श्रीमद्भागवत गीता | अध्याय १ ( अर्जुनविषाद योग ) | Srimadbhagavata Gita | adhyay 1 ( Arjunvishad Yog)

shreyash feed ads 2

श्रीमद्भागवत गीता | अध्याय १ ( अर्जुनविषाद योग ) | Srimadbhagavata Gita | adhyay 1 ( Arjunvishad Yog)

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 

अर्जुनविषाद योग



>
धृतराष्ट्र उवाच : धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥ १-१ ॥

सञ्जय उवाच: दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्‌ ॥ १-२॥

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्‌ ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ १-३ ॥

अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ १-४ ॥

धृष्टकेतुश्‍चेकितानः काशिराजश्च वीर्यवान्‌ ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ॥ १-५ ॥

युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्‌ ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥ १-६ ॥

अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥ १-७ ॥

भवान्‌ भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥ १-८ ॥

अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ १-९ ॥

अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्‌ ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्‌ ॥ १-१० ॥

अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ १-११ ॥

तस्य सञ्जनयन्‌ हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्यौच्चै: शङ्खं दध्मौ प्रतापवान्‌ ॥ १-१२ ॥

ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत्‌ ॥ १-१३ ॥

ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवाश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ॥ १-१४ ॥

पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ॥ १-१५ ॥

अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १-१६ ॥

gt; काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥ १-१७ ॥

द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक्पृथक्‌ ॥ १-१८ ॥

स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्‌ ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्‌ ॥ १-१९ ॥

अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्‌ कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ १-२० ॥

हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच : सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ १-२१ ॥

यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्‌ ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्‌ रणसमुद्यमे ॥ १-२२ ॥

सञ्जय उवाच : एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्‌ ॥ १-२४ ॥

भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्‌ ।
उवाच पार्थ पश्यैतान्‌ समवेतान्‌ कुरुनिति ॥ १-२५ ॥

सञ्जय उवाच: दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्‌ ॥ १-२ ॥

तत्रापश्यत्स्थितान्‌ पार्थः पितॄनथ पितामहान्‌ ।
आचार्यान्मातुलान्‌ भ्रातॄन्‌ पुत्रान्‌ पौत्रान्‌ सखींस्तथा ॥ १-२६ ॥

श्वशुरान्‌ सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
तान्‌ समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्‌ बन्धूनवस्थितान्‌ ॥ १-२७ ॥

कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्‌ ।
अर्जुन उवाच : दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌ ॥ १-२८ ॥

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥

गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमवतीव च मे मनः ॥ १-३० ॥

निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ १-३१ ॥

न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ १-३२ ॥

येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ १-३३ ॥

आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ १-३४ ॥

एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ १-३५ ॥

निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान्‌ हत्वैतानाततायिनः ॥ १-३६ ॥

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्‌ स्वबान्धवान्‌ ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ १-३७ ॥

यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्‌ ॥ १-३८ ॥

कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्‌ ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ १-३९ ॥

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥ १-४० ॥

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ॥ १-४१ ॥

सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥ १-४२ ॥

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ १-४३ ॥

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ १-४४ ॥

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम्‌ ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ १-४५ ॥

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्‌ ॥ १-४६ ॥

सञ्जय उवाच : एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत्‌ ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ १-४७ ॥

मूळ पहिल्या अध्यायाची समाप्ती:
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥



गीता वाचताना प्ले करा





घृतराष्ट्र म्हणाला,

       "हे संजया ! धर्मश्रेत्रात व कुरूश्रेत्रात युध्दासाठी एकत्रित झालेले माझे पुत्रांनी आणि पांडू पुत्रांनी त्यावेळी काय केले?"

संजय म्हणाला,

        हे महाराज ! पांडवांच्या  सेन्याला रणनीतीपुर्ण अवस्थेत पाहून दुर्योधनांने द्रोणाचार्यच्या जवळ जाऊन असे वचन म्हणाला,

     "हे आचार्य ! तुमच्या बुध्दिमान शिष्याने द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने रणनीतीपुर्ण करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेन्याला पहा,

           " या सैन्यात मोठमोठी धनुष्य घेतलेले भीम, अर्जुना सारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतु, चेकितान (महाभारत के युद्ध में पांडवों की सहायता की ), बलवान, काशिराज, पुरूजित, कुन्तिभोज, नरश्रेष्ठ शैब्य ,पराक्रमी, युधामन्यु, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वांचे महारथी आहेत."

        "हे द्विजश्रेष्ठ ! आपल्याला सूचित करण्यासाठी मी आपल्या सेन्यामध्ये जे जे सेनापति आहेत, ते मी आपल्याला सांगतो.आपण  द्रोणाचार्य, पितामह , भीष्म ,कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य ,अश्वथामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा लगा भूरिश्रवा इतरही पुष्कळ शूरवीर आहेत. जे माझ्यासाठी प्राण देण्यास तयार असून, ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्र-अस्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत."

        "भीष्मपिताम्हांनी(पक्षपाती) रक्षण केलेले आमचे हे सैन्यबल सर्व दृष्टीने अपरिपूर्ण दिसत आहे, तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्यबल परिपूर्ण दिसत आहे, म्हणून सर्व डावपेचांच्या प्रवेशद्वारांत आप-आपल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच नि:संदेह भीष्म-पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे."

        कौरवांतील वृध्द , महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखे गर्जना करून शंख वाजवला. त्यानंतर शंख , नगारे , ढोल, मृदु'ग, शिंगे इत्यादि वाद्ये एकदम वाजू लागली आणि त्यांचा प्रचंड आवाज झाला. त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनाने दिव्य शंख वाजवले. 

        श्रीकृष्णांनी 'पान्जन्य' नावाचा आणि भयानक कृत्ये करणारे भीमाने 'पौण्ड़' नावाचा मोठा शंख फुंकिला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले.  

        श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू, या सर्वांनी, हे राजा, सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले. आकाश व पृथ्वी दणाणून सोडणारा त्या तंबुल आवाजाने कौरवांचे काळीज फाटून टाकिले.

       महाराज ! त्यानंतर ध्वजावर हनुमान असणारे अर्जुनाने युद्धाच्या त्यारीने उभ्या असलेल्या त्या कौरवांना पाहून, शस्त्रांचे वर्षाव होण्याची वेळ आली। तेव्हा धनुष्य उचलून हृषीकेश(अर्जुनाने) श्रीकृष्णाला असे म्हणाला - "हे अच्युता ! माझे रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा, 

       मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षांकडील योद्धयांचा मी अवलोकन करीतो, व मला रणसंग्रामांत कोणाबरोर लढावयाचे आहे आणि दुर्बुध्दि दुर्योधनाचे कल्याण करण्याच्या इच्छेने जे हे येथें लढणारे जमले आहेत, ते मी पाहून घेतो."

संजय म्हणाला,

    "हे धृतराष्ट्रमहाराज ! अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्येभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांसमोर उत्तम रथ उभा करून असे म्हणाले, " हे पार्थ ! युध्दासाठी जमलेल्या या कौरवांना पहा."

        त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे-पणजे, गुरू, मामा, भाऊ, मुलगे, नातू. मित्र, सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले. तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेल्या कुन्तीपुत्र अर्जुनाने शोकाकूल होऊन म्हणाला, 

अर्जुन म्हणाला,

       " हे कृष्णा ! युद्धाच्या इच्छेने (येथे) उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अव्यय गळून जात आहेत , तोंडाला कोरडे पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांचहि उभे रहात आहेत. हातातून गाण्डीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे . तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही."

     "हे केशवा ! युध्दात स्वजनांना मारून कल्याण होईल, असे मला वाटत नाही. विजयाची इच्छा नाही, राज्य नको आणि सुखही नको."

        "हे कृष्णा ! हे गोविंदा ! आम्हाला असे राज्य काय करायचे?   ज्यांच्यासाठी राज्यभोग आणि सुखादि अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्ति आणि जीवाची आशा सोडून युध्दात उभे राहले आहेत."

        "आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत."

        "ते सर्व म्हणजे गुरूजन, काका, मुलगे ,आजे ,मामा, सासरे , नातू , मेहुणे , त्याचप्रमाणे इतर संबंधी स्वत:चे प्राण आणि धन देण्यासाठी युध्दासाठी माझ्या समोर उभे आहेत."

        "म्हणून हे मधुसूदना! या लोकांनी माझे वध जरी कले, तरी देखिल मी त्यांचे हत्या करू इच्छित नाही. हे जनार्दना ! या पृथ्वीबद्दल काय म्हणायच?  त्रैलोकयाच्या राज्यांसाठी सुधां घृतराष्ट्र पुत्रांचा वध करून आम्हाला तरी कुठले सुख मिळणार आहेत? "

        "हे जनार्दना ! या सर्व आततायींना मारून आम्हांला शेवटी पापच लागणार . आपल्या बांधवाना -धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणें योग्य नाही. कारण आपल्या कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार?"

        "म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना, आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार?"

        "जरी लोभामुळे बुद्धि भ्रष्ट झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी, हे जनार्दना ! कुल-क्षयाचा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापांपासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये?"

       "कुळाचा क्षय झाला म्हणजे परंपरागत कुलधर्म नष्ट होतो आणि त्या कुळाचे धर्म सुटले म्हणजे सर्व कुळांवर अधर्माचा पगडा बसतो."

       "अधर्म माजला म्हणजे हे कृष्णा ! कुलस्त्रिया बिघडतात ; बिघडल्या म्हणजे हे वाष्णेया! वर्णव्यवस्थेचा नाश होतो, या  वर्णसंकर करणारे दोषामुळे परंपरागत जातिधर्म आणि कुलधर्म उध्वस्त होतात."

       "हे जनार्दना ! ज्यांचे कुलधर्म नाहीसे झाले आहेत, अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते, असे आम्ही ऐकत आलो आहे."

       "अरेरे! किती खेदाची गोष्ट आहे ! आम्ही बुध्दिमान असून सुद्धा राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना मारायला तयार झालो, हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त( विनंती) झालो."
 
       "जर शस्त्ररहित व आत्म रक्षनासाठी अप्रतिकार करीत मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्र-पुत्रांनी रणात ठार जरी मारले, तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल."

संजय म्हणाला,

   "रणांगणावर दु:खाने उद्विग्न (चिंतित) मनं झालेल्या अर्जुनाने एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला."

मूळ पहिल्या अध्यायाची समाप्ती


        ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अर्जुनविषादयोग नावाचा हा पहिला अध्याय समाप्त झाला. ॥ १ ॥

👇🏻

श्रीमद्भागवत गीता | अध्याय 2 ( सांख्य योग ) | Srimadbhagavata Gita | adhyay 2 ( Sankhya Yog)









Maulimajhi-blogger


धन्यवाद !




Copyright by :DeviAnaghaBraja Beats

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.