वाराचे अभंग ( सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार ) mauli majhi

shreyash feed ads 2

]] हरिः  ॐ [[

]] श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसज्ञ [[

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download


वाराचे अभंग ( सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार ) 

संपूर्ण  वारकरी भजनी मालिका ( वाराचे अभंग ) | Varkari Bhajani Malika ( Varache Abhang) in marathi  (Maulimajhi-blogger)


***।। भजनी मालिका ।। ***

--।।  मालिका दहावी ।। --

( Malika Dahavi )

[[--- वाराचे अभंग ---]]

( Varache abhang )

  (( सोमवारचे अभंग ))

( Somvarche Abhang )

             १८२. ॐ नमो शिवा आदि । कावडी घेतली खांदीं । मिळाली संत मांदी । त्याचे चरणरज रेणु वंदी २॥१ ॥ शिवनाम शीतळ मुखी । सेवीं पां कापडिया रे । दड दड दड दड दुडु दुडु दुडु दुडु । पळ सुटला कळिकाळा बापुडिया रे ॥२ ॥ गुरुलिंग जंगम । त्याने दाविला । आगमा आधिव्याधि झाली सम । तेणे पावली विश्राम रे।।३ ॥ जवळी असतां जगजीवन । का धांडोळीसी वन । एकाग्र करी मन । तेणें होईल समाधान रे ।। ४ || देहभाव जेथें विरे । ते साधन दिधलें पुरे । बापरखुमादेवीवरे । विठ्ठलु रे विठ्ठलु रे विठ्ठलु रे ॥५ ॥ 


            १८३. शिवनाम उच्चारा । तेणे कळिकाळासी दरारा ॥१ ॥ ऐसा नामाचा महिमा । न कळेचि आगमां निगमां ॥२ ॥ सकळ मंत्रांचे माहेर । शिव मंत्र पंचाक्षर || ३ || एकाजनार्दनी वाचे । शिवनाम जपा साचे ॥४ ॥


             १८४. सर्व साधनांचे सार । वाचे उच्चार शिवनाम।।१ ।। न लगे योगाची कसवटी । शिवनाम उच्चार होटी।।२ ।। घडे जप तप अनुष्ठान । वाचे सिंमत भावालात जाती पापे || ४ ||


             १८५.शिव भोळा चक्रवर्ती । त्याचे पाय माझें जलातो रात चित्तीं ।। १॥ वाचे वदतां शिवनाम । तया न बाधी क्रोध काम ।। || धर्म अर्थ काम मोक्षा शिवा देखता प्रत्यक्ष ।। ३॥ एका जनार्दनीं शिव । निवारी कळिकाळाचा भेव ॥ ४ ॥ 


            १८६. कैलासींचा देव भोळा चक्रवर्ती । पार्वतीचा पती योगीराज ॥ १॥ तयाचिये पायी माझें दंडवत । घडो आणि चित्त जडो नामीं ॥२ ॥ जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळीं । तिजा नेत्र ज्वाळी जातवेद ॥३ ।। कंठी काळकूट डौर त्रिशूळ हांतीं । सर्वांगी विभूती शोभतसे ॥ ४॥ गळां रूंडमाळा खापर हस्तकीं । रामनाम मुखीं सर्वकाळ ॥५ ॥ व्याघ्रचर्मधारी स्मशानीं राहिला । संगें भूतमेळा विराजीत ॥६ ॥ नामा म्हणे नामें नासोनियां पाप । करी सुखरूप भक्तांलागीं ॥ ७ ॥ 


            १८७. अहा आहा रे भाई प्रथम नमूं तो विनायका ठेवूनि गुरुचरणीं मस्तक । वदेन प्रासादिक । वाणी हरिहरांचे पवाडे ॥१ ॥ ऐसी माझी ब्रीदावळी । दासें दासत्त्वे आगळी । पान्हेरीने मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडी हो ॥२ ॥ जे शितळाहूनि शीतळ । पातळाहूनि पातळ । प्रेमामृत रसाळ । तें सेवा आहो भाग्याचे नु ॥३ ॥ जिंकाल तरी जिंका अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आधी मान । धराल ते धरा शंभूचें चरण । दावाल पण ऐसा दावा तो ॥४ ॥ काळा घेऊ नेदीं वावा आला तो राखे घावडाव । शुद्ध सत्वीं राखोनि भावा म्हणा महादेव हरहर वाणी गों द्या ॥५ ॥ तापराविया नारी माऊलीसमान । परधनी बाटों नेदीं मन । जीवित्व तें तृणासमान । स्वामीकाजी जाण शूर म्हणो तया आम्ही ॥६ ॥ शक्ति वेचाविया परोपकार । खोटें ना खोट्याचा पसारा । सत्य ते भवनदीचा तारा । आळस तो न करा येथे आले हो सांगतों ॥७ ॥ व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर । पुण्य तें असे गातां नाचतां बहु फार । पुन्हां बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥ संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा । पंथ तो सुपंथं चालावा प्रवृत्ति निवृत्ति चोखडी । पुढती पुढती अधिक गोडी ।


            १८८. स्वर्ग जयाची साळोखा । समुद्रपाळी पिंड देखा । शेषा सारखी बैसका । जो आधार तिहीं लोकां १॥ लिंग देखिलें देखिलें । तिहीं त्रिभुवनीं विस्तारलें । धृ ० ॥ मेघधारी स्नपन केलें । तारापुष्पी वरी पुजिलें । चंद्रफळ ज्या वाहिलें । ओवाळिलें रविदी ।। ३ ॥ आत्मनैवेद्य समर्पिलें । ब्रह्मानंदी मग वंदिलें । ज्योतिर्लिंग मग ध्यायिलें । ज्ञानदेवें हृदयीं ॥ ४ ॥


             १८९ . आम्ही कापडी रे आम्ही कापडी रे । पापें बारा वाता पळती बापडी रे ॥१ ॥ पंढरपुरीचे आम्ही कापडी रे । उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे ॥२ ॥ आजि पाहाले रे आजि पाहाले रे । संतसंगति सुख जालें रे ॥३ ॥ समता कावडी रे समता कावडी रे । माजि नामामृत भरिलें आवडी रे ॥४ ॥ येणें न घडे रे जाणे न घडे रे । निजसुख कोंदलें पाहातां चहूंकडे ।।५ ।। नलगे दंडणे रे नलगे मुंडणे रे । नाम म्हणोनि कर्माकर्म खंडणे रे ॥६ ॥ दुःख फिटले रे दुःख फिटले रे । बापरखुमादेवीवर विठ्ठले रे ॥७ ॥ 


            १९० . तुम्ही विश्वनाथ । दीनरंक मी अनाथा । १ ।। कृपा कराल ते थोडी । पाया पडिलों बराडी ।। २॥ काय उणें तुम्हापाशीं । मी तो अल्पचि संतोषी ।। ३॥ तुका म्हणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥४ ॥ 


             १९१.भस्म उटी रूंडमाळा । हातीं त्रिशूळ नेत्रीं । ज्वाळा ।। १॥ गजचर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २॥ भूतें वेताळें नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ॥ सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥४ ॥ 


(( मंगळवारचे अभंग )) 

( Mangalvarche Abhang )

            १९२ . रंगा येई वो ये रंगा येई वो ये । विठाई किठाई माझें कृष्णाई कान्हाई ॥१ ॥ वैकुंठवासिनी वो जगत्रय जननी । तुझा वेधु माझें मनीं वो ॥२ ॥ कटी कर विराजित । मुगुटरत्नजडित । पीतांबरु कसिला ने । । तैसा येई कां धांवत ॥३ ॥ विश्वरूप विश्वंभरे चे कमळनयन कमळाकरे । तुझें ध्यान लागो ॥ बापरखुमादेवीवरे वो ॥४ ॥ 


             १९३ . कनवाळू कृपाळू भक्तालागी मोही । २। गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाई ॥१ ॥ पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जीवलगे ये वो पांडुरंगे ॥२ ॥ डे भक्तांच्या कैवारें कष्टलीस विठ्ठलें । अंबऋषीकारणे जन्म दहा घेतले ॥।॥ प्रल्हादकारणे स्तंभी अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥४ ॥ उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी ना प्रेमपान्हा क्षीरसागरा ठायीं ॥५ ॥ कौरवीं पांचाळी | सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्रे कैसी झाली || माऊली ॥६ ॥ दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धावसी लवलाही शाखादेठ घेऊनि ॥७ ॥ कृपा माऊली भक्तिमुक्ति भांडार । करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ।।८ ॥ 


            १९४.चौक भरियेला आसनीं । पाचारिली कुळस्वामिनी वैकुंठवासिनी । ये धांवोनि झडकरी १॥ रंगा येई वो विठाई । सांवळिये डोळसें । तुझे श्रीमुख साजिरे । तें मी केधवा देखेन ।। २॥ रजतम धुपारती । पंचप्राणांची आरती । अवघी सारौनि आईती । ये धावत झडकरी ॥ शामन मारुनि मेंढा मुठी । आशा मनसा तृष्णा सुटी । भक्ति भाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ।। ४ ।। डाका अनुहात गजरें । येऊनि अंगासि संचरे । आपुला घेऊनि पुरस्कार । आरोग्य करी तुकयासी ।। ५ ॥ 


            १९५.माझें कुळीची कुळ स्वामिनी । विठाई जगत्रय जननी । येई वो पंढरपूरवासिनी । ठेविले दोनी कर जघनीं । उभी सखी सजनी ॥१ ॥ येई पुंडलिके वरदायिनी । विश्व जननी । रंगा येईं वो ॥धृ .॥ मध्ये सिंहासन घातलें । प्रमाण चीक हे साधिले । ज्ञान कळस वर ठेविले । पूर्ण भरियले । धूप दीपि । सुवासें करूनि ॥शासभा मंडप शोभला । भक्ति चांदवा दिधला । उदो उदो शब्द गाजला । रंग माजला । वेद बोलिला । मूळची ध्वनी ॥३ ।। शुक सनकादिक गोंधळी । जीव शिव घेऊनि संबळी । गाती हरीची नामावळी । मातले बळी । प्रेम कल्लोळीं । सुखाचे  सदनी ॥४ ॥ ऐसा गोंधळ घातिला । भला परमार्थ को लुटिला । एकाजनार्दनीं भला । ऐक्य साधिला । ठाव आपुला । लाभ त्रिभुवनी ॥५ ॥ 


            १९६ . अनादि अंबिका भगवती । बोध परडी - घेउनी हातीं । पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदो भक्त झ नाचती ॥ १॥ गोंधळा येई वो जगदंबे । मूळपीठ तूं अंबे ॥ धृ ० ॥ व्यास वसिष्ठ शुक गोंधळी । नाचताती सोहंमेळीं । द्वैतभाव विसरूनी बळी । खेळती अंबे तुझे गोंधळी ॥ २॥ मुकुटमणी पुंडलिक । तेहतीस कोटी देव नायक । गोंधळ घालिती सकौतुक । एकाजनार्दनीं नाचे देख ॥ ३ ॥ 


             १९७.अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुर मर्दनालागुनी । त्रिविध तापांची करावया झाडणी । भक्तालागीं तूं पावसी निर्वाणी ॥१ ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारूनी माळ मी घालीन । हातीं बोधाचा झेंडा मी घेईन । भेद रहित वारीसी जाईन ।। २ ।। नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा । करूनि पोटी मागेन ज्ञानपुत्रा । धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा । दंभ सासऱ्या सांडिन कुपात्रा ॥ ३॥ पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी । ४॥ आतां साजणी जाले मी निःसंग । विकल्प मांग । केला मोकळा मारग सुरंग ॥ ५॥ ऐसा जोगवा मागुनी ठेविला । जाऊनी नवस महाद्वारी फेडिला । एकपणे जनार्दन देखियेला । जन्ममरणाचा फेरा भजनी मालिका चुकविला ॥ ६ ॥ 


            १९८.पिंडांड ब्रह्मांड अंतरीं द्वैवत भिन्नाकृति वो । शोधोनी पाहतां अवघे चराचर व्यापक धनसंभूती वो । भेदभाव त्रिगुणाचा रज तम सत्त्वाची आरती वो । ऐसें जाणोनी । केली उभवणी । द्वैत सारूनी । परी तो मनी । एक हरी अंकिला । तुज म्यां फुलवरा बांधिला ।। धृ ० ॥ जय जगदंबे पूर्णकदंबे जग उद्बोधे देह तुज अर्पिला । तुज म्यां फुलवरा बांधिला ॥ १ ॥ आई भवानी थोर जाणोनी । तिज म्यां उपासिले वो । हाती परडी देऊन तिने मज भिकेसी लाविलें वो । खुळा पांगळा करूनी आपणाजवळी बसविलें वो । उदो अस्तुचें भरें । फिरे गरगरे । भूत वावरे । तो मज व्यर्थ शीण वाटला ।॥ २॥ खंडोबासी नवस करोनी मुरळी होऊनी बैसलें वो । आपुले जे कां सखे सज्जन ते विवंचूनी भरी भरलें वो । वारी मागतां पोट भरेना प बहु श्रम पावले वो । श्वानातिये परी । वृथा गुरगुरी । जाय चाचरी । परी तो हरी नाही देखिला ॥ ३ ॥ माझें घरी पाहुणा भैरव येऊनि बैसला वो । त्रिगुणाचा त्रिशूळ घेऊनि प्रपंच विस्तारला वो । जोगी बोलाऊनि परत भरूनी भराड म्यां घातिला वो । ऐशी वरदळे । सोशिली बळें । जाली निर्फळें । सुखाचा लेश नाहीं देखिला।।४ ।। मुंजाबासी डाक घालूनी मेसाई आळविली वो । त्रिगुणाची तिवई करूनी त्यावरी बसविली वो । धूपदीप नैवेद्य दाउनी पंचारती केली वो । तिने मज नाडिलें । दुःख भोगिलें । सुख नासलें । मग म्या ढकलून दिलें तिला ॥ ५॥ ऐशी दैवतें केली अनंते नवस बहु फेडिलें वो । परि ते फलकट जालें शेवटी गळां येउनी पडिले वो । बहु जाचिलें दुःख भोगिलें चौदिशी व्यापिलें वो । जाले मी उदास । धरली कास । सोडूनी आस । पंढरी पाहूनी जीव हर्षला ॥६ ॥ वैकुंठीचे निधान त्याचे असती जे प्रियकर वो । त्यांची गाठ पडली तेणें दिधला अभयकर वो । त्यांचे संगती गेलें भक्तीने देखिलें भीमातीर वो । परात्पर सोयरा । पुंडलिक बरा दिधला थारा । तेणें मज बुडतां हात दिधला ॥ ७॥ डोळा घालुनी अंजन घेवुनी गेले मज राऊळीं वो।विटेवरी जगदंबा एका एकी नयनी देखिली वो ।मनोभावे वरदळ वृत्ती देहाची खुंटली वो । एका जनार्दनीं भलें । द्वैत हरपलें । ऐक्य संचलें । जन्म मरणाचा पट फाटला ॥ ८ ॥


(( बुधवारचे अभंग ))

( Budhavarache Abhang )


            १९९ . विठ्ठलु नाहीं जये शरीरीं । वायां कां गा जन्मले संसारीं । विठ्ठलु नाहीं जयें नगरी । तें अरण्य जाणावें ॥ १॥ विठ्ठलु नाही जये देशी । स्मशान भूमी ते परियेसी । रविशशीवीण दिशा जैसी । रसना तैशी विठ्ठलेंवीण॥धृ ॥  विठ्ठला वेगळें जितुके कर्म । विठ्ठला वेगळा जितुका धर्म । विठ्ठला वेगळे बोलती ब्रह्म । तितुकाही श्रम जाणावा ॥३ ॥ सच्चिदानंदघन । पंढरीये परिपूर्ण । कर ठेवोनियां जघन । वाट पाहे भक्तांची ॥ ४॥ विठ्ठलेवीण देवो म्हणती । ते संसार पुढती पावती । विठ्ठलवीण तृप्ती । नाहीं प्रीती विठ्ठलेवीण ॥ ५॥ श्रीगुरु निवृत्तीने दिधलें । तें प्रेम कोणें भाग्य लाधलें । बापरखुमादेवीवर विठ्ठलें । ऐसे केलें ज्ञानदेवा ॥ ६ ॥ 


            २००.नेणों ब्रह्म मार्ग चुकलें । उघडे पंढरपुरा आले । भक्त पुंडलिकें देखिलें । उभे केलें विटेवरी ।। था तो हा विठोबा निधान । ज्याचें ब्रह्मादिकां ध्यान । पाऊले समान । विटेवरी शोभती ।। २॥ रूप पाहता तरी डोळसु । सुंदर पाहतां गोपवेषु । महिमा वर्णितां महेशु । जेणे मस्तकी वंदिला ।। ३ ।। भक्ति देखोनि लांचावला । जाऊं नेदी उभा केला । निवृत्तिदास म्हणे विठ्ठला । जन्मोजन्मीं न विसंबें ॥ ४ ॥


             २०१.सार सार सार विठोबा नाम तुझें सार । म्हणोनि शूळपाणी जपताहे वारंवार ॥१ ॥ आदि मध्य अंती निजबीज ओंकार । ध्रुव प्रल्हाद अंबऋषी मानिला निर्धार ॥ २॥ भुक्ति मुक्ति सुखदायक साचार । पतित अज्ञान जीव तरले अपार ॥ ३॥ दिवसेंदिवस व्यर्थ जात संसाराबापरखुमादेविवरा विठ्ठलाचा आधार ॥४ ॥ 


            २०२. कांही नेणोनियां आन । एकला विठ्ठलचि  जाण ॥ १॥ पुढती पुढती मन । एक विठ्ठलचि जाण । शा गुरुगम्य हे तयाची खूण । एक विठ्ठलचि जाण ।। | बुझसी तरी तूंचि निर्वाण । एक विठ्ठलचि जाण ॥ आ हेचि भक्ति हेचि ज्ञान । एक विठ्ठलचि जाण ॥५ ॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलाचि आण । एक विठ्ठलचि जाण।।६ ।। 


            २०३. विठ्ठल नाम नुच्चारीसी । तरी रवरव कुंडी पडसी ॥१ ॥ विठ्ठल नाम उच्चारी । आळसु न करी क्षणभरीं।।२ ।। विठ्ठल नाम तीन अक्षरें । अमृतपान केले शंकरें।।३ ॥ रखुमादेवीवरा विठठ्ठलें । महापातकी उद्धरिलें ॥४ ॥


             २०४.पांडुरं कांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळाफांकती प्रभा । अगणित लावण्य तेजः पुंजाळले । न वर्णवे तेथींची शोभा ।॥ १॥ कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । येणे मज लाविला वेधु । खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी । आळविल्या नेदी साधु ॥ शाशब्देविण संवादु दुजेवीण अनुवादु । हे तंव कैसेनी गमे । परेही परतें बोलणे खुंटलें । वैखरी कैसेनि सांगे ।। ३ || पायां पडूं गेले तंव पाऊलचि न दिसे । उभाचि स्वयंभू असे । समोर की पाठमोरा हे न कळे । टकचि पडिलें कैसें ॥ ४॥ क्षेमालागी जीव उतावीळ माझा । म्हणवुनी स्फूरताती बाहो । क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली । असावला जीव राहो ॥५ ॥ बापरखुमादेविवरू हृदयींचा जाणुनी । अनुभवु सौरसु केला । दृष्टीचा डोळा पाहों मी गेलिये । तंव भीतरी पालटु झाला ॥ ६ ॥


             २०५. भ्रम धरिसी या देहाचा । विठ्ठल म्हणे का  रे वाचा ॥ १॥ पडोनी जाईल कलेवर । विठ्ठल उच्चारी पां सार ।। || बापरखुमादेविवरू अभयकरू । मस्तकीं ठेविला हा निर्धारू ।। ३ ॥


             २०६.नकळं ते कळों येईल उगलें । नामें या विठ्ठले एकाचिया ॥१ ॥ न दिसें तें दिसो येईल उगलें । नामें या विठ्ठले एकाचिया ।॥ २॥ न बोलों तें बोलों येईल उगलें । नामें या विठ्ठले एकाचिया ।। ३॥ न भेटें तें भेटो येईल आपण । करितां चिंतन विठोबाचें । ४॥ अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर म्हणतां वाचें ।। ५ ।। तुका म्हणे जीव आसक्त सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥ ६ ॥ 


            २०७. आनंद अद्वय नित्य निरामय जे कां निजध्येय योंगियांचे ॥ १॥ ते हे समचरण साजिरे विटेवरी।पाहा भीमातीरी विठ्ठल रुप ॥२ ॥ पुराणासी वाड श्रुति नेणती पार । झालें साकार पुंडलिका ॥ ३॥ तुका म्हणे ज्यातें सनकादिक ध्यात । तें आमुचें कुळदैवत पांडुरंग ॥ ४ ॥ 


            २०८. विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातांगीतीं । १॥ आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपुळिया धन ।। २॥ विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजीवनीं ।॥ ३ ॥ रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ।। ४ ॥


            २०९ . विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडी उन्नारा ॥१ ॥ विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥२ ॥ विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल मुखा विठ्ठल ॥४ ॥ छंद विठ्ठल ॥३ ॥ विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ।।३।।


            २१०.बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१ ॥ येणे सोसें मन झालें हावंभरी । परत माघारी घेत नाहीं ॥ २॥ बंधनापासोनी उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाश ।। ३॥ तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । काम क्रोधे केलें घर रिते ॥४ ॥


             २११. भवसागर तरतां । कां रे करितासा चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवूनियां ॥१ ॥ त्याचे पायीं घाला मिठी । मोल ने घे जगजेठी । भावा एकासाठीं । खांदा वाहे आपुल्या ॥२ ॥ सुखें करावा संसार । परि न संडावें दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥३ ॥ भुक्ति मुक्तीची चिंता । नाहीं दैन्य दरिद्रता । तुका म्हणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥४ ॥


             २१२.दोन्ही हात ठेवूनि कटीं । उभा भीवरेच्या तटी । कष्टलासी साठीं । भक्तिकाजें विठ्ठला ॥१ ॥ भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आम्हालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत।।२ ॥ होतासी क्षीरसागरी । मही दाटली असुरीं । म्हणोनियां घरीं । गौळियाचे अवतार ॥३ ॥ केला पुंडलिकें गोवा । तुज पंढरीये देवा । तुका म्हणे भावा । साठी हाती सापडसी ॥४ ॥ 


            २१३.अनंत तीर्थाचें मोहर । अनंत रूपांचें हैं सार । अनंता अनंत अपार । तो हा कटी कर ठेवूनि उभा ॥१ ॥ धन्य धन्य पांडुरंग । सकळ दोषा होय भंग । पूर्वज उद्धरती सांग । पंढरपूर देखलिया।।२ ।। निरा भींवरा पडतां दृष्टी । स्नान करितां शुद्ध सृष्टी । अंती ती वैकुंठप्राप्ती । ऐसें परमेष्ठी बोलिला।।३ ।। तेथें एक शीत दिधल्या अन्न । कोटी कुळांचे होय उद्धरण । कोटी याग केले पूर्ण । ऐसें महिमान ये तीर्थांचे ॥४ ॥ नामा म्हणे धन्य जन्म । ज्यासी पंढरीचा नेम । तया अंती पुरूषोत्तम । जीवेंभावें न विसंबें ॥५ ।।


(( गुरुवारचे अभंग )) 

( Guruvarche Abhang )

            २१४. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा । निवृत्ति उदारा सोपानदेवा ॥१ ॥ मुक्ताबाई त्रिभुवन पावनी । आद्यत्रय जननी देवांचिये ॥२ ॥ जगदोद्धारालागीं धरिले अवतार । मिरविला बडिवार सिद्धाईचा ॥३ ॥ निळा शरणागत म्हणवी आपुला । संती निरविला देऊनी हातीं।।४ ।। 


            २१५. उभारिला ध्वज तिहीं लोकांवरी । ऐसी चराचरी कीर्ति ज्याची ॥१ ॥ ते हे निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञानदीप्तिकळा।।२ ॥ धरूनी सगुणरूपे केली बाळक्रीडा । बोलविला रेडा निगमवाचें।।३ ।। बैसोनिया वरी चालविली भिंती ।  वांगदेवाप्रती दिली भेटी ॥४ ॥  मग वास केला अलकापुरासी । पिंपळ द्वारासी कनकाचा।।५ ॥ निळा म्हणे ज्यांच्या नामें करता घोष । नातळती दोष कळिकाळाचे ॥६ ॥ 


            २१६. म्हैसिपुत्रामुखें बोलवणे श्रुती । चालविणे भिंतीं बैसोनिया ॥१ ॥ नव्हे हा सामान्य महिमा संतांचा । नैवेद्य हातींचा मूर्ति जेवी ।। २॥ उदकामाजी वहा ठेवूनी कोरड्या । दाखवणे रोकड्या विश्वजना ॥३ ॥ निळा म्हणे तिहीं संगेचि तारणें । दीनें उद्धरणे नवल कोण ।॥ ४ ॥ 


            २१७.पशुमुखें वेदाच्या श्रुति । पढवा कीर्ति तुमचिये ॥१ ॥ अचेतन भिंती चालवणें । हेही करणे विचित्र ॥२ ॥ तेरा दिवस उदकी ठेवा । कागद देवा कोरडे ॥३ ॥ निळा म्हणे नारायण । ब्राह्मणजन तुम्हां घरीं ॥४ ॥


             २१८.यात्रे अलंकापुरा येती । ते ते आवडती विठ्ठला ।। १॥ पांडुरंगें प्रसन्नपणे । दिधले देणे हे ज्ञाना ।। २॥ भूवैकुंठ पंढरपूर । त्याहूनी थोर महिमा या ॥ ३ ॥ निळा म्हणे जाणोनि संत । येती धांवत प्रतिवर्षी ॥४ ॥ 


            २१९.तिन्हीं देव जैसे परब्रह्मींचे ठसे । जगीं सूर्य तैसे प्रकाशले ॥१ ॥ धन्य तो निवृत्ति धन्य तो सोपान । धन्य हा निधान ज्ञानदेव ॥२ ॥ उपजतांचि  ज्ञानी हे वर्म जाणोनि । आले लोटांगणी चांगदेवा ३॥ संस्कृतांचि गांठी उघडोनी ज्ञानदृष्टी । केलीसे मराठी गीता देवी ॥४ ॥ प्रत्यक्ष पैठणी भेटी केला वादा रेड्यामुखी वेद बोलविला ॥५ ॥ नामा म्हणे सर्व सुकृतें लाहिजे । एक वेळां जाईजे अलंकापुरा ॥६ ॥ 


            २२०. आळंदी हे गांव पुण्यभूमि ठाव । दैवताचें नांव सिद्धेश्वर ॥१ ॥ चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा । तो सुख सोहळा काय सांगू ॥२ ॥ विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव । स्वर्गीहूनि देव करिताती ॥३ ॥ नामा म्हणे देवा चला तया ठाया । विश्वांती घ्यावया कल्पवरी ॥४ ॥


             २२१. शिव तो निवृत्ति विष्णु ज्ञानदेव पाही । सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई ॥१ ॥ धन्य धन्य धन्य धन्य निवृत्तिराया ।। धन्य ज्ञानदेव सोपान सखया ॥२ ॥ प्रत्यक्ष पैठणीं भटां दाविली प्रचिती । रेडियाचे मुखें वदविली वेदश्रुति ॥३ ॥ चौदाशें वरुषांचे तप्तीतीर रहिवाशी । गर्व हरविला चालविलें भिंतीशी ॥४ ॥ धन्य कान्हुपात्रा आजी झाली भाग्याची । भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणूनिया ॥५ ॥


             २२२.सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥१ ॥ महाविष्णुचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥२ ॥ ब्रह्मा सोपान तो झाला । भक्तां आनंद वर्तला ॥३ ॥ आदिशक्ति मुक्ताबाई । दासी जनी लागे पायीं ॥४ ॥


            २२३.ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तूं सर्वज्ञा । ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा । ज्ञाता झेय निजांगें होय ऐसी प्रतिज्ञा । ज्ञानाप्नीने पापें जळती हे ज्याची आज्ञा ॥१ ॥ ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतां ज्ञान देव देतो । वासुदेव होतो अखंड वदनीं वदे तो ॥ धृ ० ॥ नररूपें विष्णु अवतरला हा भगवान । नदीनद वापी कूप पाहतां उदक नोहे भिन्न । नवल हेंचि पशु म्हैसा करी वेदाध्ययना नमन करूनी सद्भावें जपतां होय विज्ञान ॥ २॥ देवाधिदेव भक्ताप्रति वर दे । देतां वर ब्रह्मांडी ब्रह्मानंद वो कोंदें । देशिकराज दयानिधि अलंकापुरी जो नांदे । देशभाषा ज्ञानदेवी गीतार्थ वदे ॥ ३॥ वक्ते श्रोतें ग्रंथपठनें पावति समभाव । वर्जू जातां अघटित महिमा होतो जीव शिव । वंदुनि अनन्य एका जनार्दनी धरी दृढ भाव । वर्षती निर्जर ज्ञानदेव नामें पुष्पांचा वर्षाव।।४ ॥ 


            २२४.कैवल्याचा पुतळा । प्रगटला भुतळा । चैतन्याचा जिव्हाळा । ज्ञानोबा माझा ॥१ ॥ साधकाचा मायबाप । दरूशनें हरे ताप । सर्वाभूती सुखरूप । ज्ञानोबा माझा ॥२ ॥ ज्ञानियांचा शिरोमणि । वंद्य जो कां पूज्यस्थानीं । चिंतकाचा चिंतामणी।ज्ञानोबा माझा ॥३ ॥ चालविली जड भिंती । हरली चांगयाची भ्रांती । मोक्ष मागींचा सांगाती । ज्ञानोबा माझा ॥४ ॥ रेड्यामुखीं वेद बोलविला । गर्व व्दिजांचा हरविला । शांतिरूपें प्रगटला । ज्ञानोबा माझा ॥५ ॥ ब्रम्हसाम्राज्य दीपिका वर्णियेही गीतेची टिक विठोबाचा प्राणसखा । ज्ञानोबा माझा ॥६ ॥ गुरूसेवेलागी जाण । शरण एका जनार्दन । त्रैलोक्याचे जीवन । ज्ञानोबा माझा ॥७ ॥


             २२५.जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ । अंगी ऐसे बळ रेडा बोलें ॥१ ॥ करील ते काय नोहे महाराज । परि पाहें बीज शुद्ध अंगीं ॥२ ॥ जयाने घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥३ ॥ तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधान चित्ताचिया ॥४ ॥


 (( शुक्रवारचे अभंग ))

( Shukravarche Abhang )

            २२६.तूं विटेवरी सखये बाई हो करीं कृपा । माझें मन लागो तुझ्या पायीं हो करीं कृपा । तूं सावळे सुंदरी हो करीं कृपा । लावण्य मनोहरी हो करी कृपा । निजभक्तां करूणा करीं हो करीं कृपा ॥ १॥ पंढरपुरी राहिली । डोळां पाहिली । संतें देखिली । वरूनी विठाई वरूनी विठाई । सच्चिदानंद अंबाबाई हो करीं कृपा । उजळ कुळदीपा । बोध करी सोपा । येऊनि लवलाही येऊनि लवलाही ॥ २॥ तुझा देव्हारा मांडिला हो करी कृपा । चौक आसनी कळस ठेविला हो करी कृपा । प्रेम चांदवा वर दिधला हो करी कृपा । ज्ञानगादी दिली बैसावया हो करीं कृपा । वरी बैसविली आदिमाया हो करी कृपा । काम क्रोध मद मत्सर । दंभ अहंकारा त्यांचे बळ फार । सर्व सुख देई सर्व सुखा देई ॥ ३॥ शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा । नाचताती प्रेमकल्लोळी हो करीं कृपा । उदो उदो शब्द आरोळी हो करीं कृपा । पुढे पुंडलिक दिवटा हो त्याने मार्ग दाविला निटा हो करीं कृपा । आई दाविली मूळपीठा हो करीं कृपा । बापरखुमादेविवरू । सुरसागरू । त्याला नमस्कारू । सर्व सुख देई सर्व सुख देई ॥ ४ ॥


             २२७. पति जन्माला मझे उदरी । मी झालें तयाची नोंवरी ॥१ ॥ पतिव्रता धर्म पाहा तो माझा । सर्वापरी पति भोगिजे वोजा ॥२ ॥ निर्गुण पति आवडे मज । आधी माय पाठी झालिये भाज।।३ ।। मी मायराणी पतिव्रता शिरोमणी । ज्ञानदेवो निरंजनी क्रिडा करी ॥४ ॥ 


            २२८. फुगडी फूं गे बाई फुगडी फूं । निजब्रह्म तूं गे बाई परब्रह्म तूं गे ॥१ ॥ मन चित्त धू । विषयावरी थू ॥२ ॥ एक नाम मांडी । दुजा भाव सांडी ॥३ ॥ हरि आला रंगीं । सज्जनाचे संगीं ॥४ ॥ सकळ पाहें हरी । तोचि चित्तीं धरीं ॥५ ॥ नमन लल्लाटीं । संसारेसी साटी ॥६ ॥ वाम दक्षिण । चहूं भुजी आलिंगण ॥७ ॥ ज्ञानदेवा गोडी । केली संसारा फुगडी।।८ ॥ 


            २२९.सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो । ज्ञानवैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो । चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळिला वो । घालुनि सिंहासन वरूते घट स्थापियेला वो ॥१ ॥ उदो बोला उदो उदो सद्गुरू माउलीचा वो॥धृ ० ॥ प्रवृत्तीचे आणि निवृत्तीचे घालुनि शुद्ध आसन वो । ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळिलें चरण वो । कायावाचामने एकविध केलें अर्चन वो । द्वैतअद्वैतभावें दिलें आचमन वो ॥२ ॥ भक्ति वैराग्य ज्ञान याही पूजियेली अंबा वो । सद्रूप चिद्रूप पाहुनी प्रसन्न जगदंबा वो । एका जनार्दनी शरण मूळकदंबा वो । त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उभा वो ॥३ ॥


             २३०. निर्गुण निराकार दादा माहूर माझें गांव । शकुन सांगावया आले यमाई माझें नांव । तये नगरी वस्ती केली मी तरी आले एकभावें । ऐसा माझा शकुन दादा चित्त देवून ऐकावें ॥१ ॥ कैकाय कैकाय बाबा दुरील माझा देश । शकुन संगावया मी आले कलियुगास । ब्रह्माविष्णुमहेश पुसती शकुन आम्हांस । ऐसे निदान आम्ही सांगितले त्यांस ॥२ ॥ धरित्री आकाश मज देखतां उत्पत्ती । चंद्र सूर्य दादा मज देखतां होती । ब्रह्माविष्णुमहेश मज देखतां उपजती । जेथें आहे शिव तेथें आदिशक्ति ॥३ ॥ दाही अवतार मज देखतां झाले । अकराही रुद्र दादा होऊनियां गेले । अठ्यांशी सहस्त्र ऋषी मज देखतां जन्मले । ब्रह्मादि तेहतीस कोटी देव खेळविले ॥४ ॥ अठ्ठावीस युगे झाली चक्रवर्ती । कौरव पांडव गेले दादा नेणों किती । छपन्न कोटी यादव गेले दादा कोण पंथीं । आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी न राहाती ॥५ ॥ पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल । बहीण भावा दोघांजणांचा विवाह लागेल । पांचा वरुषांची बाळा भ्रतार मागेल । सहा वरुषांची नारी गर्भिण होईल।।६ ।। आणिक एक दादा माझा ऐकावा बोल । पृथ्वी वरुता वारा थोर झुंजाट सुटेल । थोर थोर दादा पर्वत उडोनि शक्रवारच । ना जातील । अठराही जाती एके ठिकाणी जेवतील ॥७ ॥ कलियुगाची दादा ऐकावी थोरी । पुत्र तो होईल पित्याचा वैरी । भ्रतारा सोडोनि घरोघरी फिरतील नारी । ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी ॥८ ॥ री आणिक एक दादा माझें ऐका उत्तर । आकार जाईल अवघा होईल निराकार । जाती चंद्र सूर्य मग पडेल य अंध : कार । धरित्री आकाश जाईल मग कै चा ने दिनकर॥९ ॥ आणिक एक शकुन माझा ऐकावा ना संतीं । तुम्ही मूळ पीठी रांहणे नांव माझें आदिशक्ति । जी अंबेचा व्यवहार त्राहे त्राहे आदिमूर्ति । एकाजनार्दनीं = प्रसन्न झाली आदिशक्ति ॥१० ॥ 


            २३१.सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो ।  पंचप्राण दिवटे दोनी नेत्रांचे हिल्लाळ वो ॥ १ ॥ पंढरपुरनिवासे तुझें रंगी नाचत असें वो । नवस पुरवीं माझा मनीची जाणोनियां इच्छा वो ॥ २॥ मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवना माझारी वो । चौक साधियेला नाभिकळस ठेविला वरी वो ॥ ३॥ बैसली देवता पुढे वैष्णवांचे गाणें वो । उद्गारें गर्जती कंठी तुळशीची भूषणे वो ॥ ४॥ स्वानंदाचे ताटी धूपदीप पंचारती वो । ओवाळिली माता विठाबाई पंचभूर्ती वो ।। ५ ।। तुझे तुज पावले माझा नवस पुरवीं आतां वो । तुका म्हणे राखें आपुलिया शरणागता वो।।६ ।। 


            २३२.पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा । गर्जा जयजयकार हरि हृदयीं धरा । आळस नका करूं सांगतो लहानाथोरां ॥१ ॥ या हो या हो बाइयांनो निघाले हरी । सिलंगणा वेगीं घेऊनि आरत्या करीं । ओवाळू श्रीमुख वंदू पाऊलें शिरीं । आम्हां दैव आले येथे घरींच्या घरी ॥२ ।। अक्षय मुहूर्त औटामध्ये साधतें । मग येरी गर्जे जैसे तैसें होत जाते । म्हणोनि मागे पुढे कोणी न पाहावें येथें । सांडा परतें काम जाऊं हरी सांगाते ॥३ ॥ बहुतां बहुतां रीतीं चित्तीं धरा हे मनीं । नका गई करूं आइकाल ज्या कानीं । मग हे सुख । तुम्ही कधी न देखाल स्वप्नीं । उरेल हाय हाय मागें होईल कहानी ॥४ ॥ ऐसियास वंचता त्यांच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार । मग हे वेळ घटिका न ये अजरामर कळलें असो द्या मग पटतील विचार ॥५ ॥ जयासाठी ब्रह्मादिक जाले ते पिसे । उच्छिष्टाकारणे देव जळी जाले मासे । अर्धांगी विश्वमाता लक्षुमी वसे । तो हा तुकयाबंधु म्हणे आले अनायासें ॥६ ॥


(( शनिवारचे अभंग ))

( Shanivarche Aabhang )

            २३३.शरण शरणजी हनुमंता । तुज आलो रामदूता ॥१ ॥ काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥२ ॥ शूर आणि धीर । स्वामीकाजी तूं सादर ॥३ ॥ तुका म्हणे रूद्रा । अंजनीचिया कुमरा ॥४ ॥ 


            २३४.मी तो अल्प मतिहीन । काय वर्ण तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हे महिमान नामाचें ।। १॥ नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भलें कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केलें राक्षसां ।। २॥ द्रोणागिरि कपि हातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याती । भरतभेटी समयीं ।। ३ ।। शिळा होती मनुष्य झाली । थोर किर्ति वाखाणिली । लंकादहन केली । हनुमंतें काशानें ॥ ४॥ राम जानकी जीवन । योगियांचें निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदीतो ॥५ ॥ 


            २३५. केली सीताशुद्धी । मूळ रामायणा आधीं ।। २॥ ऐसा प्रतापी गहन । सकळ भक्तांचे भूषण ॥ २ ॥... जाऊनि पाताळा । केली देवीची अवकळा ॥ ३ ॥ राम लक्ष्मण । नेले आणिले चोरून ॥ ४॥ जोडोनिया कर । उभा सन्मुख समोर ॥ ५॥ तुका म्हणे जपे ।


             २३६.हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥ १॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ।। २॥ करोनि उड्डाण । केलें लंकेचे शोधन ॥३ ॥ जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ।। ४ || 


            २३७.काम बांदवडी । काळ घातला तोडरी ॥ १॥ तया माझें दंडवत । कपिकुळी हनुमंत ॥ २ ॥ शरीर वज्रा ऐसें । कवळी ब्रह्मांड जो पुच्छे ॥ ३ ॥ रामाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥ ४ ॥ 


            २३८. रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी । हृदय मंदिरी स्मरा कारे ॥ १॥ आपुली आपण करा सोडवण । संसार बंधन तोडा वेगी ॥२ ॥ ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा । हृदयीं जिव्हाळा श्रीमूर्ती रया ॥३ ॥ 


            २३९.मन हे राम झालें मन हे राम झालें । प्रवृत्ति ग्रासुनी कैसे निवृत्तीसी आले ॥ १॥ श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णुस्मरण केलें । अर्चन वंदन दास सख्य आत्म निवेदन केलें ॥ २॥ यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिलें । ध्यान धारणा आसन मुद्रा कैसें समाधीस आलें ॥ ३॥ बोधी बोधिलें बोधितां नये ऐसें जालें । बापरखुमादेवीवरू विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥ ४ ॥ 


            २४०. राम म्हणतां रामचि होईजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥१ ॥ ऐसें सुख वचनी आहे । विश्वासें अनुभव पाहे ॥ २॥ रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥ ३॥ तुका म्हणे चाखोंनी सांगे । मज अनुभव आहे अंगें ॥ ४ ॥ 


            २४१.जन्मजन्मांतरीं । असेल पुण्यसमामुग्री । तरीच नाम जिव्हाग्री । येईल श्रीरामाचें ॥ १॥ धन्य कुळ तयाचें । रामनाम हेंचि वाचें । दोष हरतील जन्माचे । श्रीराम म्हणतांची ॥ २॥ कोटिकुळांचें उद्धरण । मुखीं रामनारायण । रामकृष्ण स्मरण । धन्य जन्म तयाचें ॥ ३॥ नाम तारक सांगडी । नाम न विसंबे अर्धघडी । तप केलें असेल कोडी । तरीच नाम येईल ।। ४॥ ज्ञानदेवी अभ्यास मोठा । नामस्मरण मुखावाटा । पूर्वज गेलें वैकुंठा । हरि हरि स्मरतां ॥५ ॥ 

(( रविवारचे अभंग )) 

( Ravivarche Abhang )

            २४२. वारी हो वारी । देई कां गा मल्हारी । त्रिपुरारी हरी । तुझे वारीचा मी भिकारी ॥ १॥ वाहन तुझें घोड्यावरी । वरी बैसली म्हाळसा सुंदरी । वाघ्या मुरळी नाचती परोपरी । आवडी ऐसी पाहीन जेजुरी । २॥ ज्ञान कोटंबा घेऊनी आलों द्वारीं । बोध भांडार लाविन परोपरी । एका जनार्दनीं विनवी श्रीहरी । वारी देऊनी प्रसन्न मल्हारी ॥३ ॥ 


            २४३.अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगरा वारी । सावध होऊनी भजनी लाभा देव करा कैवारी ॥१ ॥ मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी ॥ धृ ० ॥ १॥ इच्छा मुरळीस पाहूं नका पडाल नरक द्वारी । बोधबुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥ ३ ॥ आत्मनिवेदन भरित रोडगा निवतिल हारोहारी । एका  जनार्दनीं धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी ।। ४ ॥ 


            २४४. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा । शकुन सांगतो तुम्हा हा एक ऐका ॥१ ॥ डुग डुग ऐका डुगडुग ऐका ॥धृ .।। पिंगळा बैसोनि कळसावरी । तेथोनि गर्जतो नानापरी । बोल बोलतो अति कुसरी । सावध ऐका ॥२ ॥ किलबिल किलबिल । चिलबिल चिलबिल । तुलमिल तुलमिल । तुलबिल तुलबिल ॥३ ॥ तुमचे गांवीचा एक ठाणेदार । गांवच्या पाटलाची एक थोरली नार । तिसी रतला तो करी विचार । एकाजनार्दनीं बोले सारासार विचार ॥४ ॥

 

            २४५. वडाच्या पानी एक उभविलें देऊळ आधि कळसु मग पाया हो । देव पूजों गेलो तंव देऊळ उडालें पान नाहीं तथें वडुरे ॥१ ॥ चेत जाणा तुम्ही चेत जाणा । टिपरी वडाच्या साईं हो ॥२ ॥ पाषाणाचा देव पाषाणाचा भक्तु पोहती मृगजळ डोहीं हो । वांझेचा पुत्र एकु पोहों लागला तो तारी देव भक्तां हो ॥३ ॥ भवाब्धिसागर नुतरवे ते पडिले रोहिणी डोहीं हो । न संपडे आत्मा बुडाले संदेही ते गुंतले मायाजळी हो ॥४ ॥ विरुळा जाणे पोहते खुणे केला मायेसि उपावो हो । बापरखुमादेवीवरु विठ्ठलु विसावा तेणें नेलें पैल थडी वो ॥५ ॥


             २४६.खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एकएका लागतील पायीं रे ॥ १॥ नाचती आनंद कल्लोळीं । पवित्र गाणे नामावळी रे । कलिकाळावरी घातली कांस । एक एकाहूनि बळी रे ।। शा गोपीचंदन उटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां रे । टाळ मृदंग घाई पुष्पांचा वरूषाव । अनुपम्य सुख सोहळा ॥ ३॥ लुब्धली नादी लागली समाधी । मूढजन नर नारी लोकां रे । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधका रे ॥ ४॥ वर्णाभिमान विसरली याती । एक एकां लोटांगणी जाती रे । निर्मळ चित्तें झाली नवनीतें । पाषणा पाझर सुटती रे ॥ ५॥ होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले वैष्णव वीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे ॥६ ॥ 


            २४७. भीमातीरी एक बसविलें नगर । त्याचे नांव पंढरपूर रे । तेथील मोकाशी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥ १॥ नाचत जाऊं त्याच्या गावां रे खेळिया । सुख देईल विसावा रे । पुढे गेले ते निधाई झाले । वनितील त्याची सीमा रे ॥ २॥ बळियां आगळा पाळी लोकपाळां । रिघ नाहीं कळिकळा रे । पुंडलिक पाटील केली कुळवाडी । तो झाला भवदुःखा वेगळा रे ॥ ३॥ संत सजनी मांडली दुकान । जें जया पाहिजे ते आहे रे । भुक्ति मुक्ति फुकाचसाठी । कोणी तयाकडे न पाहे रे ॥ ४॥ दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे । न वजो म्हणती आम्ही होती मज आस । आजी घडलें सायासी रे । तुका म्हणे होय तुमचेनी पुण्यें । भेटी तया पायांसी रे ॥६ ॥ 


            २४८. बाराही सोळा गडियांचा मेळा सतरावा बसवंत खेळिया रे । जतिस्पद राखों जाणे टिपरिया घाई । अनुहात वाया मांदळा रे ॥१ ॥ नाचत पंढरीये जाऊं रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहूं रे ॥ २॥ सा चहुं वेगळा अठरा निराळा । गाऊं वाजवू एक चाळा । विसरती पक्षी चारा नेघे पाणी । तारूण्य देहभाव बाळा रे ।। ३॥ आनंद तेथीचा मुकीयासी वाचा । बहिरे ऐकती कानी रे । आंधळ्यासी डोळे पांगळासी पाय । तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे ॥४ ॥ 


            २४९ . नव्हे तेंचि कैसें झालें रे खेळिया । नाहीं तेंचि दिसू लागलें रे । अरूप होतें तें रूपासी आलें । जीव शिव नाम पावलें रे ॥१ ॥ आपलिच आवडी धरूनि खेळिया । आपआपणाते व्याले रे । जोपनाकारणे केली एक बायको । तिने येवढे वाढविलें रे ॥२ ॥ ऐक खेळिया तुज सांगितलें । ऐसे जाणुनी खेळ खेळे रे॥धृ ० ॥ ब्राह्मणाचें पोर एक खेळासि भ्यालें । तें बारा वर्षे लपालें रे । कांपत कांपत बाहेर आलें । तें नागवेंचि पळून गेलें रे ॥३ ॥ सहातोंड्या एक संभूचें बाळ । त्याने बहुतचि बळ आथियलें रे । खेळ खेळतां दगदगी व्यालें । तें कपाट फोडुनि गेलें रे ॥४ ॥ चहुं तोंड्याचा पोर एक नाऱ्याहि जाण । तो खेळियामाजी आगळा राकुचाळि करूनी पोरें भांडवी । आपण राहे वेगळा रे ॥५ || गंगा गौरी दोघी भांडवी संभ्यासी धाडिले राना रे । खेळ खेळे परि डायीं न सांपडे । तो एक खेळिया शहाणारे॥६॥खेळियामाजी हनुम्या शहाणा । न पडे कामव्यसनी रे । कामचि नाहीं तेथें क्रोधचि कैंचा । तेथें कैचें भांडण रे । रामगड्याची आवडी मोठी । म्हणोनि लंके पेणे रे ॥ ७॥ यादवांचा पोर एक गोप्या भला । तो बहुतचि खेळ खेळला रे । लहान थोर अवघी मारलीं । खेळचि मोडुनि गेला रे ॥ ८॥ ऐसें खेळिये कोट्यानुकोटी । गणित नाही त्याला रे । विष्णुदास नामा म्हणे वडिल हो । पहा देहीं शोधुनी रे॥९॥ 


MajhiMauli-blogger







FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER


Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.