श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अलौकिक चरित्र ( भाग -4 ) | Shree Dyaneshwarmaharajanche Alaukik Charitra ( part -4 ) in marathi
माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉 Download
माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join
॥ श्रीपांडुरंग प्रसन्न ॥
Sant Dnyaneshwar full story in marathi
श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अलौकिक चरित्र | Shree Dyaneshwarmaharajanche Alaukik Charitra in marathi
sant dnyneshawar full imformation in marathi
Part - 4
|| श्रीज्ञानेधरमहाराजांचे अलौकिक चरित्र ||
आतां या सर्व भावंडांचा प्रभाव लक्षात घेऊन पैठणांतल्या सार्या ब्रह्मवृंदांनी सभा भरवून एकमताने शुद्धिपत्र लिहून तें त्यांचा मोठ्या उत्साहपूर्वक गौरव करून निवृत्तिनाथांच्या हातीं देऊन आदरयुक्त प्रेमानें अर्पण केलें, तेव्हां निवृत्तिनाथांनी ते मोठ्या नप्रतेने शिरसा वंदिले आणि ते उद्गारले - आपण म्हणतां तसे कसलेंच सामर्थ्य आमच्या अंगी नाही.
हा सर्व आपल्या संतजनांच्या चरणांचा महिमा आहे जो खुद्द ब्रह्मदेव सुद्धां जाणत नाही. पैठणक्षेत्रीचा हा रेड्यामुखी वेद बोलवल्याचा दिग्विजय सर्वत्र महशूर झाल्यामुळे या अवतारी महात्म्यांच्या दर्शनास झुंडीच्या झंडी लोटूं लागल्या. आता ही मंडळी नेवाशाला निघण्याच्या बेतांत असतांनाच ज्यांच्या घरी ते उतरले होते, तिथें दुसर्या दिवशीं श्राद्ध होतें. पण संन्याशाची मुलें घरांत ठेवणाऱ्या त्याला गांवच्या कांही टवाळ्यांच्या कडून त्या श्राद्धाला ब्राह्मण मिळूंच नयेत अशी मोठी खटपट झाली होती.
हे ज्ञानेधर महाराजांस कळतांच त्यांनी स्वर्गलोकांतून त्या ब्राह्मणाच्या पितरांना आमंत्रण देऊन मग प्रत्यक्ष पितरच येऊन जेवून गेले. हे सर्व टवाळखोर लोकांनी दाराच्या फटींतून अवलोकिल्यामुळें तर सर्वांची आतां तर या विभूतिसंबंधींची त्यांच्या ठिकाणी कर्तुमर्तुम् सामर्थ्य असल्याची पूर्ण खात्री होऊन ते सर्वच ज्ञानदेवांच्या आतां भजनी लागले. असा हा भक्ति-ज्ञान-वैराग्याचा सोहळा थाटून तेथल्या पैठणच्या आबालवृद्धांचा निरोप घेऊन ही मंडळीं नेवाशास वेद पढलेल्या 'ग्यान्या' रेड्यासह येऊन पोंचली.
"पैठणीचे नारी नर । दुःखित झाले अपार । ज्ञानेश्वर गेले दूर । हळहळ सर्वांसी लागली ॥"
असो.
नेवाशास येऊन उतरल्यावर यांच्या मुक्कामाच्या ठिकाणावरून एक स्त्री पतीच्या प्रेताबरोबर सहगमन करीत असलेली तिर्ने या दिव्यमंडळीस पाहतांच पुढें येऊन वंदन केलें. म्हणून ज्ञानदेवांनी 'पुत्रवती भव' असा तिला आशिर्वाद देतांच तिने पतीच्या प्रेताकडे बोट करून दर्शविले तोंच श्रीज्ञानदेव प्रेतजबळ जाऊन त्याचे नांव विचारतांच -
शवार्चे नांव सच्चिदानंद । ऐकूनी झाले ज्ञानदेव सखेद ।
काय सत्-चितू-आनंद । प्रेतरूप जाहला ॥ १॥
मग निकट जाऊनी ज्ञानदेव । चाळवूनी पाहिलें शव |
तव देह जाहला सजीव । उठूनी उभा राहिला ॥ २॥
ज्ञानेश्वरीचा लेखक । म्हणौनी ज्याचा उल्लेख ।
त्यां ग्रंथांती केला सकौत॒क तुक । सच्चिदानंदबाबा तोच हा ॥ ३॥
श्रीज्ञानदेवांनी ज्ञानेधरीच्या अखेरीस त्यांचा उल्लेख असा केला आहे -
"शके बाराशते बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वर ।
सच्चिदानंदबाबा आदरे लेखकु जाहला ॥ ";
नेवाशास मोहनीराज म्हणून प्रसिद्ध असलेली श्रीम्हाळसादेवी - तिर्चे वर्णन ज्ञानेश्वरीत आलेले ते - त्रैलोक्यांत पवित्र व अनादि पंचक्रोश क्षेत्र नेवासे, ज्या ठिकाणीं सर्व जगताचें जीवनसूत्र श्रीमोहनीराज आहेत -
"त्रिभुवनैक पवित्र । अनादि पंचक्रोश । जेथ जगाचे जीवनसूत्र । श्रीमहालया असे ।"
या मंदिरांत याच सच्चिदानंदबाबांच्या लेखणीतून भगवान श्रीज्ञानेश्वर महाराजांनी अभूतपूर्व अलौकिक अशा 'ज्ञानेश्वरी' व 'अमृतानुभव' या दोन्ही ग्रंथांची निर्मिती केली. श्रीकृष्णप्रभूच्या भगवद् गीतेंतल्या त्या त्या भूमिका आणि ते भाव अतीव स्पष्ट करणारी ती ज्ञानेश्वरी, आणि श्रुतींच्या अर्थाचा विरोधपूर्वक विपर्यास होत असलेला त्याचा परिहार करून एकवाकयतेने समन्वय करणारा ग्रंथ अमृतानुभव तो हा अमृतानुभव होय. नेवाशास महान् महान् तपस्वी, योगी, भक्त, ज्ञानी, विरक्त, हंस, परमहंस, संन्यासी, जीवन्मुक्त अशा मोठ्या थोरल्या मेळाव्यांत चर्चापूर्वक या प्रासादिक ग्रंथांची निर्मिती झाली.
पुढें नेवाशाहून या विभूति आळंदीस येत असतां वाटेंत अळ्यास आल्यावर 'ग्यान्या' रेड्याचें देहावसान झालें म्हणून त्यास श्रीज्ञानराजांनी स्वहस्ते समाधी दिली. तो आजपावेतो नवसास पावणारा असा त्या गांवची देवतांच झालेला आहे. तिथें आतां श्रीज्ञानेश्वरमहाराजांची मनोहर सुबक संगमरवरी मूर्ति मुद्दाम जयपूरहून तयार करवून आणून या 'ग्यानी' देवाच्या समाधीचा जीर्णोद्धार नुकताच आळ्यास झाला त्या वेळीं गांवकरी मंडळींनी ती मोठ्या समारंभाने बसविली. या बालसंत मंडळींनी पैठणास मोठा दिग्विजय करून शुद्धिपत्र मिळविल्याची बातमी आळंदीस आधींच येऊन पोंचली असल्याने सर्व लहानथोर आळंदीकर त्यांना मोठ्या उत्साहपूर्वक सामोरे जाऊन अगदीं थाटाच्या मिरवणुकीने त्यांना गांवांत आणलें व त्यांच्या सन्मानार्थ सर्व गांवभर दिवाळीसारखा समारंभ झाला.
आळंदीस येऊन कांही दिवस झाल्यावर पुढें दिवाळीचा सण आला. त्यानिमित्त मांडे खाण्याची श्रीनिवृत्तिनाथांना इच्छा झाली. म्हणून त्यासाठी डेरा लागतो, तो आणण्याकरिता मुक्ताबाई कुंभारवाड्याकडे जात असतां वाटेत विसोबा खेचर या अत्यंत कर्मठाची गांठ पडतांच त्यानें अगदीं रागाच्या आवेशांत येऊन संन्याशाची पोरटी म्हणून मुक्ताबाईना ताकीद देऊन परतविले, त्यामुळें त्यांना अतिशय वाईट वाटले. ती हकिकत ज्ञानदेवांना कळतांच त्यांनी योगबलार्ने आपली पाठ लाल करून त्यावर मुक्ताबाईनी लगेच मांडे भाजून तयार करून ते निवृत्तिनाथ महाराजांना यथेच्छ वाढून ते अगदीं तृप्त झालें. हें सर्व विसोबांनी दाराच्या फटींतून पाहिलें, तोंच त्यांची पुण्य फलोन्मुख भावना जागृत झाली.
ते एकदमच जोरानें दार उघडून आंत प्रवेशून भानरहित अशा अवर्स्थेत जे कांही अवशेष 'प्रसाद' म्हणून मिळाले ते भक्षण करीत असतांनाच श्रीज्ञानेश्वर "परता सर खेचरा" - "चिदाकाशांत प्रवेशून राहणारा ऐस" - असें उद्गारतांच तीच विसोबांची कायमची अवस्था होऊन गेली. पुढें ते औंढ्या नागनाथीं असतांना नामदेवांना यांनीच कृतार्थ केले.
पैठणक्षेत्री रेड्याच्या मुखांतून श्रीज्ञानेश्वरांनी एक प्रहरपर्यंत वेदांतील अनुवाक अस्खलित बोलविल्याचे आश्चर्य एका यात्रेकरी ब्राह्मणाने प्रत्यक्ष पाहिल्याचे तो चांगदेवांच्या गांवी गेला असतां त्यांना तें ऐकविलें. तेव्हां चांगदेवानें अंतर्दुष्टीने पाहतांच त्यास समजले कीं, हे हरिहरब्रह्मा अवतरून आले आहेत. म्हणून त्यांचे दर्शनास जाण्याची त्यास तात्काळ उत्सुकता लागली. तथापि आधीं पत्र पाठवून खुलासा मागवावा म्हणून हातीं कागद घेतला, तोंच त्यांच्या मनांत आलें कीं नमस्कार लिहावा तर आपण चौदाशें वर्षांचा. म्हणून आशीर्वाद लिहावा तर त्या तर सर्व थोर विभूति.
तेव्हां अशा गोंधळलेल्या अवस्थेत त्याने शिष्याहातीं कोराच कागद पाठविला असतां तो आळंदीस येतांच त्याला प्रथम भेटल्या त्या मुक्ताबाईच. त्यांनी तो कोरा कागद तसाच श्रीज्ञानेधवरमहाराजांना दाखवून त्या उद्गारल्या कीं दादा, हा चौदाशें वर्षांचा योगी अजून कोराच राहिलेला दिसतो. हें वर्तमान निवृत्तिनाथांनी ऐकतांच ते ज्ञानराजांना बोलले कीं चांगदेवाला बोधपर उत्तर पाठवावें.
तो बोध श्रीज्ञानेश्वरांनी पांसष्ट ओव्यांत केलेला असून त्यालाच 'चांगदेव पासष्टी' म्हणतात. चांगदेवाला हें पासष्ट ओव्यांचे पत्र मिळतांच त्याचा अर्थ कळावा म्हणून तो आपल्या नेहमींच्या डहाण्या व्याप्रवाहनावर आरूढ होऊन हातांत मोठ्या नागाचा आसूड घेतलेला आपल्या चौदार्शे शिष्यांसह आळंदीस ज्ञानदेवांच्या दर्शनास येऊन पोंचला.
सकाळची वेळ असल्यामुळें हीं भावंडे एका लहानशा भिंतीवर ऊन खात बसलेली असतांनाच चांगदेव येत असल्याचे समजले. री म्हणून त्याला आडवे जाण्यासाठी ज्ञानदेवांनी त्या भिंतीलाच म्हटलें, "चल बये", तोंच ती तुरू तुरू चालू लागून चांगदेवाला सामोरी झाली. हे दृष्य चांगदेवारने पाहून तो फार खजील होऊन त्यानें त्या आक्राळ व्याश्रावरून चटकन् खालीं उतरून त्या बालविभूतींना साष्टांग घातलें.
तेव्हां -
ऐसी चांगदेवाची अहंता दूर । सांडूनी गेली त्याचें शरीर ।
ज्ञानदेवे फिरविला कर | त्याच्या देहावरोनी ॥ १॥
पांसष्टीचा तुज भावार्थ । मुक्ताबाई करील व्यक्त ।
तरी तियेसी तुवां त्वरित जाऊंनिया प्रार्थावे ॥ २॥
मग मुक्ताबाईनें पांसष्टीचा अर्थ विशद । करूनी केला त्यासी अर्थ
बोध ।
चांगया पावे परमानंद । कृतार्थ झालो बोलिला ॥ ३॥
पंढरीस दरसालच्या कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्रीज्ञानेधरादि संतमंडळी जमून काला झाल्यावर श्रीपंढरीनाथ चरणीं काशीयात्रेला नामदेवांना घेऊन जाण्याचा आपला मानस ज्ञानराजांनी निवेदिला. तेव्हां मोठ्या कष्टाने देवाने नामदेवास ज्ञानदेवांच्या बरोबर जाण्याचा निरोप दिला.
` "जीवनमुक्त जरी झालें पावन । तरी देवतीर्थ भजन न सांडिती ॥"
` याप्रमाणे देवाची आज्ञा घेऊन ही संत मंडळी द्वारकेस श्रीकृष्णदर्शन घेऊन प्रभास, उज्जयनी, प्रयागावरून काशीक्षेत्रीं आली. तिथें मनकर्णिकेच्या घाटावरील मुद्गलाचार्यांनी चालविलेल्या यज्ञांतल्या अग्रपूजेचा मान कोणास द्यावा या वादाचा निर्णय हत्तिणीने त्या समारंभांतल्या समुदायांतील श्रीज्ञानेश्वरांच्या गळ्यांत नेमकी माळ घातल्याने वाद आपोआपच मिटून अग्रपूजेचा मान श्रीज्ञानेथवरांना मिळून तो यज्ञसमारंभ पूर्ण झाला.
नंतर ही मंडळी पंजाबांतल्या आज ज्या अमृतसरच्या शिखांच्या गुरुसाहेबग्रंथांत गुरुनामदेवांचा उल्लेख आहे, त्या शिखांच्या सुवर्णमंदिरास भेट देऊन दिल्ली, मथुरा पाहून मारवाडांतून ..............
Maulimajhi-blogger
Post a Comment