श्रीमद्भागवत गीता | अध्याय ४ ( ज्ञानयोग ) | Srimadbhagavata Gita | Adhyay 4 ( Dyanyog ) maulimajhi-blogger
श्रीमद्भागवत गीता | अध्याय ४ ( ज्ञानयोग ) | Srimadbhagavata Gita | Adhyay 4 ( Dyanyog ) maulimajhi-blogger
माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉 Download
माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join
श्रीमद्भगवद्गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग)
अथ चतुर्थोऽध्यायः
श्रीभगवानुवाच : इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वन्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ ४-१ ॥
एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप ॥ ४-२ ॥
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ४-३ ॥
अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः ।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४-४ ॥
श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप ॥ ४-५ ॥
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया ॥ ४-६ ॥
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ४-७ ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ४-९ ॥
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ ४-१० ॥
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ४-११ ॥
काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ ४-१२ ॥
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ॥ ४-१३ ॥
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥
एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः ।
कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥ ४-१५ ॥
किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ ४-१६ ॥
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ ४-१७ ॥
कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥ ४-१८ ॥
यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ ४-१९ ॥
त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥ ४-२० ॥
निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ ४-२१ ॥
यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः ।
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥ ४-२२ ॥
गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ ४-२३ ॥
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ ४-२४ ॥
दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥ ४-२५ ॥
श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥ ४-२६ ॥
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥ ४-२७ ॥
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ ४-२८ ॥
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥ ४-२९ ॥
अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति । सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ४-३० ॥
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥
श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परन्तप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ४-३३ ॥
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥
यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥ ४-३५ ॥
अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि ॥ ४-३६ ॥
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥ ४-३७ ॥
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ४-३८ ॥
श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ४-३९ ॥
अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४-४० ॥
योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम् ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ॥ ४-४१ ॥
तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४-४२ ॥
मूळ चौथ्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
गीता वाचताना प्ले करा
|| अध्याय चौथा ||
संजय धूतराष्ट्राला म्हणाले-
“हे राजा धुतराष्ट्र!, श्रीकृष्ण अर्जुनाला जे काही गूज सांगत आहे ते अर्जुनाचे केवढे भाग्य वसुदेवाला सांगितले नाही सनकादिकांना ,देवकीला सांगितला नाही, लक्ष्मीला सुधा हा योग सांगितला नाही ! अर्जुनावर त्याचे अलोट प्रेम आहे।
श्रीभगवान म्हणाले-
"मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता सुर्याणे मनुला सांगितला आणि मनूने आपल्या पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला।।1।।
हे परंतप अर्जूना ! अशा प्रकारे पंरपरेने प्राप्त हा योग राजर्षिनी जाणला. परन्तु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर (देहबुध्दि वाढल्याने) नष्टप्राय होऊन गेला 11211
तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस. म्हणुन तोच पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे .कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे।131।
अर्जुन म्हणाला-
आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा .तर मग आपणच आरंभी सूर्याला हा योग सांगितला होता, हे कसे समजू ?।।4। |
श्रीभगवान म्हणाले-
हे अर्जुना ! माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झाले आहेत. मला माहीत आहे पण तुला ते माहीत नाही, 11511
मी जन्मरहित ,अविनाशी व सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतिला (सच्विदांनद स्वरूपाला) स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो ।।6।।
हे भारता ! जेव्हा जेव्हा धर्माचा नाश आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले नित्य देहरूप रचतो म्हणजे आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो।।॥7।।
माझ्या एकांत भक्तांच्या उद्धारासाठी ,दुष्टांचा विनाश आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगयुगात प्रकट होतो।।181।
हे अर्जुना ! माझे जन्म ,कर्म दिव्य व अप्राकृत (प्रकृति पासूण वेगळें) आहेत .असे जो मनुष्य तत्वत: जाणतो, तो शरीराच्या त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन भेटतो।।91।
पूर्वीसुद्धा ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थिर राहत होते, असे माझे आश्रय घेतलेले सर्व भक्त ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन प्रेमरूपी भक्तिला (माझा स्वरूपाला) प्राप्त झाले आहेत।।101।
हे अर्जुना ! जे भक्त मला ज्या प्रकारें भजतात मीही त्यांना त्याच प्रमाणें (भजतो) फल देतो. कारण ते सर्व (भक्तगण) सर्व प्रकारे माझ्याच मार्गांचे (गीतेचा) अनुसरण करतात.111111
या मनुष्य-लोकात कर्मफलाची इच्छा करणारे लोक देवतांची पुजा करतात . कारण कर्मापासून उत्पन्न होणारी सिध्दी व फले लौकरच मिळतात|।121।
ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य (शेतकरी,व्यापारी) आणि शूद्र (या सर्वानचे सेवा करणारे)] या चार (मनुष्य) वर्णसमूह आणि त्यांच्या कर्म विभागाने मी सृष्टि रचना केली आहे .त्या कर्मांचे मी कर्ता असूनही मला - अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज 111311
कर्म फळांची मला इच्छा नाही. त्यामुळें कर्मांचे मला बंधन होत नाही. अशा प्रकारे जो मला तत्वत: जाणतो त्याला सुधा कर्मांचे बंधन होत नाही।।141।
पूर्वीच्या मुमुक्षूंनी (राजा जनकादिक ) सुध्दा असे जाणुनच सर्व कर्मे केली आहेत. म्हणून तू पण पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मच कर|1151।
कर्म काय व अकर्म काय यांच्या व विषयी बुद्धीमान पुरूष सुधा संभ्रमात पडतात. म्हणुन ते कर्मांचे तत्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभ संसारातून (कर्मबंधनातून ) कायमचा मुक्त होशील।16।।
कर्मांचे स्वरूप आणि अकर्मांचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. कारण तात्विक स्वरूप समजण्यास कठिण आहे।।171।
जो पुरूष कर्ममध्ये अकर्म आणि अकर्म मध्ये कर्म पाहिल, तो मनुष्यांमध्ये बुध्दिमान होय आणि तोच योगी सर्व कर्म करणारा आहे।।18।।
1॥अकर्म भाव।। 23
ज्याची सर्व शास्त्र विहित कर्मे कामनाशून्य व संकल्परहित होत असतात, तसेच ज्याची सर्व कर्म ज्ञानस्वरूप अग्नीने जाळून गेली आहेत, त्या महापुरूषाला ज्ञानी लोकही “पंडित “ म्हणतात ।1191।
जो पुरूष सर्व कर्मां मध्ये आणि त्यांच्या फलांमध्ये आसक्ति पुर्णपणे टाकून ,तसेच सांसारिक आश्रय (इच्छा) सोडून परमाल्म्यात नित्य तृप्त राहतो, तो कर्मां मध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नसतो।।120।।
जो कामनाशुन्य आहे ,ज्याचा अंत:करण चित्त व इंद्रिय संयमित (वशमध्ये) आहेत आणि सर्व भोग सामग्रींच्या त्याग केला आहे, असे वशीभूत मनुष्य केवळ शरीर संबधी कर्म करीत असला तरी तो पापग्रस्त होत नाही।1211।
जो इच्छा विरूद्ध मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो आणि त्याचा मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख -दुख इत्यादि द्रंद्रांमध्ये सहनशील, सिध्दित व असिध्दित समभाव ठेवणारा कर्मयोगी सर्व कर्म करीत असूनही त्याला कर्मबंधन होत नाही ।।22।।
ज्याची आसक्ति पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहभिमानी आणि ममत्वरहित आहे ,ज्याचे चित्त नेहमी परमात्माच्या ज्ञानात स्थिर असते ,असा केवल यज्ञासाठी कर्म करणारे माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नष्ट होतात।।23।।
ज्या यज्ञात अर्पण अर्थात खरुवाआदि ब्रह्म आहे, हवन मध्ये लागणारी द्रव्य सुधा ब्रह्म आहे, ब्रह्मरूप कर्ता द्वारा ब्रह्मरूप अग्निमध्ये आहुती देण्याची क्रिया सुधा ब्रह्म आहे , तसेच ब्रह्म कर्मात स्थिर व्यक्तिला फक्त ब्रह्मच (फल) प्राप्त करने योग्य आहे ।।1241।
दुसरे काही योगी देवी पूजारूपी यज्ञाचे उपासना उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात , तर इतर ज्ञानयोगीजन ब्रह्मरूप अगम्नित यज्ञांच्या द्वारा आत्मरूपी यज्ञाला आहुती देतात 112511
दुसरे काही योगी 'कान' इत्यादि इन्द्रिये संयमरूपी अग्नीत हवन करतात ,तर इतर अन्य (गृहस्तगण) इन्द्रिरूपी अग्नीत शब्दादि-विषयांचे हवन करतात।।261।
अन्य योगीगण इन्ट्रियांच्या व प्राणांचे (प्राण-आपाण वायुचे) सर्व क्रियांना ज्ञानाने प्रकाशीत आत्मसंयम योगरूपी अग्निमध्ये हवन करतात|1271।
हे अर्जुना ! काही पुरूष द्रव्यविषयक(अन्न दानादि) यज्ञ करतात, काहीजण तपर्श्वर्या-रूपी यज्ञ आणि काही योग-अभ्यासरूपी यज्ञ करतात. इतर काही वेदांचे स्वाध्याय (अध्ययन) व त्यांचे ज्ञान(अर्थ) रूपी यज्ञ करतात, ते सर्व प्रयत्नशील कडक(त्रास दायक) व्रते करनारे आहेत ।128।।
अन्य काही योगीजन आपल्या अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात .तसेच दुसरे काही योगी प्राण-वायूमध्ये अपान-वायूचे हवन करतात ।।129।।
तसेच काही योगी प्राणात अपानवायुचे व अपानामध्ये प्राणवायुची आहूती देतात, आणि कोणी कोणी दोन्ही वायुचे गती थांबवून प्राणायम पारायण होतात. कितीतरी अल्प आहार(उपवास) करून प्राणांचे प्राणातच हवन करीत असतात ।1301।
हे सर्व साधक यज्ञांना जाणणारे आहेत. ते यज्ञांचे द्वारा पापांच नाश करून यज्ञवशिष्ट अमृत फळांचा (भोग-ऐश्र्वर्य-सिध्दी) भोग घेवून सनातन ब्रह्माला प्राप्त होतात 131
हे कुरूश्रेष्ठ अर्जुना ! जो यज्ञ करीत नाही त्याला (अल्प सुखविशिष्ट) मनुष्यलोक सुधा सुखदायक नाही , मग अन्य लोक कसे सुखदायक असतील।1321।
असे प्रकारे अनेक प्रकाराचे यज्ञ ब्रह्मदेवाचे मुखातून विस्तृत रूपात वर्णित झाले आहेत. त्याना तू सर्व “कर्मजनित (वाणी-मन-कायादि क्रिया पासुन उत्पन्न) जाण, असे प्रकारे तू मोक्षाला प्राप्त करशील।।331।
हे परंतप अर्जुना ! ज्ञानयज्ञ द्रव्यमय यज्ञा पासून श्रेष्ठ आहे .कारण सर्व कर्म ज्ञानरूपी (अग्नीत) अर्थांमध्ये समाप्त (हवन) होतात। 34 |
ते ज्ञान तू तत्वज्ञानी लोकांकडे जाऊन समजून घे, त्यांना साष्टांग नमस्कार करून, सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्म तत्वला उतम प्रकारे जाणणारे ते ज्ञानी तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील ।1351।
जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस. तसेच हे अर्जुना! त्या ज्ञानामुळे तू सर्व जीवाला पूर्णपणे प्रथम आत्म्यात आणि नंतर मज सच्विदानंद परमात्म्यात पाहशील ।1361।
जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असल्यास , तरी ज्ञानरूपी नौकेने तू खात्रीने संपूर्ण पापरूपी समुद्राला चांगल्या प्रकारे तरून जाशील ।1371।
कारण हे अर्जुना ! ज्याप्रमाणे पेटलेला अग्नि इन्धनाचा राख करतो, त्याच प्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्माचा राख रांगोळी (भस्म) करतो ।।38।।
या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने निष्काम कर्मयोगाने अंत:करण शुध्द झालेल्या व्यक्ति सहजच आपल्या आमच्यात (हृदयात) प्राप्त करून घेतात ।।391।
श्रद्धालु , जितेंद्रिय (इंद्रिय संयम) साधना मध्ये तत्पर राहणारा व्यक्ति ज्ञान मिळवितो, आणि ज्ञान झाल्यावर तो तत्काल भगवंत प्राप्तीस्वरूप परम (परमात्म) शांति मिळवतो |।401।
अविवेकी आणि श्रद्धा नसलेला ,संशयी (मनात प्रश्न ठेवनारा) मनुष्य परमार्थ पासुन खात्रीने भ्रष्ट होतो ,संशयी माणसाला ना हा लोक आहे,ना परलोक ना सुख आहे| 41 ।
हे धनंजया ! ज्याने कर्मसंन्यास योग विधीने सर्व कर्माचा त्याग केला आहे आणि ज्ञानाने सर्व संशयाचा नाश केला आहे ,असे आत्मज्ञान तत्वयुक््त पुरूषाला कर्मबंधन होत नाही।।421।
हे भारत! तू आपल्या हृदयात स्थित व अज्ञान द्वारा उत्पन्न या संशयाला ज्ञान (आत्मज्ञान) रूपी तलवाराने नाश करून (जय-पराजय सोडून) समतत्व योगाच आश्रय घेवून युध्दाला उभा हो।।431।
(-- “परमात्म विषयी हेच ज्ञान कायमचा सुख देणारा, बाकी सर्व अज्ञान ,कायमचा दुख: देणारा आहे”------------ )
👇🏻
श्रीमद्भागवत गीता | अध्याय ५ ( कर्मसंन्यास योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 5 ( Karmsannyas Yog ) maulimajhi-blogger
Maulimajhi-blogger
Post a Comment