पाहूं द्यारे मज विठोबाचें मुख । लागलीसे भूक डोळां माझ्या | pahu dyare maj vithobache mukh

shreyash feed ads 2


 पाहूं द्यारे मज विठोबाचें मुख । लागलीसे भूक डोळां माझ्या ॥१॥

कस्तुरी कुंकुम भरोनियां ताटीं । अंगीं बरवंट गोपाळाच्या ॥२॥

जाईजुई पुष्पें गुंफोनियां माळां । घालूं घननीळा आवडीनें ॥३॥

नामा म्हणे विठो पंढरीचे राणे । डोळियां पारणें होत असे ॥४॥