Chanakya Niti : या चार सवयींनमुळे आपण दारिद्र्यात राहतो | chanakya niti quotes in marathi / English | majhi mauli

shreyash feed ads 2

 

Chanakya Niti : या चार सवयींनमुळे आपण दारिद्र्यात राहतो |

chanakya niti quotes in marathi majhi mauli 

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 



            आचार्य चाणक्यानुसार ज्या लोकांमध्ये चार प्रकारच्या विशिष्ट घाणेरड्या सवयी न मुळे त्यांच्यावर कधीही मातालक्ष्मी कृपा करत नाही. असे लोक श्रीमंत जरी असले तरी  ते लवकर गरीब होतात. यासाठी आर्थिक जीवनाला समृद्ध करण्यासाठी या चार सवयींना सोडून द्यायला पाहिजे.


1.    आचार्य चाणक्यानुसार जे लोक वाईट शब्द वापरतात :

            आचार्य चाणक्यानुसार जे लोक वाईट शब्द वापरतात त्यांच्या वर मातालक्ष्मी  कधीही प्रसन्न होत नाही, म्हणून नेहमी गोड बोलावं. गोड बोलण्याची सवय चांगली आहे कडू बोलण्याची सवय त्वरित काढून द्यावी. कडू बोलण्यामुळे एखाद्याचे नाते बिघडू शकतात आणि तो दरिद्री देखील होऊ शकतो.

2.     आचार्य चाणक्यानुसार खरे मित्र आणि शुभेच्छुकांना विसरू नये :

              आचार्य चाणक्यानुसार जे लोक खरे मित्र आणि आपल्या शुभेच्छुकांना विसरतात. असे लोक कठीण काळात एकटे आणि असहाय्य पडतात. म्हणून नेहमी आपल्या खऱ्या मित्रांचा आणि शुभेच्छुकांचा साथ कधीही सोडू नये. गरज असल्यास त्यांची मदत करावी. चाणक्य नीतीनुसार जे लोक नेहमी आपल्या मित्रांना बरोबर घेऊन चालतात, मातालक्ष्मी  त्यांच्या वर नेहमी आनंदी राहते. या मुळे घरात पैशाची कमतरता होत नाही.

3.     आचार्य चाणक्यानुसार घाणेरडे करणे सोडावे : 

            आचार्य चाणक्यानुसार जे लोक घाणरेडे राहतात अस्वच्छ कपडे घालतात किंवा आपल्या सभोवतालीचे वातावरण घाण ठेवतात, सकाळी दात स्वच्छ करीत नाही. अशा लोकांवर मातालक्ष्मी कधी प्रसन्न होत नाही. असे लोक नेहमीच दारिद्र्याचे जीवन जगतात. म्हणून ह्या वाईट सवयींचा त्याग करावा. या शिवाय आपल्या घरात भांडणे करू नये.

4. आचार्य चाणक्यानुसार सकाळी उशिरा पर्यंत झोपू नका :

            आचार्य चाणक्यानुसार सूर्योदयानंतर कधीही झोपू नये. चाणक्यानुसार, जे लोक संध्याकाळी सूर्यास्तानंतर झोपतात ते नेहमी दरिद्री राहतात. शास्त्रात देखील संध्याकाळी झोपणे निषिद्ध आहे. कारण संध्याकाळ देवी-देवांची पूजेचा काळ आहे. या काळात झोपणाऱ्यांवर मातालक्ष्मी  कधीही कृपा करत नाही. म्हणून सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपू नये.

majhi mauli 

जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर नक्की कंमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि आपल्याकडे काही प्रश्न असल्यास, कृपया comment मध्ये आम्हाला कळवा.

धन्यवाद !



Whatsapp  ग्रुप मध्ये सहभागी व्हा 👉🏻Join