Makar sankranti Importances in marathi | मकर संक्रांतीचे महत्व: 2021 | majhi mauli

shreyash feed ads 2

मकर संक्रांतीचे महत्व: 2021| Makar sankranti Importances in marathi majhi mauli 

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 




  •  मकर संक्रांती 2021 :

             यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात मकर संक्रांती चे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य धनु राशी मधून मकर राशीमध्ये प्रवेश करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिणायन पासून उत्तरायण होतात. सूर्याचे उत्तरायण होणं खूप शुभ मानले आहे.


  •  मकर संक्रांती सिद्धि प्रप्तिसाथी हा एक खास दिवस आहे:

                असे मानले जाते की जोपर्यंत सूर्य पूर्वी कडून दक्षिणेकडे जातो, या दरम्यान सूर्याच्या किरणांना वाईट मानले आहे, परंतु जेव्हा सूर्य पूर्वीकडून उत्तरेकडे जाऊ लागतो, तेव्हा त्याचे किरण आरोग्य आणि शांती देतात. या किरणांमुळे  संत लोक जे अध्यात्म सह जुडलेले आहे, त्यांना शांती आणि सिद्धी प्राप्त होते.


  • मकर संक्रांती दान -पुण्य आणि स्नानाचे महत्त्व आहे :

        या दिवशी लाखो भाविक गंगा आणि पवित्र नदीच्या काठी स्नान आणि दान करतात. पौराणिक मान्यतेनुसार स्वतः भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, जो व्यक्ती मकर संक्रांतीवर देहाचा त्याग करतो त्याला मोक्षप्राप्ती होते आणि तो जीवन-मरण्याच्या चक्रातून मुक्त होतो.


  •  मकर संक्रांतीमुळे  निसर्गात बदल होतात : 

                 मकर संक्रांती पासूनच ऋतुमध्ये बदल होऊ लागतो. शरद ऋतु क्षीण होऊ लागतो आणि वसंताचे आगमन सुरू होते. यामुळे दिवस मोठा होऊ लागतो व रात्र लहान होऊ लागते.


  • मकर संक्रांती पौराणिक मान्यता : 

            पौराणिक मान्यतेनुसार, असुरांवर भगवान विष्णूंचा विजय म्हणून देखील मकरसंक्रांती साजरी केली जाते. आख्यायिका आहे की मकरसंक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णू ने पृथ्वी लोकांवर असुरांचा संहार करून त्यांचे शिरविच्छेद करून मंदरा पर्वत वर गाडले. तेव्हा पासून भगवान विष्णूच्या विजय ला मकर संक्रांती उत्सव म्हणून साजरा केला जातो.

majhi mauli 

जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर नक्की कंमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि आपल्याकडे काही प्रश्न असल्यास, कृपया comment मध्ये आम्हाला कळवा.

धन्यवाद !


फेसबुक ग्रुप मध्ये सहभागी व्हा 👉🏻Join

Whatsapp  ग्रुप मध्ये सहभागी व्हा 👉🏻Join

 Majhi Mauli आपले चॅनेलची  सदस्यता घ्या 👉🏻....  Subscribe