Hanuman Ramayan |Ramayan Rahasya, हनुमानाने लिहिलेलं रामायण समुद्रात का फेकलं ? रामायण रहास्य | majhi mauli
1
माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉 Download
माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join
हनुमानाने लिहिलेलं रामायण समुद्रात का फेकलं ? | Hanuman Ramayan | majhi mauli
आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की रामायण महर्षी वाल्मीकि यांनी लिहिले होते, पण ही गोष्ट फारच कमी लोकांना माहीत आहे की, एक रामायण हनुमानाने देखील लिहिले होते. ज्याला हनुमद रामायणाच्या नावाने ओळखले जाते. पण स्वत: हनुमानाने हनुमद रामायण लिहिल्यानंतर समुद्रात फेकून दिले होते . पण त्यांनी असे का केले, हे जाणून घेऊया.
हनुमद रामायणा रहस्य :
शास्त्रानुसार सर्वात आधी रामकथा हनुमानाने आपल्या नखांनी एका खडकावर लिहिली होती. ज्याला त्यांनी वाल्मीकी यांनी लिहिलेल्या रामायणाच्या आधी लिहिली होती.
लंकेवर विजय मिळवल्यानंतर राम अयोध्येत राज्य करू लागले होते. सगळे आनंदी होते. तेव्हा हनुमान हिमालयावर जाऊन शिव तपस्या करत होते त्या दरम्यान रोज नखाने राम कथा लिहितं होते.
महर्षी वाल्मीकी यांनी रामायण लिहिल्यानंतर महादेवाला याला समर्पित करण्याच्या हेतूने कैलास पर्वतावर आले . तेथे हनुमानाने लिहिलेले हनुमद रामायण पहिले व वाल्मीकी निराश झाले.
महर्षी वाल्मीकीला निराश बघून हनुमानाने हनुमद रामायणाच्या खडकाला एका खांद्यावर आणि दुसर्या खांद्यावर महर्षी वाल्मीकींना बसवून समुद्रात घेऊन गेले आणि त्या खडकाला समुद्रात बुडवून दिले. तेव्हा पासून हनुमानाने लिहिलेले रामकथा कुठेही उपलब्ध नाही आहे.
Related Posts:
जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर नक्की कंमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि आपल्याकडे काही प्रश्न असल्यास, कृपया comment मध्ये आम्हाला कळवा.
धन्यवाद !
majhi mauli