श्रीमद्भागवत गीता | अध्याय ३ ( कर्मयोग ) | Srimadbhagavata Gita | Adhyay 3 (KarmYog) maulimajhi-blogger

shreyash feed ads 2

श्रीमद्भागवत गीता | अध्याय ३  ( कर्मयोग  ) | Srimadbhagavata Gita | Adhyay 3 (KarmYog) maulimajhi-blogger

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 










अथ तृतीयोऽध्यायः
अर्जुन उवाच ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
< तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ ३-१ ॥



व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्‌ ॥ ३-२ ॥

श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्‌ ॥ ३-३ ॥

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ३-४ ॥

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ३-५ ॥

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्‌ ।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ३-६ ॥

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ३-७ ॥

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥ ३-८ ॥

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ३-९ ॥

सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्‌ ॥ ३-१० ॥

देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥ ३-११ ॥

इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥ ३-१२ ॥

यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः ।
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्‌ ॥ ३-१३ ॥

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ ३-१४ ॥

कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ ३-१५ ॥

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ ३-१६ ॥

यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ ३-१७ ॥

नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ ३-१८ ॥

तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ ३-१९ ॥

कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः ।
लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ॥ ३-२० ॥

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ ३-२१ ॥

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ ३-२२ ॥

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ३-२३ ॥

उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्‌ ।
सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ ३-२४ ॥

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।
कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम्‌ ॥ ३-२५ ॥

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्‌ ।
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्‌ ॥ ३-२६ ॥

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ ३-२७ ॥

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ ३-२८ ॥

प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत्‌ ॥ ३-२९ ॥

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३-३० ॥

ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३-३१ ॥

ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्‌ ।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३-३२ ॥

> सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३-३३ ॥

इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ३-३४ ॥

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्‌ ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३-३५ ॥

अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३-३६ ॥

श्रीभगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्‌ ॥ ३-३७ ॥

धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च ।
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्‌ ॥ ३-३८ ॥

आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ ३-३९ ॥

इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्‌ ॥ ३-४० ॥

तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्‌ ॥ ३-४१ ॥

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ३-४२ ॥

एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्‌ ॥ ३-४३ ॥

मूळ तिसऱ्या अध्यायाची समाप्ती



ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥



गीता वाचताना प्ले करा



|| तिसरा अध्याय ||



अर्जुन म्हणाला-

            "हे जनार्दना ! जर तुम्हांला कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ वाटतो, तर मग हे केशवा ! मला हे भयंकर कर्म ( युध्द) करण्यास का प्रवृत्त करीत आहात?।111। 

        तुम्ही मिश्रित अशा भाषणाने माझ्या बुध्दिला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ,ज्यामुळे माझे कल्याण होईल।।21।

श्रीभगवान म्हणाले-

        हे निष्पाप अर्जुना ! या जगात दोन प्रकाराची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहेत. त्यातील सांख्ययोग्यांची निष्ठा(आत्म) ज्ञानयोगाने व योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते।॥31।

        (शास्त्रोक्त )कर्म अनुष्ठान केल्याशिवाय पुरूषाला निष्कर्मरूपी ज्ञान प्राप्त होत नाही, आणि (अशुध्दचित्त असलेल्या) फक्त कर्मांचा(संन्यास) त्याग केल्याने सिद्धि प्राप्त करू शकत नाही ।141।

        नि:संशयपणे कोणीहि मनुष्य कोणत्याहि वेळी ,क्षणभर सुधा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृति पासुन उत्पन्न झालेल्या (राग- द्वेषांदि ) गुणां मुळें पराधीन (मोहवश) असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो| 151।

        जो मुर्ख मनुष्य सर्व इन्द्रिये निरोध व आवरून (ध्यानस्त) मनाने इन्द्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हंटला जातो।।6।।

        परन्तु हे अर्जुना ! जो मनुष्य मनाने इन्टद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इन्द्रियांचे द्वारा (शास्त्रोक्त) कर्मयोगाचे आचरण करतो, तोच श्रेष्ठ होय ।॥7।।

        तू शास्त्रविहित (यज्ञ,उपासादि) नित्य कर्तव्य कर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा तर कर्म करणेच श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तर तुझे शरीर निर्वाहिं सिध्द होणार नाही।181।

        यज्ञानिमित्त (श्रीविष्णु भक्ति) केल्या जाणारा निष्काम ( इच्छा न ठेवून) कर्माशिवाय दुसरे सर्व कर्म मनुष्याला बंधनकारक ( पुन: दुखरूपी जन्म देणारे) आहेत . म्हणून हे अर्जुना ! तू फळांची इच्छा सोडून यज्ञासाठी( गीतापाठ ज्ञानयज्ञ आदि जपयज्ञ) उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर।।91।

        प्रजापति ब्रह्मदेवाने आदिकाल (सृष्टि काल) आरंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की, तुम्ही या वेदवर्णित यज्ञा द्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे सर्व इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो|।10।।

        तुम्ही या यज्ञाने देवताची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हांला पुष्ट करावे. अशाप्रकारे नि:स्वार्थ पणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल।111।।

        यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागते इच्छित भोग खात्रीने देत राहतील .अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरूष स्वत: खातो, तो चोरच होय।1121।

        यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरूष सर्व पापांपासुन मुक्‍त होतात. पण जे पापी लोक स्वत:च्या शरीर-पोषणासाठी अन्न शिजवतात, ते तर पापच खातात. 111311

        सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात, अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मांमुळे घडतो।।141।

        यज्ञादि कर्मसमुदाय हे वेदांपासुन व वेद अविनाशी परमात्मा पासून उत्पन्न झालेले आहेत असे समज .यावरून हेच सिद्ध होते की , सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा  (श्रीविष्णु, नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतात ।1151।

        हे पार्थ ! जो पुरूष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालत असलेल्या सृष्टि चक्राचा अनुसरून करत नाही, व कर्तव्य कर्म करीत नाही, तो इन्द्रियांचे द्वारा भोगात रमणारा पापी व अल्प आयुष्य असलेला पुरूष व्यर्थच जगतो |।16।।

        परंतु जो मनुष्य आल्म्यातच (रत) तृप्त आणि आम्म्यातच संतुष्ट असतो, त्याला कोणतेहि कर्तव्य कर्म नाही| 11711

        त्या महापुरूषाला या विश्वात कर्म करण्याचे काही प्रयोजन असत नाही, तसेच कर्म न करण्याचेहि काही प्रयोजन असत नाही आणि त्याला सर्वत्र स्थित प्राणीमात्रांचे जरा देखिल आश्रयाची गरज पडत नाही।।181|

        म्हणुन तू नेहमी आसक्त न होता कर्तव्यकर्म चांगल्या प्रकारे करीत राहा . कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याल्या जाऊन मिळतो।।19|।

        राजर्षि जनकादी लोकही आसक्ति रहित कर्मानेच परम सिध्दिला प्राप्त झाले आहेत. तसेच लोक संग्रह (शिक्षणा) हेतू तूला आसक्ति रहित कर्म करणे उचित आहे।।201।

        श्रेष्ठ पुरूष जे जे आचरण करतो, त्याच प्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो , त्याच प्रमाणे सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो।।21।।

        हे पार्थ ! माझासाठी कुठलेही कर्तव्य कर्म नाही, कारण या तिन्ही लोकात अप्राप्त व प्राप्त करने योग्य असे ऐखादी कुठलेहि वस्तु मिळवावयाची नाही. तथापि मी माझे सर्व कर्म करीत आहे।।221।

        कारण हे पार्थ ! जर का मी सावध राहून वेळेवर कर्म केले नाही , तर मोठे नुकसान होईल . कारण मनुष्य सर्व प्रकारे माझेच मार्गांचे अनुकरण करतील।।23।।

        म्हणुन जर मी कर्तव्य कर्म केले नाही , तर हे सर्व माणस भ्रष्ट होऊन नरकात जातील आणि मी या सर्व प्रजेचा घात करणारा होईन।1241।

        हे भारता ! कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करतात, त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विठ्ठानाने लोक संग्रह (शिक्षित) करण्याच्या इच्छेने कर्म करावीत ।।25।।

        परमात्मस्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरूषाने शास्त्र विहित कर्मात असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुध्दित भ्रम निर्माण करू नये . उलट स्वत:शास्त्रविहित सर्व कर्मे अनासक्त मनाने उत्तम प्रकारे करीत त्यांच्या कडूनहि तशीच कर्मे करून घ्यावी. 112611

        वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतिच्या तीन गुणांचे प्रभावाखाली केली जातात. परन्तु अंत:करण अंहकाराने मोहित झालेले अज्ञानी पुरूष “मी कर्ता आहे” असे मानतो 112711

        पण हे महाबाहो ! आत्म गुण आणि कर्म विभाग यांचे तत्व जाणणारे ज्ञानयोगी ,जाणतो की “आत्मगुण” आणि “कर्म” वेगळे आहेत. (ते “मी” कर्तेपणाचा अभिमान करत नाही) शरीराचे इंद्रिया वेग - वेगल्या कार्यांमध्ये प्रवृत्त आहेत मानितो आणि कर्मामध्ये

        आसक्त होत नाही (सर्वान पासून मी भिन्न व स्थिर आत्मा आहे असे जाणतो) ।1281।

        प्रकतिच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली अज्ञ माणसे प्रकृतिच्या गुणात आणि कर्मात आसक्त होतात .ज्ञानी पुरूष असे अज्ञ, मंदबुध्दि लोकांचे मनाला विचलित (भ्रमित) करू नये ।1291।

        अंतर्यामी मज परमात्मा गुंतलेल्या चित्ताने (आत्म भावाने) सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संतापरहित होऊन तू युध्द कर।1301।

        जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रध्दायुक्‍्त अंत करणाने माझे या मताचे (निष्काम कर्मयोगाचे ) नेहमी अनुसरण करतात, ते सर्व कर्मबंधना पासून मुक्‍त होतात।131।।

        परन्तु , जे मानव माझ्यावर दोषारोपण करून माझ्या या मतानुसार वागत नाही, त्या मुर्खांचे तू सर्व प्रकाराचे ज्ञानाने मुकलेले आणि नष्ट (पथभ्रष्ट) झालेले समज। 321

        विवेकीजण सुधा आपल्या स्वभावनुसारच व्यवहार करतो. सर्व जीव व प्राणीमात्र आपल्या स्वभाव अनुसारच कर्म करतात, मग या विषयांत कोणाचेहि हट्टीपणा काय करील? ।1331।

        प्रत्येक इन्द्रियांच आप-अपल्या विषयां बदल राग आणि द्वेष असतो ,ते स्वाभाविक आहेत. माणसाने या दोन्हीच्या आहारी जाता कामा नये. कारण ते दोन्ही तूझ्या कल्याण मार्गात विघ्र टाकणारे मोठे शत्रु आहेत ।1341।

        चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसरे धर्माहून दोषरहित स्वर्धर्म श्रेष्ठ आहे. तरी आपल्या (क्षत्रिय) धर्मात तर मरणेहि कल्याणकारक आहे. पण दुसरांचे (ब्राह्मण,वैश्य श्रूद्रांचे) धर्म तर( मोठे) भय देणारे आहेत ।1351।


        ॥[मग मनुष्य पापचरण का करतो ।।


अर्जुन म्हणाला ,

        हे कृष्णा ! तर हा मनुष्य स्वत:ची इच्छा नसताना जबरदस्तीने कराव्यास लावणारा कोणाच्या प्रेरणेंने पापांचे (अधर्म, हिंसा,निंदा आदिचे) आचरण करतो ?।॥361।

        ॥॥काम व क्रोध हे एकच याला कारण।।


श्रीकृष्ण म्हणाले,

        हे अर्जुना! रजोगुणापासुन उत्पन्न झालेला हेच “काम”(विषय भोगन्याची इच्छा) क्रोधात परिवर्तीत होते . अतिशय उग्र ,भोगांनी कधीहि तृत्प (संतृष्ट) न होणारा व मोठा पापी आहे .हाच या विषयातील वैरी (राजा) आणि जीवांचा प्रधान शत्रु आहे ,असे तू जाण 113711

        ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धूळाने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे हे (परमात्म) ज्ञान कामामुळे (सदैव) आच्छादित ( झाकून) राहातो।।1381।

        आणि हे अर्जुना ! कधीहि तृप्त न होणारा हा कामरूपी अग्नी ज्ञानी माणसांचे कायमचा शत्रु व त्यानेच विवेकी माणसांचे (परमात्म) ज्ञान झाकून टाकले आहे।।391।

        ॥॥कामक्रोध कसे जिंकावे ?।।


        पाच इन्द्रिये, मन आणि बुद्धि हे यांचे निवास स्थान म्हटले जातात. हा कामच मन, बुद्धि आणि इन्द्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो (चुकीच्या मार्गात नेतो)।।401।

॥।मनात इच्छा ठेवू नये।।


        म्हणुन हे अर्जुना ! तू प्रथम इन्द्रियांवर ताबा ठेवून ज्ञान यांचा नाश करणारा मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक 141 ||

        इंद्रिया स्थूल शरीरापेक्षा श्रेष्ठ, बलवान आणि सुक्ष्म आहे. या इन्द्रियाहून श्रेष्ठ मन आहे व मनाहून श्रेष्ठ बुद्धि आहे आणि बुध्दिहून अत्यंत पर व श्रेष्ठ ,तो आत्मा आहे।।421।

        अशाप्रकारे जीवात्मा बुध्दिहून श्रेष्ठ आहे हे जाणून आणि बुद्धि(भक्‍्ति) द्वारे मनाला स्वाधीन करून हे महाबाहो ! तू या कामरूपी अजिंक्य शत्रुला कायमचाच मारून टाक 14311

👇🏻

श्रीमद्भागवत गीता | अध्याय ४ ( ज्ञानयोग ) | Srimadbhagavata Gita | Adhyay 4 ( Dyanyog ) maulimajhi-blogger



Maulimajhi-blogger


धन्यवाद !





Copyright by :DeviAnaghaBraja Beats

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.