Pasaydan lyrics in marathi with meaning, पसायदान श्लोक आणि सोप्या भाषेत अर्थ | भावार्थ | majhi mauli

shreyash feed ads 2
 पसायदान श्लोक आणि सोप्या भाषेत अर्थ |भावार्थ   | Pasaydan lyrics in marathi with meaning | majhi mauli 

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 

Download pasayadan in marathi song | music free






 



आता विश्चात्मके देवे, येणे  वाग् यज्ञे तोषावे  
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे  ।।


    श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या   वाणीतून जी ज्ञानेश्वरी लिहिली आहे, ती देवाकडं अर्पण करताना ज्ञानेश्वरीचे फळ म्हणून देवाकडे संपूर्ण विश्वकल्याणासाठी  प्रसादरूपी पसायदान मागितले आहे.

ज्ञानेश्वरांनी देवाकडे कृपाप्रसाद रुपी काय मागितले ते खालील ओव्यांमध्ये वर्णन करतात. )


जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो  
भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे  ।।


    प्रसादरूपी पसायदानात ते मागतात कि जे लोक दुष्ट व वाईट  आहेत, त्यांचा दुष्ट्पणा संपून ते चांगल्या मार्गाला लागावेत, त्यांच्यात सत्कर्माची गोडी वाढो आणि सर्व प्राणिमात्रांमध्ये प्रेम वाढो. 


दुरितांचे  तिमीर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो 
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात  ।।


    पापरूपी अंधाराचा नाश होऊन  स्वधर्म रुपी सूर्याचा उदय होवो. आणि प्राणिमात्रांना जे हवे ते मिळो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होवो.


वर्षत सकळमंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी  
अनवरत भूमंडळी, भेटतु भूतां  ।।



संपूर्ण जगावर कल्याण करणारे  ईश्वरनिष्ठ संतांनी या भूमीवर मंगल वातावरण निर्माण करण्यासाठी यावे व त्याचा सहवास सर्व प्राणिमात्रांना भेटत राहो. 



चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गांव 
बोलते जे अर्णव, पीयूषाचे ।।


ज्ञानेश्वर संतांचं वर्णन  करताना सांगतात कि संत हे कल्पवृक्षाची चालतीबोलती उद्याने आहेत. ज्ञानेश्वर संतांचं वर्णन  करताना सांगतात कि संत हे कल्पवृक्षाची चालतीबोलती उद्याने आहेत. ते जिथे राहतात ते जणू चिंतामणीचे गावच आहे. शिवाय ते अमृतासारखे बोलणारे समुद्राचं आहेत. 



चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन  
ते सर्वांही सदा सज्जन, सोयरे होतु  ।।



संत म्हणजे चंद्रासारखे शीतल ,  त्यांचा ज्ञानाचा प्रकाश खूप प्रखर असतो, पण सूर्यासारखा भाजून निघेल एवढाही नसतो. व ते सर्व सज्जनांचे मित्र आहेत.  



किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनि तिहींलोकीं 
भजि जो आदिपुरुखी, अखंडित  ।।



ज्ञानेश्वर संतांचं वर्णन  करताना सांगतात कि संत सर्वात आनंदी, तिन्ही लोकांमध्ये सर्वसुखी असूनही अखंडपणे उपासना करतात. 


आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये  
दृष्टादृष्टविजये, हो आवे जी  ।।



संत ज्ञानेश्वर म्हणतात कि ज्यांनी ह्या ग्रंथाचे तंतोतंत पालन केले आहे अश्या सर्व लोकांना आपल्या दुष्ट, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवून ते  सुखी व्हावे.



येथ म्हणे श्रीविश्वेशरावो, हा होईल दानपसावो  
येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला  ।।



यावर श्री विश्वेश्वर संत ज्ञानेश्वरांना वर दिला तुला इच्छित असलेला कृपाप्रसाद नक्कीच मिळेल. या गोष्टीमुळे संत ज्ञानेश्वर सुखी झाले आहेत. 




In English 


Aata vishwatmake deve, yene wagyadnye toshave |
toshoni maj dnyave, pasaayadaan he ||

Je khalanchi vyankati sando, taya satkarmi rati wadho |
bhuta paraspare pado, maitra jeevache ||

Duritanche timir javo, vishwa swadharme surye paho |
jo je wanchil to te laho, praanijaat ||

Varshat sakal mangali, ishwarnisthanchi maandiyaali ||
anavarat bhumandali, bhetatu bhuta ||

Chala kalpatarunche aarava, chetana chintamaninche gaava |
bolate je arnav, piyushache ||

Chandrame je alanchan, martand je tapahina |
te sarvaahi sada sajjana, soyare hotu ||

Kimbahuna sarv sukhi, purn houni tinhi loki |
bhajijo aadipurukhi, akhandit ||

Aani granthopajiviye, visheshi loki iye |
drushtaadrusta vijaye, hoave ji ||

Aani granthopajiviye, visheshi loki iye |
drushtaadrusta vijaye, hoave ji ||


majhi mauli 

धन्यवाद !



Whatsapp  ग्रुप मध्ये सहभागी व्हा 👉🏻Join






FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER


Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
Copyright by: AaryaSA Official