राम रक्षा स्तोत्र काय आहे ? रहस्य जाणून घ्या . Ram raksha stotra kay ahe? | majhi mauli

shreyash feed ads 2

 राम रक्षा स्तोत्र काय आहे ?  रहस्य जाणून घ्या . Ram raksha  stotra kay ahe? majhi mauli 

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 



            रामरक्षेची कथा (Ramrakshan Story ) अशी सांगितली जाते की, एकदा 

 माता पार्वती :  (शंकरास ) "जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ?" 

        तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्र विषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे.

        आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली.  हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये  खूप वाद झाले.

        शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. रामायणात १०० शलोक होते ,१०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली.

    शंकर: "ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो" 

        असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जावू लागले. एक ऋषि मात्र शेवटपर्यंत थांबले.


        त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्या नंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जावून 'रामरक्षा' सांगितली.


        काही काळाने ऋषींना जाग आली. आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा 'रामरक्षेची' निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते 'बुधकौशिक' ऋषी. याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे.


आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः || तथा लिखितवान्प्रात: प्रबुध्हो बुधकौशिकः ||

शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ----------शतकोटीचे बीज म्हणजे राम हि ती दोन अक्षरे.


काय आहे ‘श्रीरामरक्षा’ स्तोत्राचे महत्व ?

          परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभु रामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम‘ असे म्हणतात. प्रभु रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, प्रभु रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पति या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे.

          बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रा तील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे.हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी.

          त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ति उत्पन्न होते. व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्या पासून निश्चित फायदा आहेच. रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमी पर्यंत हे अनुष्ठान करतात.

          प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा या प्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा.अनुष्ठान म्हटले की त्याच्या यम नियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्या शिवाय राहात नाही. रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे.

राम रक्षा स्तोत्राचे चमत्कार 

राम राम!

आपण कधी विचार केला आहे का, की आपण "राम-राम" दोन वेळेस का म्हणतो.

कारण

र = २७ वा शब्द. ( क ख ग घ ड..........)

आ = २ रा शब्द. (अ आ..)

म = २५ वा शब्द शब्द. (अ आ............)

एकूण = ५४.

राम + राम. ५४+५४ = १०८. आपण जी गळ्यात माळ घालता तिचे मणि सुद्धा १०८ असतात.

          ह्याचा अर्थ = आपण एका व्यक्तीला जर दोनदा "राम-राम" म्हटले तर आपण एक माळ जप केला असा होतो. रामनाम घेत असताना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष+मन= लक्ष्मण होते. नामस्मरण करताकरता मन उन्मन होते म्हणजेच हनुमान होते. हनुमान झालेले हे मन भक्ती मध्ये रत झाले की भरत होते. असे मन सततच्या नामस्मरणा मुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात, शत्रुंचे हे मन हनन करते म्हणून ते शत्रुघ्न होते. अशा नामस्मरणाने मन शांत होते शीतलता प्राप्त करते म्हणजेच सीता होते. सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते राम स्वरूप होते.

          रामरक्षेच्या एका श्लोका बद्दल- कदाचित माहिती असेलही सगळ्यांना.


रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे ।

रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् ।

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।


या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत.

           रामो=रामः(प्रथमा), रामं (द्वितीया), रामेण (तृतीया), रामाय (चतुर्थी), रामान्नास्ति= रामात् (पंचमी)रामस्य(षष्ठी), रामे (सप्तमी),भो राम (संबोधन). 

           ह्या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे (किंवा जीभ जड असलेले) होत नाही.


रामरक्षास्तोत्रम्‌


: रामरक्षा: आरोग्यरक्षक कवच

         एक वेगळा पैलू तुमच्या समोर मांडत आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्ही सांजेला आवर्जून म्हटले जाते. आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे?


रामनामकवच:

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कंधौ दिव्यायुधः पातुभुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥८॥

जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥


        असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्या साठी मंत्र धारण करणे!! थोडक्यात; आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे.


कशी करावी रामरक्षा सिद्ध ?

          121 रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते किंवा गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज 13 वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते.


 राम रक्षा स्तोत्रचे फायदे :

        आपदामपहर्तारम -- हा श्लोक 1 लक्ष वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ आहे. प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ केल्याने त्याचे स्वतंत्र परिणाम मिळते.

उदा:  कौसल्याये दृशो पातु:.... हा श्लोक सतत म्हटल्याने... डोळ्यांचे विकार बरे होतात...

जय श्रीराम!!

What is Ram Raksha Stotra? Learn the secret. What is Ram Raksha Stotra?

The story of Ramrakshan is told that, once

 Mata Parvati: (to Shankara) "As Vishnu Sahastra is named, isn't there a hymn of Rama?"

        Then Lord Shiva told Mother Parvati about this hymn 'Ramraksha'. But there is a story behind how Ramrakshe was originally created.

        The Ramayana was created by the early poet Valmiki. Everyone wanted to get this Ramayana. Gods, humans and demons went to Lord Shiva to get it. There was a lot of arguing between them about who should get it.

        In the end, Shankara decided to share the Ramayana equally among all. There are 100 verses in Ramayana, since 100 is an even number, no matter how many divisions are made, only one verse remains. As this is an anushtup verse, there are 32 letters in a verse. He also shared. Finally, Shankara kept two letters to himself.

    Shankar: "I keep these two letters to myself"

        Saying this, he told everyone to go and sit for meditation. But the minds of gods, demons, humans are not filled. The fact that Shankara kept the letters to himself meant that there was something important about it, so everyone waited. After a while, everyone got bored and started going one after another. One sage, however, stayed until the end.

        They wanted something more. After waiting for a long time, he started nodding and at the same time, Shankar came out of meditation. He looked at the sage. They appreciated it. Then he went to the sage's dream as a blessing and said 'Ramraksha'.

        After some time, the sages woke up. And from what is said in the dream, he created such a beautiful 'Ramrakshe'. The name of that sage was 'Budhakaushik' sage. This is described in the fifteenth verse of Ramaraksha.


आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः || तथा लिखितवान्प्रात: प्रबुध्हो बुधकौशिकः ||


Hundreds of crores of seeds are pronounced ---------- The seeds of hundreds of millions are Ram, those two letters

What is the significance of the hymn 'Shri Ramraksha'?

          Revered Gurudev, while giving guidance, said that the word Shri Ramraksha means the savior Rama. Lord Ramachandra is called 'Myrada Purushottam'. If we observe the character of Lord Ramachandra, we will notice that Lord Ramachandra has set a great example by keeping the limits in all the relationships like king, father, brother, husband.

          Going to the dream of Budhakaushik sage, Lord Ramachandra himself has recited the hymn 'Ramaraksha'. Therefore, every letter in the Ramraksha Stotra is Mantramaya and Tarak. There is no problem in saying Ramraksha by washing hands and feet, becoming pure. Children of Kumar age must say Ramraksha Nitya.

          Therefore, proper rites are performed on the voice and strength is generated by reciting Ramraksha regularly. And she protects us forever. Young and old should always say Ramraksha. There is a definite benefit from it. But there is a way to comply with self-defense. These rituals are performed from the pure pratipada of any month to the pure ninth.

          Pratipada should be recited once, Dwitiya twice in ascending order, and nine times on the ninth day, the recitation of Ramrakshe should be recited. The ritual says that one has to follow the rules of Yama. It does not last without experience. The hymn Ramraksha is very effective.


Miracles of Ram Raksha Stotra

Ram Ram!

Have you ever wondered why we say "Ram-Ram" twice?

Reason

And = 27th word. (क ख ग घ ड ..........)

A = 2nd word. (Aa ..)

I = 25th word. (Aa ............)

Total = 54.

Ram + Ram. 54 + 54 = 108. The necklace you wear has 108 beads.

          This means that if you say "Ram-Ram" to a person twice, you are chanting a Mal. While taking Ramanam, Laksh became fixed on Nama that the mind becomes Laksh + Man = Lakshman. The mind is uplifted to recite the name, that is, Hanuman. The mind that became Hanuman was filled with devotion. Such a mind is satisfied due to constant remembrance of the name, its disorders disappear, it destroys the mind of the enemy, so it becomes Shatrughan. Such namasmarana calms the mind and gives coolness, that is, Sita. He could not think of anyone else in the mind of Sita, so he was Ram Swarup.

          About a verse of Ramrakshe- maybe everyone knows.



रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे ।


रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।


रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् ।


रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।

This verse contains all the inflections of the name Rama.

           Ramo = Rama: (first), Rama (second), Ramen (third), Rama (fourth), Ramannasti = Ramat (fifth), Ramasya (sixth), Rame (seventh), Bho Rama (address).

           Since this verse is a repetition of Rakara, saying this verse in pregnancy does not make the baby born dumb (or with a heavy tongue).


रामरक्षास्तोत्रम्⁇

: Ramraksha: Health Guard

         A different aspect is presented to you. Shri Ramraksha Stotra is still recited in many houses on all three evenings. The patient or the patient is heard after the surgery. Why Ramraksha? What is the secret hidden in this mantra?




शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥


कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।


घ्राणं पातु मखत


Related Posts:

majhi mauli 

जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर नक्की कंमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि आपल्याकडे काही प्रश्न असल्यास, कृपया comment मध्ये आम्हाला कळवा.

धन्यवाद !






फेसबुक ग्रुप मध्ये सहभागी व्हा 👉🏻Join

Whatsapp  ग्रुप मध्ये सहभागी व्हा 👉🏻Join