधळे व्यर्थ होती ॥३ ॥ वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष । वेदें नाहीं ऐसें सांगितले ॥४ ॥ वेदांची ही बीजाक्षरे हरि दोनी । एका जनार्दनी हरी बोला ॥५ ॥

         २९६.सत्पद तें ब्रह्म चित्पद ते माया । आनंद पदीं जया म्हणती हरी ॥१ ॥ सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२ ॥ तत्सदिति ऐसें पैल वस्तूवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ॥३ ॥ हरिपद प्राप्ति भोळ्या भाविकांसी । अभिमानी यांसी गर्भवास ॥४ ॥ अस्ति भाति प्रिय ऐशीं पदें तिनी । एका जनार्दनी तेंचि झालें ॥५ ॥ 

            २९७.ना कळे ते कळे कळे तें ना कळे । वळे तें ना वळे गुरुवीणें ॥१ ॥ निर्गुणी पावलें सगुणी भजतां । विकल्प धरितां जिव्हा झडे ॥२ ॥ बहुरुपी धरी संन्याशाचा वेष । पाहोन तयास धन देती ॥३ ॥ संन्याशाला दिले नाहीं बहुरुपीयाला । सगुणी भजला तेथें पावे ॥४ ॥ अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी । 

            २९८.ओळखिला हरि सांठविला पोटीं । होता त्याची भेटी दुःख कैचे ॥१ ॥ नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरि पवित्र तो ॥२ ॥ पवित्र ते कुळ धन्य त्याची माय । हरिमुखें गाय नित्य नेमें ॥३ ॥ काम क्रोध लोभ जयाचें अंतरी । नाहीं अधिकारी ऐसा येथे ॥४ ॥ वैष्णवाचें गुह्य काढिलें निवडुनी । एका जनार्दनी हरि बोला ॥५ ॥ 

            २९९.हरि बोला देतां हरि बोला घेतां । हसतां खेळतां हरि बोला ॥१ ॥ हरि बोला गातां हरि बोला खातां । सर्व कार्य करितां हरि बोला ॥२ ॥ हरि बोला एकांती हरि बोला लोकांती । देहत्यागा अंती हरि बोला ॥३ ॥ हरि बोला भांडतां हरि बोला कांडतां । उठता बैसतां हरि बोला ॥४ ॥ हरि बोला जनीं हरि बोला विजनीं । एका जनार्दनी हरि बोला ॥५ ॥

 भजन : ।। भानुदास एकनाथ । भानुदास एकनाथ ।। 

            ३००.एक तीन पांच मेळा पंचविसांचा । छत्तीस तत्त्वांचा मूळ हरी ॥१ ॥ कल्पना अविद्या तेणें झाला जीव । मायोपाधि शिव बोलिजेती ॥२ ॥ जीव शिव दोनी हरिरुपी तरंग । सिंधु तो अभंग नेणे हरी ॥३ ॥ शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे । रज्जूवरी भासे मिथ्या सर्प ॥४ ॥ क्षेत्र क्षेत्रज्ञातें जाणताती ज्ञानी । एका जनार्दनी हरी बोला ॥५ ॥ 

            ३०१.कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोवा नेणे हरी ॥१ ॥ दिधल्यावांचुनि फळ प्राप्ति कैची इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२ ॥ इच्छावे जे जवळी हरिचे चरण । सर्व नारायण देतो तुज ॥३ ॥ न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेतां जन्म कोटी हरि कैचा ॥४ ॥ एका जनार्दनी सांपडली खूण । कल्पना अभिमान हरी झाला ॥५ ॥

             ३०२.काय नपूंसका पद्मिनीचे सोहळे । वांझेसी डोहळे कैचे होती ॥१ ॥ अंधापुढे दीप खरासी चंदन । सर्पा दुग्धपान करूं नये ॥२ ॥ क्रोधी अविश्वासी त्यांसी बोध कैचा । व्यर्थ आपुली वाचा शिणवू नये ॥३ ॥ खळाची संगती उपयोगासी नये । आपणा अपाय त्याचे संगें ॥४ ॥ वैष्णवीं कुपथ्य टाकिले वाळूनी । एका जनार्दनी तेचि भले ॥५ ॥ 

            ३०३.न जायेचि ताठा नित्य खटाटोप । मंडूकी वटवट तैसे ते गा ॥१ ॥ प्रेमेवीण भजन नाकावीण मोती । अर्थावीण पोथी वाचुनी काय ॥२ ॥ कुंकुवा नाहीं ठाव म्हणे मी आहेव । भावाविण देव कैसा पावे ॥३ ॥ अनुतापावीण भाव कैसा राहे । अनुभवें पाहे शोधूनियां ॥४ ॥ पाहतां पाहणे गेलें तें शोधूनी । एका जनार्दनी अनुभविलें ॥५ ॥

            ३०४.परिमळ गेलिया वोस फूल देठी । आयुष्या पाहे । अजुनि किती आहे अवकाश ॥२ ॥ हाचि घेऊनि सावध । कांहीं तरी बोध करी मना ॥३ ॥ एकतास उरला खट्वांग रायासीं । भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ॥४॥सांपडला हरि तयाला साधनी । एका जनार्दनी हरी बोला ॥५ ॥

             ३०५.करा रे बापांनो साधन हरीचें । झणी करणीचे करूं नका ॥१ ॥ जेणें न ये जन्म यमाची यातना । ऐसिया साधना करा काहीं ॥२ ॥ साधनाचें सार मंत्रबीज हरी । आत्मतत्त्व धरी तोचि एक ॥३ ॥ कोटि कोटि यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरि नाम जपतां घडे ॥४ ॥ एका जनार्दनी न घ्यावा संशय । निश्चयेंसी होय हरिरुप ॥५ ॥

             ३०६.बारा सोळा जणी हरीसी नेणती । म्हणोनि फिरती रात्रंदिवस ॥१ ॥ सहस्त्र मुखांचा वर्णिता भागला । हर्ष जया झाला तेणें सुखें ॥२ ॥ वेद जाणूं गेला पुढे मौनावला । ते गुह्य तुजला प्राप्त कैचें ॥३ ॥ पूर्व सुकृतांचा पूर्ण अभ्यासाचा । दास सद्गुरुचा तोचि जाणे ॥४ ॥ जाणते नेणते हरिचे ठिकाणीं । एका जनार्दनी हरी बोला ॥५ ॥ 

            ३०७.पिंडी देहस्थिति ब्रह्मांडी पसारा । हरिवीण सारा व्यर्थ भ्रम ॥१ ॥ शुक याज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी । हरिसी जाणोनि हरिच झाले ॥२ ॥ यारे यारे धरूं हरिनाम तारुं । भवाचा सागरु भय नाहीं ॥३ ॥ साधुसंत गेले आनंदी राहिले । हरि नामें झाले कुतकृत्य ॥४ ॥ एका जनार्दनी मांडिले दुकान । देतो मोलाविण सर्व वस्तु ॥५ ॥ 

            ३०८.आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१ ॥ नको खेद करुं कोणत्या गोष्टीचा । पति लक्ष्मीचा जाणतसे ॥२ ॥ सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसें नाहीं ॥३ ॥ जैसी स्थिति आहे तैशापरी राहे । कौतुक तूं पाहें संचिताचें ॥४ ॥ एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकृ त्याचा नाश झाला ॥५ ॥

             ३०९.दुर्बळाची कन्या समर्थाने केली । अवदशा निमाली दरिद्राची ॥१ ॥ हरि कृपा होता भक्ता निघती दोंदे । नाचती स्वानंदें हरिरंगी ॥२ ॥ देव भक्त दोन्ही एकरुप झाले । मूळीचे संचले जैसे तैसें ॥३ ॥ पाजळली ज्योती कापुराची वाती । ओवाळितां आरती भेद नुरे ॥४ ॥ एका जनार्दनी कल्पचि मुराला । तोचि हरि झाला ब्रह्मरुप ॥५ ॥

             ३१०.मुद्रा ती पांचवी लावुनियां लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे ।।१ ॥ कानी जे पेरिलें डोळां तें उगवलें । व्यापके भरिले तोचि हरि ॥२ ॥ कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले । हरिपाठी आले सर्व मार्ग ॥३ ॥ नित्य प्रेमभायें हरिपाठ गाय । हरिकृपा होय तयावरी ॥४ ॥ झाला हरिपाठ बोलणे येथूनी । एका जनार्दनी हरी बोला ॥५ ॥ 

        ३११.अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आतां । चरणी जगन्नाथा चित्त ठेले॥शामाय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथाचा नाथ जनार्दन ।।२ ।। एका जनार्दनी एकपणे उभा । चैतन्याची शोभा शोभतसे || ३ || 

श्री एकनाथ महाराजांची गुरुपरंपरा 

        ३१२.जो निर्गुण निराभास । जेथूनि उद्भव शबल ब्रह्मास । आदिनारायण म्हणती ज्यास । तो सर्वास आदिगुरु ॥१ ।। तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत । ब्रह्मा अत्रीस उपदेशित । अत्रीपाद प्रसादित । श्री अवधूत दत्तात्रय ।।२ ।। दत्तात्रय परंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा । जनार्दन शिष्य तिसरा । केला खरा कलियुगी ॥३ ॥ जनार्दन कृपेस्तव जाण । समूळ निरसले भवबंधन । एका जनार्दनी शरण । झाली संपूर्ण परंपरा ॥४ ॥ 

भजन : ।। जनार्दन माऊली एकनाथ ।।



MajhiMauli-blogger







FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER


Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.