श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी | shrigurusarikha asta pathirakha

shreyash feed ads 2

 श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ॥१॥

राजयाची कांता काय भीक मागे । मनाचियां जोगे सिद्धी पावे ॥२॥

कल्पतरु तळवटीं जो कोणी बैसला । काय वाणी त्याला सांगिजो जी ॥३॥

ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों । आतां उद्धरिलों गुरुकृपे ॥४॥