काही महत्त्वाचे निवडक अभंग ( ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, जनाबाई, निळोबाराय, भानुदास, सावतामाळी, चोखामेळा, सेना महाराज, नरहरी सोनार, मिराबाई, कबीर, कान्होपात्रा अभंग)

shreyash feed ads 2

  ]] हरिः  ॐ [[

]] श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसज्ञ [[

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download


 काही महत्त्वाचे निवडक अभंग ( ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, जनाबाई, निळोबाराय, भानुदास, सावतामाळी, चोखामेळा, सेना महाराज, नरहरी सोनार, मिराबाई, कबीर, कान्होपात्रा अभंग)  

संपूर्ण  वारकरी भजनी मालिका| Varkari Bhajani Malika 


***।। भजनी मालिका ।। ***

।। मालिका अठरावी ।।
( Malika Aathravi )

 काही महत्त्वाचे निवडक अभंग 

( Kahi Mahatvache Nivadak Abhang )

।। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग ।।

( Shree Sant Dnyneshwar Maharajanche Abhang )

             ५४६. इवलेसे रोप लावियेले द्वारी । त्याचा वेलु गेला गगनावरी ॥१ ॥ मोगरा फुलला मोगरा फुलला । फुलें वेचिता अति भारू कळियेसी आला ॥२ ॥ मनाचिये गुंती गुंफियेला शेला । बापरखुमादेविवरू विठ्ठली अर्पिला ॥३ ॥ 

            ५४७.सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावणानाहीं रूपगुण वर्ण जेथे।।शातो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी।पाहते पाहणे दुरी सारोनियां।।२।।ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती । ते हे उभी मूर्ति विटेवरी ॥३ ॥ 


            ५४८.परिमळाची धांव भ्रमर ओढी । तैसी तुझी गोडी लागो मज || १ || अविट गे माय विटेना । जवळी आहे परी भेटेना ।। २ || तृषा लागलिया जीवनाते ओढी । तैसी तुझी गोडी लागो या जीवा।।३ ।। बापरखुमादेवीवरा विठ्ठली आवडी गोडियेसि गोडी मिळोन गेली || ४ || 


            ५४९ . तुझी सेवा करीन मनोभावें वो । माझें मन गोविंदी रंगलें वो॥शा नवसिये नवसिये माझें नवसिये वो । पंढरीचें दैवते विठ्ठले नवसिये वो ॥२ ॥ बापरखुमादेविवरे विठ्ठले वो । चित्त चैतन्य चोरूनि नेलें वो || ३ ||


             ५५०. मन हे धालें मन हे धालें । पूर्ण विठ्ठलचि झालें । अंतरबाह्य रंगूनि गेले । विठ्ठलची ॥१ ॥ विठ्ठल म्हणतां हरलें पाप । पदरी आले पुण्य माप । झाला दीनांचा मायबाप , विठ्ठलची।।२ ।। विठ्ठल जळी स्थळी भरला । रिताठाव कोठे नाही उरला । आज म्यां दृष्टीने पाहिला । विठ्ठलची ॥३ ॥ ऐसा भाव धरूनि मनीं । विठ्ठल आणिला निजध्यानीं । अखंड वदो माझी वाणी । विठ्ठलची || ४ || तो हा चंद्रभागें तीरा । पुंडलिकें दिधला थारा । बापरखुमादेवीवरा जडलें पायीं । विठ्ठलची || ५ || 


            ५५१.आजि संसार सुफळ झाला गे माये । देखियेले पाय विठोबाचे॥१॥तो मज व्हावा तो मज व्हावा।वेळावेळा व्हावा पांडुरंग ॥२ ॥ बापरखुमा देवीवरू न विसंबे सर्वथा।निवृत्तीनें तत्त्वतां सांगितलें ॥३ ॥ 


            ५५२.सोनयाचा दिवस आजि अमृते पाहाला । नाम आठवितां रूपी प्रगट पैं झाला ॥ १॥ गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना । आनु न विसंबे हरि जगत्रजीवना ।। २ ।। तनुमनु शरण विनटलों तुझ्या पायीं । बापरखुमादेविवरांवाचुनी आनु नेणें कांहीं ॥३ ॥ 


            ५५३. आकार उकार मकार करती हा विचार । परि विठ्ठल अपरंपर न कळे रया।।१ ।। संतांचे संगति प्रेमाचा कल्लोळ ।आनंदें गोपाळमाजी खेळे ॥२ ॥ बाळे भोळे भक्त गाताती साबडे । त्यांचे प्रेम आवडे विठोबासी ॥३ ॥ बापरखुमादेवीवरू परब्रह्म पुतळा । तेथिल हे कळा निवृत्ति जाणे ॥४ ॥


             ५५४. रूणझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडी तूं अवगणु रे भ्रमरा ॥१ ॥ चरण कमळदळु रे भ्रमरा । भोगी तूं निश्चळु रे भ्रमरा ॥ २॥ सुमन सुगंधु रे भोवरा । परिमळ विद्गदु रे भोंवरा ॥ ३॥ सौभाग्य सुदरू रे भमरा लापरखमादेवीवरू रे भ्रमरा ॥ ४ ॥


             ५५५. पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥१ ॥ उड रे उड रे काऊ तुझे सोन्याने मढीन पाऊ । पाहुणे पंढरीरावो घरां कैं येतीं ।॥ २ ॥ दहिभाताची उंडी लावीन तुझ्या तोंडीं । जीवा पढीये त्याची गोडी सांग वेगी ॥३ ॥ दुधे भरूनी वाटी लावीन तुझे ओंठीं । सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४ ॥ आंबया डाहाळी फळे चुंबी रसाळी । आजिचे रे काळी शकून सांगे ॥५ ॥ ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे । भेटती पंढरीराणे शकुन सांगे ॥६ ॥


             ५५६.परियेसी गव्हारा सादर । कर्मे निर्वंश झाले सगर । भिल्ले विधिलें शारंगधराजाला पुरंदर सहस्त्रनयन ॥शाकर्मे मन्मथ जालासे राखाकर्मे चंद्रासी घडला दोष । कर्मे भार वाहती कूर्मशेष । कर्मे खरमुख ब्रह्मा देखा॥२॥कर्मे वासुकी लंकें दिवटा।कर्मे हनुमंता उदरीं कांसोटा । करें शुकदेव गी कष्ठा । पाताळवाटा बळी गेला ॥३ ॥ कर्मे दशरथ वियोगें मेला । कर्मे श्रीराम वनवासा गेला । कमें रावण क्षयो पावला । वियोग घडला सीतादेवी ॥४ ॥ कर्मे दुर्योधनादि रणीं नासले । क पांडव महापंथे गेले । कर्मे सिंधुजळ शोषिलें । नहुष जाला सर्प देखा ॥५ ।। कर्माते शंभु मानीं आपण । किती पळसिल कर्माभेण । बापरखुमादेवीवरा विठ्ठल शरण । केली कर्मे निवारी नारायण ॥६ ॥ 


            ५५७.संत भेटती आजि मज । तेणें मी झालों चतुर्भुजा दोन्ही भुजा स्थूळी सहजा दोन्ही सूक्ष्मी वाढल्या ॥ १॥ आलिंगनीं सुख वाटें । प्रेम चिदानंदी घोटें । हर्षे ब्रह्मांड उतटे । समूळ उठे मीपणा ॥२ ॥ या या संतांसी भेटतां । हरे संसाराची व्यथा । पुढतां पुढती माथा । अखंडित ठेवीन ॥ ३॥ या या संतांचे हे देणे । कल्पतरू हूनि दुणे । परिसा परीस अगाध देणें । चिंतामणी ठेंगणा ॥ ४॥ या संतापरीस उदार । त्रिभुवनीं नाहीं थार । मायबाप सहोदर । इष्टमित्र सोईर।।५ ।। देखिली नाहीं बाप॥धृ .॥ जंववरी रे तंववरी मैत्रत्व संवाद । जंववरी अर्थेसि संबंध पडिला नाहीं बाप | ॥२ ॥ कृपा कटाक्षे न्याहाळिलें । आपुल्या पदी बसविलें । जंववरी रे तंववरी युद्धाची मात । जंव परमाईचा पूत २२ ९ ज्ञा.म.निवडक अभंग बापरखुमादेविवरे विठ्ठलें । भक्ता दिधलें वरदान।।६ ।।


             ५५८. गाते श्रोते आणि पाहाते । चतुर विनोदी दुश्चिते । सोहं भावी पूर्ण ज्ञाते । या सकळातें विनवणी ।। २॥ करा विठ्ठलस्मरण । नामरूपी अनुसंधान । जाणोनि भक्तां भवलक्षण । जघनप्रमाण दावितो ।। २ ।। पुंडलिकाच्या भावार्था । गोकुळीहूनि झाला येता । निजप्रेमभक्ति भक्तां । घ्या घ्या आतां म्हणतसे ।। ३॥ मी माझं आणि तुझें । न धरी टाकी परतें ओझें । भावबळे फळतीं बीजें । बापरखुमादेविवरू विठ्ठलीं ॥४ ॥ 


            ५५९.पांचासहित लयातीत जालिये वो । प्रेमभक्ति अनुसरले काळ्या रूपासी ॥१ ॥ ठायींचाची काळा अनादि बहुकाळा । म्हणोनि वेदा चाळा लाविला गे माये ॥ २॥ बापरखुमादेविवरें जन्मावेगळे केलें । म्हणोनि भाज झाले नाईयो नो ॥३ ॥ 


            ५६०. जंववरी रे तंववरी जंबुक करी गर्जना । जव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥१ ॥ जंववरी र तंववरी वैराग्याच्या गोष्ठी । जंव सुंदर वनिता दृष्टी देखिलें नाहीं बाप ॥१ ॥ जंववरी रे तंववरी वैराग्याच्या गोष्ठी । जंव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाहीं बाप॥धृ .॥ जंववरी रे तंववरी मैत्रत्व संवाद । जंववरी अर्थेसि संबंध पडिला नाहीं बाप।।२ ॥ जंववरी रे तंववरी युद्धाची मात । जंव परमाईचा पूत  देखिला नाहीं बाप || ३ || जंवरी रे तंववरी समुद्रकरी गर्जना । जंव अगस्ती ब्राह्मणा देखिलें नाहीं बाप ॥४ ॥ जंववरी रे तंववरी बाधी हा संसार । जंव रखुमादेवीवरा देखिला नाहीं बाप ॥५ ॥ 


            ५६१. गुरु हा संतकुळींचा राजा । गुरु हा प्राणविसांवा माझा । गुरुवीण देव दुजा । पाहतां नाहीं त्रिलोकीं ॥१ ॥ गुरु हा सुखाचा सागरु । गुरु हा प्रेमाचा आगरु । गुरु हा धैर्याचा डोंगरू । कदाकाळी डळमळेना ॥२ ॥ गुरु वैराग्याचें मूळ । गुरु हा परब्रह्म केवल । गुरु सोडवी तात्काळ । गांठ लिंग देहाची ॥३ ॥ गुरु हा साधकाशी साह्य । गुरु हा भक्तालागीं माय । गुरु हा कामधेनु गाय । भक्तांघरी दुभतसे ॥४ ॥ गुरु घालीं ज्ञानांजन । गुरु दाखवीं निज धन । गुरु सौभाग्य देऊन । साधुबोध नांदवी।।५ ।। गुरुमुक्तीचे मंडन । गुरु दुष्टाचें दंडन । गुरु पापाचे खंडन । नानापरी वारितसे ॥६ ॥ काया काशी गुरु उपदेशी । तारक मंत्र दिला आम्हांसी । बापरखुमादेवीवरासी । ध्यान मानसी लागलें।॥७ ॥ 


            ५६२.कानी घालूनियां बोटें नाद जे पाहावे । न दिसतां जाणावें नऊ दिवस ॥१ ॥ भोंवया पाहातां न दिसे जाणा । आयुष्याची गणना सात दिवस ॥२ ॥ डोळां घालोनियां बोट चक्र जे पाहावें । न दिसतां जाणावें पांच दिवस॥शनासाग्रीचें अग्र न दिसे नयनीं । तरी तेचि दिनी म्हणा रामकृष्ण ॥४ ॥ ज्ञानदेव म्हणे हे साधूंचे लक्षण । अंतकाळी आपण वेगीं पाहा ॥५ ॥


            ५६३.आपुलेनि रंगें येती होती ये साजणी । तंव एके वनवासी आळंगिलें गे माये।।१ ।। बोलेना बोलों देईना । तेथें पाहणे ते अवघे पारुषलें गे माये।।२ ।। आपुले केले काहीं न चले वो आतां । बापरखुमादेवीवरा विठ्ठला देखतां ॥३ ॥


             ५६४.सद्गुरु वांचोनि संसारी तारक । नसेचि निष्टंक आन कोणी || १ || इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करूनि । संशयाची श्रेणी छेदितीना ॥२ ॥ उघडे प्ररब्रह्म सद्गुरुची मूर्ती । पुरविती आर्ती शिष्याचिया ॥३ ॥ वंचना करिती जन दुष्ट नष्ट । मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती ॥४ ॥ ज्ञानदेव म्हणे श्रीगुरुचा मी दासानेणें साधनास आन काही || ५ || 


            ५६५.अष्टांगयोगें न सिणिजेोयम नेम निरोध न कीजे रया ॥१ ॥ वाचा गीत गाइजे वाचा गीत गाइजे । गाता वाता श्रवणीं ऐकिजे रया।।२ ।। गीताछंदें अंग डोलिजे।लीला विनोदें संसार तरिजे रया।।३ ।। बापरखुमादेविवरू विठ्ठलु नामें।जोडे हा उपावो किजे रया।॥४ ॥


             ५६६.राम बरवा कृष्ण बरवा । सुंदर बरवा बाइयांनो ॥ १॥ केशव बरवा माधव बरवा । गोपाळ बरवा बाइयांनों ॥ २॥ बाप रखुमादेविवरू त्रिभुवनीं गरुवा । विठ्ठलु बरवा बाइयांनो।।३ ।। 


                ५६७.बरवा वो हरि बरवा वो । गोविंद गोपाळ गुण गरूवा वो ॥1॥ सांवळा वो हरि सांवळा वो । मदन मोहन कान्हो गोवळा वो ॥ २॥ पाहतां वो हरि पाहतां वो । ध्यान लागलें या चित्ता वो ।। ३॥ पढिये वो हरि पढिये वो । बाप रखुमादेविवरू घडिये वो ॥४ ॥ 


            ५६८. तृप्ति भुकेली काय करूं माये । जीवनी जीवन कैसें तान्हेजत आहे।।१ ।। मन धालें परि न धाये । पुढत पुढती राजा विठ्ठलु पाहे ॥२ ॥ निरंजनी अजन लेईजत आहे । आपुले निधान कैसे आपणचि पाहे ॥३ ॥ निवृत्ति गार्हस्थ्य मांडले आहे । निष्काम आपत्य प्रसवत जाये ॥४ ॥ त्रिभुवनीं आनंदु न माये गे माये । आपेआपु परमानंदु वोसंडतु आहे ॥५ ॥ बापरखुमादेवीवरु विठ्ठलुगे माये । देहभाव सांडूनि भोगिजत आहे ॥६ ॥ 


            ५६९ . तुझी आण वाहीन गा देवराया । बहु आवडसी जीवां पासूनियां ॥१ ॥ कानडिया विठोबा कानडिया । बहु आवडसी जीवां पासूनियां ॥२ ॥ बापरखुमादेवीवरु विठ्ठलुराया । बहु आवडसी जीवां पासूनियां।।३ ॥ 


            ५७०. कां सांडिसी गृहाश्रम । कां सांडिसी क्रियाकर्म । कासया सांडिसी कुळींचे धर्म । आहे ते वर्म वेगळेचि ॥ १॥ भस्मउधळण जटाभारूं । अथवा उदास दिगंबरू । न धरी लोकांचा आधारू । आहे तो विचारू वेगळाची ।। २॥ जपतप अनुष्ठान । क्रियाकर्म यज्ञ दान । कासया इंद्रिळ्यां बंधन । आहे ते निधान वेगळेंची ॥ ३॥ वेदशास्त्र जाणितलें । आगमी पूर्ण ज्ञान झालें । पुराणमात्र धांडोळिलें । आहे तें राहिले वेगळेचि ॥ ४॥ शब्दब्रह्म होसी आगळा । म्हणसी न भिये कळिकळा । बोधेवीण सुखसोहळा । आहे तो जिव्हाळा वेगळाची।।५ ।। याकारणे श्रीगुरूनाथु । जंव मस्तकी न ठेवी हातु । निवृत्तिदास असें विनवितु । तंव निवांतु केवी होय ॥ ६ ॥


             ५७१.घरदार वोखटें त्यज्यूं म्हणती तरी शरीरा येव . जाड । मायबाप वोखटीं त्यजूं त्यजूं म्हणसी तरी अहंकार अविद्येचे कोडे । बंधु सखे त्यजूं म्हणसी तरी काम क्रोध मद मत्सर अवघड । बहिणी पाठीच्या त्यजूं म्हणसी आशा तृष्णामायाचे बंड रया ॥१ ॥ त्याजिलें तें काय कासया म्हणिजे सांग पां मजपासी ऐंसें । जया भेणें तूं जासी वनांतरा तें तंव तुजचि सरिसें रया।।२ ।। स्त्री वोखटी त्यजूं म्हणसी तरी कल्पना येवढी भक्ती । पुत्र आपत्य त्यजूं म्हणसी तरी इंद्रियासी नाहीं निवृत्ति । सकळ गणगोत त्यजूं म्हणसी तरी हे अष्टधा प्रकृति । अवघेचि त्यजूं पाहे म्हणसी तरी मना नाहीं निज शांती रया।।३ ।। अवघीच तुज जवळी दुमदुमित असतां वरीवरी मुंडिसी कां करिसी विंटबना । सहज संतोषे असोनि जैसा तैसा परि तो सदगुरु पाविजे खुणा । आपुले आश्रमी स्वधर्मी असता सर्वत्र एकुचि जाणा । बापरखुमादेविवरु विठ्ठल इतुकियासाठी  नेईल वैकुंठभुवना ॥४ ॥ 


            ५७२. सकळ मंगळनिधी । श्री विठ्ठलाचें नाम आधीं ।। १॥ म्हण कां रे म्हण कां रे साचें । श्री विठ्ठलाचें नाम वाचें ।। २ ।। पतीत पावन साचें । श्री विठ्ठलाचें नाम वाचें ।। ३॥ बापरखुमादेवीवरू साचें । श्री विठ्ठलाचें नाम वाचें ।। ४ || 


            ५७३.तुज सगुण म्हणो की निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ।। १ ।। अनुमानेना अनुमानेना । श्रुति नेति नेति म्हणती एकु गोविंदु रे ।। धृ ० ॥ तुज स्थूल म्हणो की सूक्ष्म रे । स्थुळ सुक्ष्म एकु गोविंदु रे।।२ ।। तुज आकारू म्हणो की निराकारू रे । आकारू निराकारू एकु गोविंदु रे ।। ३ ।। तुज दृश्य म्हणो की अदृश्य रे । दृश्य अदृश्य एकु गोविंदु रें ।। ४॥ निवृत्ति प्रसादे ज्ञानदेव बोले । बापरखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥५ ॥


             ५७४. हे नव्हे आजिकालिचें । युगा अठ्ठाविसांचें । मज निर्धारितां साचें । हा मृत्युलोकुचि . नव्हे । हाचि मानी रें निर्धारु । येर सांडी रे विचारु । जरी तूं पाहासी परात्परु । तरी तूं जायें पंढरिये।।१ ॥ बाप तीर्थ पंढरी । भूवैकुंढ महीवरी । भक्त पुंडलिकाचे द्वारी । कर कटावरी राहिला ॥२ ॥ काशी आयोध्या अवंती कांची । मथुरा माया गोमती । ऐशी तीर्थ इत्यादिकं आहेती । परी सरी न पवती पंढरे।।३ ।। हाचि मानी रें विश्वासु । येर सांडी रे हव्यासु । जरी तू पाहासी वैकुठवासु । तरी तूं जायें पंढरियें।॥४ ॥ आड वाहे भीमा । तारावया देह आत्मा । पैल थडीये परमात्मा । मध्ये राहिला पुंडलिकु ॥५ ॥ या तिहींचें दरुशन । प्राण्या नाहीं जन्ममरण । पुनरपी आगमन । येथें बोलिलेंचि नाही पंढरी म्हणजे भुवैकुंठ । ब्रह्म तंव उभेचि दिसताहे नीट । या हरिदासासी वाळवंट । जागरणासी दिधलें ॥७ ॥ म्हणोनि करा करा रे क्षीरापति । नटा नटा कीर्तनवृत्ति । ते नर मोक्षातें पावती । ऐसें बोलती सुरनर।।८ ॥ हे चोविसा मूर्तीचे उद्धरण । शिवसहस्त्रनामासी गहन । हेंचि हरिहराचें चिंतन । विश्ववंद्य हे मूर्ती॥९ ॥ तो हा देवादि देव बरवा । पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा । बापरखुमादेवीवरु पंचविसावा । चोविसा मूर्ति वेगळा।।१० ॥ 


            ५७५ .वाजतसे बोंब कोणी नायकती कानीं । हरि हरि न म्हणती ताय थोर झाली हानी ॥ ११॥ उठा उठा जागा पाठी भय आले मोठे । पंढरीवाचुनी दुजा ठाव नाहीं कोठें ॥ २॥ तापत्रय अग्नीचा लागला वोणवा । कवण रिचे आड कवण करीं सावाधावा ।। ३॥ देखोनि एकोनि एक बहिर अंध झालें । विषयाचे लंपट बांधोनि यमपुरीस नेले ॥४ ॥ आजा मेला पणजा मेला बाप मसणा नेला । देखत देखत नातु पणतु तोही वेडा झाला ।। ५ ।। व्याघ्र लासी भूतें ही लागताती पाठीं । हरिभजन न करितां सगळे घालूं पाहे पोटीं ।। ६॥ संतसंग धरा तुम्ही हरिभजन करा । पाठी लागलासे काळ दांत खातो करकरा।।७ ।। बापरखुमादेवीवरा विठ्ठला शरण । भावें न निघतां चुके जन्ममरण ॥ ८ ॥


             ५७६. जोडूनियां जोडी जेणें हुंडारिली दुरी । भिकेची आवडी तया नावडी पंढरी।।१ ।। करंटे कपाळ ज्याचें नाम नये वाचें । सदैव सभाग्य तोचि हरिरंगी नाचे।।२ ॥ आपण न करी यात्रा दुजियासी जावो नेदी । विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुद्धी ॥३ ॥ ऐसे जे जन्मोनि नर भोगिती अघोर । न करिती तीर्थयात्रा तया नरकी बिढार ॥४ ॥ पुंदलिके भक्ते तारिलें विश्वजनां । वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपूर पाटना।।५ ।। कायावाचामनें जीवें सर्वस्वं उदार । बापरखुमादेवीवरा विठ्ठलाचां वारिकर।।६ ।। 


            ५७७.माझें जीवींची आवडी । पंढरपुरा नेईल गुढी ।। १॥ पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ॥ २॥ जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रूप आनंदी आनंद सांठवे ।। ३॥ बापरखुमादेविवरू सगुण - निर्गुण । रूप विटेवरी दाविली खूण ॥४ ॥ 


            ५७८. वाराणशी यात्रे जाईन । प्रयाग तीर्थ पाहीन । त्रिवेणिये स्नान करीन । परि मी वीट नव्हेन।।१ ।। विठोबा पाईंची वीट । मी कई बा होईन॥धृ .॥ गोदावरी यात्रे जाईन । बारा वरुषांचें फळ लाहीन । अब्जकतीर्थी स्नान करीन । परि मी वीट नव्हेन ॥२ ॥ मल्लिकार्जुन यात्रे जाईन । श्रीशैल्य शिखर पाहीन । पाताळगंगें स्नान करीन । परि मी वीट नव्हेन ।।३ ।। मातापुर यात्रे जाईन । सह्याद्री पर्वत पाहीन । गहनगंगें स्नान करीन । परि मी वीट नव्हेन।।४ ।।  कोल्हापुरी यात्रे जाईन । महालक्ष्मी पाहीन । विशाळतीर्थी स्नान करीन । परि मी वीट नव्हेंन ॥५ ॥ एका अंगुष्टी तप करीन । पृथ्वी पात्रचि लाहीन । देह कर्वती देईन । परि मी वीट नव्हेन।।६ ।। बहुता पुण्यांच्या सायासी । चरण जोडलें विटेसी । निवृत्तिदासु म्हणे परियेसी । परि मी वीट नव्हेन ॥७ ॥ 


            ५७९. तूं माझा स्वामी मी तुझा रंक । पाहतां न दिसे वेगळीक ॥१ ॥ मी तूं पण जाऊं दे दुरी । एकचि घोंगडें पांघरूं हरि ॥२ ॥ बापरखुमादेवीवरा विठ्ठलु राया । लागेन मी पायां वेळोवेळा ॥३ ॥ 


            ५८०. निरखित निरखित गेलिये । पाहें तंव तन्मय जालिये।।१ ।। उन्मनी मन निवालें । सावळे परब्रह्म भासलें ॥२ ॥ रूप येवोनियां डोळां बैसलें । पाहें तंव परब्रह्म अवतरलें ॥३ ॥ बापरखुमादेवीवरें विठ्ठलें । मुस तू ओतूनिया मेण सांडिलें ॥४ ॥ 


            ५८१. अंडज जारज स्वेदज उद्भिज आटे । हरिनाम नाटे रें बरवें ॥।॥ नाटे तें नाम चित्तीं । रखुमादेवीपति श्री विठ्ठलाचे ॥२ ॥ शरीर आटे संपत्ति आटे । हरिनाम नाटे तें बरवें ॥३ ॥ बापरखुमादेवीवराचें नाम नाटे । युगें गेली परि उभा विटें ।। ४ ॥


             ५८२. नाम प्रल्हाद उच्चारी । तयां सोडवी नरहरी । उचलूनि घेतला कडियेवरी । भक्त सुखें निवाला।।१ ॥ नाम बरवया बरवंट । नाम पवित्र आणि चोखट । नाम स्मरें निळकंठ । निजसुखें निवाला।।२ ।। जे धुरुसी आठवलें । तेचि उपमन्य घोकिलें । तेचि गजेंद्र लाधलें । हित जालें तयांचें।।३ ।। नाम स्मरें अजामेळा महापातकी चांडाळ । नामें जाला सोज्वळ । आपणासहित निवाला || ४ || वाटपाडा कोळिकु । नाम स्मरें तो वाल्मिकु । नामें उद्धरिलें तिन्ही लोकु । आपणासहित निवाला।।५ ॥ ऐसें अनंत अपार । नामें तरलें चराचर । नाम पवित्र आणि परिकर । रखुमादेवीवराचें।।६ ।। 


            ५८३. आपुलेनि भारे श्रीरंग डोलत गेले । तंव अवचितें पाचारिलें पाठिमोरें || शा चैतन्य चोरिलें माझें चैतन्य चोरिलें । अवघे पारुषलें दीन देह।।२ ।। बापरखुमादेवीवरु दीनानाथ भेटला । विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा ॥३ ॥ 


            ५८४. अशौचिय जपों नये । आणिकातें ऐको नये । ऐसिया मंत्रातें जग बिहे । त्याचें फळणे थोडे परि क्षोभणे बहु तैसा मंत्रराज नव्हे रे ॥१ ॥ नारायण नाम नारायण नाम । नारायण नाम म्हणकारे ।।धृ .॥ बाह्या उभारावी त्यावरी काहाळ लावावी । गातिया ऐकतिया उणीव येवों ने दावी । उत्तमापासूनि अंत्यजावरी । मुक्तीची सेज मागावीरें ॥२ ॥ काय करेल योगें न शिणावें योगें । हे तो व्यसनचि वाउगें । नरहरि नरहरि उदंड वाचा म्हणाल तरी । कळिकाल राहेल उगेरे रे ॥३ ॥ चरणीं गंगा जन्मली अहिल्या उद्धरली । नामें प्रतिष्ठा पावली गिरिजा । सकळिका साधना वरिष्ठ हें नाम । मा मनीं भाव न धरी दुजा रे रे ॥४ ॥ तीर्थी भजिजाल अमरी पूजिजाल । तुमचिया तुमचा प्राणवई म्हणतां नलजै गाया । भावासारिखा देवो होईल । बापरखुमादेवीवरु विठ्ठलू ।


             ५८५.कर्म आणि धर्म आचरिजे जयालागीं । साधक शिणले साधन साधितां अभागीं ।। १ ।। गोड तुझें नाम विठो आवडतें मजा दुजें उच्चारितां मना वाटतसे लाज ॥२ ॥ भुक्ति आणि मुक्ति नामापासीं प्रत्यक्षा चन्ही वेद साही शास्त्रे वदताती साक्ष ॥३ ॥ बापरखुमादेवीवरा तुझी आण । काया वाचा चित्त चरणीं डुललें गहाण ॥४ ॥


             ५८६. जे शंभूनें धरिलें मानसी । तेचि उपदेशिलें गिरजेसी ॥१ ॥ नाम बरवें बरवें । निज मानसीं धरावें ॥२ ॥ गंगोदकाहूनि निकें । गोडी अमृत जालें फिकें ॥३ ॥ सीतळ चंदनाहूनि वरतें । सुंदर सोनियाहूनि परतें ॥४ ॥ भक्तिमुक्तिदायक । भवबंधन मोचक ॥५ ॥ बापरखुमादेवीवरें । सुलभ नाम दिधलें सोपारे ॥६ ॥ 


            ५८७. उपजोनी संसारी आपुला आपण वैरी । मी माझे शरीरी घेऊनि ठेला । या देहातें म्हणे मी पुत्र दारा धन माझें । परि काळाचें हें खाजें ऐसें नेणतु गेला ॥१ ॥ कामक्रोधमदमत्सराचेनि गुणें । बांधला आपण नेणें भ्रमित जैसा । मिथ्या मोह फांसा शुक नळिके जैसा । मुक्त परि अपैसा पळों नेणे ॥२ ॥ जळचरु आमिष जैसा कां लागलासे गली । आपणपें तळमळी । सुटिका नाहीं तैसें आरंभी विषयसुख गोड वाटे इंद्रियां । फळपाकी पापिया दुःख भोगी ॥३ ॥ राखोंडी कुंकितां दीप न लगे जयापरी । तैसा शब्द ब्रह्मकुसरी ज्ञान अन पवे । व्रत तप दान तीर्थ भजन वेचिलें । पोटा दंभाच्या खटपटा शिणतु गेला ॥४ ॥ मृगजळाची नदी दुरूनि देखोनी धांवें । परी गंगोदक न पवे तन्हेला जैसा । तैसें विषयसुख नव्हेचि हित । दुःख भोगितो बहुत परि सावधान नव्ह।।५ ।। परतोनि न पाहे धांवतो सैरा । करितो येरझारा संसारींच्या । ज्ञानदेव म्हणे बहुतां जन्मांचा अभ्यासु । तरीच होय सौरसु परब्रह्मीं ।६ ।।


             ५८८. कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांसी कां दिलीं वागुली रे।।धृ ० ॥ स्वगत सच्चिदानंदे मिळोनी शुद्धसत्त्वगुण विणली रे । षड्गुण गोंडे रत्नजडित तुज श्यामसुंदरा शोभली रे ॥१ ॥ काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतांनी विणली रे । रक्त रेत दुर्गंधी जंतु नरक भुताने भरली रे।।२ ।। षड्विकार षड्वैरी मिळोनी तापत्रयाने विणली रे । नवा ठायीं जी फाटूनि गेली ती त्वां आम्हांसि दिधली रे ॥३ ॥ ऋषी मुनी घ्यात मुखीं नाम गातां । संदेहवृत्ती विरली रे बापरखुमादेविवरू विठ्ठलें त्वत्पदी वृत्ति मुरली रे ॥४ ॥ 


            ५८९ . निमीष नलगे मन वेधितां । येवढी तुझी स्वरूपतां ॥१ ॥ विठोबा नेणों कैसी भेटी । उरणे नाहीं जीवेसाठीं ॥२ ॥ उरलें उपाधी कारणें । ते त्वा नेमिलें दरुशनें ।।३।। निवृत्तिदास वेगळे ।  सांगावया नाही उरलें ।।४।।


            ५९०.आकार स्थूल नाशिवंत । हे तरी जाईल भूमि आंत । तयावरी हरि चालत । तेणें होईल कृतकृत्य ॥१ ॥ देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो॥धृ .॥ दुजा गुण आपी मिळें । तरी मी होईन गंगाजळें । हरि अभिषेक अनुदिनीं । सुखें सर्वागावरी खेळे ॥२ ॥ तिजा गुण तेजरूप । तरी मी होईन महादीप । हरिरंगणी दीपमाळा । दीप उजळीन समीप ॥३ ॥ वायु व्यापक चौथा गुण । तरी मी विजंणा होईन । हरि अष्टांगें निववीन मना । ऐशा दृढ धरिन खुणा ॥४ ॥ आकाश पांचवा गुण । तरी मी प्रासादी राहेन बापरखुमादेविवरा अखंड तुझे अनुसंधान।।५ ।। 


            ५९१ . काय करिसी सकळ देवांचे वैभव विलासामाझिया स्वामीविण ते अवघे उदद्धसरया ॥१ ॥ तपन त्या कमळा कमळी विकासु । सुकवि मयंकु काय करिसी अरे वा सुधांसु ॥२ ॥ साताही वारांचे दिवसु एकियाची सुरिजे । तैसें सर्वी सर्वपण माजीये न श्रीराजे ॥३ ॥ सर्वज्ञ सुंदर देव होतु का भलतैसें । परि जडातें चेष्टविते आणिकां पैं नसे ॥४ ॥ जया नांव नाहीं रूप चिन्ह कांही । नामरूप चिन्ह स्वयेंचि पाही।।५ ।। बापरखुमादेविवरू आहे तैसाचि पुरे । काय करिसी आणिकां देवांची गोवारें रया ॥६ ॥ 


            ५९२.कुंचे पताकांचे भार । आले वैष्णव डिंगर | भेणे पळती यम किंकर । नामें अंबर गर्जतसे ॥शाआले हरिदासांचें थाट । कळीकाळा नाही वाट । विठ्ठलनामें करिती बोभाट भक्ता वाट सापंडली ॥शाटाळ घोळ चिपळिया नादादिंडी पताका मकरंद । नाना बागडीयाचे छंद । कवच अभेद नामाचें ।॥ ३ ॥ वैष्णव चालिले गर्जत । महावीर ते अद्भुत । पुढे प्र यमदुत पळत ।पुरला अंत महा दोणां ॥ ४॥निवृत्ति - संत हा सोपान । महावैष्णव कठीण ।मुक्ता बाई तेथों आपण । नारायण जपतसे ॥ ५॥ ज्ञानदेव ब वैष्णव मोठा । विट्ठलनामें मुक्त पेठा । स्नानदान घडे पि श्रेष्ठा । वैकुंठवाटा संत गेले ॥६ ॥


             ५९३.उंच पताका झळकती । टाळ मृदंग वाजतीं । आनंदें प्रेमें गर्जती । भद्र जाती विठ्ठलाचें ।। १॥ आले हरीचे विनट । वीर विठ्ठलाचे सुभट । भेणें जाहलें दिक् पट । पळती थाट दोषांचे ।। २ ॥ तुळसीमाळा शोभती कंठीं । गोपीचंदनाच्या उटी । सहस्त्र विघ्ने लक्ष कोटी । बारा वाटा पळताती ॥ ३॥ सतत कृष्णमूर्ति सावंळी । खेळे ज्यांचे हृदयकमळीं । शांति क्षमा तया जवळीं । जीवें भावें अनुसरल्या ।। ४ ॥ सहस्त्र नामाचें हतियार । शंखचक्राचे शृंगार । अतिबळ वैराग्याचे थोर । केला मार षड्वर्गा ।। ५। ऐसे ऐकांग वीर विठ्ठलरायाचें डिंगर ।बापरखुमादेवीवर । तिहीं निधारी जोडिला ॥ ६ ॥ 


            ५९४.पूर्वजन्मीं सुकृतें थोर केली । ती मज आजि फळासीं आलीं ॥ १ || परमानंदु आजि मानसीं । भेटी झाली या संतासीं ।। २ ।। मायबाप बंधु सखे सोयरे । यांतें भेटावया मन न धरे ।। ३॥ एकएका तीर्थाहूनी आगळें । तयामाजी परब्रह्म सांवळे ।। ४ ॥ निर्धनासी धनलाभु झाला । जैसा अचेतनी प्राणु प्रगटला ॥ ५॥ वत्स विघडलिया धेनु भेटली । जैसी कुरंगिणी पाडसा मीनली ।। ६ ।। हे पियुषा परते गोड गाटत । पंढरीरायाचे भक्त भेटत ।। ७ ॥ बापरखुमादेवीवरू विठ्ठलें । संत भेटता भनदुःख फिटलें ।॥ ८ ॥ 


            ५९५.आनंदले वैष्णव गर्जती नामें । चौदाही भुवनें भरली परब्रह्मे ॥ १॥ नरो हरी हरी नारायणा । सनकसनंदनमुनिजनवंदना ॥२ ॥ गातां वातां नाचतां प्रेमें उल्हासें । चराचरीचे दोष नाशिले अनायासे।।३ ।। हरि मनीं हरि चित्तीं हरि अंकु शरीरीं । तयातें देखोनि हरि चाही बाहा पसरी ।। ४ ।। अंध्रिरेणु ज्याचा उद्धरितो पतिता । प्राकृत वाणी के वि वणु हरिभक्तां ॥५ ॥ तीर्थी पावन जिंहीं धर्म केला धडौती । कैवल्य कल्पद्रुम ते त्रिजगतीं ॥ ६॥ मत्स्यकूर्मादिक ज्याचे महिमेसी आले । धन्य वैष्णव तेज रविशशिसीं पाहिले ॥ ७॥ बापरखुमादेवीवरा पढयंति जया तनु । तया संतचरणी स्थिर हो कां मनु ।। ८ ॥


             ५९६. पन्नास अक्षरी करिसी भरोवरी । शेखीं तुझें तोंड तुज वैरी रया ।।१।। या परी नामाची वोल  हे मांडूनि । दवडूनि घाली परता ॥२ ॥ रकारापुढे एक मकार मांडी कां । उतरसी सम तुका शंभुचिया ॥३ ॥ बापरखुमादेवीवरा विठ्ठल हृदयी । आपुली आण वाही त्रिभुवनीं रया ॥४ ॥ 


            ५९७. दोही बाही संतांची सभा । सिंहासनी उभा श्री विठ्ठल ॥१ ॥ गाती नारद तुंबर प्रेमें । हरीची नामें गर्जती ॥२ ॥ बापरखुमादेवीवरु विठ्ठलु उभा । त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥३ ॥ 


            ५९८ . दीप दीपिका शशी तारा होतु का कोटीवरी रे । परि न सरे निशी नुगवे दिवसु दिनकरनाथे जयापरी रे ॥ १॥ नुद्धरिजे नुद्धरिजे नुद्धरिजेगोपाळेविण  नुद्धरिजे ॥ २॥ नगर भ्रमतां जन्म जावो परि प्रवेशु = एक्या द्वारें रें । तैसे यजिजो भजिजो पूजिजो परि उकलु नंदकुमरू रे ॥ ३॥ सर्वावयवी शरीर सांग परि विरहित एका जीवें रे । तैसा धिक् तो श्रोता धिक् तो वक्ता जो वाळिला विठ्ठलदेवे रे ॥ ४॥ गळित शिर हे कलेवर उदकेविण सरिता भयंकर रे । रविशशिवीण अंबर तैसें हरिविण जिणे असार रे ।। ५॥ अंत : करणी रूक्मिणीरमणु परि त्या श्वपचाहि बंधन न घडे न घडे रे । येरू यति होका भलतैसा परि तो भव आघाडिहूनी न सुटे न सुटे न सुटे रे ॥ ६॥ शिखीपक्षी पत्री डोळे जेवी अकाली जळद पटल रे । तैसी गोकुळपाळकबाळेंविण कर्मे सकळे विफळे रे ॥ ७ ॥ यम नियम प्राणायम प्रत्याहार हे सकळ उपाय परि अपाय । जव तमाळनीळ घन सावळा हृदयीं ठाण | मांडूनी न राहे रे ।। ८॥ मी उत्तम पैलहीनु भूती द्वेषाद्वेष ठेले रे । केलेनि कर्मे उफकां निफजे सुख तें दुरी ठेले २॥ ९ ॥ आतां असोत हे भेदाभेदा आम्ही असो एक्या बोधे रे । बापरखुमादेवीवर विठ्ठल । निवृत्ति मुनिराय प्रसादे रे ।। १० ॥ 


            ५९९.ये सातें आलिया वोळंगा सारंगधरू । नाहीं तरि संसारू जाईल रया।॥१ ॥ कवणाचें मायबाप कवणाचें गणगोत । मृगजळवत् जाईल रया।।२ ।। विषयाचें समसुख बेगडाची बाहुली । आभ्राची साउली जाईल रया ॥३ ॥ ज्ञानदेव म्हणे पाहतां पाहिले । स्वप्नीचें चेईले जाईल रया ॥४ ॥ 

hgj` 

            ६००.श्रीगुरू सारिखा असतां पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ॥ १॥ राजयाची कांता काय भीक मागे । मनाचिये जोगे सिद्धि पावे ।। २ ॥ कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला । काय वाणु त्याला सांगि जो जी ॥ ३॥ ज्ञानदेव म्हणे तरलो तरलों । आता उद्धरलों गुरुकृपे ॥ ४ ॥


 -/श्री संत तुकाराम महाराजांचे अभंग \-

( Shree Sant Tukaram Maharajanche Abhang ) 

             ६०१.आपुला तो एक देव करूनि घ्यावा । तेणेंवीण जीवा सुख नव्हे।।१॥येर ती मायिकें दुःखाची जनितीं । नाहीं आदि अंती अवसानी॥२॥अविनाश करी आपुलिया ऐसें । लावीं मना पिसे गोविदाचें ॥३ ॥ तुका म्हणे एका मरणेंचि सरे।उत्तमचि उरे कीर्ति मागें ॥४ ॥

             ६०२. हेचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१ ॥ ठेविले अनंतें तैसेचि रहावें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥२ ॥ वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥३ ॥ तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवापायीं ॥४ ॥

             ६०३.ब्रह्मरस गोडी तयासी फावली । वासना निमाली समूळ ज्याची ।। १ ।। नाहीं त्यां विटाळ अखंड सोवळा । उपाधी वेगळा जाणिवेच्या ।। २ ।। मन हें निश्चल जालें एके ठायीं । तया उणें काय निजसुखा ॥ ३॥ तेचि पुण्यवंत तेचि पर उपकारी । प्रबोधी त्या नारी नरलोकां ॥ ४॥ तुका म्हणे त्याचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन तेथें ।। ५ ।।

             ६०४. याजसाठी केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा।।१ ॥ आतां निश्चितीने पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२ ॥ कवतुक वाटे झालिया वेंचाचें । नाम मंगळाचें तेणें गुणें ॥३ ॥ तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥४ ॥

             ६०५. सदा नामघोष करूं हरिकथा । तेणें सदा चित्ता समाधान ॥१ ॥ सर्वसुख ल्यालो सर्व अलंकार । आनंदें निर्भर डुल्लतसो॥२॥असों ऐसा कोठे आठवचि नाहीं । देहींच विदेही भोगू दशा ॥३ शातुका म्हणे आम्ही झालों अग्निरूप । लागों नेदूं पापपुण्य अंगा ॥४ ॥ 

            ६०६. आम्ही तेणें सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखीं॥१॥तुमचें येर वित्त धन । तें मज मृत्तिकेसमान २॥ कंठी मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ॥३ ॥ म्हणवा हरीचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥४ ॥

             ६०७. घेई घेईं माझें वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१ ।। तुम्ही घ्यारे डोळे सुखापहा विठोबाचें मुख ॥२ ॥ तुम्ही आइकारे कान । माझ्या विठोबाचे गुण।।३ ॥ मना तेथें धांव घेईं । राहें विठोबाचे पायीं ॥४ ॥ तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥५ ॥ 

            ६०८.विषयी विसर पडिला निःशेषाअंगीं ब्रह्मरस ठसावला ॥१ ॥ माझी मज झाली अनावर वाचा।छंद या नामाचा घेतलासे ॥२ ॥ लाभाचिया सोसें पुढे चाली मना।धनाचा कृपणा लोभ जैसा ॥३ ॥ तुका म्हणे गंगासागरसंगमीं।अवघ्या झाल्या उर्मिक एकमय ॥४ ॥ 

            ६०९ . प्रारब्धेचि जोडें धन । प्रारब्धेचि वाढे मान।।१।।सोस करिसी वांयां भजे मना पंढरीराया ॥२॥प्रारब्धंचि होय सुखाप्रारब्धेचि पावें दुःख ॥३ ॥ प्रारब्धेचि भरे पोट । तुका करीना बोभाट ॥४ ॥ 

            ६१०.आम्ही वैकुंठासी।आलों याचि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावें वर्ताया॥१॥झाडू संतांचे मारग । आडरानी भलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरला तो से।।२ ॥ अर्थे लोपली पुराणें । नाश केला शब्दज्ञानें । विषयलोभी मनें । साधन हे बुडविलीं ॥३ ॥ पिटूं भक्तीचा डांगोरा । कळिकळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदें ॥४ ॥ 

            ६११.आले देवाचिया मना । तेथें कोणाचें चालेना।।शा हरिश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबाघरी पाणी ॥२ ।। पांडवांचा साहाकारी । राज्याहूनि केले दुरी॥३॥तुका म्हणे उगेचि राहा । होईल तें सहज  पाहा।।४ ।।             

            ६१२.म्हणऊनि शरण जावें।सर्वभावें देवासी।।१ ॥ तो हा उतरील पार । भवदुस्तर । नदीचा ॥२ ॥ बहु आहे करुणावंत । अनंत हे नाम य ज्या।।३।।तुका म्हणे साक्षी आले । तरी केले प्रगट ॥४ ॥ 

            ६१३.कारे प्रेमें मातलासे । उभे केलें विठ्ठलासी।।१ ।। ऐसा कैसा रे तूं धीट । मागें भिरकावली वीट॥२॥युगे झाली अठवीस।अजुनी न म्हणसी के बैस॥३॥भावदेखोनि निकटादेवें सोडिले वैकुंठ ॥४ ॥ तुका म्हणे पुंडलिका।तूंचि भक्त बळिया निका ॥५ ॥ 

            ६१४. भक्ति प्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी।॥१ ॥ आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्तिसुख दुर्लभ त्यां ॥२ ॥ तुका म्हणे कृपा करील नारायण । तरिच हे वर्म पडे ठावे ॥३ ॥ 

            ६१५.काळ सारावा चिंतनें । एकान्तवासी गंगासानें । देवाचे पूजनें । प्रदक्षिणा तुळसीच्या ।। || युक्त आहार विहार । नेम इंद्रियासी सारा नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥ २॥ परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जनत । हे उपाय लाभाचे ॥ ३॥ देह समर्पिजे देवा । भार कांहींच न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥ ४ ॥ 

            ६१६.तरीच जन्मा यावें । दास विठोबाचें  व्हावे ॥१ ॥ नाही तरी काय थोडी । श्वान सुकरें बापुडीं ॥२ ॥ ज्याल्याचे ते फळ । अंगी लागो नेदी मळ।।३।।तुका म्हणे भले । ज्याच्या नांवें मानवलें ॥४ ॥ 

            ६१७.शांतीपरते नाही सुख । येर अवघेचि दुःख ॥शा म्हणऊनि शांती धरा । उतराल पैल तीरा ॥२ ॥ खवळलिया कामक्रोधी । अंगी भरती आधीव्याधी ॥३ ॥ तुका म्हणे त्रिविध ताप । मग जाती अपोआप ॥४ ॥ 

            ६१८. आलियां भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ॥१ ॥ मग तो कृपासिंधू निवारी सांकडें । येर तें बापुडे काय रंक।।२ ।। भयाचिये पोटीं दुःखाचिया रासी । शरण देवासी जातां भले ॥३ ॥ तुका म्हणे नव्हे काय त्या करितां चिंतावा तो आतां विश्वंभर ॥४ ॥ 

            ६१९ . साठविला हरि । जीही हृदयमंदिरीं ।। १ ॥ त्याची सरली येरझार । जाला सफळ व्यापार।।२ ।। हरि आला हाता । मग कैची भय चिंता ॥३ ॥ तुका म्हणे हरी । कांहीं उरों नेदी उरी ॥४ ॥ 

            ६२०. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हे वर्म चुको नये ॥१ ॥ निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२ ॥ तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणी ॥३ ॥ 

            ६२१.भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त । १॥ तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ।। २॥ आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ।। ३ ॥ मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा ।। ४॥ वेची तें वचन । जेणें राहे समाधान ॥ ५॥ तुका म्हणे फार । थोडा तरी परउपकार ॥ ६ ॥ 

            ६२२.घेउनियां चक्र - गदा । हाचि धंदा करितो ॥ १॥ भक्ता राखे पायांपासीं । दुर्जनांसी संहारी ॥ २ ॥ अव्यक्त तें आकारलें । रूपा आलें गुणवंत ।। ३ ॥ तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥४ ॥

             ६२३.सत्य संकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१ ॥ येथें अलंकार शोभती सकळ । भावबळे फळ इच्छेचे तें ॥ २॥ अंतरीचें बीज जाणे कळवळा । व्यापक सकळां ब्रह्मांडाचा ॥ ३॥ तुका म्हणे नाही चालत तांतडी । प्राप्तकाळ घडी आल्याविण ॥ ४ ॥ 

            ६२४.अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥ १॥ देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ २॥ आपुल्याच वैभवें । शृंगारावे निर्म ।। ३॥ तुका म्हणे जेवीं सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥४ ॥ 

            ६२५.आनंदाच्या कोटी । सांठवल्या आम्हां पोटी प्रेमा चालिला प्रवाहो । नाम ओघ लवलाहो ॥२ ॥ अखंड खंडेना जीवन । रामकृष्ण नारायण।।३ ॥ धडी अहिक्य परत्र । तुका म्हणे समे ती ॥४ ॥ 

            ६२६. गाढवाचें ताने । पालटते क्षणक्षणे || १ || तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन।।२ ।। उपजतां बरे दिसे । रूप वाढतां तें नासे ॥३ ॥ तुका म्हणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥४ ॥

             ६२७. एका बीजा केला नास । मग भोगिलें कणीस॥शा कळे सकळां हा भाव । लहान थोरांवरी जीव।।२।।लाभ नाहीं फुकासाठी।के ल्याविणा जीवासाठी ॥३ ॥ तुका म्हणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥४ ॥ ॥

             ६२८. आधळ्यासि जन अवघेचि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१ ॥ रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२ ॥ तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघे खोटें ॥३ ॥

            ६२९ . पडतां जड भारी । दासी आठवावा हरि ॥१ ॥ मग तो होऊं नेदी शीण । आड घाली सुदर्शन।।२ ॥ नामाच्या चिंतनें । बारा वाटा पळती तुका म्हणे प्राण । करा देवासी अर्पण ॥४ ॥ 

           ६३०.मी अवगुणी अन्यायी । किती म्हणान सांगो काई । आतां मज पायीं । ठाव देई विठ्ठलें ॥१ ॥ पुरे पुरे हा संसार । कर्म बळिवंत दुस्तर । राहो नेदी स्थिर । एके ठायीं निश्चळ ॥२॥अनेक बुध्दीचे तंरंग | क्षणक्षणा पालटती रंगाधरु जातां संग । तंव तो होतो बाधक ।। ३॥ तुका म्हणे आतां । अवघी तोडी माझी चिंता । येऊनी पंढरीनाथा । वास करी हृदयीं ॥४ ॥

             ६३१. कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तोची श्वान । वायां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ।।१ ।। त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार । झाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसी ॥२ ॥ अखंड अशुभ वाणी । खरें न बोलेचि स्वप्नीं । पापी तयाहूनि । नाहीं आणिक दुसरा ॥३ ॥ पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला । पाठी लागे आल्या । अतिताचे दारासी ॥४ ॥ कांहीं संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण । यमाचा आंदण । शीण थोर पावेल ॥५ ॥ तुका म्हणे त्यांनी । मनुष्यपणा केली हाणी । देवा विसरूनि । गेली म्हणती मी माझें ॥६ ॥

             ६३२. रंगी रंगेरें श्रीरंगें।काय भुललासी पतंगें॥१॥शरीर जायाचें ठेवणें । धरिसी अभिळास झणे।।२।।नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर॥३॥अंतकाळींचा सोयरा । तुका म्हणे विठो धरा ॥४ ॥

             ६३३. सेवितों हा रस वाटितों आणिकां । ध्यारें होऊ नका रानभरी ॥१ ॥ विटेवरी ज्याची पाउलें समान । तोचि एक दानशूर दाता ॥२ ॥ मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धि याचे पायीं ॥३ ॥ तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप।।४ ॥

             ६३४. मायबापें जरी सीण की बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ।।१ ।। चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥२ ॥ तुका म्हणे नरकीं घाली अभिमान । जरी होय ज्ञानगर्व ताठ ॥३ ॥ 

            ६३५. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र ही न खाती सर्प तया ॥१ ॥ विष तें अमृत आघात तें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥२ ॥ दुःख तें देईल सर्व सुख फळा होतील शीतळ अग्निज्वाळा ॥३ ॥ आवडेल जीवां जीवाचिये परी । सकळां अंतरी एक भाव।।४ || तुका म्हणे कृपा केली नारायणे । जाणिजेते येणें अनुभवें ॥५ ॥ ' 

            ६३६.नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥१ ॥ हेचि शूरत्वाचे अंग । हरी आणिला श्रीरंग ॥२ ॥ अवघा जाला पण । लवण सकळां करण।।३ ।। तुका म्हणे पाणी । पातळपणे तळां खणी ॥४ ॥ 

            ६३७. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ।।१ ।। आइकाजी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥२ ॥ कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचें ॥३ ॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥४ ॥

             ६३८.चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥१ ॥ देखवी ऐकवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नको ॥२ ॥ माणसाची देव चालवी अहंता । मीचि एक कर्ता म्हणों निया ॥३ ॥ वृक्षाचेहि पान हाले ज्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठे E ॥४ ॥ तुका म्हणे विठो भरला सबाही । तयाउणें काय आहे चराचरी ॥५ ॥

             ६३९ . निर्वाहापुरतें अन्न आच्छादन । आश्रमासी स्थान कोंपी गुहा ॥१ ॥ कोठें ही चित्तासी  नसावें बंधन । हृदयीं नारायण सांठवावा ॥२ ॥ नये बोलों फार बैसों जनामधीं । सावधान बुद्धी इंद्रियें दमी ॥३ ॥ तुका म्हणे घडी घडीने साधावी । त्रिगुणांची गोवी उगवूनि ॥४ ॥ 

             ६४०. गुणा आला विटेवरी । पीतांबरधारी सुंदर ॥१ ॥ डोळे कान त्याच्या ठायीं । मन पायीं राहो हैं।॥२॥निवारोनी जाय माया।ऐसी छाया जगाची॥शातुका म्हणे समध्यान । ते हे चरण सकुमार ॥४ ॥ 

            ६४१.कन्या सासुऱ्यासी जाये।मागे परतोनी पाहे ॥१ ॥ तैसें जालें माझ्या जिवा।केव्हां भेटसी के शवा।।२॥चुकलिया मायाबाळा हुरू हुरू । पाशाजीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी ॥४ ॥ 

            ६४२.येउनि संसारी।मी तो एक जाणे हरी ॥१ ॥ आणिक कांहीं नेणें धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा॥२॥कामक्रोधलोभस्वार्थ।अवघा माझा । पंढरिनाथ॥शातुका म्हणे एकाधणी विठ्ठल मी सेवक ॥४ ॥ 

            ६४३. आम्हीं नामाचे धारक । नेणों प्रकार आणीक । सर्व भावें एकाविठ्ठलचि प्रमाण ॥१ ॥ पा न लगे जाणावें नेणावें । गावें आनंदें नाचावें ।  प्रेमसुख घ्यावें ।  वैष्णवांचे संगती।।२ ।। भावबळे घालूं कास । लजा चिंता दवडूं आस । पायीं निजध्यास । म्हणवू दास विष्णूचे ॥३ ॥ भय नाहीं जन्म घेतां । मोक्षसुखा हाणों लाता । तुका म्हणे सत्ता । करूं निकट सेवेची ॥४ ॥ 

             ६४४ . आतां तरी पुढे हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१ ॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥२ ॥ हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन शुद्धभावे ।।३ ।। तुका म्हणे लाभ होय तो व्यापार | करा काय फार शिकवावें ॥४ ॥ 

            ६४५. सकळांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणी ठेवीतसें ॥१ ॥ अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥२ ॥ फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तव हामाल भारवाही ॥३ ॥ तुका म्हणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥४ ॥

             ६४६. देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥शामी तों सांगतसें भावें । असो ठावें सकळां ॥२ ॥ निराकारी ओस दिशा । येथें इच्छा पुरतसे ॥३ ॥ तुका म्हणे रोकडे केणें । सेवितां येणे पोट धाय ॥४ ॥ 

            ६४७.आणीक दुसरे मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासुनियां ॥१ ॥ पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं । जाग्रतीं स्वप्नी पांडुरंग ॥२ ॥ पडिलें वळण इंद्रियां सकळां भाव तो निराळा नाहीं दुजा॥३॥तुका म्हणे नेत्री केली ओळखणा | तटस्थ हे ध्यान विटेवरी ॥४ ॥ 

            ६४८.हरि हरि तुम्ही म्हणा रे सकळातेणें मायाजाळ तुटईल ॥१ ॥ आणिक नका पडू गाबाळाचे भरी।आहे तिथे थोरी नागवण।।२ ॥ भावें तुळसीदळ पाणी जोडा हात । म्हणावे पतित वेळोवेळां ॥३ ॥ तुका म्हणे हा तंव कृपेचा सागर । नामासाठी पार पावतील ॥४ ॥ 

            ६४९.आतां उघडी डोळे । जरी अद्यापि न कळे ।तरी मातेचिया खोळे । दगड आला पोटासि ॥१ ॥ मनुष्यदेह ऐसा निध । साधिल ते साधे सिद्ध करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥२ ॥ नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारी ।कट धरूनियां करीं ।उभाउभी पालवी ॥३ ॥ तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातलीया मिठी ।होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥४ || 

            ६५०. पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥१ ॥ तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजे॥२॥सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेंसी॥३॥तुका म्हणे बाळ मातेपुढे नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥४ ॥ 

            ६५१.पतिव्रतें जैसा भ्रतार प्रमाण । आम्हा नारायण तैशापरी ॥१ ॥ सर्वभावें लोभ्यां आवडे हे धन । आम्हां नारायण तैशापरी ॥२ ॥ तुका म्हणे एकविध जाले मन । विठ्ठलावांचून नेणें दुजें ॥३ ॥

             ६५२.कास घालोनी बळकट झालों कळिकाळावरी नीटाकेली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥१ ॥ या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥२ ॥ कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथे जमे । लाविले दमामे । मुक्त आणि मुमुक्षा ॥३ ॥ एकंदर शिक्का । पाठविला येहीलोका।आलों म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥४ ॥ 

            ६५३.आणिकांची स्तुति आम्हां ब्रह्महत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा॥१॥आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणों या देव आणिकांसि ॥२ ॥ शतखंड माझी होईल रसना।जरी या वचना पालटेन।।३।।तुका म्हणे मज आणिका संकल्पें । अवघींच पा घडतील ॥४ ॥ 

            ६५४.आम्हासाठी अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥१ ।। मोहें धांवे घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणाशाकोठे न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ॥३ ॥ सुख ठेवी आम्हासाठीं । दुःख आपणची घोंटी ॥४ ॥ आम्हां घाली पाठीकडे । आपण कळिकाळाशी भिडे ॥५ ॥ तुका म्हणे कृपानीधी । आम्हां उतरी नावेमधीं ॥६ ॥ 

            ६५५ .. संसार तापे तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥१ ॥ म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥२ ॥ बहुतां जन्मींचा जालों भारवाही । सुटिजे हे कांहीं वर्म ठावें ॥३ ॥ वेढियेलों चोरी अंतर्बाह्यात्कारी । कणव न करी कोणी माझी ॥४ ॥ बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिस झालों कासाविस ॥५ ॥ तुका म्हणे आतां धांव घाली वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीनानाथा ॥६ ॥ 

            ६५६..जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥१ ॥ उत्तमचि गति तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥२ ॥ परउपकारी नेणे परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ॥३ ॥ भूतदया गाईपशूचें पाळण । तान्हेल्या जीवन वनामाजीं ॥४ ॥ शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचें ॥५ ॥ तुका म्हणे हेंचि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥६ ॥

             ६५७.पवित्र तें अन्न । हरिचिंतनी भोजन ॥१ ॥ येर वेठ्या पोट भरी । चाम मसकाचे परी ॥२ ॥ जेऊया तोचि धाला । हरिचिंतनीं केला काला ॥३ ॥ तुका म्हणे चवी आलें । जें कां मिश्रित विठ्ठलें ॥४ ॥ 

            ६५८. लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१ ॥ ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठिण ॥३ ॥ तुका म्हणे जाण । व्हावें लहानाहुनि लहान ॥४ ॥ 

            ६५९. लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥१ ॥ सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं तेचि ठायीं ॥२ ॥ माझी अल्प हे वासना । तूं तो उदाराचा राणा || ३ || तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥४ ॥

             ६६०.मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांची ॥१ ॥ वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥२ ॥ भस्म दंड नलगे काठी । तीर्थी आटी भ्रमण ॥३ ॥ तुका म्हणे आडकाठी । नाहीं भेटी देवाचे ॥४ ॥ 

            ६६१. हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१ ॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥२ ॥ करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥३ ॥ तुका म्हणे गीतीं गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥४ ॥ 

            ६६२.ठाकलोंसें द्वारीं । उभा याचक भीकारी ॥शामज भीक कांहीं देवा । प्रेमभातुकें पाठवा ॥शायाचकाचा भार । घेऊ नये येरझार ॥३ ॥ तुका म्हणे दान । सेवा घेतल्यावांचून।॥४ ॥ 

            ६६३.दुर्बुद्धि ते मना।कदा नुपजो नारायणा ॥१ ॥ आतां मज ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥२ ॥ उपजला भावो । तुझे कृपे सिद्धी जावो ॥३ ॥ तुका म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥४ ॥ 

            ६६४.फलकट तो संसार । येथे सार भगवंत ॥१ ॥ ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥२ ॥ अवघे निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥३ ॥ तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥४ ॥ 

            ६६५. काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥१ ॥ सर्व- साधनांचे सार । भवसिंधु उतरी पार ॥२ ॥ योगयागतपें । केली तयाने अमुपें ॥३ ॥ तुका म्हणे जपा । मंत्र त्री अक्षरी सोपा ॥४ ॥

             ६६६.देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१ ॥ ऐसें आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥२ ॥ हरिजनासी भेटी । नहो अंगसंग तुटी ॥३ ॥ तुका म्हणे जिणें । भलें संतसंघष्टणें ॥४ ॥

             ६६७. धर्म रक्षावया अवतार घेशी । आपुल्या पाळिसी भक्तजना ॥१ ॥ अंबऋषीसाठीं जन्म सोसियेलें । दुष्ट निर्दाळिले किती एक ॥२ ॥ धन्य तुज कृपासिंधु म्हणतील । आपुला तूं बोल साच करीं ॥३ ॥ तुका म्हणे तुज वर्णिती पुराणें । होय नारायण दयासिंधु ॥४ ॥ 

            ६६८.कामामध्ये काम । कांहीं म्हणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचें ॥१ ।। कळों येईल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळी । रांडापोरें सकळ।।२ ।। जीतां जीसी जैसा तैसा । पुढे आहे रे वोळसा । उगवुनि फांसा । काय करणे तें करीं ॥३॥केलें होतें याचि जन्में । अवघे विठोबाच्या नामें । तुका म्हणे वर्मे । जाणोनियां तरती ॥४ ॥ 

            ६६९.लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥१ ॥ विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥२ ॥ कृष्ण विष्णु हरि गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठींचा ॥३ ॥ सकळांसी येथे आहे अधिकार । कलियुगी उद्धार हरिनामें ॥४ ॥ तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ति । ऐसें बहुताग्रंथीं बोलियेलें ॥५ ॥

             ६७०.फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हाती दूध प्याला ॥१ ॥ भरियेली हुंडी नरसीमेहत्याची । धनाजी चाट्याची सेतें पेरी ॥२ ।। मिराबाईसाठी घेतो विष प्याला । दामाजीचा झाला पडेवार ॥३ ॥ कबिराचे मागी विणूं लागे शेले । मूल उठविलें कुंभाराचें ॥४ ॥ आतां तुम्ही दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां वेळोवेळां ॥५ ॥ 

            ६७१.जन हे सुखाचें दिल्याघेतल्याचें । अंत में काळींचें नाहीं कोणी ॥१ ॥ जाल्या हीन शक्ति नाकडोळे गळती । सांडोनियां पळती रांडापोरें ॥२ ॥ बाइल म्हणे खर मरता तरी बरें । नासिलें हें घर धुंकोनियां ॥३ ॥ तुका म्हणे माझी नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वांचूनियां ॥४ ॥ 

            ६७२. नाम घेतां उठाउठीं । होय संसारासी तुटी ॥१ ॥ ऐसा लाभ बांधा गांठी । विठ्ठलपायीं पडे मिठी ॥२ ॥ नामापरतें साधन नाहीं । जें तूं करिसी आणिक कांहीं ॥३ ॥ हाकारोनि सांगे तुका । नाम घेतां राहों नका ॥४ ॥ 

            ६७३. दीन आणि दुर्बळांसीं । सुखरासी हरिकथा ॥१ ॥ तारूं भवसागरींचें । उंचनीच अधिकारी ॥२ ॥ चरित्र तें उच्चारावें । केलें देवें गोकुळीं ॥३ ॥ तुका म्हणे आवडी धरीं । कृपा करी म्हणऊनी ॥४ ॥ 

            ६७४. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१ ॥ कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारूं । उतरी पैल तीरू भव नदीचा ॥२ ॥ कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥३ ॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसांवा । वाटे न करावा परता जीवा ॥४ ॥ 

            ६७५. किती वेळां जन्मा यावें । नित्य व्हावें फजीत ॥१ ॥ म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोसी ॥२ ॥ प्रारब्ध हे पाठी गाढें । न सरें पुढे चालता ॥३ ॥ तुका म्हणे रोकडी हे । होती पाहें फजीती ॥४ ॥ 

            ६७६. जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१ ॥ बुका लावू नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥२ ॥ तद्यावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥३ ॥ तुका म्हणे द्रव्य घेती । देती तेही नरका जाती ॥४ ॥ 

            ६७७.कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ॥१ ॥ प्रेमें छंदें नाचे डोले । हारपला देहभाव ॥२ ॥ एकदेशी जीवकळा । हा सकळां सोयरा ॥३ ॥ तुका म्हणे उरला देव । गेला भेव त्या काळें ॥४ ॥ 

            ६७८. इहलोकींचा हा देहे । देव इच्छिताती पाहे ॥१ ॥ धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचे जालों ॥२ ॥ आयुष्याच्या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥३ ॥ तुका म्हणे पावटणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥४ ॥ 

             ६७९ . होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१ ॥ हाचि माझा नेम धर्म । मुखीं विठोबाचें नाम ॥२ ॥ हेचि माझी उपासना । लागेन संतांच्या चरणा ॥३ ॥ तुका म्हणे देवा । हेची माझी भोळी सेवा ॥४ ॥ 

            ६८०. अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं ॥१ ॥ जो हे दूषी हरिची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥२ ॥ याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥३ ॥ तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥४ ॥ 

            ६८१.तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१ ॥ नवविधा काय बोलली जे भक्ती । द्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२ ॥ तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें । उतरेन खरें भवनदी ॥३ ॥

             ६८२.रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥१ ॥ जीवाही आगोज पडती आघात । येऊनियां नित्य नित्य वारू ॥२ ॥ तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळें । अवघीयांचे काळें केलें तोंड ॥३ ॥ 

            ६८३.घेईन मी जन्म याजसाठी देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१ ॥ हरिनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥२ ॥ आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःखा नाहीं चाड आम्हां ॥३ ॥ आणीक सायास न करीं न धरी आस । होईन उदास सर्व भावें ॥४ ॥ मोक्ष आम्हां घरी कामारी ते दासी । होय सांगों ऐसी तुका म्हणे ॥५ ॥ 

            ६८४. धन्य आजि दिन । जालें संताचे दर्शन ॥१ ॥ जाली पापातापा तुटी । दैन्य गेले उठाउठीं ॥२ ॥ जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥३ ॥ तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळीदसरा ॥४ ॥ 

            ६८५.पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास जन्म घेती ॥१ ॥ कर्मधर्म त्याचा झाला नारायण । त्याचे नि पावन तिन्ही लोक ॥२॥वर्णअभिमानें कोण झाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥३॥अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाची पुराणे भाट झालीं ॥४ ॥ वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥५॥कबीर मोमीन लतिफ मुसलमान । सेना न्हावी जाण विष्णुदास ॥६ ॥ कान्होपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरिचे पायीं ॥७ ॥ चोखामेळा बंका जातीचे महार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥८ ॥ नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥९ ॥ मैराळ जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥१० ॥ यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥११ ॥ तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥१२ ॥

             ६८६.कई ऐसी दशा येइल माझ्या आंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे ॥१॥नाठवुनि देह पायांचे चिंतन । अवसान ते क्षण नाहीं मध्ये ॥२ ॥ कई ऐसा पात्र होईन लाभासी । नेणों हृषीकेशी तुष्टईल ॥३ ॥ तुका म्हणे धन्य मानीन संचिता घेईन नित्या नित्य प्रेमसुख ।।४।।

 ६८७.अर्भकाचे साठीं । पंतें हातीं धरिली पाटी ॥१॥तैसे संत जगीं । क्रिया करून दाविती अंगी ॥२ ॥ बाळकाचे चाली । माता जाणूनि पाउल घाली ॥३ ॥ तुका म्हणे नाव । जनासाठी उदकी ठाव ॥४ ॥

             ६८८. बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥१ ॥ नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वाटे खरें ॥२ ॥ विष खावें ग्रासोनासीं । धन्य तोचि एक सोसी ॥३ ॥ तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ॥४ ॥ 

             ६८९.आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१ ॥ कुळी कन्यापुत्र होती जी सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥२ ।। गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥३ ॥ तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥४ ॥ 

            ६९० . धर्माचे पाळण । करणे पाखंड खंडण ॥शाहेंचि आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥२ ॥ तीक्ष्ण उत्तरें । हाती घेउनि बाण फिरें ॥३ ॥ नाहीं भीड भार । तुका म्हणे साना थोर ॥४ ॥ 

             ६९१ . जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥१ ॥ आणिक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥२ ॥ नामरूपी जडलें चित्त । त्याचा दास मी अंकित ॥३ ॥ तुका म्हणे नवविध । भक्ति जाणे तोचि शुद्ध ॥४ ॥ 

            ६९२.श्रीसंताचिया माथा चरणांवरी । साष्टांग हे करी दंडवत ॥१ ॥ विश्रांती पावलों सांभाळा उत्तरीं । वाढलें अंतरी प्रेमसुख॥शाडौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसे उद्धरलों ॥३ ॥ तुका म्हणे मज न घडतां सेवा । पूर्व पुण्यठेवा वोढवला ॥४ ॥

             ६९३. न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥१ ॥ ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हेंचि सांगे ॥२ ॥ विटंबो शरीर होत कां विपत्ति । परि राहो चित्तीं नारायण ॥३ ॥ तुका म्हणे नाशिवंत हे सकळ । आठवी गोपाळ तेंचि हित ॥४ ॥

             ६९४ .. नव्हती ते संत करितां कवित्व । संतांचे ते आप्त नव्हती संत ॥१ ॥ येथें नाहीं वेष सरत आडनांव । निवडे घावडाव व्हावा अंगीं ॥२ ॥ नव्हती ते संत धरितां भोंपळा । पांधरती वाकळ नव्हती संत ॥३ ॥ नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराणे नव्हती संत ॥४ ॥ नव्हती ते संत वेदाच्या पठणें । कर्म आचरणे नव्हती संत ॥५ ॥ नव्हती ते संत करितां तप तीर्थाटन । सेविलिया वन नव्हती संत ॥६ ॥ नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणें । भस्म उधळणे नव्हती संत।।७ ॥ तुका म्हणे नाहीं निरसला देह । तोंवरि आघवे संसारिक ॥८ ॥

            ६९५..संतांनी सरता केलों तैशापरी । चंदनी ते बोरी व्यापियेली ॥१ ॥ गुण दोष याती न विचारी कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥२ ॥ तुका त्याचा ॥३ ॥ म्हणे आलें समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ।।३।।

             ६९६ . वेद अनंत बोलिला । अर्थ इतुलाचि शोधिला ॥१ ॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठा नाम गावें॥शासकळशास्त्रांचा विचार । अंती इतुलाचि निर्धार॥३॥अठरापुराणी सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥४ ॥ 

            ६९७.संतचरणरज लागतांसहज । वासनेचें बीज जळोनि जाय ॥१ ॥ मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥२ ॥ कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । हृदयीं प्रगटे रामरूप ॥३ ॥ तुका म्हणे साधन सुलभ गोमटे ॥परि उपतिष्ठे पूर्व पुण्यें ॥४ ॥ 

            ६९८ .. शुद्धबीजा पोटीं । फळे रसाळ गोमटी ॥१ ॥ मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे कारणी ॥२ ॥ सर्वांगी निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥३ ॥ तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥४ ॥ 

            ६९९.मागें बहुतां जन्मीं । हेंचि करित आलों आम्ही । भवतापश्रमी । दुःखें पीडिले निववृ त्यां ॥१ ॥ गर्जा हरिचे पवाडे । मेळवू वैष्णव बागडे । पाझर नामावळी । हर्षे नाचों पिटूं टाळी । घालूं पायां तळीं । कळिकाळ त्या बळें ॥३ ॥ कामक्रोध बंदखाणी । तुका म्हणे दिले दोन्ही । इंद्रियांचे धणी।आम्ही जालों गोसावी ॥४ ॥

             ७००. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास । कठिण वज्रांस भेदूं ऐसे ॥१ ॥ मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥२ ॥ भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठ्याळाचे काठी देऊ माथां ॥३ ॥ मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥४ ॥ अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥५ ॥ तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥६ ॥ 

            ७०१ . दिनरजनी हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥११ ॥ संकल्पिला देह देवा । सकळ हेवा तें ठायीं ॥२ ॥ नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंद्रिया ॥३ ॥ कीर्ति मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥४ ॥ 

            ७०२.सर्व सुखें आजी एथेंचि वोळलीं । संतांची देखिली चरणांबुजें ॥१ ॥ सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥२ ॥ तुका म्हणे वाचा राहिली कुंठित । पुढे जालें चित्त समाधान ॥३ ॥ 

            ७०३.भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवारूनि ॥१ ॥ विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे धन जन माता पिता ॥२ ॥ निर्वाणी गोविंद असे मागेपुढे । कांहीं च सांकडे पडों नेदी ॥३ ॥ तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साह्य । घातलिया भये नर्का जाणे ॥४ ॥ 

            ७०४.अवघा तो शकुन।हृदयीं देवाचे चिंतण ॥१ ॥ येथे नसतां वियोगालाभा उणे काय मग॥२॥छंद हरिच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥शतुका म्हणे हरिच्या दासां शुभकाळ अवघ्या दिशा ॥४ ॥

             ७०५. पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया या भेटी हरिदासांची ॥१ ॥ ऐसें बळ नाहीं आणिकाचे अंगीं । तप तिर्थ जगीं दान व्रत ॥२॥चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥३ ॥ भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेदी पाव हात कांहीं ॥४ ॥ तुका म्हणे मना जालें समाधान । देखिल्या चरण वैष्णवांचे ॥५ ॥ 

            ७०६.पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१ || तयाच्या चिंतने तरतील दोषी । जळतील रासी पातकांच्या।।२॥देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागे मागें ॥३ ॥ काय त्यां उरलें वेगळे आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥४ ॥ तुका म्हणे देवभक्तांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥५ ॥

             ७०७.उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली॥शासंतदर्शनें हे लाभ । पद्मनाभ जोडला ॥२ ॥ संपुष्ट हा हृदयपेटी । करूनि पोटी सांटवू ॥३॥तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥४ ॥

             ७०८. तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणूं ॥१ ॥ अवतार तुम्हां धराया कारण । उद्धरावें जन जड जीव ॥२ ॥ वाढावया सुख भक्ति भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥३ ॥ तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुम्ही जगीं संतजन ॥४ ॥

             ७०९. आलिंगने घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१ ॥ ऐसा संतांचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥२ ॥ तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥३ ॥ तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥४ ॥ 

            ७१०. जें का रंजले गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१ ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२ ॥ मृदु सबाय नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त।।३ ।। ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि धरी जो हृदयीं ॥४ ॥ दया करणे में पुत्रासी । तेचि दासा आणि दासी।।५ ।। तुका म्हणे सांगू किती । तोचि भगवंताचि मूर्ती ॥६ ॥ 

            ७११. काय सांगों आता संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥१ ॥ काय द्यावें त्यासीं व्हावें उतराई । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥२ ॥ सहज बोलणे हितउपदेश । करूनि सायास शिकविती ॥३ ॥ तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्तीं । तैसे मज येती सांभाळीत ॥४ ॥

            ७१२. ऐसा ज्याचा अनुभव । विश्व देव सत्यत्वे ॥१ ॥ देव तया जवळी असे । पाप नासे दर्शने ॥२ ॥ कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥3॥ तुका म्हणे भेदाभेद । गेला वाद खंडोनि ॥४ ॥ 

            ७१३ . कोण पुण्ये यांचा होईना सेवक । जीही द्वंदादिक दुराविलें ॥१ ॥ ऐसी वमें मज दावी नारायणा । अंतरींच्या खुणा प्रकटोनि ॥२ ॥ बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करुणा केली ॥३ ॥ तुका म्हणे मग नये वृत्तीवरी । सुखाचे शेजारी पहुडईन।।४ ।।

             ७१४.संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाही येथें ॥१ ॥ बहु दूधड जरी जाली म्हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२ ॥ तुका म्हणे अंगें व्हावें तें आपण । तरीच महिमान येईल कळों ॥३ ॥ 

            ७१५.साधावया भक्ति काज । नाहीं लाज धरीत॥१॥ऐसियासी शरण जावें।शक्ती जीवें न वंची॥२॥भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें।।३ ।। तुका म्हणे साक्ष हातीं । तो म्यां चित्तीं धरियेला ॥४ ॥ 

            ७१६..भाविकांचें काज अंगें देव करी । काढी धर्माधरी उच्छिष्ट तें ॥१ ॥ उच्छिष्ट ती फळे खाय भिल्लटीची । आवडी तयांची मोठी देवा ॥२ ॥ काय देवा घरी न मिळेची अन्न । मागे भाजीपान द्रौपदीसी ॥३ ॥ अर्जुनाची घोडी धुतली अनंतें । संकटें बहुतें निवारिलीं ॥४ ॥ तुका म्हणे ऐसी आवडती लडिवाळे । जाणीवेचे काळें तोंड देवा ॥५ ॥ 

            ७१७.काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणी ठेवीतसे ॥१ ॥ थोरीव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥२ ॥ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती परउपकारें ॥३ ॥ भूतांची दया है भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥४ ॥ तुका म्हणे सुख पराविया सुखें । अमृत हे मुखें स्रवतसे ॥५ ॥ 

            ७१८ .. उभारिला हात । जगी जाणविली मात ॥१ ॥ देव बैसले सिंहासनीं । आल्या याचकासी पुरे धनी ॥२ ॥ एकाच्या कैवाडें । उगवे बहुतांचे कोडें ॥३॥दोही ठायीं तुका । नाहीं पडों देत चुका ॥४ ॥ 

            ७१९ . भाग्यवंत म्हणों तयां । शरण गेले पंढरिराया ॥१ ॥ तरले तरती हा भरंवसा । नामधारकाचा ठसा ॥२॥भुक्तिमुक्तीचें तें स्थळ । भोळ्या भाविकानिर्मळ ॥३ ॥ गाइलें पुराणीं । तुका म्हणे वेदवाणी ॥४ ॥

             ७२०.भक्तां समागमें सर्वभावें हरि ।न सांगता करी सर्वकाम ( सर्व काम करी न सांगता ) ॥१ ॥ सांठवला राहे हृदयसंपुष्टीं । बाहेर धाकुटी मूर्ति उभा ॥२ ॥ मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥३ ॥ तुका म्हणे जीव भाव देवापायीं । ठेवूनि ते कांहीं न मगती ॥४ ॥

             ७२१..देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥१ ॥ भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥२ ॥ देवें भक्तां रूप दिलासे आकार । भक्ती त्याचा पार वाखाणिला॥शा एका अंगी दोन्ही झाली ही निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥४ ॥ तुका म्हणे येथे नाहीं भिन्नभाव । भक्त तोचि देव देव भक्त ॥५ ॥ 

            ७२२.भक्ति तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मीं भोग ब्रह्मतनु ॥१ ॥ देहाच्या निरसने पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥२ ॥ उदक अग्नि धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥३ ॥ तुका म्हणे मज कळते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥४ ॥


 ।। श्री एकनाथ महाराजांचे अभंग ।।

( Shree Eknath Maharajanche Abhang )

            ७२३.सगुण चरित्रं परम पवित्रे सादर वर्णावीं । सज्जन वृंदें मनोभावें आधी वंदावीं ॥१ ॥ संतसंगें अंतरंगें नाम बोलावें । कीर्तनरंगी देवासन्निध सुखें डोलावें ॥२ ॥ भक्ति ज्ञानविरहित गोष्टी इतरा न कराव्या । प्रेमभरें वैराग्याच्या युक्ती विवराव्या ॥३ ॥ जेणे करूनि मूर्ति ठसावी अंतरीं श्रीहरिची । ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची॥४॥अद्वय भजनें अखंड स्मरणे वाजवी करटाळी । एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी ॥५ ॥


             ७२४.उदर भक्त उदार भक्त । त्रैलोकी मात जयाची॥शाकेला भगवद्गीते अर्थ । ऐसे समर्थ तिही लोकी ॥२ ॥ बोलविला रेडा चालविली भिंती । चांगदेवाते उपदेशिती ॥३ ॥ एकाजनार्दनीं समर्थ ते भक्त । देव त्यांचा अंकित दास होय ॥४ ॥ ७२५.देवासी आवडे भक्त समागम । त्यांचे सर्वकाम करी अंगे ॥१ ॥ भक्तकाजालागी अवतार धरी । नांदे भक्ताघरी स्वये देव॥२॥भक्तांविण देवा कांहिची नावडे ।भक्त तो आवडे सर्वकाळ।।३ ॥ एकाजनार्दनी भक्तांचा अंकित । देव सदोदीत स्वये होत ॥४ ॥ 


            ७२६. धन्य पंढरीची वारी । सदा वसे जया घरी ॥१ ॥ तोचि देवाचा आवडता । कळिकाळा मारी लाथा ॥२ ॥ आलिया आघात । निवारी स्वये दीनानाथ ॥३ ॥ कळिकाळाची बाधा । नोहे तयासी कदा ॥४ ॥ लक्ष्मी घरी वसे । देव तेथे फिरतसे ॥५ ।। ऐसी भाविकाची आवडी । एका जनार्दनी घाली उडी ॥६ ॥ 


            ७२७. धन्य आज दिन संत दरूशनाचा । अनंत जन्माचा शीण गेला ॥१ ॥ मज वाटे त्यासीं आलिंगन द्यावें । कदा न सोडावे चरण त्यांचे ॥२ ॥ त्रिविध तापांची जाहली बोळवणा देखिल्या चरण वैष्णवांचे ॥ ३॥ एका जनार्दनी घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग माझ्या चित्ता ॥४ ॥


             ७२८. झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं प्रगटला ॥धृ ० ॥ गुरुकृपा निर्मळ भागिरथी । शांती क्षमा यमुना सरस्वती । असि पदें एकत्र जेथें होतीं । स्वानुभव सान हे मुक्तस्थिती ।। १॥ सद्बुद्धीचें घालूनि शुद्धासन । वरी सद्गुरूंची दया परिपूर्णी | शम दम विभूती चर्चुनी जाण । वाचे उच्चारी केशव नारायण ॥ २॥ बोधपुत्र निर्माण झाला जेव्हां । ममता म्हातारी मरोनी गेली तेव्हां । भक्ति बहीण धाउनि आली गांवा । आतां संध्या कैशी मी करूं केव्हां ॥३ || सहज कर्मे झाली ती ब्रह्मार्पण । जन नोहे अवघा हा जनार्दन । ऐसें ऐकतां निवती साधुजन । एका जनार्दनीं बाणली । निजखूण ।। ४ ॥ 


            ७२९ . हरिप्राप्तीसी उपाय । धरावे संतांचे ते पाय ।। १॥ तेणें साधती साधनें । तुटतीं भवाची बंधनें ।। २॥ संताविण प्राप्ति नाहीं । ऐशी वेद देती ग्वाही । ३॥ एकाजनार्दनीं संत । पूर्ण करिती मनोरथ ॥४ ॥ ।


             ७३०. ज्या सुखा कारणे देव वेडावला । वैकुंठ सांडुनी ( सोडोनी ) संत सदनी राहिला ॥१२ ॥ धन्य धन्य ते संतांचे सदन । जेथे लक्ष्मीसहित शोभे नारायण ॥२ ॥ सर्व सुखांची सुख राशी । संत चरणी भुक्ति मुक्ति दासी ॥३ ॥ एका जनार्दनी पार नाही सुखा । म्हणोनि देव भुलला देखा ॥४ ॥


             ७३१. भक्ति प्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजीं ॥१ ॥ प्रेम सुख देई प्रेम सुख देईं प्रेमेविण नाहीं समाधान ॥२ ॥ रांडवेनें जेवी श्रृंगारु केला । प्रेमेविण जाला ज्ञानी तैसा ॥३ ॥ एकाजनार्दनीं प्रेम अति गोड । अनुभवी सुरवाड जाणतील ॥४ ॥ 


            ७३२. ज्ञानदेव ज्ञानदेव वदता वाचे । नाही कळिकाळाचे भेव जीवा ॥१ ॥ जाता अलंकापूर गावी । मोक्ष मुक्ती वाट दावी त्यासी ॥२ ॥ ब्रह्मज्ञान जोडोनी हात । म्हणे मी तुमचा दास अंकित ।।३ ।। वाचे वदता इंद्रायणी । यम वंदितो चरणी ॥४ ॥ एका जनार्दनी भावे । ज्ञानदेवा आठवावे।।५ ।। 


            ७३३. नाम घेता हे वैखरी । चित्त धांवे विषयावरी ॥१ ॥ कैसे होताहे स्मरण । स्मरणामाजी विस्मरण ॥२ ॥ नामरुपा नव्हता मेळा नुसता वाचेचा गोंधळ ।।३ ।। एकाजनार्दनी छंद । बोलामाजी परमानंद।।४ ॥ 


।। श्री नामदेव महाराजांचे अभंग ।।

( Shree Namadev Maharajanche abhang )

            ७३४.नाचूं कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगीं ॥१ ॥ सर्व सांडूनि माझाई । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२ ॥ परेहून परतें घर । तेथें राहूं निरंतर ॥३ ॥ सर्वांचें जे अधिष्ठान तेचि माझे रुप पूर्ण ॥४ ॥ अवघी सत्ता आली हाता । नामयाचा खेचरी दाता ॥५ ॥


             ७३५.ऐका पंढरीचें महिमान । राऊळे तितुकें प्रमाण । तेथील तृण आणि पाषाण । ते ही देव जाणावें ॥१ ॥ ऐसी पंढरी मनीं ध्याती । त्यांसी तिहीं लोकी गति । तें आणिका तीर्था जाती । ती वंदिती तयांसी ॥२ ॥ वाराणसी चालिजे मासा । गोदावरी एक दिवसा । पंढरी पाऊल परियेसा । ऐसा ठसा नामाचा ॥३ ॥ ऐसे शंकर सांगें ऋषीं जवळीं । सकळ तीर्थे मध्यान्हकाळीं । येते पुंडलिकाजवळी । करिती आंघोळी वंदिती चरण ॥४ ॥ ऐसेनि तीर्थी पाप घडे । असत्य बोलतां जिव्हा झडे । नामा विनवी संतांपुढे । पंढरी पेठ वोसंडावी ॥५ ॥ 


            ७३६. पंढरीच्या सुखा अंतपार नाही लेखा । शेषां सहस्त्रमुखां न वर्णवेचि ॥१ ॥ पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी । जन्मोजन्मी वारी घडली तयां ॥२ ॥ पंढरीस जातां प्रेम उचंबळत । आनंदें गर्जत नामघोष ॥३ ॥ विश्वमूर्ति विठो विश्वंभर देखें । विसरला दुःखें देहभाव ॥४ ॥ नामा म्हणे त्याचा होईन चरणरज । नुपेक्षील मज पांडुरंग ॥५ ॥ 


            ७३७. जाऊ म्हणता पंढरी । यम थोर चिंता करी ॥१ ॥ धरितां पंढरीची वाट । पापे पळली सपाट ॥शाकळस देखता नयनी । होय पातकांची धुणी ॥३ ॥ घेतां विठोबाची भेटी । दोष जाती उठाउठी।॥४ ॥ करिता चंद्रभागे स्नान । सर्व पापे घडे हान ॥५ ॥ नामा म्हणे रे केशवा । आम्ही करूं तुझी सेवा ॥६ ॥


             ७३८.अषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी । शोभा पांडुरंगी घनवटे ॥१ ॥ संतांची दर्शनें हेंचि पीक जाण । देतां आलिंगन देह निवे।।२।।देह निवे किती नवल सांगावें । जीवासी दुणावें ब्रह्मानंद।।३ ॥ नामा म्हणे यासी मूळ पांडुरंग । त्याचेनि अव्यंग सुख आम्हां ॥४ ॥ 


            ७३९ . नामाचा गजर गर्जे भीमातीर । महिमा साजे थोर तुज एका ॥१ ॥ रिद्धि सिद्धि दासी अंगण झाडीती । उच्छिष्टे काढीती मुक्ति चारी ॥२ ॥ चारी वेद भाट होऊनि गर्जति । सनकादिक गाती कीर्ति तुझी ॥३ ॥ सुरवराचे भार अंगणी लोळती । चरणरज क्षिती शिव वंदी ॥४ ॥ नामा म्हणे देव ऐसा हा कृपाळू । करितो सांभाळु अनाथांचा 


            ७४०.सुखाचें हें सुख श्रीहरि मुख । पाहतांही भूक ताहान गेली ॥१ ॥ भेटली भेटली विठाई माऊली । वासना निवाली जीवांतील ॥२ ॥ चंद्रासी चकोर मेघासी मयुर । वाटे तैसा भर आनंदाचा ॥३ ॥ नामा म्हणे पाप आणि ताप दुःख । गेले झाले सुख बोलवेना।।४ ॥ 


            ७४१.अमृताहूनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां बा नेघे ।। १॥ सांग पंढरीराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासी नये तुझें ॥ २॥ कीर्तनी बैसतां निद्रे नागविलें । मन माझें गुंतलें विषयसुखा ॥ ३॥ हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती । नये माझ्या चित्तीं नामा म्हणे ॥ ४ ॥ 


            ७४२.पंढरीचा वास चंद्रभागें स्नान । आणिक दर्शन विठोबाचें ॥१ ॥ हेंचि घडो मज जन्मजन्मांतरी । मागणे श्रीहरी नाहीं दुजें ॥२ ।। मुखीं नाम सदा संतांचे दर्शन । जनी जनार्दन ऐसा भाव ॥३ ॥ नामा म्हणे तुझें नित्य महाद्वारीं । कीर्तन गजरी सप्रेमाचें।।४ ।। 


            ७४३. तुझीउया सत्तेने वेदांसी बोलणे । सूर्यासी चालणें तुझिया बळे ॥१ ॥ ऐसा तूं समर्थ ब्रह्मांडाचा धनी । वर्म जाणूनि शरन आलो ॥२ ॥ मेघांनी वर्षावें पर्वती बैसावें । वायुनें विचरावें सत्तें तुझें ॥३ ॥ नामा म्हणे कांहीं न हाले साचार । प्रभु तूं निर्धार पांडुरंगा ॥४ ॥ 


            ७४४. सद्गुरुनायकें पूर्ण केली । निजवस्तु दाविली माझी मज ॥१ ॥ माझें सुख मज दावियेलें डोळां । दिधली प्रेमकळां ज्ञानमुद्रा ॥२ ॥ तया उतराई व्हावें कवण्या गुणें । जन्म नाहीं येणें ऐसें केले ॥३ ॥ नामा म्हणे निकी दावियेली सोय । न विसरावे पाय विठोबाचे ॥४ ॥ 


            ७४५. तूं माझी माऊली मी वो तुझा तान्हा । पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे ॥१ ॥ तूं माझी माऊली मी तुझें वासरूं । नको पान्हा चोरूं पांडुरंगे ॥२ ॥ तूं माझी हरिणी मी तुझें पाडस । तोडी भवपाश पांडुरंगें ॥३ ॥ तूं माझी पक्षिणी मी तुझे अंडज । चारा घाली मज पांडुरंगे ॥४ ॥ नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ । मागे पुढे उभा सांभाळिसी ॥५ ॥ 


            ७४६. मनुष्य करिसी तरी भक्तिचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥१ ॥ श्वान करिसी तरी उच्छिष्ठाचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥२ ॥ पक्षि करीसी तरी चारियाचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥३ ॥ झाड करिसी तरी तुळसीचेनि मिले । तुझे द्वारी वषे ऐसे करी ॥४ ॥ वृक्ष करिसी तरी मंडप मेखाचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥५ ॥ करिसी तरी रंग शिळेचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥६ ॥ उदक करिसी तरी सडियाचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥७ ॥ नामा म्हणे विठोकीर्तनाचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥८ ॥ 


।। श्री संत जनाबाईचे अभंग ।।

( Shree Sant Janabaiche Abhang )

            ७४७. पुण्यवंत पाताळ लोकी नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला । चोरट्याचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ।। १ ।। धुंद झाला तुझा दरबार ॥ धृ ० ॥ वैरियासी दिधली मोक्षसिद्धी । कपटिया दिधली महानिधी । सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी । चाळकासी त्रैलोक्य भावें बंदी ।। २॥ पतिव्रता ती वृथा गुंतविली । वेश्या गणिका ती सत्यलोका नेली । कळी स्वकुळा लावियेली । यादववृंदा ही गोष्ट बरी नाही केली ।। ३॥ सत्त्ववानाचा बहु केला छळ । कीर्तिवानाचें मारियेलें बाळ । सखा म्हणविसी त्याचे नासी बळ । जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ ।। ४ ॥ 


            ७४८.संतभार पंढरीत । कीर्तनाचा गजर होत ॥ १॥ तेथें असे देव उभा । जैशी समचरणाची शोभा ॥ शा रंग भरे कीर्तनात । प्रेमें हरिदास नाचत ।। ३ ।। सखा विरळा ज्ञानेश्वर । नामयाचा तो जिव्हार ॥ ४ ॥ ऐशा संतां शरण जावें । जनी म्हणे तया ध्यावे ॥ ५ ॥ 


            ७४९.धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनियां दोरा ||1|| हृदय बंदीखाना केला । आंत विठ्ठल कोंडीला ॥२ ॥ शब्द केली जडाजुडी । विठ्ठल पायीं घातली बेडी || शा सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुळती आला ॥४ ॥ जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडी मी तुला ॥५ ॥ 


।। श्री संत निळोबारायांचे अभंग।।

( Shree Sant Nilobarayanche Abhang )

             ७५०.शोधूनिया आले संत । हिताहित जगाचे॥१॥तेचि वचने अनुवादती।सकळा नीतिप्रमाणे ॥२ ॥ सत्यासत्य ठावे तया । पाहोनियां ठेविले ॥३ ॥ निळा म्हणे गुंता गोवा । कांहिची जीवा न करिती ॥४ ॥ 


            ७५१. येथें तुजलागीं बोलाविलें कोणी । प्रार्थिल्या वांचूनि आलासी कां ॥१ ॥ प्रल्हादा कैवारी दैत्यांसी दंडाया । स्तंभी देवराया प्रगटोनी ॥२ ॥ तैशापरी मजला नाहीं बा संकट । तरी कां फुकट श्रम केला ॥३ ॥ निळा म्हणे आम्ही नोळखूचि देवा ॥४ ॥ 


             ७५२. येऊनियां कृपावंतें । तुकयास्वामी सद्गुरुनाथें ॥१ ॥ हात ठेविला मस्तकीं । देऊनि प्रसाद केले सुखी ॥माझी वाढविली मती । गुण वर्णावया स्फूर्ती ॥३ ॥ निळा म्हणे मी बोलतां । दिसे परी हे त्याची सत्ता ॥४ ॥ तुकयाचा धावा करीतसो ॥४ ॥


             ७५३. मुख्य महाविष्णु चैतन्याचें मूळ । संप्रदाय सकळ तेथोनियां ॥१ ॥ हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी । चतुःश्लोकी चारी भागवत ॥२ ॥ तें गुज विधाता सांगें नारदासी । नारदें व्यासासी उपदेशिलें ॥३॥राघवचैतन्य केले अनुष्ठान । त्यासी द्वैपायनें कृपा केली ॥४ ॥ कृपा करूनि हस्त ठेवियेला शिरीं । बोध तो अंतरी ठसावला ॥५ ॥ राघवचरणीं केशव शरण । बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची ॥६ ॥ बाबाजीने स्वप्नीं येऊनि तुकयाला । अनुग्रह दिला निजप्रीति ॥७ ॥ जगद्गुरु तुका अवतार नामयाचा । संप्रदाय सकळांचा येथूनियां ॥८ ॥ निळा म्हणे मज उपदेश केला । संप्रदाय दिला सकळ जनां।।९ ।। 


            ७५४.मार्ग दाउनि गेले आधीं।दयानिधी संत ते ॥१ ॥ तेणेंचि पंथें चालों जातां । न पडे गुंता कोठे कांहीं।।२।।मोडोनियां नाना मतें।देती सिद्धांतें सौरसु॥शानिळा म्हणे ऐसे संताकृपावंत सुखसिंधु ॥४ ॥ 


            ७५५. जिही निमिषमात्रे देह पालटिला । स्त्रीयेचाचि केला पुरुष उभा ॥१ ॥ त्याचे नवल कोण तारिती जड जीवा । यालागी घडावा संत संग ॥२ ॥ जिही फिरविले औढ्यांचे देऊळ । बोलविले बोल मूर्तिकरवी ॥३ ॥ निळा म्हणे जिही प्रेते जिवविली । वरदे उपजविली बाळे स्त्रिया ॥४ ॥ 


            ७५६. मृत प्राणी ते जेवविले । पुरुषही केले स्त्रियांचे ॥१ ॥ हे तो तुमची सहजस्थिती । लोकांसी भक्ति प्रगटवया ॥२ ॥ प्रसादेचि विधवेसी बाळ । जन्मविला केवल भातलवंडा ॥३ ॥ निळा म्हणे तुमची करणी । देवाहुनि अधिक ॥४ ॥ 


            ७५७.तेचि संत तेचि संत । ज्यांचा हेत विठ्ठलीं ॥शानेणती कांहीं टाणाटोणा । नामस्मरणावांचूनी ॥२॥काया वाचा आणि मनें । धालें चिंतने डुलती ॥३॥निळा म्हणे विरक्त देहीं।आठवचि नाहीं विषयांचा ॥४ ॥ 


            ७५८.भूती उपद्रव दिधला । ताडिला अथवा निस्तेजिला । तेणे चित्ती दाहो झाला । अधिभौतिक बोलिला तो ताप॥१॥देही प्रगटे रोगव्याधी । तेणे आहाळली तापे बुद्धि । लोळे न पुरे दुःखावधी । आध्यात्मिक त्रिशुद्धि तो ताप ॥२ ॥ दैवे अतिवृष्टिकां अनावृष्टि । राजिके लुटिले झाला कष्टी । आगीने जळता नावरे संकटी । तो अधिदैव ताप बोलिजे ॥३ ॥ ऐसे त्रिविधताप सत्संगती । विवेक श्रवणे विलया जाती । म्हणोनि कीर्तनी बुद्धिमंती।अवश्य श्रवणार्थी बैसावे ॥४ ॥ निळा म्हणे होईल लाभ । ब्रह्मानंदा निघती कोंब । प्रसन्न होऊनी पद्मनाभ । सीतळ करील सर्वार्थी ॥५ ॥ 


            ७५९.पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ॥१ ॥ घरां आले घरां आलें । घरां आले कृपाळु ॥शासांभाळिले सांभाळिलें । सांभाळिले अनाथा ॥३ ॥ केला निळा केला निळा । केला निळा पावन ॥४ ॥


             ७६०. काय त्यांचा महिमा वाणू वारंवार । हरिभक्त थोर भूमंडळी।।१ ।। ज्यांचिये भेटीचे आर्त ब्रह्मादिकां । पूज्य सकळ लोकां विश्वा झाले।।२ ।। यमधर्म वाट पाहे नित्यकाळ । म्हणे धन्य वेळ भेटती ते ॥३ ॥ निळा म्हणे सर्व भाग्ये चोजविती । ऋद्धि सिद्धी येती वोळंगण्या।।४ ।।


             ७६१. देव घरा आला।भक्ति सन्माने पूजिला॥१॥पाहुणेर पंगती।संत द्विजवृंदे शोभती ॥२ ॥ पुढे आरंभुनी कथा । बुका माळा गंधाक्षता ॥३ ॥ निळा म्हणे ब्रह्मानंदे । नाचती उभयतां आनंदे || ४ ||


।। श्री संत भानुदास महाराजांचे अभंग।।

( Shree Sant Bhanudas Maharajanche Abhang )

             ७६२. जरी हे आकाश वर पडों पाहे । ब्रह्मगोळ भंगा जाये । वडवानळ त्रिभुवन खाये । तरी मी तुझीच वाट पाहें गा विठोबा ॥१ ॥ न करी आणिकांचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला।।धृ .॥ सप्त सागर एकवट होती । जरी हे विरूनि जाय क्षिती । पंचमहाभूतें प्रलय पावती । परि मी तुझाचि सांगाती गा विठोबा।।२ ।। भलतैसे वर पडों भारी । नाम न संडी न टळे निर्धारीं । जैसी पतिव्रता प्राणेश्वरी । विनवी भानुदस म्हणे अवधारी गा विठोबा ॥३ ॥

 

            ७६३. जें सुख क्षीरसागरी ऐकिजे । तें या वैष्णवामंदिरी देखिजे ॥१ ॥ धन्य धन्य तें वैष्णवमंदीर । जेथें नामघोष होय निरंतर ॥२ ।। दिंडी पताका द्वारी तुळशीवृंदावनें । मन निवताहे नामसंकीर्तनें ॥३ ॥ ज्याच्या दरुशनें पापताप जायें । भानुदास तयासी गीती गायें ॥४ ॥


 ।। श्री संत सावता माळी याचे अभंग ।।

( Shree Sant Savata Mali Yanche Abhang )

            ७६४.नामाचिया बळे न भीऊं सर्वथा । कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥१ ॥ वैकुंठीचा देव आणूं या कीर्तनी । विठ्ठल गाऊनी नाचो रंगी।।२ । सुखाचा सोहळा करूनी दिवाळी । प्रेमे वनमाळी चित धरूं ॥३ ॥ सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा । तेणे भक्तिद्वारा वोळंगती ॥४ ॥ 


            ७६५. कांदा मुळा भाजी । अवघी विठाबा माझी।।१ ।। लसून मिरची कोथिंबिरी । अवघा झाल माझा हरी।।शमोट नाडा विहीर दोरी । अवर्घ व्यापिली पंढरी ॥३ ॥ सांवता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळां ॥४ ॥ 


            ७६६.समयासी सादर व्हावें । देव ठेविल तैर रहावें॥धृ .॥ कोणे दिवशी बसून हत्तीवर । कोणे दिवर्श पालखी सुभेदार । कोणे दिवशीं पायांचा चाकर चालून जावें ॥१ ॥ कोणे दिवशी बसून याची मन कोणे दिवशी घरांत नाहीं धान्या कोणे दिवशीं द्रव्याचे सांठवण । कोठे सांठवावें ॥२ ॥ कोणे दिवशीं यम येती भजनी मालिका चालून । कोने दिवशी प्राण जाती घेऊन । कोणे दिवशीं स्मशानी जाऊन । एकटें रहावें॥शा कोणे दिवशी होईल सद्गुरुची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा । कोणे दिवशी सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥४ ॥

 

।। श्री संत चोखामेळा यांचे अभंग ।।

( Shree Sant Chokhomela yanche Abhang )

             ७६७.टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१ ॥ हरिनाम गर्जता नाही भय चिंता । ऐसे बोले गीता भागवत ॥२ ॥ पताकाचे भार मिळाले अपार । गर्जे भीमातीर जयजयकारी ॥३ ॥ पंढरीचा हाट कौलाची पेठ । मिळाले चतुष्ठ वारकरी ॥४ ॥ खटनट यावे शुद्ध होऊनी जावे । दवंडी पिटी भावे चोखामेळा ॥५ ॥ 


            ७६८. ऐसा पुत्र देगा देवा । जग म्हणे त्याला बाबा ॥१ ॥ कन्या ऐसी तरी देई । जैसी मिरा मुक्ताबाई ॥२ ॥ ऐसा भक्तराज गुंडा । त्याचा तिही लोकी झेंडा ॥३ ॥ इतके न देवे तुझ्याने । माझे करीगा निसंतान।।४ ॥ दोही माजी एक लेखा । बोले केशव दास चोखा ॥५ ॥


             ७६९ . उस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१ ॥ कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥२ ॥ नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगे ॥३ ॥ चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४ ॥


             ७७०. सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलंकाभुवनीं नांदतसे ॥१ ॥ तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली । जेणें निगमवल्ली प्रगट केली ॥२ ॥ संसारी आसक्त माया मोहें रत । ऐसे जे पतित तारावया ॥३ ॥ चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ होती जीव ॥४ ॥


 ।। श्री संत सेना महाराजांचे अभंग ।।

( Shree Sant Sena Maharajanche Abhang )

             ७७१. उदार तुम्ही संतामायबाप कृपावंत ॥१॥केवढा केला उपकार । काय वाणू मी पामर ॥२ ॥ जडजीवा उद्धार केला । मार्ग दाविला सुपंथ ॥३ ॥ सेना म्हणे उतराई । होतांना दिसे काहीं ॥४ ॥ 


            ७७२. देई मज जन्म देवा।करीन सेवा आवडी॥१॥करीन संतांचे पुजन । मुखी नाम नारायण ॥२ ॥ असो भलते ठायी । सुख दुःखा चाड नाही ॥३ ॥ मोक्ष सायुज्यता । सेना म्हणे नये चित्ता ॥४ ॥


             ७७३. घेता नाम विठोबाचे । पर्वत जळती पापाचे ॥१॥ऐसा नामाचा महिमा । वेद शिणला झाली सीमा।।२ ।। नामे तारिले अपार । महा पापी दुराचार ॥३ ॥ वाल्हा कोळी ब्रह्महत्यारी । नामे तरिला निर्धारी।।४ ॥ सेना बैसला निवांत । विठ्ठल नाम उच्चारीत ॥५ ॥ 


            ७७४. धन कोणा कामा आले । पहा विचारूनि भले ॥१ ॥ ऐसे सकळ जाणती । कळोनियां आंधळे होती ॥२ ॥ स्त्रीया पुत्र बंधू पाही । त्याचा तुझा संबंधु नाही ॥३ ॥ सखा पांडुरंगावीण । सेना म्हणे दुजा कोणी ॥४ ॥ 


            ७७५. स्वहिता कारणे सांगतसे तुज । अंतरीचे गुज होते कांही ॥१ ॥ करा हरि भजन तराल भवसागर । उतरिल पैलपार पांडुरंग ॥धृ ॥ कृपा नारायणे केली मजवरी । तुम्हालागी हरि विसंबेना ॥३ ॥ सेना सांगूनिया जातो वैकुंठासी । तिथी द्वादशी श्रावणमास।।४ ॥ 


।। श्री संत नरहरी सोनार यांचे अभंग ।।

( Shree Sant Narhari sonar yanche abhang )

             ७७६.सकळ धर्माचे कारण । नामस्मरण हरिकीर्तन ॥१ ॥ दया क्षमा समाधान । घ्यावे संतांचे दर्शन ॥२ ॥ संत संग धरा वेगी । वृत्ती जडो पांडुरंगी ॥३ ॥ नरतनु न येयाची बा कदा । भावे भजा संत पदा ॥४ ॥ भूलु नका या संसारी । हरि उच्चारी उच्चारी ॥५ ॥ सर्व जायाचे जायाचे । हरि नाम हेचि साचे ॥६ ॥ विठोबा रक्षिल शेवटी । उभा कर दोन्ही कटी ॥७ ॥ नरहरी जाणूनि शेवटी । संत चरणा घाली मिठी ॥८ ॥ 


            ७७७. नाम फुकाचे फुकाचे । देवा पंढरीरायाचे ॥१ ॥ नाम अमृत हे सार । हृदयी जपा निरंतर ॥२ ॥ नाम संतांचे माहेर । प्रेम सुखाचे आगर ॥३ ॥ नाम सर्वामध्ये सार । नरहरी जपे निरंतर ॥४ ॥ 


            ७७८. नव्हे ते सगुण नव्हे ते निर्गुण । जाणती हे खुण तत्वज्ञानी॥शा आहे ते अंबर निःशब्द निराळ । अद्वय केवल जैसे तैसे ॥२ ॥ म्हणे नरहरी सोनार ते क्षर ना अक्षर । परेहुनि परात्पर ब्रह्म जैसे ॥३ ॥ 


            ७७९ . देवा तुझा मी सोनार । तुझें नामाचा व्यवहार ॥१ ॥ देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोनें ॥२ ॥ त्रिगुणाची करूनि मूस । आंत ओतिला ब्रह्मरस ॥३ ॥ जीव शिव करूनि फुकी । रात्रंदिवस ठोकाठोकीं ॥४ ॥ विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ॥५ ॥ मनबुद्धीची कातरी । रामनाम सोने चोरी ॥६ ॥ ज्ञान ताजवा घेऊन हातीं । दोन्ही अक्षरें जोखिती ॥७ ॥ खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पैलथडी ॥८ ॥ नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस॥९ ॥


 ।। श्री संत मिराबाईचे अभंग ।।

( Shree sant mirabaiche abhang )

             ७८०. पग पुंगरु बांधकर नाची रे॥धृ॥ मैं अपने तो नारायणकी । हो गयी आपही दासी रे ॥१ ॥ विषका प्याला राजाजीनें भेजा । पीवत मीरा हासी रे ॥२ ॥ लोक कहे मीरा भई रे बावरी । बाप कहे कूलनाशी रे ॥३ ॥ मीराके प्रभु गिरीधर नागर । हरिचरनकी दासी रे ॥४ ॥


             ७८१. कृष्ण करो जजमान ॥ प्रबु तुम।।धृ .॥ जाकी कीरत बेद बखानत । सांखी देत पुरानाप्रभु .१ ।। मोर मुकुट पीतांबर सोभत । कुंडल झळकत कान ।। प्रभु .२ ॥ मीराके प्रभु गिरिधर नागर । दे दरशनको दान ।। प्रभु .३ ॥ 


            ७८२.तुम बिन मेरी कौन खबर ले । गोवर्धन गिरीधारी रे ॥धृ .॥ मोर मुगुट पीतांबर शोभे । कुंडलकी छबी न्यारी रे ॥१ ॥ भरी सभामों द्रौपदी ठारी । राखो लाज हमारी रे ॥२ ॥ मीरा के प्रभु गिरीधर नागर । चरण कमल बलहारी रे ॥३॥


            ७८३.हरि गुन गांवत नाचुंगी।।धृ०॥आपने मंदिरमो बैठ बैठकरागीता भागवत बाचूंगी ॥१ ॥ ग्यान ध्यानकी गठडी बांधकर । हरिहर संग मैं लागूंगी ॥२ ॥ मीराके प्रभु गिरीधर नागरासदा प्रेमरस चाखुंगी ॥३ ॥ 


।। श्री संत कबीर महाराजांचे अभंग ।।

( Shree Sant Kabir Maharajyanche Abhang )

             ७८४. संगत संतनकी करले जनमका सार्थक कछु करले ॥धृ .॥ उत्तम नरदेह पाया प्राणी इसका हित कछु करले । सद्गुरु शरण जाके बाबा जनम मरण करले ॥१ ॥ कहांसे आया कहां जावेगा ये कछु मालूम करना । दो दिनकी जिंदगानी बंदे चलना ॥२ ॥ कौन किसीके जोरूं लडके कौन किसीके साले । जबलग पल्लोमें पैसा भाई तबलग मिठ्ठा बोले ॥३ ॥ कहत कबीरा सुनभाई साधु बारबार नहीं आना ।  अपना हित कछु करले भाई अखर अकेला जाना।।४ ॥ 


             ७८५.गुरु बिन कौन बतावे बाट ॥धृ .॥ बड़ा बिकट यम घाट ॥१ ॥ भ्रांतिकी बाडी नदियां बिचमों । अहंकारकी लाट ॥२ ॥ मद मत्सरकी धार बरसता माया पवन घनदाट ॥३ ॥ काम क्रोध दो पर्वत ठाडे । लोभ चोर संगात ॥४ ॥ कहत कबीरा सुन मेरे गुनिया । क्यौं करना बोभाट ॥५ ॥


             ७८६. हरि बोलो भाई हरि बोलो भाई । हरी ना बोले वांकू राम दुन्हाई ॥१ ॥ काहेकू पढता खिन खिन गीता । हरिनाम लिया सो सब कुछ होता ॥२ ॥ मेरा मेरा कर कर क्या फल पाया । हरीके भजन बिन झूट गमाया ॥३ ॥ कहत कबीर हरिगुन गाया । गावत नाचत बैकुंठ जाना।।४ ॥


             ७८७. धन दौलत ही माल खजीना देखत है सपना ॥१ ॥ समज मना कुहि नही अपना॥धृ॥ नगीन आवे नगीन जावे । सात नही कपड कफना ।। २ ॥ कहत कबीर सुनो भाई साधू । राम नाम जपना ॥३ ॥ 


            ७८८. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रें ॥धृ .॥ जोगी दुखिया जंगम दुखिया तपसीकू दुख दुना रे ॥१ ॥ आशा मनशा सब घट व्यापी कोई महेल नहीं सुनारे । राजा दुखिया परजा दुखिया दुखिया घर बैरागी । दुखकारन सुखदेवने उदरी माया त्यागी ॥२ ॥ साच कहे तो सब जग दुखिया झूटा कहे न जाई । ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया जिन्ने सृष्टि कमाई॥३॥धूत दुखिया अवधुत दुखिया दुखिया है धनरंकारे । कहत कबीरा ओ नहीं दुखिया जिन्ने मनकू जीतारे ॥४ ॥


             ७८९ . ये दुनिया बुरी है । आपाअपसे भुली है ॥धृ .॥ सच्चा छांड झुटा करे । महेल खजाना मेरा है । भुल गया माया बाजार । फेर चौऱ्यांशी आया है । काका मेरे मामु मरे उनोसे देखकर रोता है । आप मरे जद रोवे कोय । देखो बुरी बाता है।॥२ ॥ कहत कबीर सुनो भाई साधु । दुनया भयो उलटी । रामनामकी सुद ना रखे । डारे गांड लंगोटी ॥३ ॥


             ७९०. ये पेट बडा बाका सबसे लगादिया धोका॥धृ .॥ देख फकीरा देख संन्यासी घरघर मांगे टुकरा । एक आसनपर कूई नहीं बैठा पिछे पेटका लकरा ॥१ ॥ येहि पेटसे राव सिपाई येहि पेटसे मरते । येहि पेटके खातर अदमी मुलख मुलख सब फिरते ॥२ ॥ कहत कबीरा सुनो भाई साधु सब दुनियासे न्यारा । भला बिचारा पशु पंखी वोही पेटनें घेरा ॥३ ॥


             ७९१ . जबका अजब तडका बे । तूं क्या जाने लडका बे ॥धृ .॥ बडे मिजाजी कठडे बैठे तकिया बिछाइत साजा । मार झपटकर जम ले जावे जैसा खबुतर बूझा ॥१ ॥ नवभी मर गये दसभी मर गये मर गये सहस्त्र अठ्यांशी । तेहतीस कोटी देवता मर गये पडे कालकी फांसी ॥२ ॥ पीस मरे पैगंबर मर गये मर गये जिंदा जोगी । जपी तपी संन्यासी मर गये मर गये हकीम रोगी ॥३ ॥ तीन लोकपर छत्र बिराजे लुटा कुंजबिहारी । कहत कबीरा सो भी मर गये रयत कौन बिचारी ॥४ ॥


             ७९२ . इस तन धनकी कौन बढाई । देखत नयनोमें मट्टी मिलाई॥धृ .॥ अपने खातर महेल बनाया । आपही जाकर जंगल सोया ॥१ ॥ हाड जले जैसे लकरीकी मोली । बाल जले जैसी घास की पोली ॥२ ॥ कहत कबीर सुन मेरे गुनिया । आप मुवे पिछे डुब गई दुनिया।॥३ ॥ 


            ७९३ . क्या खुबसुरत अल्लानें तुज बनवाई । राम भजनबिना देखो यारो चुप खाली गमाई ॥१ ॥ औट हातका मानव देह अल्लाने तुज दिया । खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया ॥२ ॥ मेरा मेरा सबही मेरा जनम भार मिलाया । लख चौऱ्यांशी गिरकी म्याने येही फल पाया।॥३ ॥ कौन किसोका साथी यारो कौन किसोका सगा । अंतकालकी रखना नहीं पावे दगा ॥४ ॥ कहत कबीर सुनो भाई साधु राम नाम सबसे मीठा । इदर उदर काहेकू देखे सबही बजार झूटा।।५ ।। 


            ७९४.सब पैसेके भाई।आपना साथी नही कोई॥धृ॥आपने पल्लोमें पैसा होय तो सबही खुशामत करते।जब आपनेपर बखत पडेगा तब कोई साथी नही चलते॥१॥माय बाप भाई जोरु और बहीन साले।जिसको यारो भला किया है वोही मिठा न बोले।।आपने हात पांव रह गये यारो लडका नजीक न आवे।बडा प्यार जोरुपर वोबी दुरसे पानी बतावे॥शाकहत कबीरा सुन भाई साधू करो बिचार पुरताासुनना होय तो सुनले प्यारे नही तो खावो गोता ॥४ ॥ 

।। श्री संत कान्होपात्राचे अभंग ।।

( Shree Sant Kanhopatrache Abhang )

            ७९५.माझे माहेर पंढरी । सुखे नांदु भीमातीरी ॥१ ॥ येथे आहे माय बाप । हरे ताप दरुशने ॥२ ॥ निवारिली तळमळ चिंता । गेली व्यथा अंतरीची॥३॥कै शी विटेवरी शोभली । पाहुनी कान्होपात्रा घाली॥४॥


  

***।। मालिका एकोणविसावी ।। ***

 ((( संताच्या पुण्यतिथी )))

( Santanchya Punyatithi )

   श्री संत एकनाथ महाराज  

 ( Shree Sant Eknath Maharaj  )

             ७९६ . जळ स्पर्शा जाता स्नानी । तंव चिन्मात्र भासे जीवनी ॥१ ॥ कैशी वाहातसे गंगा । स्नान हरपले ' अंग ॥२ ॥ अंगत्व मुकले अंगा । स्नाने सोवळी झाली गंगा ॥३ ॥ एकाजनार्दनी सज्जन । सकळ तीर्थे झाली पावन।॥४ ॥     

            ७९७ . पताकांचे भार वैष्णव नाचती । रामकृष्ण  गाती नामावली॥१॥शालीवाहन शके पंढराशे अकरा । विजय संवत्सरा फाल्गुन मास।।२ ॥ उत्तम हे षष्ठी दिवस रविवार । प्रयाण साचार दोन प्रहरी।।३ ।। निळा म्हणे ऐशा नामाच्या गजरी । समाधी गोजिरी प्रतिष्ठानी ॥४ ॥ 


  श्री संत सावता महाराज  

( Shree SAnt Savata maharaj )

             ७९८.धन्य ते अरण रत्नाची खाण । जन्माला निधान सांवता तो ॥१ ॥ सांवता सागर प्रेमाचा आगर । घेतला अवतार माळ्याघरी ॥२ ॥ धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता । सांठविला दाता त्रैलोक्याचा ॥३ ॥ नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला । वंश उद्धरिला माळियाचा ॥४ ॥ 


            ७९९ . उठोनिया प्रातःकाळी करुनिया स्नान । घालूनि आसन यथाविधी।।१ ।। नवज्वरे देह जालासे संतप्त । परि मनी आर्त विठोबाचे ॥२ ॥ प्राणायम करूनि कुंभक साधिला । निरोधिला मूळ तत्वी ॥३ ॥ वायु शके बाराशे सतरा शालीवाहन शक । मन्मथनामक संवत्सर ॥४ ॥ ऋतु ग्रीष्म आषाढ कृष्ण चर्तुदशी । आला उदयासी सहस्त्रकर ॥५ ।। सावता पांडुरंगी स्वरुपी मिनला । देह समर्पिला ज्याचा त्यासी ॥६ ॥


  श्री संत सेना महाराज  

( Shree sant sena maharaj )

            ८००.करितो विनवणी । हात जोडूनियां दोन्ही ॥१ ॥ हेंचि द्यावे मज दान । करा हरिचे चिंतन ॥२ ॥ जातो सांगूनिया मात । पांडुरंग बोलावित ॥३ ॥ सोडा द्वादशी पारणे । सुखे करावे कीर्तन ॥४ ॥ दिवस मध्यान्ही आला । सेना वैकुंठासी गेला।।५ ॥


             ८०१.माझे झाले स्वहित।तुम्हा सांगतो निश्चीत॥शाकरा हरिचे चिंतन।गावे उत्तम हे गुण।।धृ.॥श्रावण वद्य द्वादशी।सेना समाप्त त्यादिवशी ॥३ ॥


  श्री संत नरहरी महाराज   

( Shree sant narahari Maharaj )

             ८०२ . देवाच्या समोर नरहरि सोनार । हृदयी निरंतर हरिहर ॥१ ॥ पार्थीवसंवत्सरे बाराशे सात । उगवला दिवस सोमवार । नरहिर दोन प्रहरी देवाचे कटीशी । माघवद्य तृतीयेसी बैसलासे ॥३ ॥ नामदेव म्हणे नरहरि महाद्वारी । नामाचे गजरी गुप्त झाली ॥४ ॥ 


            ८०३. हा हाःकार झाला मानवा दानवी । ऋषिवृंदी पाही देवादिकी ॥१ ॥ नरहरि बैसला हरि कटि स्थानी । पाहता लोचनी संतमेळी ॥२ ॥ खुणाखुण व्यक्ति खुणाचे ते अव्यक्त । संत ते भाषिक एकसरा ॥३ ॥ नामा म्हणे तेव्हा होतो मी जवळी । नरहरि वनमाळी एक झाला ॥४ ॥


  श्री संत चोखोबाराय  

( Shree sant Chokhobaray )

            ८०४. शालीवाहन शके बाराशे साठ । प्रमाथी नाम स्पष्ट संवत्सर ॥१ ॥ वैशाख वद्य पंचमी सुदिन गुरुवारी प्रयाण करी चोखा।।२ ।। काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती । मी आलो व्यक्ती तयासांठी || ३ || नामदेवे अस्थि आणिल्या पारखोना घेत चक्रपाणी पितांबरी ॥४ ॥ वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार । नामाचा गजर महाद्वारी॥५॥ऐसे आनंदाने नामाच्या गजरी । दिली महाद्वारी समाधी त्या । नामा म्हणे धन्य विठोबाची कृपा । जाईन माझ्या बापा ओवाळून।।७ ।। 


***।। मालिका विसावी ।।***

( Malika Visavi )

  विनवणीचे अभंग  

( Vinantiche Abhang )

             ८०५.कृपाळु सज्जन तुम्ही संतजन । हेंचि कृपादान तुमचें मज ॥१ ॥ आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कीव माझी सांगा काकुळती ॥२ ॥ अनाथ अपराधी पतित आगळा । परि पायावेगळा नका करूं ॥३ ॥ तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी । मग मज हरि उपेक्षीना।।४ ।। 


            ८०६.शेवटींची विनवणी । संतजनीं परिसावी ॥१ ॥ विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी।।२ ।। पुढे फार बोलों कायी । अवघे पायीं विदित ॥३ ॥ तुका म्हणे पडिलों पायां । करा छाया कृपेची।।४ ॥ 


भजन : जय विठ्ठल । जय जय विठ्ठल ।।


             ८०७.हेंचि दान देगा देवा । तुझा व्हावा ॥ १॥ गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥ २॥ नलगे मुक्ति आणि संपदा । संत संग देई सदा ॥ ३॥तुका म्हणे गर्भवासी । सुखें घालावें आम्हांसीं ॥४ ॥ 

            ८०८. बोलिली लेकुरें । वेडी वाकुडी उत्तरें ।। १॥ करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ॥ २ ॥ नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥ ३॥ तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पाया पैं किंकरा ॥ ४ ॥ 


भजन : ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम ।।


             ८०९. झालें समाधान । तुमचे देखिले चरण ।। ॥ आतां उठावेसें मना । येत नाहीं नारायणा ।। २ ।। सुरवाडिकपणें । येथे सांपडलें केणे ॥ ३॥ तुका म्हणे भोग । गेला निवारला लाग ॥ ४ ॥

             ८१०.करूनी आरती । चक्रपाणि ओवाळिती ।। १॥ आजि पुरले नवस । धन्य काळ हा दिवस ॥२ ॥ पाहा वो सकळां । पुण्यवंत तुम्ही बाळा ॥ ३॥ तुका वाहे टाळी । उभा सन्निध जवळीं ॥ ४ ॥



MajhiMauli-blogger





FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER


Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.