वाराणसी यात्रे जाईन । प्रयाग तीर्थ पाहीन । varanashi yatre jain | prayag tirthe pahin
वाराणसी यात्रे जाईन । प्रयाग तीर्थ पाहीन ।
त्रिवेणीय स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥१॥
विठोबा पायींची वीट । मी कई बा होईन ॥२॥
गोदावरी यात्रे जाईन । बारा वरुषाचें फ़ळ लाहीन ।
अब्जक तीर्थी स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥३॥
मल्लिकार्जुन यात्रे जाईन । श्रीशैल्य शिखर पाहीन ।
पाताळगंगे स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥४॥
मातापुर यात्रे जाईन । सह्याद्री पर्वत पाहीन ।
गहनगंगे स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥५॥
कोल्हापुरीं यात्रे जाईन । महालक्ष्मी पाहीन ।
विशाळ तीर्थी स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥६॥
एका अंगुष्ठीं तप करीन । पृथ्वी पात्रचि लाहीन ।
देह कर्वतीं देईन । परी मी वीट नव्हेन ॥७॥
बहुता पुण्याच्या सायासीं । चरण जोडले विटेसी ।
निवृत्तिदासु म्हणे परियेसी । परी मी वीट नव्हेन ॥८॥
Post a Comment