श्रीमद्भागवत गीता | अध्याय १३ (क्षेत्रक्षेत्रविभाग योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 13 (kshetrakshetravibhag yog) maulimajhi-blogger

shreyash feed ads 2

श्रीमद्भागवत गीता | अध्याय १३  (क्षेत्रक्षेत्रविभाग योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 13 (kshetrakshetravibhag yog) maulimajhi-blogger

|| क्षेत्रक्षेत्रविभाग योग ||

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 













श्रीमद्‌भगवद्‌गीता : तेरावा अध्याय (क्षेत्रक्षत्रज्ञविभागयोग)
मूळ तेराव्या अध्यायाचा प्रारंभ
अथ त्रयोदशोऽध्यायः
श्रीभगवानुवाच: इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते ।
एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १३-१ ॥

क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।
क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम ॥ १३-२ ॥

तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारि यतश्च यत्‌ ।
स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु ॥ १३-३ ॥

ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक्‌ ।
ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥ १३-४ ॥

महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च ।
इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥ १३-५ ॥

इच्छा द्वेषः सुखं दुःखं सङ्घातश्चेतना धृतिः ।
एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्‌ ॥ १३-६ ॥

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्‌ ।
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ १३-७ ॥

न्द्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च ।
जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम्‌ ॥ १३-८ ॥

असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु ।
नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥ १३-९ ॥

मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी ।
विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ १३-१० ॥

अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम्‌ ।
एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा ॥ १३-११ ॥

ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वामृतमश्नुते ।
अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥ १३-१२ ॥

सर्वतःपाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम्‌ ।
सर्वतःश्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥ १३-१३ ॥

सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम्‌ ।
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥ १३-१४ ॥

बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च ।
सूक्ष्मात्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्‌ ॥ १३-१५ ॥

अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम्‌ ।
भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥ १३-१६ ॥

ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ।
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्‌ ॥ १३-१७ ॥

इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः ।
मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥ १३-१८ ॥

प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि ।
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान्‌ ॥ १३-१९ ॥

कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ १३-२० ॥

पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान्गुणान्‌ ।
कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥ १३-२१ ॥

उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः ।
परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन्पुरुषः परः ॥ १३-२२ ॥

य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह ।
सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥ १३-२३ ॥

ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना ।
अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥ १३-२४ ॥

अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते ।
तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः ॥ १३-२५ ॥

यावत्सञ्जायते किञ्चित्सत्त्वं स्थावरजङ्गमम्‌ ।
क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥ १३-२६ ॥

समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम्‌ ।
विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ १३-२७ ॥

समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम्‌ ।
न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्‌ ॥ १३-२८ ॥

प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः ।
यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति ॥ १३-२९ ॥

यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति ।
तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा ॥ १३-३० ॥

अनादित्वान्निर्गुणत्वात्परमात्मायमव्ययः ।
शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥ १३-३१ ॥

यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते ।
सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥ १३-३२ ॥

यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः ।
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥ १३-३३ ॥

क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा ।
भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम्‌ ॥ १३-३४ ॥

मूळ तेराव्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥



गीता वाचताना प्ले करा



|| अध्याय तेरावा ||


अर्जुन म्हणाला,

        हे केशवा ! मी प्रकृति ,पुरूष, क्षेत्र क्षित्रज्ञ ज्ञान आणि ज्ञेय या सर्वांना जाणण्याची इच्छा करतो ।111।

श्रीभगवान म्हणाले,

क्षेत्र व क्षेत्रज्ञ


        हे अर्जुना! हे शरीर “क्षेत्र” या नावाने संबोधला जातो आणि जो त्याला जाणतो व त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोकांना “क्षेत्रज्ञ” असे म्हणतात ।।21।


        हे अर्जुना ! तू सर्व क्षेत्रा(सर्व शरीरां) मध्ये क्षेत्रज्ञ (संपूर्ण शरीराला जाणारा) मलाच समज आणि क्षेत्र (देह) व क्षेत्रज्ञ (परमात्मा) बदल जे तत्वत: जाणणे योग्य आहे, तेच “ज्ञान” आहे, असे माझे मत आहे।।31।


        जे क्षेत्र (शरीर) आहे , ते ज्या विकारांनी युक्‍त आहे ,ज्या कारणांपासून ते उत्पन्न झाले आहेत, तसेच ते “क्षेत्रज्ञ” (परमात्मा) जो आणि ज्या स्वरूप व प्रभावाने युक्‍त आहे. ते सर्व योडक्यात माझ्याकडून ऐक |14।।


        ते (परमात्मा) तत्व क्रषिंनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहेत आणि निरनिराळ्या वेदवाक्यांणी सुधा कीर्तित झाले आहेत. तसेच युक्तियुक्‍त, सिध्दीयुक्‍त आणि ब्रह्मसूत्रांच्या पंदानीही कीर्तित झालेले आहेत।।5।।


        पाच महाभूते, अहंकार, बुध्दि आणि( मूळ) प्रकृति तसेच दहा इन्द्रिये, एक मन आणि पाच इन्द्रियांचे विषय अर्थात शब्द ,स्पर्श , रूप ,रस, आणि गंध।16।।


        इच्छा, द्वेष, सुख, दुख, स्थूल देह, चेतना आणि धृति(धैर्य) अशा प्रकारे विकारांसहित हे क्षेत्रशरीर) थोडक्यात सांगितले गेले आहेत ।17।।


ज्ञान म्हणजे काय ?


        मानशुन्य, ढोंग न करणे, अहिंसा, दया ,क्षमा, सरलता, गुरूची सेवा, आंतर्बाह्यची शुध्दत्ता, चित्ताची स्थिरता।।81।


        मन व इन्द्रियांसह शरीराचा निग्रह, शब्दादि-स्पर्श विषयांच्या उपभोगात आसक्ति नसणे, जन्म-मृत्यु, वृद्धत्व , रोग इत्यादिमध्ये दु:खांचा वारंवार विचार न करणे| |9।।


        पुत्र, स्त्री, घर आणि धन इत्यादिंची आसक्ति (ममता) नसणे , दुसरांचे सुख-दुखात सहभागी नसणे ,तसेच प्रिय-आप्रिय वस्तु प्राप्तीमध्ये चित्त समतोल ठेवणे।| 101 |


        मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती, तसेच एकांतात शुध्द ठिकाणी राहण्याच्या स्वभाव आणि विषय आसक्त मनुष्यांच्या सहवासाची आवड नसणे|1111।


        अध्यात्म ज्ञानात नित्य स्थिती आणि तत्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा व मोक्ष त्यालाच पाहणे हे सर्व “ज्ञान” होय आणि याऊलट जे असेल ते अज्ञान होय, असे म्हटले आहे।।121।


        जो “ज्ञेय” म्हणजे जाणणे योग्य (परमात्मा) आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्य परम आनंद (मोक्ष ) मिळवतो, ते चांगल्या प्रकारे तुला सांगतो, ते नित्य ,आश्रित ,परम ब्रह्म (धाम) ज्याला “सत” आणि “असतही” म्हणता येत नाही।113।।


ज्ञेय परमात्माचे वर्णन


        तो सर्व बाजुंनी हात-पाय असलेले, डोळे ,डोके , तोंडे आणि सर्व बाजुंनी कान असलेले हे सर्व जग व्यापून राहिले आहे।1141।


        तो सर्व इन्द्रियांना आणि गुणांचे प्रकाशक (जाणणारे) आहेत, परंतु वास्तविक तो सर्व इन्द्रियांनी रहित आहे. तो आसक्तिरहित असून सुधा सर्वांचे धारण पोषण करणारे आणि निर्गुण असून सुधा गुणांचा भोग (वापरून) घेणारा आहे।1151।


        तो सर्व प्राणिमात्रांच्या आंत व बाहेर आहे. तसेच चर आणि अचरही (स्थावर-जड प्रकृति) तोच आहे, तो सुक्ष्म असल्यामुळे त्याला तू सहज जाणू शकत नाही . तसेच तो अतिशय जवळ आणि दूर स्थित आहे।1161।


        तो परमात्मा विभागरहित (एकरूप)असून सुधा संपूर्ण भुतांमध्ये वेगवेगळे पण सम (एकसारखे ) अवस्थित आहे, तू त्याला सर्वभूतांचे पालक, संहारक आणि (जीवांना) उत्पन्न करणारा जान ।॥171।


        तो ज्योतिर्मय वस्तुंना (सूर्यादिला) सुधा प्रकाश देणारा आहे, अज्ञानाच्या अत्यंत पलीकडचे आहे, तोच ज्ञान, ज्ञय आणि ज्ञानगम्य (तत्वज्ञानाने प्राप्त होणारा) आहे .तसेच सर्वांच्या हृदयांत विशेष रूपाने राहिलेला आहे।|1181।


        अशा प्रकारे क्षेत्र (शरीर) तसेच ज्ञान आणि ज्ञय (जाणणे योग्य) परमात्माचे स्वरूप थोडक्यात सांगितले आहे . माझे भक्त हे तत्वत: जाणून माझी प्रेममय भक्ति करण्यास योग्य होतात।। ।1191।


प्रकृति -पुरूष विवेक


        प्रकति आणि पुरूष हे दोन्ही अनादि आहेत, आणि राग-द्वेषादि सहा विकारसमुह तसेच सर्व(तीन) गुणसमुह प्रकृतिपासूनच उत्पन्न झालेले आहेत असे तू समझ।।201।


        कार्य व कारण यांच्या उत्पत्तिचे मूळ कारण प्रकृति आहे आणि जीवात्म्याला सुख - दु:ख उपभोग घेण्यास पुरूष(परमात्मा) हेच कारण आहे ,म्हटले आहे।।211।


        प्रकतिमध्ये राहिलेल्या पुरूष प्रकृतिपासून उत्त्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थानां भोगतो आणि प्रकृतिच्या गुणांची संगती या जीवात्म्याला बरे-वाईट योनीत जन्म घेण्यास कारण आहे।1221।


        त्या पुरूषाला देहात उपद्रष्टाजवल बसून पाहणारा) जीवापेक्षा भिन्न पुरूष ,साक्षी , निकट स्थित, धारक ,पालक, महेश्वर आणि परमात्मा वगैरे पण म्हणतात ।।1231।


        अशा रीतीने त्या पुरूषाला(परमात्म्येला) , गुणांसहित प्रकतिला जो मनुष्य तत्वत: जाणतो, तो सर्व प्रकारे कर्मे करीत असला तरी, तो पुन्हा जन्म घेत नाही।।24।।


        त्या परमात्म्येला भक्तगण ध्यान (भगवद चिंतन) द्वारा स्वतच्या हृदयात (त्या परम पुरूषाला) पाहतात, काही ज्ञानीजन साख्पयोग व योग अभ्यासा द्वारा तर कोणी कोणी कर्मयोगाने त्यांना पाहण्याची चेष्टा (इच्छा ) करतात ।।251।


        परंतु ज्यांना या प्रकारे(परमाल्म्याचे) ज्ञान होत नाही ते दुसर्या तत्वज्ञानी पुरूषांकडून श्रवण करून माझी उपासना करतात, ते पण श्रवणनिष्ठ होऊण मृत्यरूप संसारसागरला खात्रीने तरून जातात ।1261।


        हे अर्जुना ! जेवढे पण स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात, ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञच्या संयोगानेच उत्पन्न होतात, असे समज।127।।


        जो पुरूष परमेश्वराला सर्वत्र सर्वभूतांमध्ये समभावाने स्थिर असलेला पाहतो , तोच खरे अर्थाने पाहतो।।281।


        कारण जो पुरूष सर्वांमध्ये समभावाने आपल्या मनाचे द्वारा मज परमेश्वराला पाहतो तो अधोगतीला जात नाही ,तर तो परम गती मिळवतो |।29|।


        आणि जो पुरूष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृति कडून केली जात आहे, असे पाहतो आणि आम्येला अकर्ता पाहतो, तोच खरे अर्थाने पाहतो।।301।


        ज्या क्षणी हा पुरूष भुतांचे निरनिराळे भाव एका परात्म्यातच असलेले आणि परमाल्म्या पासूनच सर्व भूतांचा विस्तार झाले आहे असे जाणतो, तेव्हा तो ब्रह्म भावाला प्राप्त करतो।1311।


        हे अर्जुना ! हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही वास्तविक पणे तो कुठलेच कर्म करीत नाही आणि त्यांचे कर्म फलांनी सुधा लिप्त होत नाही।1321।


        ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्यामुळे वायुनी लिप्त होत नाही (वेगला राहतो) त्याच प्रमाणे देहात सर्वत्र व्यापून राहिलेला आत्मा निर्गुण असल्यामुळे देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही।।331।


        हे अर्जुना ! ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो , तसेच एकच आम्मा संपूर्ण क्षेत्राला(शरीराला) प्रकाशित करतो।1331।


        अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांतील भेद तसेच कार्यासह प्रकृतिपासून मुक्‍त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरूष तत्वत: जाणतात, ते महात्मे परम ब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात 11341 |


मूळ तेराव्या अध्यायाची समाप्ती


ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नावाचा हा तेरावा अध्याय समाप्त झाला. ॥ १३ ॥

👇🏻

श्रीमद्भागवत गीता | अध्याय १४ ( गुणत्रयविभाग योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 14 (GuntrayVibhag yog) maulimajhi-blogger


Maulimajhi-blogger


धन्यवाद !




Copyright by :DeviAnaghaVedic Vigyan

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.