श्रीमद्भागवत गीता | अध्याय १७ (श्रद्धात्रयविभाग योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 17 (Shradhhatray vibhag yog) maulimajhi-blogger

shreyash feed ads 2

श्रीमद्भागवत गीता | अध्याय १७ (श्रद्धात्रयविभाग योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 17 (Shradhhatray vibhag yog) maulimajhi-blogger

|| श्रद्धात्रयविभाग योग ||

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 











श्रीमद्‌भगवद्‌गीता : सतरावा अध्याय (श्रद्धात्रयविभागयोग)
मूळ सतराव्या अध्यायाचा प्रारंभ
अथ सप्तदशोऽध्यायः
अर्जुन उवाच
ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥ १७-१ ॥

श्रीभगवानुवाच
त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा ।
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ॥ १७-२ ॥

सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ॥ १७-३ ॥

यजन्ते सात्त्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः ।
प्रेतान्भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥ १७-४ ॥

अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः ।
दम्भाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥ १७-५ ॥

कर्शयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः ।
मां चैवान्तःशरीरस्थं तान्विद्ध्यासुरनिश्चयान्‌ ॥ १७-६ ॥

आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः ।
यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु ॥ १७-७ ॥

आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः ।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥ १७-८ ॥

कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः ।
आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ १७-९ ॥

यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत्‌ ।
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्‌ ॥ १७-१० ॥

अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते ।
यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥ १७-११ ॥

अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत्‌ ।
इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम्‌ ॥ १७-१२ ॥

विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम्‌ ।
श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥ १७-१३ ॥

देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम्‌ ।
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥ १७-१४ ॥

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्‌ ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ १७-१५ ॥

मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ १७-१६ ॥

श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः ।
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥ १७-१७ ॥

सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत्‌ ।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्‌ ॥ १७-१८ ॥

मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ १७-१९ ॥

दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ।
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम्‌ ॥ १७-२० ॥

यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः ।
दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्‌ ॥ १७-२१ ॥

अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते ।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ १७-२२ ॥

ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ।
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥ १७-२३ ॥

तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपःक्रियाः ।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम्‌ ॥ १७-२४ ॥

तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपःक्रियाः ।
दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः ॥ १७-२५ ॥

सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते ।
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥ १७-२६ ॥

यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते ।
कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥ १७-२७ ॥

अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत्‌ ।
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥ १७-२८ ॥

मूळ सतराव्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥



गीता वाचताना प्ले करा



|| अध्याय सतरावा ||

अर्जुन म्हणाला ,


        हे कृष्णा ! जी माणस शास्त्रोक्त विधिला सोडून श्रद्धेने युक्‍त होऊन देवदिकांचे पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती ? सत्व, रज व तामस?


श्रीभगवान म्हणाले,

                                             || तीन प्रकारचे श्रध्दा ||


        श्रध्दा तीन प्रकाराची आहेत, ते पूर्वजन्मांचे संस्कारा पासून उत्पन्न असतात - ते सात्विक , राजसी आणि तामसी आहेत तते तू श्रवण कर।।21।


        हे भारता ! अंत: करण्याचे अनुरूप सर्वांची श्रध्दा असते, जो श्रध्दामय पुरूष आहे, ज्यांची जसी श्रद्धा असते , तसेच ते व त्यांचे चित्त असतात ।।3।।


        सात्विक (गुण) असलेल्या (लोक) देवांची पूजा करतात, यक्ष आणि राक्षसांची पूजा करणारे “राजसी लोक” आणि भत-प्रेतांची पूजा करणारे “तामसी लोक” असतात

1141]


        जे अशास्त्रीय व अविधिपूर्वक कठिन तपस्या करतात ,ते तपस्वी लोक आहेत. ते दंम्म , अहंकार ,कामना , आसक्ति आणि बळांचे अभिमानांनी युक्‍त असतात ।151।


        ते शरीराच्या रूपात असलेल्या भूतसमुदायाला आणि अंत: करण्यात स्थित असलेला मला क्षीण करणारे असतात, ते अज्ञानी (तप करणारे) लोकांना तू आसूरीक धर्मांत निष्ठा असलेले जाण।।6।।


        आहार पण सर्वांना तीन प्रकारचे प्रिय आहेत, तसेच यज्ञ , दान आणि तपस्या ही तीन प्रकाराचे आहेत, त्यांचे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक |171।


तीन प्रकारचे आहार


        आयु , उत्साह , बल, आरोग्य , सुख आणि प्रीति वाढविणारे , रस युक्‍त , स्थिग्ध , स्थिर राहणारे स्वभावात: मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरूषांना प्रिय असतो ।।81।


        कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट ,कोरडे, जळजळणारे आहारसमूह राजसी लोकांना प्रिय असतो , ते (आहार) दुख, शोक आणि रोग देणारे असतात ।।9|।


        (एक प्रहर पूर्वीचा ) ठंड, कच्चे ,रस नसलेले, दुर्गन्ध येणारे , शिळे, उप्ते (दुसरांणी खालेले ) आणि अपवित्र भोजन तामसी लोकांना प्रिय आहे।1101।


तीन प्रकारचे यज्ञ


    `    “यज्ञांचा अनुष्ठान करने कर्तव्य आहे” -या प्रकारे मनाला एकाग्र करून फलांची कामनारहित व्यक्ति द्वारा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ सात्विक आहे।।111।


        हे भरतत्रेष्ठा ! उद्देश्य करून आणि फलांना प्रकाशित करून (दिखाव्यासाठी ) ,मान कीर्ति , स्वर्गाची इच्छा ठेवून जो यज्ञ अनुष्ठित केला जातो , तो यज्ञ राजस समज।।121।


        (अशास्त्रीय) विधिहीन, अन्नदान रहित, मन्त्रहीन, दक्षिणाहीन आणि श्रध्दाहीन यज्ञाला तामस(यज्ञ) म्हटला जातो।।1131।


तपाचे वर्णन


        देव, ब्राह्मण , गुरू आणि ज्ञानीजणांची पूजा करणे .तसेच शौच, सरळपणा , ब्रह्मचर्या आणि अहिंसा हे सर्व शरीर सम्बन्धी तप म्हटले जातात ।141|


        उद्धेग न देणारे ,सत्य प्रिय व हितकारक असे जे भाषण आणि वेद अध्यन करणें ,याला वाचिक तप म्हणतात ।1151।


        मनाची प्रसन्नता , सरलता , मौन, मनाचे संयम, व्यवहारामध्ये कपट नसणे ,भावांची पूर्ण पवित्रता असणे हे मनाचे तप म्हटले जाते।1161।


तीन प्रकारचे तप


        फलांची इच्छा न करणारा योगी पुरूषांकडून अत्यंत श्रध्देने केलेल्या (वर सांगितलेल्या ) तिन्ही प्रकाराच्या तपाला सात्विक तप म्हटला जातो।1171।


        सत्कार ,मान आणि पूजनीय होण्यासाठी तसेच दग्भ (प्रदर्शित करीत जो तप केला जातो , तो अनित्य आणि अनिश्चित असल्यामूळे राजसिक तप आहे।1181।


        मूर्खतापूर्वक, हट्टाने , स्वत:ला (शरीराला) त्रास देण्यासाठी जो तप केला जातो व दुसरांचे विनाशासाठी केला जाणारा तप तामसिक म्हटला जातो|।19।।


तीन प्रकाचे दान

        “दान देणे कर्तव्य आहे” या भावनेने, प्रत्युपकार करण्यात असमर्थ व्यक्तिला व देश तिर्थस्थानी , पुण्यकाल आणि योग्य व्यक्तिला जो दान दिला जातो, सात्विक दान म्हटला जातो।1201।


        परंतु प्रत्युपकाराच्या हेतूने ,फल उद्देश्य करून व प्रायश्चित झाल्या नंतर जो दान दिला जातो, तो राजसिक आहे।।211।


        अयोग्य स्थानात व अयोग्य वेळी ,जो दान अयोग्य पात्राला(व्यक्तिला) दिला जातो. तिरस्कार आणि अन्यायपूर्वक केलेला तो (दान) तामस म्हटला जातो।।221।


        ऊं तत्‌ सत्‌ -“निर्देश्क ब्रह्माचे” नाव तीन प्रकारे सांगितले गेले आहेत. त्यांचे द्वारा प्राचीनकाळात ब्राह्मणगण, वेद समूह आणि यज्ञसमूहांचे निर्मिती झाले आहेत।।231।


        या ऊँ शब्दांचे उच्चारण करूनच वेदवादियांचे शास्त्रोक्त, यज्ञ, दान, तप , कर्म आदि सर्व सदैव अनुष्ठित(आरम्भ) होतात।।241।


        “तत्‌” या नावने संबोधित होणारे परमात्मा हेच सर्व आहे, या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दानरूप सर्व क्रिया मोक्ष इच्छित (कल्याणकारी) पूरूषांकडून केला जातो ।1251।


        हे पार्थ ! ब्रह्मतत्व आणि ब्रह्मवादि तत्वात या “ सत्‌” शब्दाचा प्रयोग होतो. तसेच मंगळ करणारे कार्यांमध्ये सुधा “तत्‌ “ या शब्दाचा प्रयोग केला जातो।।1261।


        तसेच यज्ञ, तप व दान यांमध्ये जी स्थिती (सात्विक बुध्दि) असते त्याला “सत्‌” असे म्हणतात, आणि त्या परमाल्येसाठी केलेले जे निश्चय कर्म आहेत, त्यालाही “सत्‌” असे

म्हटले जातात ।1271।


        हे अर्जुना ! अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य (असत्‌ असल्याने) ते मेल्यावर ना या(इह)लोकी लाभदायी आणि परलोकीहि (लाभत) नाही ।1281।

मूळ सतराव्या अध्यायाची समाप्ती

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील श्रद्धात्रयविभागयोग नावाचा हा सतरावा अध्याय समाप्त झाला. ॥ १७ ॥

👇🏻

श्रीमद्भागवत गीता | अध्याय १८ (मोक्षसंन्यास योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 18 (Mokshasannyas yog) maulimajhi-blogger

Maulimajhi-blogger


धन्यवाद !



Copyright by :DeviAnaghaVedic Vigyan

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.