श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अलौकिक चरित्र ( भाग - 3 ) | Shree Dyaneshwarmaharajanche Alaukik Charitra ( part -3 ) in marathi
॥ श्रीपांडुरंग प्रसन्न ॥
माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉 Download
माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join
Sant Dnyaneshwar full story in marathi
श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अलौकिक चरित्र | Shree Dyaneshwarmaharajanche Alaukik Charitra in marathi
sant dnyneshawar full imformation in marathi
Part - 3
|| श्रीज्ञानेधरमहाराजांचे अलौकिक चरित्र ||
भगवान महाविष्णुच प्रत्यक्ष अवतरून आलेले. या बाळाचे नांव दृष्टांताप्रमाणे 'ज्ञानदेव' ठेवण्यांत आले. तिसरे अपत्य जन्मले तो दिवस कार्तिक, शुद्ध पोर्णिमा, रविवार, प्रहररात्र, ईश्वरनाम संवत्सर, शके अकराशे शाण्णव. हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवच प्रकटलेले. यांचे नांव 'सोपान'. चवथ्या भगवती चित्कला 'मुक्ताबाई' नांवाने प्रसिद्धी पावल्या. हा दिवस आश्विन शुद्ध प्रतिपदा, शुक्रवार, मध्यान्ह, प्रमाथिनाम संवत्सर, शके अकराशे नव्याण्णव. हे शक ज्ञानेश्वरीचे लेखक सच्चिदानंदबाकृत 'ज्ञानेध्वरविजय' यांतील आहेत.
ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हर: ।
सोपानो ब्रह्मदेवश्व मुक्ताख्या चित्कला च सा ॥
ऐसी इच्छेसारखीं बाळें । बालार्कसम तेजाळें ।
पाहुनी मातापित्यांचे डोळे । भरती सदा आनंदे ॥ १ ॥
असो संतति जन्मली भली । मातापिता सुखावली ।
परी झाली जातीवेगळी । म्हणुनी कष्टी उभयतां ॥ २॥
कांही सुचेना पुढील उपाय | तिळतिळ तुटे त्यांचे हृदय ।
मुलांचा उपनयन समय । सन्निध येत चालला ॥ ३॥
मग ब्रह्मसभा मेळविली । वर्तली मात जाणविली ।
गुवज्ञिने मज घडली । प्रपंचस्थिती यति म्हणे ॥ ४ ॥
यावर सभास्थानी जमलेल्या वैदिक, शास्त्री, पंडित, धर्मनिष्ठ, तपोनिधि तसेंच ब्रह्मनिष्ठ, तत्त्ववेत्ते अशा सर्व अधिकारांच्या ब्रह्मवृंदांनी सर्व शास्त्रार्थाचा साधक बाधक विचार करून मग एकमताने आपला निर्णय विठ्ठलपंतांना सांगण्यांत आला - "तुम्ही एकदां गृहस्थाश्रम सोडून विधिपूर्वक संन्यास घेतल्यानंतर त्या यतिधर्माचा त्याग केव्हांही करतां येत नाही. तो तुम्ही टाकून देऊन पुन्हा गृहस्थी झालांत; हें करणे अत्यंत निंद्य असून तुमचे कडून हे घोर पातक घडलें आहे म्हणून याला देहांतप्रायश्चित्त घेण्याखेरीज अन्य उपाय नाहीं.
प्रयागतीर्थीं गंगाप्रवेश करून मुक्त होणें, हेंच एक प्रायश्चित्त. " ब्रह्मवृंदांचा हा कठोर निर्णय कानीं पडतांच विठ्ठलपंतांनी सर्वतोपरी त्रस्त होऊन स्त्रीमुलांसह वर्तमान आळंदीक्षेत्र सोडून ते त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीस जाऊन त्याला सर्वांच्यासह प्रतिदिनीं एक प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. असा कांही दिवस क्रम श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अलौकिक चरित्र चालला होता.
एके दिवशी प्रदक्षिणा करते समयी एका वाघाच्या डरकाळीनें सर्वच भयभीत होऊन पांगले असतांना त्या निवृत्तिनाथांना एक गुहा दिसली. तींत आंत प्रवेश करतांच तिथे गहिनीनाथ सहजावस्थेंतल्या परमानंदांत एकासनीं स्थित होते. त्यांना साष्टांग प्रणिपात करून हात जोडून निवृत्तिनाथ उभे असतांना प्रार्थना करून म्हणाले -
म्हणे मी बाळ अल्पमती । उपदेशावी योगमुक्ति ।
जेणें मज स्थितप्रज्ञस्थिति । प्राप्त होये सवेग ॥ १ ॥
मग सप्तदिनपर्यंत । पाजिले त्यासि तत्त्वमस्यादि बोधामृत ।
निवृत्ति झाला योगी पूर्ण ज्ञानवंत | गुरुकृपें करूनी ॥ २॥
श्रीकृष्णाची उपासना । करावी ऐसे निवृत्तीच्या मना |
बिंबवूनि धाडिला स्वस्थाना । गहिनीनाथे तयासी ॥ ३॥
हेंचि तत्त्वज्ञान पुढती । आपुल्या सहोदरांप्रती ।
उपदेशावें त्वां निगुती । ऐसे तया आज्ञापिर्ले ॥ ४॥
अशा रीतीनें गहिनीनाथांच्या सहवासांत त्या गुहेंत निवृत्तिनाथ सात दिवस राहून तेवढ्या अवकाशांत त्यांची कुंडलिनी जागृत होऊन प्राणस्थैर्याने मनोजयामुळें त्यांना अंतर्मुखता प्राप्त झाली व सद्गुरुकृपाकटाक्षद्रारां ते उन्मत्त बनले ते कायमचेच. आणि हाच आमचा प्रसाद भावंडांना पोंचब अशी त्यांना गहिनीनाथांनी शब्दशक्ति पण देऊन ठेवली होती.
नंतर गहिनीनाथांची आज्ञा होऊन ते गुहेबाहेर येतांच त्यांना अंतर्ज्ञानाने आपली मातापितरें व भावंडे ज्या ठिकाणीं होतीं तें कळल्यार्ने ते नेमके तिथें गेले. मग निवृत्तिनाथांची सर्वांशी भेट होतांच सर्वांना खूप संतोष झाला. नंतर निवृत्तिनाथांनी गहिनीनाथ कसे भेटले आणि त्यांचेकडून कसा उपदेश मिळाला हा सर्व वृत्तांत सांगितला.
ही शुभ वार्ता ऐकून तर सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. यावर सर्वांना उद्देशून विठ्ठलपंत म्हणाले कीं देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी मी आतां प्रयागास जात आहे. तरी तुम्ही सर्वांनी आपल्या जन्मभूमीस आळंदीस जावे. तेव्हां रुक्मिणी म्हणाल्या जिकडे पतिदेब जातील तिकडे मीही जाणार. विठ्ठलपंत मग त्र्यंबकेश्वर सोडून आपल्या चारी मुलांना घेऊन वाराणसींस जावयास निघाले. मग वाटेंत आपेगांवी आपली चारी मुलें ठेवून 'यापुढें मुलांच्या दैवांत जसे असेल तसें घडेल' असा विचार करून आपेगांवाहून रुक्मिणी देवींच्यासह प्रयागाकडे निघाले व तिथें त्या दोघांनी एकदम गंगाप्रवेश करून ते दोघे जलतत्त्वरूप असे आपोनारायण झाले.
आपेगांवी ब्रह्मवृंदसभेस निवृत्तिनाथ प्रार्थून म्हणाले कीं, "आतां आमची गति काय ?" त्यावर मग विचारविनिमय करून निर्णय होईना तेव्हां ब्रह्मवृंदांनी एक पत्र देऊन "हे पैठण क्षेत्रीच्या ब्रह्मवृंदांना दाखवा, तेच निर्णय करतील" असे सांगितले. त्याप्रमाणे आपेगांवच्या ब्रह्मवृंदांचे पत्र घेऊन हीं भावंडे पैठणक्षेत्री आल्यावर आपल्या आजोळच्या घरीं उतरलीं आणि लगेच तें आपेगांवचे आणलेले पत्र पैठणच्या ब्राह्मणसभेस दाखविर्ले.
त्यांनी सांगितले "तुम्हांस असल्या पातकाचे प्रायश्चित्ताचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे 'हरिभक्ति' करणे. त्यायोगेंच तुम्ही सद्गती पावाल असा हा एकच विधि दिसतो आहे." हें ऐकून चारी भावंडांचे हृदय आनंदाने उचंबळले, कारण त्यांच्या दृष्टीनें त्यांना जे प्रिय होते तेंच त्यांना मिळाले.
नंतर ही भावंडे आपल्या आजोळच्या बिऱ्हाडीं परत जाण्यास निघण्याच्या बेतांत असतांना तेथल्या एका ब्राह्मण सभासदार्ने या मुलांना त्यांची नांवे काय म्हणून सहज कौतुकाने विचारले. निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता अशी मोठमोठी नांवे ऐकतांना त्याच वेळी तिथून एक पखालवाहक रेडा चालला होता. त्याला पाहून एकाने चेष्टेने ज्ञानदेवास म्हटले कीं या रेड्याचेंही नांव 'ज्ञाना-ग्याना' असें आहे. तुमची नांवे तर थोर थोर आहेत. ह्या रेड्याचेही नांव 'ज्ञाना' आहे मग याच्या मुखी वेद म्हणवून दाखवा बघू.
` ज्ञानदेव म्हणतात, "सर्व देहांतील आत्मा तर एकच आहे, मग याने क्रग्वेद म्हणावा यांत विशेष असे काय ? " तेव्हां दुसरा एक पंडित बोलला, "निश्चितच चैतन्य सर्वगत आहे. पण त्याचा कांहीतरी अनुभव यायला पाहिजे ना ? " असे म्हणून त्याने पखालवाल्याचा आसूड घेऊन रेड्यास तडाखे मारूं लागतांच त्याचे सर्व वळ मात्र ज्ञानोबांच्या पाठीवर उमटून दिसूं लागले. सर्व विप्रवृंद हे नवल पाहून आश्चर्यचकित झाले. तरीपण त्यांचे समाधान होईना.
त्यांनी रेड्याचे मुखांतून वेदध्वनि काढून दाखवावे अथवा आपले नांव सोडून द्यावे असे सांगितलें. ज्ञानदेवांनी रेड्याच्या पाठीवरून हात फिरविला आणि म्हणाले "ज्ञाना, यांना वेद म्हणून दाखव ना ?" पशु तो, पण त्यानें जेव्हां क्रगेदाच्या प्रथम अष्टकांतील प्रथम सूक्त 'अग्निमिळे पुरोहितं' म्हणायला सुरुवात केली आणि त्या पाठोपाठ यजुर्वेंदांतील व सामवेदांतील ही काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. रेड्याच्या मुखातून निघणाऱ्या क्रचा इतक्या सुस्वर होत्या कीं तेथील कित्येक विप्र देखील त्याप्रमाणे म्हणण्यास असमर्थ होते.
अशा प्रकारचा तो रेड्याच्या मुखांतून वेदयोष एकसारखा अस्खलित एक प्रहर चाललेला पाहून त्या सर्व पंडितांचा गर्व हरण होऊन ते त्या आश्चर्याने अगदीं लज्जित होऊन गेले. सभेतील थोर विप्रही म्हणूं लागले कीं हेविधिहरिहर, देवांचे अवतार आहित यांत शंकाच नाही. साक्षात विष्णुच अवतार घेऊन श्रीज्ञानदेवांच्या रूपाने प्रकट झाले आहेत.
अशा ईश्वरविभूति यांना आतां शुद्धिपत्र देऊन पावन करण्याचें कोणास सामर्थ्य आहे ? यावर श्रीज्ञानदेव मोठ्या आदरयुक्त लीनतेनें उद्गारले कीं हा सर्व महिमा आपल्या सर्व सज्जनांच्या कृपेचाच होय.
ऐशी ऐकुनी विप्रभाषणें । तयांसी ज्ञानदेव म्हणे ।
केवळ आपल्या आशिर्वचनें । घडले असें समग्र ॥
ज्ञानदेवांचे तें दैवी तेज प्रत्यक्ष अवलोकून त्या सर्व अधिकार संपन्न ब्राह्मण सभासदांची पूर्ण खात्री होऊन गेल्यानें त्यांनी ज्ञानदेवांची समक्ष प्रार्थना केली कीं आम्हां ब्रह्मवृंदांस आत्मदर्शनाचा लाभ होण्याविषयींचे आपल्याकडून मार्गदर्शन व्हावें.
"कुंडलिनी जागृत होऊन प्राणाचा प्रवेश सुषुम्नेंत झाल्यानें भूकुटींतल्या अंतरांतल्या मनोजयामुळें साहजिकच लाभणारें आत्मसुख प्राप्त व्हावें" अशी त्यां पंडितजनांनी आपली अपेक्षा असल्याचें ज्ञानदेवांना दर्शविलें. त्या सर्व पंडितांच्या आग्रहावरून -
असें भक्तिमार्गी जन । लावावया प्रतिदिन ।
ज्ञानदेव कीर्तन पुराण | करूं लागले त्या स्थळी ॥ १॥
भागवत योगवसिष्ठ । गीता ब्रह्मसूत्र ग्रंथ श्रेष्ठ ।
वाचुनी पुराण उत्कृष्ट । ज्ञानेधर सांगती ॥ २॥
ऐसा कीर्तनपुराण द्वारें । भक्ति आणि योगपंथ ज्ञानेश्वरें।
संस्थापिला त्यासि अत्यादोरं । जन सारें अनुसरले ॥ ३॥
Maulimajhi-blogger
Post a Comment